रविवारी ग्रोसरी केली नव्हती म्हणून बाकीचीही ग्रोसरी केली. त्यामध्ये आज हिरवी द्राक्षे बरीच आली होती, ती घेतली. अनसॉल्टेड दाणे घेतले. कानातले तर मी नेहमीच बघते. त्यात मी आज कानातले भोपळे घेतले.
बाकी नेहमीचीच आठवड्याची भाजी, दुध, दही, कांदे बटाटे वगैरे खरेदी केली. विनू मला घरी आणण्यासाठी वालमार्ट मध्ये आला. आज दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते. मला उद्या कामावर जायचे नसल्याने आज निवांतपणा आहे. उद्याची पोळी भाजी करून झोपायच्या आधी या वेगळ्या दिवसाची रोजनिशी टंकत आहे. कानातले भोपळे आता मी कामावर जाईन तेव्हा घालीन आणि आज मला दुकानात बॅकपॅकही छान मिळून गेली.
१० डॉलर्सची मुळ किंमत मला सेल मध्ये ३ डॉलर्स ला मिळाली. ती पण एखाद दिवशी कामावर घेऊन जाईन.
त्यात जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली, स्वेटर आणि टोपी हे सर्व नीट मावेल का ते आधी बघितले पाहिजे. मावल्यास तीच कामावर जाण्याची बॅग करीन. अर्थात त्याला पर्स सारखे आतले कप्पे नाहीयेत त्यामुळे बाकीचे सर्व कश्यात ठेवायचे? म्हणजे पैसे, क्रेडीट कार्ड, फोन,
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे.
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे.