Wednesday, October 27, 2010

Art Photography





पिवळे पान अगदी फुलासारखे दिसत आहे ना? आज सकाळी पाहिले तर मागच्या अंगणात पडले होते उलटे. सुलटे केले तर खूप छान दिसले म्हणून फोटो घेतला. जांभळा व निळा रंग पाण्यावर दिसत आहे त्या आहेत आकाशातील रंगांच्या छटा. आमच्या इथे एक नदी आहे तिथे आम्ही दर रविवारी फिरायला जातो. फुले, सुर्यास्त, आकाशातील रंग काही ना काही वेगळे दिसतेच.

Friday, October 22, 2010

आठवणींच्या हिंदोळ्यावर.... (३)








हे सर्व फोटो साध्या कॅमेराने घेतलेले आहेत २००२ ते २००४ सालामध्ये. प्रिंट फोटोचे डिजिटल कॅमेराने फोटो काढून लावलेले आहेत. आता जेव्हा क्लेम्सनला जाईन तेव्हा डिजिटल कॅमेराने फोटो काढून ते लावणार आहे. खूप निसर्गरम्य व टुमदार शहर आहे. डिजिटल कॅमेराने बाकी सर्व फोटोज जिथे मी जात होते आणि जे माझ्या कायमच्या आठवणीत राहिले आहेत ते सर्व घेणार आहे. शिवाय अजुनही जे पूर्वी घेतलेले नाहीत असेही फोटोज काढणार आहे. क्लेम्सन इतके निसर्गरम्य आहे की मला तिथे कधी एकदा जाऊन येते असे झाले आहे.

आठवणींच्या हिंदोळ्यावर.... (२)