Tuesday, April 27, 2021

अघटित (३)

 

अमितने ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती दोघे बाहेर फिरुन उशीरानेच hotel वर परत येतात. मानसीचा मनावरचा ताण खुप हलका होतो. जेवण करुनआल्याने थोडावेळ टीव्हि पाहुन मग झोपतात. अमितचा प्रोजेक्ट एक दिवस लांबतो आणि उद्याच्या ऐवजी परवा निघायचे ठरते. मानसीला तर आनंदच होतो. ती म्हणते आज मी समुद्रावर खुप फिरणार. अमित तिला चिडवण्यासाठी म्हणतो मनसोक्त लहान मुलीसारखी खेळत बस समुद्रावर तेवढाच मला कामासाठी वेळ मिळेल आणि आपल्याला लवकर घरी जाता येइल. मानसी चिडते. तुझाच प्रोजेक्ट लांबला आहे म्हणुन आपण थांबलो ना? उगाच तुझे काम माझ्यामुळे झाले नाही असे म्हणु नकोस. अगं वेडे तसे नाही गं, मजा पण तुला कळत नाही? आज मात्र मला माझे प्रेझेंटेशन घेउन इथल्या साइट वर जायचे आहे. तुझ्यासाठी मी जेवण मागवुन ठेवले आहे. ते तुला इथेच मिळेल.
 
 
अमित कामाच्या साइटवर जातो आणि संध्याकाळी होटेलवर परत येतो. मानसी गाणी ऐकत असते. तिच्या laptop वर एकीकडे असंख्य फोटो अपलोड करत असते. तिने काही विडिओ क्लिप्स पण काढलेल्या असतात. अमित म्हणतो चल आज लवकर झोपु. उद्या सकाळी ब्रेकफास्ट करुन लवकरच निघु म्हणजे घरी पोहोचायला उशीर होणार नाही. अमित मानसी लवकरच झोपतात. साधारण मध्यरात्री दारावर थडथड असे वाजते. मानसी जागी होते. परत थडथड आणि वाऱ्याचा घो.घो. आवाज पण ! 
 
 
 
इतक्या रात्री कोण आले असेल म्हणुन मानसी उठते आणि दार उघडते. दार उघडताच क्षणी मोहवणारा वारा आत शिरतो. आणि मानसी हळुच बाहेर पडते. ती काय करत आहे हे तिचे तिलाच कळत नाही. नाचत बेभान होउन जात असते. तिला भुरळ पडलेली असते. तिच ती भुरळ त्या दिवशी सारखीच पण आता त्या भुरळेने तिची शुद्ध हरपलेली असते. तिला भीती वाटत नाही. आधी कोरड्या वाळुत चालत जाते आणि किनाऱ्यापाशी पोहोचते. चालताना ती खुप हासत असते. हातवारे करुन गिरघ्या घेत असते. मधुनच तिला पायाच्या खालची वाळु ओलि झालेली आहे ते कळते. मधुनच एखादा शिंपला तिच्या पायाला टोचतो. खुप मोठे आवार जिथे पाणी नाही. फक्त ओली वाळु. सोबत मंद वाहणारा वारा. या वाऱ्यासोबत ती आनंदात असते. ती चालते चालते खुप दुरपर्यंत आणि अचानक तिचे पाय पाण्यात जातात. पाणी वर वर सरकत जाउन तिच्या गुडघ्यापर्यंत येते आणि ती एकदम गटांगळी खाते. पायाखालची वाळु सरकल्यावर अजुन काय होणार्? नाही का. आणि अशातच तिची हारपलेली शुद्ध परत येते आणे तिला कळुन चुकते आपण होटेल सोडुन खुप दुरवर समुद्राच्या पाण्यात आहोत. तिलाभीती वाटायला लागते आणी ति झपाझप पाउले टाकुन पाण्याच्या बाहेर येते. 
 
 
 
जिवाच्या आकांताने पळत सुटते. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरलेला असतो. समुद्रावर एक चिटपाखरु देखील नसते. दमुत ती तशीच उभी राहते.समुद्राजवळच्या hotelचे दिवे लुककुकत असतात. तिला कळुन चुकते आपण खुप लांब आलो आहोत. परत चालायला सुरवात करते तर तिच्या पायावरुन परत पाणी जाते. मागे वळुन पाहते तर मागुन पाण्याच्या लाटा येताना तिला दिसतात. या भरतीच्या लाटा आहेत हे तिला कळुन चुकते. आपल्याकडे फोन नाही याची तिला प्रखरतेने जाणिव होते. धापा टाकत टाकत ती हळु हळु चालते तर कधि पळते. पण इतके लांबचे अंतर आपण कसे गाठणार्? ती तशीच जात राहते. ठरवते आपण असे चालत पळत होटेल मध्ये जाउ शकतो. ती जसजशी पुढे जाते तस तसे पाणी तिच्या पाठिमागुन येत असते. आता तर पाण्याचा जोर खुप वाढलेला असतो. भरती येत असते. पाण्याच्या लाटांवर लाटा उसळत असतात्. तिला मागे खेचुन घेत असतात. 
 
 
 
आपण परवा रात्री समुद्रावर येउन खुप मोठी चुक केली होती ते तिला जाणवते. तेव्हा पण समुद्रावर कोणीहि नव्हते. ११ किंवा १२ चाच सुमार होता. आपण त्यावेळी अश्याच धापा टाकत होतो. पण नशीबाने आपण जास्त दुर गेलो नव्हतो.पण आज काय झाले मला. मला इतक्या दुर वाऱ्याने आणले? कि अजुन कोणत्या अद्भुत शक्तिने आणले? येथे भुताटकी असेल का? मला काहीच समजत नाहीये. पण लवकरात लवकर मला होटेल मध्ये ने रे देवा असा तिचा धावा सुरु होतो. हा कोणता भुरळ घालणारा वारा? की आपण बेभान होउन इथपर्यंत आलो? मला कळले कसे नाही? अमित उठला तर नसेल्? किति वाजले असतील्? तिला खुप रडु येते. एकिकडे डोळ्यातुन घळघळ अश्रु वाहायला लागतात आणी एकिकडे झपाझप पावले पडत असतात्. मगाचचा घोंघावणारा वारा आता शांत कसा ? आता फक्त लाटांचा आक्राळ विक्राळ आवाज येतोय. ती आता होटेल दिसण्याच्या टप्यात येते खरी पण मागे येणाऱ्या प्रचंड लाटांमुळे ती सतत मागे खेचली जात असते. मागोवा घेत समुद्राच्या लाटाही तिच्या पाठोपाठच असतात ते तिला कळत नाही. मागे वळुन पाहायचे नाही, तर सतत पुढे पुढे जात राहायचे असे ठरवुनही ती तसे करु शकत नाही. एक खुप मोठी प्रचंड लाट येते आणि तिला खेचत समुद्राच्या खुप आत घेउन जाते. तिच्या नाकातोंडात पाणी जाते. आणि दुसऱ्या लाटेसरशि ति समुद्राच्या पाण्यात नाहीशि होते.
 
 
इकडे होटेलवर अमित जागा होतो. बाजुला पाहतो तर मानसि नसते. बाथरुम मध्ये असेल म्हणुन तो कुस बदलतो. १० मिनिटे झाली तरी मानसी आली नाही? सगळीकडे बघतो. दार उघडुन बाहेर जातो, परत आत येतो. खाली जाउन चौकशी करतो आणि विचारतो तुम्हाला माझि मिसेस इथे कुठे दिसली का? रात्रपाळीचा मॅनेजर म्हणतो इथे मी रात्री कुणालाच जाताना पाहिले नाही. मग ही गेली कुठे? तिला फोन लावतो. तर फक्त रिंग वाजत राहते. रुम मध्ये येतो तो मानसिचा फोन रुम वरच असतो. आता मात्र त्याचा धीर सुटतो. तो होटेलच्या बाहेर , समुद्रावर सैरावैरा फिरायला लागतो. आतापर्यंत झुंजु मुंजु झालेले असते. काही वेळाने सुर्यही डोके वर काढतो. तिच्या सेल मधले तिचे फोटो ब्रेकफास्ट करायला आलेल्या माणसांना दाखवतो, विचारतो तुम्ही यांना कुठे पाहिले का? तर सर्वच नाही असे म्हणतात्त. काय करावे असा विचार करत असताना त्याच्या एकदम लक्षात येते. आता थांबुन चालणार नाही. तो ९११ ला फोन लावावा का अश्या विचारात असतो. नको. ९११ ला फोन नको करायला. उगाच चौकश्या आणि नसती लफडी मागे लागतील. कदाचित खुनाचा आरोपही लागेल माझ्यावर्. बापरे ! हे काय होउन बसले आहे ? परत रुम वर येउन तो विचार करत राहतो. त्याचे डोके खुप भणभणायला लागते...............Rohini Gore 
 
क्रमश : ....

No comments: