Eckerd pharmacy (Now Rite Aid pharmacy) memory of 2003
परवा मी घरात आवरा आवरी करत होते. तेव्हा मला एक बॉक्स दिसला. त्यात मला
छान आठवणी सापडल्या. नंतर मला आठवले की आम्ही जेव्हा विल्मिंग्टन मधून
हँडरसनविलला आलो तेव्हा हा बॉक्स मी तयार केला होता. हा बॉक्स आठवणींचा
म्हणून तयार केला होता, जो मी कधीच फेकून देणार नाहीये. प्रत्येक
गोष्टींकडे पाहत माझ्या सर्व आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. त्यातली एक आठवण
लिहीत आहे. ती आठवण म्हणजे
एकर्ड दुकानाची की जे नंतर राईट एड ने विकत
घेतले होते. ही आठवण आहे २००३ सालातली. आम्ही क्लेम्सन मध्ये राहात होतो
तेव्हा हे दुकान होते कॉलेज ऍव्हेन्यू रस्त्यावर वाहत्या वाहनांच्या एका
चौकामध्ये. आमचे अपार्टमेंट या चौकाच्या बरेच बरेच आत चालत गेल्यानंतर
होते. त्यानंतरचे अपार्टमेंट कॉलेज ऍव्हेन्युवरच रस्त्याला लागून होते. हे
दुकान माझे एक वेळ घालवण्याचे ठिकाण होऊन गेले होते. इथे मी चालत जायचे
यायचे. या दुकानाच्या बाजूला पोस्ट ऑफीस होते. या दुकानाच्या समोर कपडे
धुलाईचे दुकान होते आणि बाजूला थाई दुकान होते. एकर्ड दुकानात गेले की
तासभर कसा निघून जायचा कळायचेच नाही.
मुख्य म्हणजे येथे फोटो
प्रिंट करून मिळायचे. छान छान ग्रीटींग बघायला मिळायची. दूध मिळायचे. इथे
सौंदर्यप्रसाधने बघण्यात पण माझा छान वेळ जायचा. इथे औषधे तर मिळायचीच पण
इतरही काही काही छोट्या गोष्टी बघण्यात वेळ जायचा. साध्या क्यॅमेराने फोटो
काढून रीळ संपले की मी इथे यायचे आणि फोटो प्रिंट करायचे. त्यातले काही
फोटो माहेरी आणि काही फोटो सासरी पोस्टाने पाठवायचे. या दुकानाच्या शेजारीच
पोस्ट ऑफीस असल्याने फोटो भारतात पोस्टाने सहज पाठवता यायचे.
शुभेच्छापत्रे पाहण्यात तर मी बराच वेळ घालवायचे. त्यातले एक छानसे
वाढदिवसाचे शुभेच्छापत्र मी माझ्या भाचीला आणि पुतणीला पाठवायचे.
Thursday, January 17, 2019
Thursday, January 10, 2019
बाजारहाट (४)
जेव्हा आमच्या अपार्टमेंट मध्ये आम्ही रहायला आलो तेव्हा मुख्य प्रश्न होता तो फोडणीचा. फोडणीला लागणारे साहित्य मोहरी, हिंग, हळद आमच्याकडे नव्हते ते मी प्रविणाकडून उसने आणले. ती म्हणाली आम्ही जेव्हा भारतीय दुकानात जाऊ तेव्हा तू मला तुला हव्या असणाऱ्या सामानाची यादी दे. तेव्हा मी अगदी मोजकीच यादी दिली होती. ती म्हणजे पोहे,
रवा, मोहरी, हिंग हळद. बाकीचे सर्व सामान सॅक अँड सेव्ह मधून आणले होते.
दूध, दही, साखर, भाज्या, टुथपेस्ट, ब्रश, कपडे धुण्याची पावडर, टी-बॅग्ज
वगैरे अनेक गोष्टी. सुरवातीचे काही दिवस संध्याकाळच्या खाण्याला काय करायचे
हा एक प्रश्नच होता. कारण की पोहे उपमे मी संध्याकाळच्या खाण्याला भारतात
असताना करायचे. सकाळच्या न्याहरीचा प्रश्न कधी आला नाही कारण की सकाळी
आम्हाला दूध पिण्याची सवय होती ती तशीच अजूनही कायम आहे. दूधामध्ये
कॉर्नफ्लेक्स किंवा बोर्नव्हिटा घालून दूध किंवा ड्राय फ्रुटसची पावडर
घालून दूध घेण्याची सवय असल्याने सकाळी न्याहरीचा प्रश्न सुटला होता.
दुपारी मी मैद्याच्या पोळ्या लाटत होते आणि लाँग ग्रेन राईसचा भात आणि
फ्रोजन बीनची भाजी करायचे.
सॅक अँड सेव्ह मधून संध्याकाळच्या खाण्याला मल्टीग्रेन ब्रेड खायचो.सोबत कॉफी. तिथे आम्हाला साधे कप केक दिसले. शिवाय बटाटा चिप्सच्या अनेक व्हराईटी दिसल्या. भाज्यांपैकी कोबी, फ्लॉवर, वांगी, श्रावणघेवडा, सिमला मिरची अश्या भाज्या होत्या. पण त्या सतत उपलब्ध नसायच्या. मग व्हरायटी म्हणून फ्रोजन बीन्स आणायला सुरवात केली. ब्रेड बटरने जरी संध्याकाळच्या खाण्याचा प्रश्न सुटला असला तरी पोहे उपम्यांची इतकी काही आठवण यायची की त्याने जास्तच भूक लागायची. ब्रेड, अंडी, चीझ, आम्हाला दोघांनाही आवडत नाही आणि पचतही नाही.वडा पाव, भेळ,, पाणीपुरी, इडली, डोसे, उतप्पा असे भारतात मिळणारे पदार्थ इथे मिळत नसल्याने त्याचीही तीव्रतेने जाणीव व्हायची. आपली खूप उपासमार होत आहे हे जाणवायचे. तसे तर भारतात असताना हे पदार्थ आपण काही रोजच्या रोज खात नाही पण अजिबात दिसतही नाहीत आणि त्यामुळे मनात आणले तरी खायला मिळत नाही हे इथे अमेरिकेत आल्यावर प्रकर्षाने जाणवले. डेंटन पासून डॅलसला जाण्याकरता कारने तास लागायचा. एके दिवशी प्रविणा आणि नागा यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर भारतीय दुकानात नेले आणि आम्ही भली मोठी खरेदी केली. आमची कार्ट पूर्ण भरून वाहत होती. ते पाहून ते दोघे हासायला लागले होते. आम्ही सर्व काही घेतले. कणीक, तांदुळाचे पीठ, हरबरा डाळीचे पीठ, पोहे, रवा, साबुदाणा, डाळीमध्ये तुरीची आणि मुगाची डाळ घेतली. लाल तिखट, हळद, मोहरी, हिंग, धनेजिरे पूड हेही सर्व घेतले. त्यानंतर आमचे संध्याकाळचे खाणे सुरू झाले. कणीक इतकी काही चांगली नव्हती. पण कणकेच्या पोळ्या इतकेच समाधान होते. भारतीय भाज्याही घेतल्या होत्या. गवार, तोंडली, कारली, भेंडी, इ. इ. सॅक अँड सेव्हला ५० सेंटला बटाट्याचे खूप तिखट चिप्स मिळायचे. ते खाल्ल्याने समाधान व्हायचे. आयस्क्रीमच्या बादल्या मिळायच्या. आयस्क्रीमचे सर्व प्रकारचे फ्लेवर्स मिळायचे. तेही आणायचो. सॅक अँड सेव्हला भाज्यांचा मात्र बरेच वेळा खडखडाटच असायचा.
एके दिवशी प्रविणा आणि नागाने आम्हाला सॅम्स क्लब मध्ये नेले. इथे सर्व काही घाऊक मिळते. त्यासाठी वर्षाची ३० डॉलर्सची मेंबरशिप घ्यावी लागते. एकाकडे कार्ड असले तरी बाकी काही जणांना त्यांच्याबरोबर जाता येते. तिथे आम्ही बासमती तांदुळ घेतले होते. एका पूर्ण फॅमिलीसाठी हे दुकान चांगले आहे. नंतर पुढे आम्ही जेव्हा क्लेम्सनला आलो तेव्हा प्रत्येकी १० डॉलर्स प्रमाणे आम्ही तिघात एक मेंबरशिप घेतली होती. त्यामध्ये २ कार्डे आम्हाला दिली. एका कार्डावर एकाचा फोटो तर दुसऱ्या कार्डावर दुसऱ्या फॅमिली मेंबरचा फोटो होता. क्लेम्सन सोडल्यावर जेव्हा विल्मिंगटनला आलो तेव्हा आम्ही ३० डॉलर्स भरून मेंबरशिप घेतली. या दुकानातून आम्ही बरेच काही आणतो की जे नेहमीच वापरात असते. ते म्हणजे, बासमती तांदुळाचे पोते, साखर, मीठ, धुण्याचा डिटर्जंट, भांडी घासायचे लिक्विड, फरशी पुसायचे ओले पेपर टावेल्स, फर्निचर पुसण्यासाठीचे ओले टावेल्स, दाणे, साबण, हँड वॉशचे लिक्विड, ब्रश केल्यानंतरचे खळखळून चूळ भरायचे लिक्विड, तूप करण्यासाठीचे बटर इ.
सॅम्स क्लब मध्ये महिन्या दोन महिन्यातून एकदा गेले तरी पुरते. बाकीचे इतर सर्व सामान आणण्यासाठी वाल मार्ट मध्ये जातो. तिथे दर आठवड्याला दूध, दही, ज्युस, भाज्या, कांदे बटाटे, लसूण, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो काकडी, आणि पिण्याचे पाणी, आणतो. सॅम्सला सुरवातीला भाज्याही आणायचो पण नंतर आणणे बंद केले. फ्रोजन चिरलेल्या भाज्या मात्र मी कधीच आणल्या नाहीत. एक दोन वेळा आणून बघितल्या पण आवडल्या नाहीत. आम्ही नेहमीच फ्रेश भाज्याच आणतो. भारतीय दुकानात मात्र महिन्यातून एक वेळा जातो की जे सध्याच्या शहरापासून एका तासाच्या अंतरावर आहे. त्या आधी विल्मिंग्टनला राहत असताना रॅले शहरातून भारतीय किराणामाल आणायला लागायचा. त्याकरता येऊन जाऊन ५ तास जायचे. म्हणून मग मी जास्तीचे सामान आणायला लागले. ते इतके जास्ती होत गेले की घरातच एक दुकान बनले. नंतर आम्ही इतक्या लांब जाणे सोडून दिले. विल्मिंग्टनला राहत असताना एक भारतीय दुकान सुरू झाले होते पण ते ६ महिन्यात बंद झाले. भारतीय वस्ती कमी असल्याने ते म्हणाले की आमच्या दुकानात कोणीच येत नाही त्यामुळे आमचे नुकसान व्हायला लागले होते म्हणून बंद केले. क्लेम्सनला असताना एकदा मी आणि उमाने मिळून भारतीय किराणामालाची यादी ऑनलाईन ऑर्डर केली होती. तेव्हा १०० डॉलर्सच्या वर बील झाले तर फ्री शिपिंग होते. मग माझी आणि तिची मिळून साधारण १२० डॉलर्सचा किराणामाल आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता.
विल्मिंग्टनला राहत असताना भारतीय भाज्या खाण्याचे विसरून गेलो होतो. अमेरिकन स्टोअर्स मधून त्याच त्याच भाज्या खाऊन खूपच कंटाळून गेलो होतो. त्याच त्याच भाज्यांमध्येच थोडे बदल करून भाज्या करायचे. आता मात्र राहत्या शहरापासून एका तासाच्या अंतरावर भारतीय दुकान असल्याने तोंडली, गवार, भेंडी, कार्ली, घेवडा, दुधी भोपळा या भाज्या खाता येतात. शिवाय बाकीचे सटर फटरही आणता येते. ग्लुकोज बिस्किटे, फरसाण, चुरमुरे,, खारी, इ.इ. विल्मिंग्टनला आणि क्लेम्सनला एक थायी दुकान होते तिथे काहीवेळेला भारतीय किराणामाल दिसायचा. पण क्वचित काही मिळायचे. त्याचेही अप्रुप वाटायचे. तिथे काही वेळेला पार्लेजीची बिस्किटे दिसायची, तर काही वेळेला उडदाचे पापड, तर काहीवेळेला टोमॅटो केचप , पोहे आणि रवाही दिसायचा. काही फ्रोजन पराठे दिसायचे. अमेरिकेतल्या मोठ्या शहरातून अनेक भारतीय दुकाने आणि उपहारगृह असतात. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांना दूर दूर जायला लागत नाही. अमेरिकेतल्या इतर ग्रोसरी स्टोअर्सची माहीती पुढील भागात.
क्रमश : ----

Wednesday, January 09, 2019
बाजारहाट (३)
बाजारहाटचे २ भाग मी माझ्या ब्लॉगवर लिहिले आहेत. या दोन भागात मी पुणे
आणि डोंबिवलीमधल्या आठवणी लिहिल्या आहेत. आयायटी पवई मधला बाजारहाट जरा
वेगळा होता. आयायटीचा भला मोठा कॅपस पार करून मुख्य रस्त्याला यायला
लागायचे. तो रस्ता क्रॉस केला की एक दुकान होते तिथे बऱ्याच भाज्या
ठेवलेल्या असायच्या. मी आणि भैरवी एक दिवस आड १ ते २ मैल चालत जाऊन भाजी
आणायचो. वसतिगृहात आम्ही सर्व मॅरीड कपल राहत असल्याने कुणाकडे फ्रीज
नव्हता. ते जे दुकान होते तिथला काम करणारा एक मुलगा वसतिगृहात रात्री
यायचा. त्याच्या हातात मोठमोठाल्या २
जाड्या पिशव्या असायच्या. त्यात बिस्कीटे, चिवडा, फरसाण , अंडी. ब्रेड
असायचे. त्यातले काही आम्ही विकत घ्यायचो. त्या मुलाला आम्ही सर्व
बायकांनी पटवले की आम्हांला रोज इतक्या लांब चालत यायला लागते तर तू
आम्हाला रोजच्या रोज भाजी घेऊन येशील का? तर तो लगेचच हो म्हणाला. रात्री
तो आमच्याकडून भाज्यांची यादी घेऊन जायचा आणि सकाळी १० च्या सुमारास
रोजच्या रोज भाजी घेऊन यायचा. त्यामुळे आमचे चालायचे कष्टीही वाचले आणि
भाजीही घरपोच येऊ लागली. बाजारहाट मध्ये आपण भाज्यांबरोबर इतरही काही सामान
आणतो पण वाण्याचे सामान आणत नाही.अर्थात काही अपवाद आहेत. वाण्याची यादी म्हणजे डाळ तांदुळ, साबुदाणा, पोहे
साखर, मीठ तेल, साबण इ. इ. वाण्याच्या दुकानात जाऊन सामानाची यादी द्यायची
व तो दुकानदार सर्व सामान घरपोच करतो. किंवा फोनवरून यादी सांगितली तरी
चालते. किंवा महिन्याची यादी सांगूनही काही सामान महिन्याच्या आधीच संपले
तरीही जाता जाता वाण्याच्या दुकानात काय हवे नको ते सांगता येते. सामान
घरपोच असते. भाजीपाला आपण रोजच्या रोज किंवा २ ते ३ दिवसाच्या आणू शकतो.
सहज बाहेर पडले पाय मोकळे करायला की अगदी कोपऱ्यावरच्य्या
भाजीवाल्याकडूनही भाजी आणता येते. कधी कधी घरासमोर असलेल्या वाण्याच्या
दुकानातूनही भाजी नाहीतर आयत्या वेळेला कांदे बटाटे किंवा मोड आलेली
कडधान्ये आणता येतात. पण अमेरिकेतला बाजारहाट खूपच वेगळा आहे.
अमेरिकेतला बाजारहाट मध्ये, वाण्याची यादी, त्यातही भारतीय सामानाची यादी
वेगळी, भाज्या, भारतीय भाज्या उदा. तोंडली, कारली, गवार, ह्या भारतीय
दुकानातच मिळतात. आणि ही भारतीय दुकाने अगदी जवळ नसतात. मोठमोठ्या शहरात
असतात पण छोट्या शहरात नसतात. त्याकरता दूरदूर कार घेऊन जावे लागते. भारतीय
किराणा आणि भाजी आणण्याकरता ३ तासांच्या कार ड्राईव्ह वर जावे लागते ते
सुद्धा वन वे. किंवा तासाभराच्या कार ड्राईव्ह वर. सहज उपलब्ध सर्व ठिकाणी
असतेच असे नाही. आमचा अमेरिकेतला बाजारहाट १७ वर्षापूर्वी टेक्साज राज्यातून सुरू झाला. आमचे पहिलेवहिले ग्रोसरी स्टोअर्स म्हणजे सॅक अँड सेव्ह. हे दुकान आम्ही राहत असलेल्या घरापासून चालत १० मिनिटाच्या अंतरावर होते.
अंतरावर होते म्हणजे आम्ही असेच घर निवडले होते. या अपार्टमेंट पासून
ग्रोसरी स्टोअर्स, लाँड्रोमॅट आणि युनिव्हरसिटी, सर्व ठिकाणी चालत जाता
येईल.अगदी सुरवातीला डॉक्टर मर्चंड (विनू यांच्याकडे पोस्डॉक करत
होता) यांनी आम्हाला कॉस्टको मध्ये नेले होते. तिथे आम्ही ऑल पर्पज फ्लोअर
आणि लाँग ग्रेन राईसचे पोते घेतले होते. नंतर नंतर बरीच दुकाने माहिती
झाली. १७ वर्षात तीन स्थलांतरे झाली. त्यामुळे सामान आणि भाजीपाला
आणण्याकरता बरीच दुकाने माहिती झाली. त्यामध्ये वालमार्ट, सॅक अँड सेव्ह,
लोएस फूड, सॅम्स क्लब, कॉस्टको, बायलो, विंडिक्सी, हॅरिस्टीटर, आणि आता
इंगल्स, पूढील भागात सविस्तर वर्णन.
क्रमश : ----
क्रमश : ----
Sunday, January 06, 2019
Tuesday, January 01, 2019
आठवणी वर्षाअखेरीच्या आणि वर्षारंभाच्या
1 Jan 2019
संध्याकाळच्या सुमारास साडेसात वाजता मी भाजी फोडणीला टाकली आणि ध्यानीमनी नसताना वीज गेली. चोहीकडे दाट अंधार पसरला. स्वयंपाकाघरातल्या एका कपाटात मी नेहमीच एक मेणबत्ती आणि काडेपेटी ठेवते. अंधारातही न चाचपडता ती मेणबत्ती आणि काडेपेटी काढली. आणि लावली. लगच्यालगेच निर्णय घेऊन बाहेर जेवायला गेलो. कारण की इथे इलेक्ट्रिक शेगड्यांवर स्वयंपाक असतो. आता कधी वीज येईल आणि बाकीचा स्वयंपाक होईल याचा विचार करत बसलो असतो तर उपाशीपोटी झोपायला लागले असते. बाहेर जेवायला जाण्याअगोदर आठवणीने मेणबत्या विझवल्या. भाजी फोडणीला टाकली होती ती शेगडी बंद केली आणि बाहेर पडलो.
बाहेर पडून चौकात गेलो तर तिथे खूप मोठा राडा झालेला होता. ऍक्सीडेंट झाला होता. पोलीसच्या गाड्या उभ्या होत्या. कोणी जखमी झाले असेल तर त्यांना हॉस्पीटल मध्ये पोहोचवण्यासाठीच्या गाड्याही उभ्या होत्या. सिग्नल्स चालू नव्हते. चौक बंद करून ठेवला होता. त्यामुळे दुसऱ्या लेन मध्ये जाऊन उजवीकडे वळून परत मुख्य रस्त्याला लागलो. नंतरच्या रस्त्यावर लाईटी होत्या. ठार अंधार आणि नंतर लगेच लाईटी दिसल्या तर अगदी झगमगाट झाल्यासारखाच भास झाला. एक तर वीज गेलेली आणि त्यात हा झालेला अपघात. अर्थात नंतर कळाले की या अपघातामुळेच काही ठीकाणची वीज गेली होती. एका खांबाला एक कार आदळ्याने असे झाले होते.
जेवण करून घरी आल्यावर परत मेणबत्या लावल्या आणि झोपलो. पण झोप कुठची यायला. नशीबाने थंडी नव्हती. थंडी असती तर खूपच कुडकुडायला झाले असते. वीज खात्यात फोन केला तर रात्री ११ वाजता वीज येईल असे सांगितले. गादीवर पडून राहणे याशिवाय दुसरे काहीही करता येत नव्हते. ना इंटरनेट, ना टिव्ही, ना फेबुवर जाता येत होते. वीज केव्हा येईल याची वाट पाहता पाहता केव्हातरी थोडा डोळा लागल्यासारखे झाले आणि नंतर सर्व घरामध्ये लक्ष लक्ष दीप उजळले आणि जाग आली. इतके काही हायसे वाटले. जीव
आल्यासारखा वाटला. डुलकीतून जाग आली तेव्हा २०१८ संपत आले होते आणि २०१९ ची सुरवात झाली होती. घड्याळ पाहिले तर ३१ डिसेंबरचे १२ वाजून काही मिनिटे झाली होती. फोडणीला घातलेली भाजी केली आणि नंतर कॉफी करून प्यायली. झोप उडाल्याने आणि मला काहीतरी खरडावेसे वाटले. नेट चालू झाल्याने आजच्या सारख्या अजून २ आठवणीही लिहिण्याचे ठरवले. आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला टंकण्याचे काम करून मी झोपेन.
२००१ सालची गोष्ट. टेक्साज मध्ये आमच्या ४ कुटुंबांचा एक ग्रुप झाला होता. ३१ डिसेंबर २००१ चे सेलीब्रेशन काही वेगळेच होते. ३ तेलगू कुटुंबीय आणि आणि आम्ही गोरे मराठमोळे. मी नेहमीप्रमाणेच बटाटेवडे केले होते. ८० बटाटेवडे तळले आणि राहत्या अपार्टमेंटचा स्मोक डिटेक्टर वाजायला लागला. थंडी तर मरणाची होती. मायनस ५ अंश सेल्सियस मध्ये तापमान आणि हिमवृष्टीही चालू होती. दार काही मिनिंटाकरता उघडे ठेवले तेव्हा तो स्मोक डिटेक्टर वाजायचा थांबला. आम्ही दोघे प्रविणा आणि नागाच्या कारमध्ये बटाटेवड्यांचा डबा घेऊन बसलो. एकीने गुलाबजाम, एकीने पुलीहरा, एकीने लेमन राईस, तर स्वीट डिश म्हणून गुलाबजाम केले होते. शिवाय केकही होता. दिवसभर आम्ही सगळ्याजणी ठरवलेले पदार्थ करत होतो. शिवाय दुपारचे जेवण, त्यानंतरची भांडी घासली. परत ठरवलेले पदार्थ करून तीही भांडी घासली. सगळे करून खूपच दमायला झाले होते. एकीच्या घरी जमलो. आणि गप्पा टप्पा केल्या. त्यात अंताक्षरी खेळलो.
अंताक्षरी मध्ये हिंदी, मराठी, आणि तेलगू गाणी होती. मग थोडे जेवलो. जेवण कुणालाच नीट गेले नाही. १२ वाजता सर्वांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि घरी परतलो. दुसऱ्या दिवशी डॅलसला मंदीरात जाणार होतो. पण दुसऱ्या दिवशी हिमवृष्टी बरीच वाढली असल्याने बेत रद्द केला. आदल्या दिवशीचे बनवलेले जेवण सगळ्यांनीच वाटून घेतले होते त्यामुळे नवीन वर्षाचा दुपारच्या जेवण करायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या अन्नाची चव खूपच छान लागली. अश्या रितीने नवीन वर्षाची सुरवात आगळीवेगळी
झाली. त्याचप्रमाणे २०१९ ची सुरवातही झाली. अशीच एक आगळी वेगळी सुरवात नव्या वर्षाची म्हणजेच १९८४ सालची. १ जानेवारी १९८४ साली माझ्या सासूबाईंनी आमच्या दोघांचा कांदेपोहे कार्यक्रम अचानक ठरवला. सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम झाला. कांदेपोच्यांचा कार्यक्रमानंतर मी कामावर गेले. विनू त्याच्या आईवर खूपच चिडला होता. त्याने नोकरी सोडून पिएचडी करण्याचा निर्णय घेतला होता. माझा चेहराही चांगलाच वाकडा झाला होता. कारण मला काहीही केल्या पुणे सोडायचे नव्हते. सासूबाईंनी माझ्या हातात कांदेपोच्यांची डिश आणून दिली. चहाही दिला. आम्ही दोघे एकमेकांकडे अधून मधून कटाक्ष टाकत होतो. आम्ही दोघे काहीच बोललो नाही.
विनुने मला फक्त एक प्रश्न विचारला "तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करता? " तर मी उत्तर दिले "पर्चेस" आमच्या दोघांचे आईवडील खूप गप्पा मारत होते. आई आणि सासऱ्यांचा पनवेली गप्पा तर बाबा आणि सासूबाईंच्या पुणेरी गप्पा. मध्ये ४ वर्षे गेली. बरेच काही घडले.
आणि सरतेशेवटी १९८८ साली आम्ही दोघे विवाहबद्ध झालो. आणि आयायटी पवई वसतीगृहात रु.१२०० शिष्यवृत्तीमध्ये आमच्या दोघांचा संसार सुरू झाला. Wishing you All A very Happy New Year 2019
rohini gore :)

Subscribe to:
Posts (Atom)