आज पहिल्यांदाच ब्लॅक फ्रायडेची खरेदी केली. आज कामावर मजा आली. काम खूपच होते. आज ८ तासाची ड्युटी होती. Kohl's मध्ये आज जत्रा होती. Kohl's मध्ये आज सर्वांना ब्रेकफास्ट आणि जेवण होते. मी जेवण नाहि घेतले. रांगाच रांगा होत्या. दुकानाबाहेर पोलीस सेक्युरिटी होती. सकाळी वुमन्स डिपार्टमेंटला होते तर लंच नंतर men's बॅंक रजिस्टरला होते. मी माझ्यासाठी आधीच खरेदी करण्यासाठी कपडे राखून ठेवले होते. काम झाल्यावर मी कपडे ट्राय केले आणि भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले. एका top चा आवडीचा रंग आणि टी शर्टवर काहीतरी कोरलेले घ्यायचे असे बरेच वर्ष मनात होते ते ही खरेदी केले. shopping साठी सीझन सुरू झाल्याने माझे आठवड्याचे वेळापत्रक खूप हेक्टिक आहे. रिटर्न्स तर इतके येत आहेत की रॅक भरून ते ओसंडून वाहत आहे. कपडे खाली पडत आहे. मि आज women's departmentला होते. माझ्याबरोबर कामाला होती ती म्हणाली मी रिटर्न्स जागेवर ठेवते. यु जस्ट कीप फोल्डिंग. मी कपडे फोल्ड करत होते आणि कस्टमर परत कपडे उचकटत होते. Black Friday deal प्रत्येक गोष्टीवर आठवडाभर होते. मला एक मॅनेजर म्हणाली की लंच नंतर मेन्स bank रजिस्टरला जा. मागच्या आठवड्यात तर सकाळी ९ ते १ bank register ला होते की मला एक कणही हालता आले नाही. भुकेने व्याकुळ झाले होते. स्टोअर पिक अप and online order filling वेगळेच. वेळ मिळाला की लिहीन एकेक करत सर्व. Wish you All Happy Holidays !
Wednesday, December 08, 2021
Tuesday, November 30, 2021
आठवणी खिडकीच्या (१)
Friday, August 13, 2021
सई व तिचे आजोबा 🙂
Friday, July 02, 2021
इंगल्स मार्केट ... (९)
Monday, June 28, 2021
इंगल्स मार्केट ... (८)
Saturday, June 26, 2021
इंगल्स मार्केट ... (७)
३ पॅक सॅंडविच म्हणजे कठिण आणि किचकट, उत्पादन विभागात आम्हां तिघींपैकी कुणालाच हे बनवणे आवडायचे नाही. दुपारी २ नंतर हे बनायचे. अगदीच पटापट विकले गेले तर मात्र सर्व काम सोडुन आधी हेच बनवायलाघ्यायचो. आणि बनवायचे असतिल तर फ्रिजर मधून ते सकाळिच आणायला लागायचे म्हणजे रुम टेंप्रेचरला यायला अवधी असायचा. जर का आणायचे राहिले तर मात्र अरेरे ! किती त्रास होतोय कापायला असे व्हायचे. मी हे बनवायचे पण अगदीच कुणी नाही बनवले तर बनवायचे. नाहीतर मी आणि कार्मेन मिळुन बनवायचो. लुलु तिचे सुशीचे काम झाले की आमच्या मदतीला यायची आणि ती हे सॅंडविच बनवायची. याकरता जे ग्रीन लीफ लेट्युस लागते ते आम्ही प्रोड्युस डिपार्टमेंट मधुन आणायचो. हे धुवुन घ्यायला लागायचे. नंतर ते चाळणीतनिथळत ठेवायचे. ३ पक संडविचला संपूर्ण टेबल रिकामे असले तर चांगले व्हायचे. १० सॅंडविच बनवायला टेबल भरुन जायचे.
हे गोल आकाराचे ब्रेड मधोमधकापुन त्याच्या वरचा भाग, (मी त्याला टोप्या म्हणायचे. :D ) ब्रेड कापला की एकावर एक टोप्या ठेवायला लागायच्या. खालचे डगले (कापलेल्या ब्रेडचा खालचा भाग )एका खाली एक असे पुर्ण टेबल भरुन जायचे. मग सर्वांवर आधी लेट्युसची पाने, नंतर ठरलेले २ औंस मांस ठेवायचे व नंतर चिझच्या चकत्या ठेवायच्या. प्रत्येक डगल्यावर वेगवेगळे मांस. हे सर्व झाले की प्रत्येक डगल्यावर ज्याच्या त्याच्या टोप्या ठेवायच्या. :D मग प्रत्येक सॅंडविच एका कागदामध्ये रॅप करायचा. रॅप करायचा कागद सुळसुळीत आणि कापायही कडक असायचा. रॅप करायचीपण एक पद्धत आहे. विकी आणि कार्मेनची पद्धत वेगवेगळी होती. मला कार्मेनच्या पद्धतीने रॅप करायचे.
Wednesday, June 02, 2021
सायकल डे
Saturday, May 22, 2021
ओढ
काल स्वप्नात आला होता "तो"
नेत्रकटाक्ष झाले होते बरेचवेळा
हसलो होते दोघे एकमेकांकडे पाहून
आता परत कधी भेट?
ती दुसरीकडे स्थलान्तरीत ....
आणि कदाचित तोही बघत असेल
नक्किच ! तिचा विश्वास
Tuesday, April 27, 2021
अघटित (३)
Friday, April 23, 2021
अमेरिकेतील फर्निचरच्या कहाण्या... (२)
अमेरिकेतील फर्निचरच्या कहाण्या... (1)
Monday, March 22, 2021
२०२० डायरी
आम्ही नेटफ्लीक्सवर बघितलेले सिनेमे आणि वेबसिरिजची यादी इथे देत आहे.
Friday, February 26, 2021
२६ फेब्रुवारी २०२१
आजचा दिवस तुम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांमुळे खूपच छान गेला ! अनेक धन्यवाद ! आजचा दिवस लक्षात कायमच असतो पण काहीवेळा वेगळे असे काही घडले तर मी ते रोजनिशीमध्ये लिहिते. तर आज सकाळी उठल्यावर तुमच्या शुभेच्छा पाहिल्या. फोनवर आणि ईमेलमधूनही शुभेच्छा आल्या. आज मी विशेष असे काहीच केले नाही पण तरी वेगळे काहीतरी केले. दुपारच्या जेवणाच्या वेळी २ पोळ्या लाटल्याआणि आदल्या दिवशीची उसळ त्याबरोबर खाल्ली. मला नोकरी लागल्यापासून म्हणजे २०१५ सालापासून मी रात्रीचे जेवण आणिदुसऱ्या दिवशीचे जेवण एकत्रच बनवते. आता घरीच आहे गेले वर्षभर पण तरीही तेच कायम ठेवले आहे. इथे राहणारे सगळेच असे करतात.
Friday, February 19, 2021
वास्तू (९)