Monday, December 31, 2012
नव वर्ष शुभेच्छा !
तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, आनंदाचे, उत्साहाचे, उत्कर्षाचे, चैतन्याचे, जावो ही हार्दिक शुभेच्छा !
Wednesday, December 19, 2012
पक्षी
आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटच्या समोर एक तळे आहे. तिथे दर हिवाळ्यात सीगल्स येतात. आज खूप आले होते. त्यांची बसण्याची जागा छतावर असते. अधुनमधून इकडे तिकडे बागडत असतात. तळ्यात पोहत असतात. खूप मजा आली आज हे सर्व पाहताना. मला सीगल्स खूपच आवडतात. निरागस असतात. उंच उंच उडून परत छतावर बसतात. हे सर्व पहायला खूप छान वाटते.
Saturday, November 24, 2012
मनात भरून राहिलेले!.... (२)
मनात भरून राहिलेल्या लेखातील हा दुसरा भाग लिहीत आहे. काजुकतली हा
प्रकार सर्व मेवामिठाईंमध्ये मला खूप आवडतो. काजुकतली वर जो चांदीचा वर्ख
असतो तो तर माझ्या मनात नुसता भरून राहिला नाहीये तर रुतून बसलाय! आणि
त्यातुनही पूर्वी काजुकतली गुलाबी रंगाची मिळायची. त्यावर प्लॅस्टीकचे
कव्हर असायचे. एका वडीला एक कव्हर असायचे. हा गुलाबी रंग काय वर्णावा !
इतका सुरेख. चॉकलेट, गोळ्या, बिस्कीटे मध्ये श्रीखंडाच्या गोल गोळ्या,
रंगही श्रीखंडी ! मनात भरल्या आहेत अगदी.
माझ्या माहेरी बाग होती. जाईचा वेल होता. अनेक गुलाबांची झाडे होती. त्यामुळे केसांमध्ये भरपूर फुले माळली आहेत. या फुले माळण्यामध्ये डाव्या बाजुला गजरे किंवा फुले घालायचो आम्ही बहीणी. काहीतरी वेगळे नवीन छान दिसायचे त्यावेळी. गजरे, फुले यामध्ये पूर्वी वेण्या नावाचा एक फुलांचा प्रकार मिळायचा. या वेण्या सरळ असायच्या. भरगच्च फुलांनी बांधलेल्या व जाड दोऱ्यांमधून विणलेल्या. त्यात मला शेवंतीची वेणी अशीच मनात भरून राहिली आहे. काय दिसायही ही वेणी ! बघत बसावे अगदी. हा वेणी नामक प्रकार खूप मनात भरून राहिला आहे. आज मी एक टॉप खरेदी केला. छान आहे. हा माझ्या मनात भरून राहील आता. वेगळा रंग, वेगळी फॅशन, या टॉपवरून मी दहावीत असताना एक अम्रेला कट फ्रॉक असाच आठवला. तोही साधारण आता घेतलेल्या रंगासारखाच होता. खूप वेगळा. तो मी तेव्हा घेतला नाही. अंधुक आठवत आहे. हा फ्रॉक माझ्या मनात त्यावेळी खूप भरून राहिला होता. या सर्व गोष्टींमध्ये काही गोष्टी किती काठोकाठ भरून राहतात ना !
कॉलेजमध्ये असताना अनेक पिशव्या होत्या. त्यात शबनम नावाची कापडी गळ्यात अडकवायची पिशवी होती ती तर आवडायचीच पण एक लोकरीच्या धाग्याने विणलेले एक आयताकृती होते. लांब घागे विणले होते. त्यात चार वह्या भरायचे. ती पर्स हातात धरता यायची नाही. ताणून जायची म्हणून मग मी त्यात कॉलेज मधल्या चार वह्या घालून त्याची गुंडाळी करून डाव्या हातात धरायचे आणि कॉलेजला जायचे्. हा प्रकार मला खूपच आवडला होता आणि खूप मनात भरून राहिलेला आहे. हे लोकरीचे धागे आकाशी आणि राणी रंगाचे होते. हे रंगही मनात भरले होते माझ्या !
गोदरेजचे निळे कपाट असेच मनात भरले आहे. ते अजूनही आमच्या भारताच्या घरात आहे. आमच्या घरात तेव्हा काहीही नव्हते. संसाराला नुकती सुरवात झाली होती. मी बाजारात जाताना गोदरेजच्या शोरूम वरून जायचे व मला अगदी सहज त्या शोरूम मधले ते निळ्या रंगाचे कपाट दिसायचे. हा निळा रंग पण खूपच वेगळा होता. त्याचे वर्णन कराता येणार नाही. कपाट घ्यायचे तर हेच घ्यायचे म्हणून ठरवले आणि आमची संसाराची सुरवात या कपाटानेच झाली.
आईकडे जे कपाट होते ते एका कारखान्यातून बनवून घेतले होते. खूप दणकट होते, अजूनही आहे. या कपाटात डावीकडे बांगड्या ठेवण्यासाठी एक जाड लाकडी दांडा होता तो काढून त्यामध्ये विकत घेतलेल्या बांगड्या ठेवायचो. तो परत दोन्हीकडून लावता यायचा. छान होता. बांगड्या ठेवण्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या त्यात ठेवल्या जायच्या. आईच्या काचेच्या बांगड्या, आमच्या दोघींच्या कचकड्याच्या, खड्याच्या बांगड्या. प्लेन बांगड्या, असे वेगवेगळे प्रकार या दांड्यावर खूप उठून दिसायचे. हा प्रकार असाचा मनात भरला आहे.
पूर्वी आम्ही दोघी बहिणी नाकामध्ये चमकी घालायचो. चमकीमध्ये पांढऱ्या खड्याची चमकीच आम्हाला दोघींना आवडायची. सगळ्या दागिन्यांमध्ये चमकी व पायाच्या बोटात घालायची जोडवी अशीच मनात भरलेली आहे. खरे तर जोडवी लग्न झाल्यावर घालायची असते पण मी कॉलेजमध्ये असताना पायाच्या मधल्या बोटात घुंगरू असलेल्य्य जोडवी घालायचे. तुळशी बागेत घेतलेली ही जोडवी अशीच मनात भरून राहिली आहे.
मनात भरून राहिलेले अजून संपलेले नाही, ते पुढच्या लेखात, असेच आठवले की लिहीन.

Wednesday, November 14, 2012
Tuesday, November 13, 2012
खेड्यामधले घर कौलारू !
क्लेम्सनमधल्या कॉलेज ऍव्हेन्युच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या सुमारास आम्ही राहायला आलो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे सर्व सुखसोयीने सज्ज असलेली फक्त एकच खोली! त्या खोलीमध्ये आमच्या मोठाल्या बॅगा व काही सामान ठेवले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसल्या बसल्या संसाराला लागणारे सर्व सामान एकाच खोलीत कसे काय लावायचे याचा विचार डोक्यात चालू झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. सुरुवाततर करू म्हणजे आपोआप सुचेल असा विचार करत कामाला लागले. सर्वात प्रथम नव्या कोऱ्या गादीवर नवी कोरी चादर अंथरली व बेडरूम तयार केली. उशांना अभ्रे घातले. या चादर व अभ्र्यांचे उद्घाटन या स्टुडिओमध्ये होणार होते तर! या नव्या कोऱ्या गादीचा योगही आमच्याकडेच होता. क्लेम्सनमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा एका भारतीय कुटुंबाकडे आठ दिवस राहिलो होतो. त्या मैत्रिणीचे घर मोठे होते. त्या जागेत आधीचा राहणारा कुणीतरी ही आकाशी रंगाची गादी अशीच सोडून गेला होता. ती मैत्रीण म्हणाली, "ही गादी आम्ही वापरत नाही तर तुम्ही घेऊन जा. चांगली आहे. तुम्हाला नवीन घरात उपयोगी पडेल. " गादी नवीकोरी दिसत होती म्हणून घेऊन आलो. त्याचप्रमाणे या स्टुडिओमध्ये एक खुर्ची अशीच कोणीतरी सोडून गेले होते. विद्यापीठात फर्निचर असेच फिरत असते. एक तर कोणी विकत घेत नाही, घेतले तर मित्रमैत्रिणींना फर्निचर देऊन जातात. ते बरोबर घेऊन जाण्यासाठीचा खर्च इथे जास्त असतो. तेव्हा बसायला खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी तयार झाली.
आमच्याकडे पहिलावाहिला खरेदी केलेला जो टेलिव्हिजन होता तो ठेवण्याकरता स्टूलवजा काहीतरी घ्यायला हवे होते. काय घ्यावे आणि कोणत्या दुकानात जावे ते ठरवून तिसऱ्या दिवशी दुकानात जायला बाहेर पडले. त्या दिवशी अगदी मनासारखी खरेदी झाली. एक छोटा लाकडी टीपॉय घेतला आणि प्लॅस्टिकचे तीन ड्रॉअर असलेला कपाटवजा स्टँड घेतला. टीपॉयवर एक अभ्रा अंथरला आणि त्यावर आमचा १३ इंची टिल्लू टीव्ही ठेवला. त्या टीपॉयच्या खाली एक कप्पा होता, तिथे आमचा व्हिसीआर ठेवला व त्यावरती सिनेमांच्या कॅसेटी ठेवल्या. टीव्हीच्या आजूबाजूला रिकामी असलेली जागा ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांसाठी निश्चितकेली. टीव्ही विराजमान झाल्यावर त्या खोलीला थोडे रूप आले. त्या खोलीत जी खुर्ची होती तिचे पाय अर्धगोलाकार होते त्यामुळे ही खुर्ची खूपच आरामदायी होती. ज्याला झोपून टीव्ही बघायचा आहे तो गादीवर आडवा व्हायचा व ज्याला बसून टीव्ही बघायचा आहे तो खुर्चीवर बसायचा आणि हो, मला टीव्ही नसलेल्या स्वयंपाकघरातूनही बघता यायचा बरं का! पोळी भाजी करताना मागे वळून मी टीव्ही वर काय चालू आहे ते पाहत असे. "वन बीएचके इन वन रूम" साकार होत होते. भारतामध्ये काही जणांचे एका खोलीतले संसार पाहिले होते आणि ते नीटनेटके होते. आमची एका खोलीत संसार करण्याची ही पहिलीच वेळ होती. नवीन अनुभव होता. प्लॅस्टिकचा कपाटासारखा दिसणारा स्टँड आवडला म्हणून आणला पण याचे काय करायचे, काय ठेवायचे यामध्ये, काही सुचत नव्हते आणि एकदा अशीच गादीवर आडवी पडलेली असताना एकदम सुचले. चटदिशी उठले आणि जे सुचले होते ते लगेच करूनही टाकले. त्या प्लॅस्टिकच्या छोट्या कपाटात पहिल्या कप्यात मी महत्त्वाची बिले ठेवण्याकरता जागा केली. दुसऱ्यात नेलकटर, स्टेप्लर, कात्री, पट्टी, पत्रावर चिकटवण्याचे स्टँप असे सर्व काही ठेवले. सर्वात खालच्या कप्यात भारतातून आणलेल्या जुन्या हिंदी गाण्यांच्या कॅसेट ठेवल्या. सर्वात वरती भारतातून आणलेले छोटे घड्याळ ठेवले आणि शिवाय फोनही ठेवला. या छोट्या कपाटाची जागा मी टीपॉयच्या बाजूला केली व त्याच्या बाजूला आमचा बेड. सकाळी उठताना घड्याळात किती वाजले हे सहज दिसायचे. त्या स्टँडचा रंग निळा होता. त्याचे मी मनातल्या मनात खूप कौतुक केले. ध्यानीमनी नसताना आवडले आणि घेतले, आणि त्याचा इतका छान उपयोग होत आहे ते पाहून खूप आनंद झाला.
या जागेत मला सर्वात जे काही आवडले असेल ते म्हणजे या खोलीचे दार आणि या दाराला लागूनच असलेले दुसरे जाळीचे दार! या जाळीच्या दाराला एक मोठा आडवा हूक होता तो मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला छोट्या गोल हुकामध्ये अडकवला की मुख्य दार सताड उघडे ठेवले तरी चालायचे. जागेत हवा यायला हेच दार होते. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद होती. मी अनेकदा हवा खेळती राहण्यासाठी हे दार उघडे ठेवायचे व जाळीच्या दारातून समोर असलेली हिरवळ बघायचे. याच जाळीच्या दारातून रपारप पडणाऱ्या पावसाकडे बघायला मला खूप छान वाटायचे. या घराच्या दरवाज्याला लागूनच एक ओसरी होती. पाऊस पडताना ओसरीच्या बाहेर पावसाच्या पागोळ्या पडायच्या. ओसरीवर उभे राहिले की अगदी कोकणातले वातावरण तयार व्हायचे. सर्व बाजूंनी हिरवीगार झाडी, ओसरी, मुसळधार पाऊस, पाऊस पडत असताना छतावरचे पाणी ओघळून बनलेल्या असंख्य पागोळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे. काही वेळेला पावसाचा अधिक आनंद लुटण्यासाठी आले घातलेल्या गरम चहाचा कप हातात असायचा. मन आपोआप गाणे गुणगुणायचे - खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू! या खोलीच्या एका भिंतीला एक भली मोठी खिडकी होती. पूर्ण काच असलेल्या खिडकीला जाळ्या होत्या व काचेची सरकती दारे होती. या सरकत्या दारातून हवा येण्यासाठी मी खिडकी काही वेळा अर्धी उघडी ठेवायचे. या खिडकीला पडदे मी घरीच शिवले. दुकानातून नाजूक फुले असलेले कापड आणले व सुई-दोऱ्याने टिपा घालून छान पडदे शिवले. दुपारचे जेवण झाले की गादीवर बसून मी काही वेळा काहीतरी लिहीत बसले की मधूनच नजर खिडकीबाहेरच्या उंच व काटकुळ्या झाडांकडे जायची. लिहायचा कंटाळा आला की पडदे लावून अंधार करून थोडा वेळ आडवी व्हायचे. थोडी डुलकी लागायची. झोपताना जाळीचे दार लावून मुख्य दार थोडे किलकिले करून ठेवायचे. बाहेरून कोणी आले की दरवाज्यावरची बेल वाजवायचे. जेव्हा उठून दार उघडायला जायचे तेव्हा मैत्रीण आलेली असायची व हळू आवाजात विचारायची "सो रहे थे क्या? ". काही वेळेला मैत्रिणीला बोलावून घ्यायचे व आम्ही दोघी पडदे लावून अंधार करायचो. बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन घरात पसरायचा व व्हिसीआरवर एखादा हिंदी चित्रपट बघायचो. जणू काही थिएटर मध्ये चित्रपट बघत आहोत असेच भासायचे. तो बघून झाला की आम्ही दोघी मिळून चहा प्यायचो. ती बरेच वेळा काहीतरी खायला आणायची.
या चौकोनी घराला स्वयंपाकघर असे नव्हतेच. एका भिंतीला लागून एक ओटा, त्यातच इलेक्ट्रिकच्या शेगड्या, आणि भांडी धुण्याकरता एक भले मोठे सिंक होते. इलेक्ट्रिक शेगडीच्या खाली ओव्हन, ज्यामध्ये मी भांडी एकात एक घालून ठेवली होती. ओट्याला लागून जे ड्रॉवर होते तिथे भांडी, वाट्या, झारे, कालथे, सुऱ्या ठेवल्या. त्या ओट्याशेजारी फ्रीज आणि त्याला लागूनच बंद एक छोटी खोली ज्यामध्ये बाथ-टब वगैरे होते. स्वयंपाकघराच्या वरच्या दोन फळकुटांवर काही डबे, बरण्या व जास्तीचे तेल साखर ठेवली. चहा साखरेचे डबे ओट्यावरच ठेवले. भांडी घासायला जे सिंक होते त्यात भांडी जमा झाली रे झाली की लगेच घासून पुसून ठेवायला लागायची. ओट्यावरच जुनी चादर घालून घासून विसळलेली भांडी उपडी घालायचे. उपडी घातल्याने भांडी लगेचच कोरडी व्हायची व ती परत जागेवर ठेवायला लागायची. पसारा घालण्यासाठी अजिबात वाव नव्हता. घराच्या चार भिंतींच्या कडेने एकेक खोली तयार झाली. सुरवातीच्या भिंतीला प्रवेशाचे दार आणि खिडकी. समोरच स्वयंपाकघर. आता उरलेल्या समोरासमोरच्या दोन भिंतींमध्ये एकाला तर लागूनच गादी होती आणि उरलेल्या भिंतीला जे अनेकविध खोलगट कप्पे होते त्यात बाकीचा संसार मावायचा होता.
हे कप्पे तीन भागांमध्ये बसवले होते. डाव्याउजव्या बाजूचे जे भाग होते त्यांना दारे होती, म्हणजे आत जे काही ठेवले असेल ते दिसायचे नाही. उजव्या बाजूला जो भाग होता तो तर चक्क कपाटासारखाच होता, त्यामुळे त्यात सर्वच्या सर्व कपडे राहणारच होते. तिथे हँगर ठेवायला एक दांडा होता. त्यावर नेहमी वापरातले कपडे हँगरला लटकवले. आणि त्या खाली जी रिकामी जागा होती तिथे आमची भली मोठी बॅग ठेवली. ज्याप्रमाणे ऋतू बदलतील त्यानुसार योग्य ते कपडे बाहेर काढून हँगरला लटकवायचे व बाकीचे अनावश्यक कपडे बॅगेत ठेवायचे. बाजूला असणाऱ्या जागेत जास्तीची पांघरुणे, रग व चादरी ठेवल्या. सर्वात वरच्या कप्प्यात टिशू पेपर, पेपर टॉवेल असे ठेवले. खाली एका कडेला व्हॅक्युम क्लीनर ठेवला.
डाव्या बाजूच्या भागात जे कप्पे होते त्यात उरलेल्या दोन बॅगा ठेवून सर्वात खालचा कप्पा बूट, चपला ठेवण्यासाठी केला. मधला एक कप्पा रिकामा होता तोही पुढे उपयोगात आला. संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टी एकेक करत मांडत गेले आणि माझी मीच थक्क झाले. एवढे सर्व सामान लागून सुद्धा मधली चौकोनी जागा घरातल्या घरात फेऱ्या मारायला रिकामी होती. त्या भिंतीत आता उरला होता तो मधला भाग! हा भाग स्वयंपाकघरात रांधा-वाढा यासाठी लागणाऱ्या किराणामालासाठी लागणार होता. खूप नाही तरी दोन तीन महिने पुरेल इतके सामान आणायला झाले होते. आमच्यासारखीच दोन तीन भारतीय कुटुंबे या स्टुडिओ अपार्टमेंट संकुलामध्ये राहत होती. आम्ही तिघी मैत्रिणी एकमेकींकडे जायचो तेव्हा एकमेकींच्या खोल्यांचे कौतुक करायचो. प्रत्येकीची मांडणी वेगवेगळी. त्यातल्या त्यात खोलीची केलेली सजावटही छान होती. त्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारले की "आपण दोघी मिळून ऑनलाईन भारतीय किराणामाल आणायचा का? ". लगेच किराणामालाची एक यादी बनवली. ऑनलाईन किराणा मागवल्याने आमचा फायदा झाला. एक म्हणजे सामान घरपोच आले आणि दुसरे म्हणजे ज्या खोक्यातून सामान आले ती खूप उपयुक्त ठरली. उरलेला मधला कप्पा जो रिकामा होता त्यात सर्व कसे बसवायचे याचा विचार सुरू झाला. स्टुडिओ अपार्टमेंटमधला हा नवीन अनुभव खूप छान वाटत होता. असे वाटत होते की आपण जितकी जागा वापरू तितकी ती आपल्याला कमीच पडते!
किराणामालाच्या खोक्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगेत पूर्ण सामान आले. त्यातले रोजच्या रोज वापरात काय काय सामान लागते याची एक यादी बनवली व परत दुकानामध्ये डबे बरण्या खरेदीसाठी गेले. प्लॅस्टिकच्या बरण्या पारदर्शक व दिसायलाही छान दिसतात त्याच खरेदी केल्या. खोलगट, उभट, चौकोनी असे वेगवेगळे बरण्यांचे आकार घेतले व त्यात सामान भरले. तांदूळ, डाळ, पोहे, रवा, साबुदाणा, दाणे एकेकात भरले व ओळीने त्या कप्यात लावले. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांकरता उभट आकाराच्या बरण्या छान व सुबक दिसत होत्या. खोक्यांमधली जी प्लॅस्टिकची बॅग उघडायचे ती उभी करून ठेवायचे म्हणजे त्यातले काही सांडायचे नाही. रबर बॅंडने पिशव्याही बंद करून घ्यायचे. सर्वात वरचा कप्पा होता त्यात मिक्सर, बल्ब, इस्त्री असे ठेवले व बाथरूम मध्ये धुणे धुण्याची व भांडी घासण्याची साबणे, एअर फ्रेशनर असे ठेवले. शिवाय तिथे लाँड्री बॅगही ठेवली. स्टुडिओमध्ये वॉशर ड्रायर नसल्याने धुणे बाहेर असलेल्या लाँड्रोमॅटमधून धुऊन आणायला लागायचे.
आतापर्यंत सर्व सामानाची व्यवस्था लावली ती मनाजोगती लावली गेली होती. सर्व काही जिथल्या तिथे वेळच्या वेळी ठेवायला लागत होते. पसारा घालण्याकरता वावच नव्हता. भांडी रोजच्या रोज दोन वेळेला घासायलाच लागायची. भांडी विसळून उपडी करून लगेचच्या लगेच जागेवरही ठेवायला लागायची. सकाळची पोळी भाजी झाली की मी घराबाहेर येऊन बसायचे. हे घर जंगलात होते. सर्व बाजूने हिरवीगार झाडीच झाडी होती. या झाडांचे बरेच ओंडके घराच्या बाहेरच्या बाजूला होते. त्यातल्या एका ओंडक्यावर सकाळच्या गार हवेत बसले की छान वाटायचे. समोरचा रस्ता दिसायचा. विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, काही चालत तर काही बसला उभे राहिलेले दिसायचे. हिरव्यागार झाडीतून जांभळ्या व नारिंगी रंगांची 'कॅट' बस दिसायची. असा सर्व निसर्गरम्य देखावा पाहताना असे वाटायचे की या ओंडक्यावरून उठूच नये. या घराच्या भोवती जी उंच उंच झाडे होती त्यामुळे कायम सावली असायची. पानगळीमध्ये पूर्ण अपार्टमेंटच्या सभोवताली रंगीबेरंगी पानांचा मोठा ढिगारा साठायचा. त्यावरून कोणी चालत आले की सळसळ असा आवाज यायचा. हिवाळ्यामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात ओंडक्यावर बसले की कोवळ्या उन्हाची तिरीप पर्णहीन झाडांतून यायची.
आमच्या शेजारी एक अमेरिकी विद्यार्थी राहायचा. फावल्या वेळात तो 'कॅट' बस चालवायचा. आमचे बसने नेहमी येणे जाणे असल्याने ओळखीचा झाला होता. घरी असला की तो ओसरीवर एक खुर्ची टाकून बसलेला असायचा. एकदा मी त्याच्या घरी सहज म्हणून भजी द्यायला गेले आणि सांगितले ही खाऊन बघ तुला कदाचित आवडतील. त्याच्या घरात मी प्रथमच जात होते. तो क्वचितच घरी असायचा. त्याच्या घरी गेले आणि बघतच राहिले. तो एकटा राहत होता तरी त्याच्या घरी सर्व सामान होते आणि तेही एकाच खोलीत. त्याच्याकडे सोफा होता, शिवाय टेबल, खुर्ची, पलंग, डायनिंग टेबल व त्याच्या चार खुर्च्या होत्या. मोठा टीव्ही व त्याखाली एक छोटे कपाटही होते. सर्व सामान असूनही टापटीप ठेवलेली ही खोली मला खूपच आवडली. आतापर्यंत आमच्याकडे असलेले थोडे सामान एका खोलीत कसे काय बसवायचे या चिंतेत होते आणि इथे तर सर्व सामान होते. आता मला आमच्या खोलीत सर्व काही असावे असे वाटू लागले. आमच्याकडे असलेल्या आरामदायी खुर्चीत बसून मी विचार करायला लागले. सोफा, टेबलखुर्च्या, जेवणाचे टेबल, पलंग, कुठे बसेल व कसे बसेल, विकत आणावे की नकोच अशी विचारचक्रे सुरू झाली. बसल्या बसल्या सर्व फर्निचर असलेले कल्पनाचित्र रंगवू लागले. परत वाटायचे नकोच काही, आहे ते सर्व काही व्यवस्थित आणि छान लागले आहे. एकाच खोलीत राहायचे आणि ते सुद्धा दोन वर्षाकरताच म्हणून आम्हाला जास्तीचे सामान घ्यायला नको असे वाटत होते. खूपच गिचमीड होईल म्हणून साधा डेस्कटॉपही घेण्याच्या विचारात नव्हतो. पण म्हणतात ना, निर्जीव वस्तूचेही ऋणानुबंध असतात! काही दिवसांनी आमच्या शेजारी राहणारा तो अमेरिकी राहते घर सोडून निघून चालला होता. त्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला जे सामान हवे आहे ते घेऊन जा. त्यातले माझे जे काही आहे ते मी थोडेफार घेऊन जाणार आहे. बाकीचे सामान मित्रांनी दिले होते आणि तेही आता इथे राहत नाहीत. माझ्यात परत उत्साह संचारला व थोडाफार तरी बदल आपण आपल्या जागेत करूच म्हणून त्याच्याकडचे टेबल, व चार फोल्डिंगच्या खुर्च्या असलेले फोल्डिंग डायनिंग टेबल आणले. त्याच्याकडचे सामान आमच्याकडे हालविल्याने त्याचा भारही कमी झाला.
त्या अमेरिकन विद्यार्थ्याकडून सामान आणल्यावर परत सामानाची पुनर्रचना केली. ओट्याच्या बाजूला जेवणाचे टेबल ठेवले व पलंगाच्या दुसऱ्या बाजूला खिडकीशेजारी लाकडी टेबल ठेवले. टेबल आल्याने संगणक खरेदी करायचा ठरवला व खरेदी केला. पहिलावहिला डेस्कटॉप घरी आला. तारांची जुळवाजुळव झाली व संगणक सुरू झाला. आमचा संगणक यायला आणि मनोगत संकेतस्थळाची ओळख व्हायला एकच गाठ पडली. चार फोल्डिंग खुर्च्यांपैकी दोन खुर्च्या भिंतीमधला जो रिकामा कप्पा होता त्यात अगदी सहजपणे मावून गेल्या. दोन खुर्च्यांपैकी एक ह्या टेबलासमोर ठेवली व एक जेवणाच्या टेबलाशेजारी ठेवली. जेवणाच्या टेबलावर आमचा पहिलावहिला खरेदी केलेला रेडिओ कम टेपरेकॉर्डर पण दिमाखात बसला. संगणकावर म्युझिक इंडियावर हवी तितकी आणि हवी तशी गाणी ऐकणे सुरू झाले. झालेला स्वयंपाक डायनिंग टेबलावर झाकून ठेवून तिथेच ताट वाढून खुर्चीवर बसून जेवायला मजा यायला लागली. या चार फोल्डिंग खुर्च्या व दुसरी आरामदायी खुर्ची असल्याने मित्रमंडळींना गप्पा मारण्यासाठी बोलावू लागलो. अनेक जेवणावळी होऊ लागल्या. याच घरात होळीच्या दिवशी केलेला पुरणपोळीचा बेत गाजला. त्या दिवशी आम्ही दहा जण जेवायला बसलो होतो.

आणि एके दिवशी हे राहते घर सोडून जायची वेळ आली. साधारण दोन वर्षे या घरात आम्ही राहिलो. सामानाची बांधाबांध झाली. आमचे नसलेले फर्निचर मित्रमंडळींना देऊ केले. एकेक करत सर्व सामान हालले. निघण्याच्या दिवशी एका मैत्रिणीने आमच्या घरात शेवटची कॉफी केली. कॉफी घेताना रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. डेस्कटॉप, टीव्ही व काही सामान कारमध्ये घातले आणि निघालो नव्या शहराकडे! कारमध्ये बसणार तितक्यात मी परत एकदा घराला पाहून घेते म्हणून शेवटचे डोळे भरून घराला पाहिले. एकेक करत सर्व आठवत होते आणि टचकन डोळ्यात पाणी आले. घराची किल्ली मैत्रिणीला दिली आणि सांगितले की अपार्टमेंटच्या ऑफीसमध्ये नेऊन दे. तिला टाटा केले. नव्या शहराच्या वाटेवर या घरात घडलेल्या गोष्टींची सारखी आठवण येत राहिली.
अजूनही जेव्हा जेव्हा मला त्या घराची आठवण होते तेव्हा तेव्हा नकळत मी गुणगुणायला लागते "खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू!! " या घरामध्ये आम्हाला का यायला लागले ते पुढील दुव्यावर वाचा.ते तीन महिने!
हा माझा लेख मनोगत दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झाला आहे.
Monday, October 08, 2012
वास्तू (६)
"आज आपण आपल्या घरी 'नटसम्राट' हे नाटक पाहणार आहोत" बाबा म्हणाले, बाबा
सकाळी पूजा करत होते. त्या दिवशी रविवार होता. आम्ही दोघी बहिणी उशिराने
उठून चहा पीत होतो. बाबांचे हे वाक्य ऐकल्यावर आम्ही दोघी म्हणालो " म्हणजे
काय बाबा? " बाबा म्हणाले माझे वाक्य परत एकदा नीट ऐका. आज संध्याकाळी
टीव्हीवर नटसम्राट आहे ना? आम्ही म्हणालो 'हो' तर मग ते आपण आपल्या घरी
पाहणार आहोत. आम्ही दोघी एकदम "म्हणजे आपण टीव्ही घेणार आहोत का? " बाबांनी
हसूनच मान डोलाव्वली. आम्हा दोघींचा आनंद गगनात मावेनासा झाला.
त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरी टेलिव्हिस्टा टीव्ही आला. खूप छान होता. आम्हा दोघी बहिणींना क्राऊन टीव्ही आवडायचा नाही, याचे कारण या टीव्ही वर सारख्या मुंग्या यायच्या. मुंग्या म्हणजे चित्र धुरकट होऊन अजिबात दिसेनासे व्हायचे आणि नुसते बारीक बारीक अनेक ठिपके दिसायचे. याला आम्ही मुंग्या म्हणायचो. आमच्या दोघींच्या मैत्रिणींकडे क्राऊन टिव्ही होते. आमचा टिव्ही येण्या आधी आम्ही आम्ही आमच्या मैत्रिणींकडे जायचो. अंटीनाला काठीनेच जरा हलवले की टीव्ही परत दिसायला लागायचा. टेलिव्हीस्टाला सरकते दार होते. या टीव्हीवर घरी विणलेले कापड घालायचो. कृष्ण धवल टीव्ही वर रविवारी संध्याकाळी नाटक सिनेमे असायचे. रविवारी संध्याकाळी आम्ही सर्व जण जय्यत तयारीने टीव्ही पहायला बसायचो. बाबा म्हणायचे मी बाल्कनीत बसणार. बाल्कनी म्हणजे कॉट. कॉटवर आईबाबा बसायचे व आम्ही दोघी फोल्डिंगच्या खुर्च्यांवर बसायचो. या फोल्डिंगच्या खुर्च्या आरामदाय होत्या. नायलॉनच्या कपड्यांनी बांधलेल्या होत्या. त्याच्या पाठी खूप उंच होत्या त्यामुळे टेकून आरामात बसता यायचे. एक आरामखुर्ची होती. ज्यांना कोणाला सिनेमा बघण्यात स्वारस्य नसेल तो आरामखुर्चीवर बसायच व डोळे मिटून सिनेमा ऐकायचा. रविवारी संध्याकाळी सर्व घर आवरून केर काढायचो. खिडक्यांचे पडदे लावून घ्यायचो. दार लावायचो व अंधार करून सिनेमा बघायचो. त्या दिवशी दडपे पोहे ठरलेले असायचे. खुर्चीवर बसून दडपे पोहे खायला सुरवात केली की सिनेमाच्या टायटल्स सुरू व्हायच्या. साप्ताहिकी न चुकता बघायचो. साप्ताहिकीमध्ये पुढील आठवड्याचे कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जायची. रविवारी जर फालतू सिनेमा दाखवणार असतील तर मग आम्ही घरी थांबायचो नाही. बाहेर कुठेतरी फिरायला जायचो. रविवार सकाळची रंगोली आरामात सकाळी उठताना गादीवर झोपूनच पहायची. रंगोलीमध्ये गाणी छान लागायची. अंगावर पांघरूण व डोक्याखाली दोन दोन उश्या घेऊन रंगोली पहायचो. नंतर उठून चहा व बाकीचे आवरणे सुरू व्हायचे.
माझ्या माहेरी सर्व गोष्टी अचानकच आलेल्या आहेत. जसा टीव्ही अचानक घरी आला तसाच रेडिओ आमच्या घरी मी लहान असतानाच आलेला आहे. बाबांनी एकदा बाहेर चहा पिताना सुधीर फडके यांचे विसर गीत विसर प्रीत, विसर भेट आपुली हे गाणे ऐकले. हे गाणे बाबांना इतके काही आवडले की त्या दिवशीच बाबा रेडिओ विकत घेऊन आले. पूर्वी रेडिओ भेले मोठे असायचे. रेडिओच्या डाव्या बाजूला वर एक छोटा आयताकृती डोळा होता. तिथून हिरवा लाईट लागायचा व रेडिओ सुरू व्हायचा. स्टेशने बदलायला छोट्या बरण्यांची झाकणे असायची तशीच गोल चक्रासारखी बटणे असायची. ही बटणे फिरवली की आवाज लहान मोठा व्हायचा. एक बटण स्टेशन फिरवायला होते तर एक बटण बँड बदलायला होते. रेडिओच्या मध्यभागी एका आयताकृती चौकोनात काही अंतरावर आकडे लिहिलेले होते. या आयताकृती चौकोनात एक लाल उभा बारीक दांड्यासारखा एक काटा होता. स्टेशन बदलायचे बटण डावीकडे किंवा उजवीकडे फिरवले ही हा लाल काटा डावीउजवीकडे सरकायचा व स्टेशने लागायची. मुंबई, पुणे, विविध भारती, ऑल इंडिया रेडिओ अशी सर्व स्टेशने लागायची. आईला मुंबई स्टेशन आवडायचे. त्यावर मराठी गाणी, श्रुतिका लागत असत. मुंबई अ, मुंबई ब, अशी काहीतरी स्टेशने होती. आम्हा दोघी बहिणींना विविध भारती खूपच आवडायचे. मला तर खूपच प्रिय होते. आईने मुंबई लावले असेल तर मी ते लगेच बदलून विविध भारती लावत असे. मग आमच्या दोघींची भांडणे व्हायची. दिवसभर रेडिओ सुरू असायचा.
आईलाही हिंदी गाणी आवडायची पण सारखी नाही. ती म्हणायची इतर स्टेशनांवरही चांगले कार्यक्रम असतात तेही ऐकले पाहिजेत. आईचे हे म्हणणे पटायचे पण हिंदी गाण्यांची इतकी आवड होती की सारखे विविध भारतीच लावले जायचे. बाबांना रेडिओवर सुधीर फडके यांचे गाणे लागले असेल तर बाबा ओरडायचे "हे गाणे संपले की तुम्हाला हवे तिथे जा" रेडिओवरचा लाल काटा सतत इकडे तिकडे हालत असायचा. शेवटी तो एकदाचा तुटला. तोही दमत असेल. सिलोन, ऑल इंडिया रेडिओ, मुंबई, पुणे अशी बरीच स्टेशने लागायची. रात्री सगळ्यात शेवटी बेलाले फूल लागायचे, ते ऐकूनच मग आमचा रेडिओ बंद व्हायचा. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ६ वाजता भक्तीगीते व भावगीते या गाण्यांई सुरू व्हायचा. सकाळची शाळा होती तेव्हा ही भक्तीगीतेच आम्हाला जागी करायची. पाऊस पडत असेल, थंडीचे दिवस असतील तर असे वाटायचे की पांघरूणात तयार झालेल्या उबेतून बाहेर येऊच नये. गाणी ऐकत असेच पडून राहावेसे वाटायचे.
एका दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बाबा असाच अचानक टेप रेकॉर्डर घेऊन आले. हा टेप रेकॉर्डर आयताकृती होता व त्याची बटणे आयताकृती चौकोनी आकाराची होती. पियानो वाजवायची बटने कशी दिसतात तशीच होती. त्याला एक माईकही होता. माईकला वायर होती. हा माईक गॅस पेटवायचा लायटर कसा दिसतो तसाच दिसायचा. त्या दिवशी आम्ही सर्वजण खूप आनंदात होतो. पहिल्याप्रथम आजोबांनि काही श्लोक म्हणले. नंतर आम्ही सर्वांनीच आमच्या आवडीची गाणी म्हणली. गाणे टेप करायचे. नंतर रिव्हाईंड करायचे व ऐकायचे. आवाज कमी जास्त करायचे एक छोटे बटण होते. ते एका फटीत बसवले होते. ते मागे पुढे फिरवून आवाज कमी जास्ती करता यायचा. कॅसेटवर आम्ही काहीही टेप करायचो. बाळाचे जोरजोरात रडणे, कोणी झोपले असेल तर त्याचे घोरणे, शिंका कुणाला येत असतील तर त्या टेप करायचो. काही वेळा गप्पा मारताना त्या खुप रंगात आल्या की त्या टेप करून मग ऐकायचो. नंतर ऐकायला खूप मजा यायची. गप्पा मारताना आपण जसे काही वेळा खूप जोशात बोलतो ते नंतर ऐकताना मजा वाटायची. एकदा तर खडाजंगी भांडणे टेप केली होती.
आमच्याकडे मामा मामी, व आमची काही मामे व मावस भांवंडे जमलो होतो. गप्पा मारताना काही मुंद्यांवरून वादावादी सुरू होती आणि त्यातच मामा मामीची भांडणे जुंपली. त्या दोघांचेच तावातावाने बोलणारे आवाज आम्ही गुपचुप टेप केले. नंतर भांडणे निवळली. झोपण्याचया आधी गादीवर बसून मामीला लाडात येऊन म्हणालो बघ ना मामी आमचा टेप रेकॉर्डर, कसा आहे? त्यावर मामी म्हणाली ऐकवा ना काहीतरी. मग लगेच टेप ऑन केला आणि भांडणाचा आवाज सुरू झाला. मामी डोळे विस्फारून हे काय गो! आम्हाला वाटले चिडली. पण नंतर तीच हासायला लागली म्हणाली डांबरट्ट आहात हो अगदी. नंतर मग काही दिवसांनी आम्ही भावंडे एकत्र जमलो की ती भांडणाची कॅसेट लावायचो व भरपूर हासायचो.
क्रमशः

Tuesday, September 18, 2012
Smith Creek Park (3)
आमच्या शहरात एक तळे आहे. तिथे चालायला खूप छान वाटते. मधोमध तळे आणि बाजूने चालणे होते. आजुबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. त्याचे फोटो घेत राहावेसे वाटतात. इथे सूर्यास्त खूप छान दिसतो. वर आकाशातले ढगांचे बदलते रंगही तळ्यात उमटलेले छान दिसतात.
Subscribe to:
Posts (Atom)