Saturday, May 22, 2021

ओढ

 काल स्वप्नात आला होता "तो"
नेत्रकटाक्ष झाले होते बरेचवेळा
हसलो होते दोघे एकमेकांकडे पाहून

वाट बघायची ती !
आता परत कधी भेट?
तुटातूट तर झालीच नव्हती
पण ओढ मात्र लागली होती
आता त्यांची भेट होत नाही
तिला त्याची आठवण येत राहते
कधीतरी क्वचित
त्यालाही येत असेलच
ते दोघे वेगळ्या देशातले
पण प्रेमाची भाषा दोघांची एकच
ती दुसरीकडे स्थलान्तरीत ....


कधी आठवणीत तर कधी स्वप्नात
त्यालाही येत असेल का माझी आठवण
नक्कीच ! तिचा विश्वास
कारण तिने तर त्याला
साठवलं आहे कायमच आठवणीत
आणि कदाचित त्यानेही !
नाहीतर स्वप्नात का येईल तो!
मधूनच एखाद वेळी बघते ती त्याला इंटरनेट वर ! :)
आणि कदाचित तोही बघत असेल
नक्किच ! तिचा विश्वास
रोहिणी गोरे