Wednesday, December 31, 2014
दोन हजार पंधरा
सर्वांना २०१५ च्या हार्दिक शुभेच्छा!! नूतन वर्ष तुम्हां सर्वांना आनंदाचे व उत्साहाचे जावो ही सदिच्छा !
सजावट: सफरचंदाची साल वापरली आहे.
Tuesday, December 30, 2014
पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(१)
पूर्वकिनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्याकडे जायला निघालो. दुपारचे विमान उड्डाण होते. लॉस एंजलिसला जाण्यासाठी विमानाचा एक थांबा लास वेगासला होता. विल्मिंग्टन ते लास वेगास ४ तासाचा प्रवास होत आला होता. प्रचंड भूक लागली होती कारण लवकर जेवून निघालो होतो. प्रवासात काही कोरडे पदार्थ करून घेतले होते, पण ते पुढे उपयोगात येतील म्हणून विमानात विकणारे काही पदार्थ बघितले. त्यात प्रिंजल्सचे पोटॅटो चिप्स होते. या चिप्सची किंमत दुकानात दीड डॉलर्स आहे पण इथे विमानात ते ४ डॉलर्सला होते. चिप्सचे २ डबे घेतले व सोबत कॉफी घेतली. हे चिप्स मला खूपच आवडतात ! भूकेच्या वेळेला विमानान बसून चिप्स खाताना मस्तच वाटत होते !
काही वेळातच विमान लास वेगासच्या विमानतळाच्या एका गेटवर थांबले. विमानतळावर प्रवेश केल्यावर दुसऱ्या देशात आल्यासारखे वाटले. अस्वच्छता खूप होती. चिनी लोक खूप दिसायला लागले. पूर्ण विमानतळावर कॅसिनो लावले होते. इथे दोन तासांची विश्रांती होती. आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. एकेक सँडविच व कॉफी घेतली. झाले जेवण ! पूर्व व पश्चिम किनाऱ्यांमध्ये तीन तासांचा फरक आहे. आम्ही पूर्वेचे लोक आधी जागे होणारे ! आता इथपासून वेळेच गणित बिघडणार होते. वेळीअवेळी खाणेपिणे आणि झोपणे सुरू झाले. लास वेगास ते लॉस अँजलिसच्या विमान उड्डाणाचा अवधी साधारण दीड तासाचा होता. जिथे अँजली लॉस झाली तिथे उतरलो व बॅगा काढण्यासाठी पुढे सरसावलो. एकीकडे चिनी टूर्सच्या गाईडला फोन लावला. तो म्हणाला बाहेर येऊन फुटपाथवर थांबा. मी येतोच. त्याने त्याच्या गाडीचा नंबरही दिला. विमानतळावरून बाहेर पडलो आणि आम्हाला मुंबईत आल्यासारखेच वाटले.
हवाही गरम होती. ड्राईव्हरने आम्हाला क्वालिटी इनच्या होॅटेलमध्ये सोडले व "उद्या सकाळी बरोबर ९ वाजता तयार रहा. आपल्याला उद्या लास वेगासला जायचे आहे" असे सांगितले. हॉटेलमध्ये गाद्यांवर आडवे झालो. बॅगा उघडून फक्त जरूरीपुरते कपडे बाहेर काढून ठेवले. सकाळी उठून पटापट आवरून नाश्त्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो. नाश्ता छानच होता. उकडलेली अंडी, ब्रेड, केक, कॉफी, फळे, ज्युस, सेरेयल. लास वेगासला जाणारी टूरची मोठी बस आली. त्यात चढलो. आम्हाला पुढची जागा दिली होती आणि आमचा ७ दिवसाचा प्रवास सुरू झाला. आहाहा! खूप छान वाटत होते. बसण्यासाठी प्रशस्त जागा, मोठमोठाल्या संपूर्ण काच असलेल्या खिडक्या आणि त्यातूनही आम्हाला पुढच्या सीटा बसण्यासाठी मिळाल्याने पुढचा रस्ता, रस्त्यावरची इतर वाहतूक, सर्व काही छान दिसत होते. सुरवातीचा प्रदेश डोंगराळ होता. दूरवर कुठेतरी डोंगरावर बर्फ पडलेले दिसत होते. नेवाड्यात शिरलो आणि सपाट व वाळवंटी प्रदेश सुरू झाला. एकही झाड नाही. डोंगरही दाढी केलेल्या माणसासारखे गुळगुळीत दिसत होते. डोळ्याना सपाट व वाळवंटी प्रदेश जास्त छान वाटत होता. कारण की पूर्वेकडे रस्त्याने जाताना खूप झाडी लागतात. सर्वत्र हिरवेगार दिसते. पण इथल्या वेगळ्या रुपामुळे थोडा वेगळेपणा व त्यामुळे उत्साह आला होता. गाईडने माहिती सांगायला सुरवात केली. आमच्या बसमध्ये आम्ही सोडून सर्व चिनी लोक होते. त्यामुळे गाईड चॉव म्यॉव बोलायला लागला. इंग्रजीतून थोडेसेच बोलायचा. परत मूळ पदावर याची गाडी सुरू. चोम छोम छमा छम चम छम हाहा! कानाला वेगळी भाषा असल्याने त्याचा त्रास होत न्हवता तर चांगले वाटते होते.
लॉस अँजलिस ते लास वेगास हा एकूण ६ तासाचा प्रवास होता. त्यात जेवणासाठी एक थांबा घेऊन हॉटेलमध्ये उतरणार होतो. आधीचा १० तासाचा विमानप्रवास व आता हा ६ तासाचा प्रवास होता. जसजसे लास वेगास जवळ येऊ लागले तस तसे पोटात काव काव कावळे ओरडायला सुरवात झाली. एका एशियन बफेट उपहारगृहात सगळे शिरलो. सर्व जण आपापली डिश भरण्यात मग्न होऊन गेली. आम्ही पण शाकाहारी पदार्थ डिशमध्ये भरून घेतले. त्यात नूडल्स, फ्राईड राईस, सलाड, उकडलेले कणीस, उकडलेले बीन्स, व्हेजिटेबल रोल्स असे सर्व घेतले. एकही शब्द न बोलता तोंड आणि हात याचीच मिळवणी करत होतो. अधुनमधून डाएट कोकचा एकेक घोट जात होता. नंतर परत एक डिश भरून घेतली. त्यात फळफळावळ, आईस्क्रिम, केक्स घेतले. पोटभर जेवळ्याने चांगलीच तरतरी आली ! बसमध्ये बसलो व परत प्रवासाला सुरवात झाली. लास वेगास हॉटेलमध्ये आल्यावर साधारण दीड ते २ तासाची विश्रांती घेऊन झगमगाट व चकचकाट अशा नाईटलाईफला सुरवात होणार होती. हॉटेलमध्ये उतरल्यावर बॅगा टाकल्या, फ्रेश झालो. जरा आडवे होतो न होतो तोच लगेचच उठावे लागले. एका छोट्या पिशवीत पाण्याची बाटली, चिप्स, केक व थोडी बिस्किटे घेतली. हॉटेलच्या लॉबीमध्ये येऊन थांबलो. बसमध्ये बसलो आणि आमच्या नाईटलाईफला सुरवात झाली. मोठमोठाली ४ ते ५ हॉटेल्स पाहिली व त्याला लागूनच मोठमोठाले मॉल्स पाहिले. त्यात काही छोटे शोज होते तेही पाहिले. सर्वजण फोटो काढण्यात मग्न होऊन गेली होती. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये जाणार होतो तिथे जो शो होता तो होता ऍडल्ट शो ! गाईड म्हणाला "कोणाची लहान मुले असतील त्यांचे बेबी सिटिंग मी करीन. तुम्ही काळजी करू नका. शो एंज्यॉय करा !
हा शो दीड तासांचा होता. हा दीड तास कसा निघून गेला ते कळालेच नाही ! सर्वजण एका लयीत व तालबद्ध नाचत होते. काही गात होते. नाचणाऱ्या मुली कमनीय बांध्याच्या व त्यांची वेशभूषा व केशभूषा अवर्णनीय होती! शोमधले सीन पटापट बदलत होते. या शोचे एक वैशिष्ठ म्हणजे काही मुली टॉपलेस होत्या ! पण कुठेही अश्लीलता नाही. सर्व मुले व मुली कलात्मकरित्या नाचत होते. गात होते. गाण्यामध्ये व नाचण्यामध्ये आजुबाजूला, मागे पुढे व वर खाली होणारे भव्य व दिव्य सेट होते. तेही पटापट बदलत होते. हे सर्व काही नेत्रसुखद होते ! या शो चा रेट होता ९० डॉलर्स एका माणसासाठी. पैसे पुरेपूर वसूल झाले होते ! इथे फोटो व विडिओ काढण्यास सक्त मनाई होती.
झगमगाटी लास वेगासचे दर्शन खूपच सुंदर झाले होते ! या शो नंतर आम्हाला सर्वांना डाऊन टाऊन मध्ये सोडण्यात आले. इथे तर बरीच गर्दी होती. काही जण नाचत होते. काही जण गात होते. फोटो काढत होते. इथेही पूर्ण रस्ताभर झगमगाट पहायला मिळाला. नंतर आम्हाला हॉटेलवर सोडले. गाईडला विचारले आता जेवणाची सोय काय आहे? तर तो म्हणाला हॉटेलच्या दुसऱ्या लॉबीमध्ये बरीच उपहारगृहे आहेत तिथे तुम्हाला जे हवे ते मिळेल. तिथे गेलो तर एक भारतीय उपहारगृह दिसले. ते पाहून तर खूपच आनंद झाला. तिथे नवरतन कुर्मा आणि नान घेतले. खूपच चविष्ट होते. परत हॉटेलकडे रवाना झालो. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ ला हॉटेल लॉबीमध्ये हजर रहायला सांगितले होते. हॉटेलमध्ये आल्यावर दुसऱ्यादिवशीचे कपडे बाहेर काढून बॅगा बंद केल्या. झोप कुठली यायला ! एकतर पहाटे उठायचे म्हणून त्या धसक्याने झोप नाही आणि शिवाय डोळे मिटले की टॉपलेस गर्ल्स डोळ्यासमोर येत होत्या ! हाहाहा ! दुसऱ्या दिवशी ग्रँड कॅनियनकडे - ऍरिझोना राज्यात प्रवेश करणार होतो !
क्रमश : ------
Wednesday, December 17, 2014
Thursday, December 11, 2014
Saturday, October 25, 2014
२५ ऑक्टोबर २०१४
आज नको तितका सूर्यप्रकाश होता. डोळे दिपत होते. बरेच दिवसानंतर आज हवेत
अजिबात आर्द्रता नव्हती. कालचा आणि आजचा दिवस दिवाळी साजरी केली. म्हणजे
अगदीच काही नाही तरी शास्त्रापुरते तरी पदार्थ करू असे ठरवले होते. काल
बेसन लाडू आणि पातळ पोह्यांचा चिवडा केला आणि आज सकाळी उठल्या उठल्याच दोन
पदार्थ केले ते म्हणजे ओल्या नारळाच्या करंज्या आणि जाड पोह्यांचा चिवडा.
धान्याची रांगोळी काढली आणि झाली दिवाळी. अगदी सुटसुटीत अशी. हल्ली तेलकट
तुपकट खाणे नको वाटते. आज सकाळी विनायक बाहेर फिरायला गेला आणि म्हणाला आज
आपण समुद्रकिनारी जायचेच. काल ठरवल्याप्रमाणे उसळ आणि पोळ्या केल्या म्हणजे आल्यावर काही करायला नको. आवडीच्या ओल्या नारळाच्या करंज्या, उसळ पोळी खाल्ली आणि आडवे न होता लगेचच आवडत्या समुद्रकिनारी जायला निघालो. खरी तर झोप येत होती आणि प्रखर सूर्य डोळ्यावर येत होता. तिथे पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे चक्कर मारली.
आज आकाश खूपच निरभ्र होते. एकही म्हणजे एकही ढग नव्हता. समुद्राचे पाणी शाई किंव्हा नेव्ही ब्ल्यू रंगाचे दिसत होते. ढग असले की त्याच्या निरनिराळ्या छटा पाण्यावर उमटतात. हिरवा, निळा, मातकट असे रंग समुद्राच्या पाण्यावर दिसतात. आज तसे नव्हते. कुठेही नजर फिरवा, रंग एकच होता. गडद निळा आणि आज ओहोटी असल्याने वाळू ओली होती त्यामुळे चालताना त्रास होत न्हवता आणि म्हणूनच खूप चालणे झाले.सीगल पक्षांची दोन चार पिल्ले किनारी खेळत होती. इटुकली पिटुकली छान दिसत होती. आज ओहोटी जरी असली तरी पूर्वी एकदा गेलो होतो तशी नव्हती. काही भागात पाणी होते त्यामुळे सलग किनाऱ्यावरून चक्कर मारता आली नाही. उन लागल्यामुळे डोके मात्र जाम दुखत आहे. आल्यावर गरम चहा आणि सोबत चिवडा खाल्ला. आज रोजनिशी लिहायलाही मुहूर्त लागला. आजचा दिवस हवेच्या बाबतीत खरच खूपच वेगळा होता ! आणि एकूणच जेवणाच्या बाबतीतही खूप वेगळा होता. आज सावल्यांचे फोटो घेतले. जरा काहीतरी वेगळे. नाहीतरी वेगळे असे एखाददिवशी तरी झाले पाहिजे ना ! नाहीतर तोचतो पणा तर आयुष्यात भरलेलाच असतो.

Friday, September 26, 2014
Saturday, September 13, 2014
वास्तू (७)
माहेरच्या घराचा सर्वात लाडका भाग म्हणजे माळा. आमच्या घरी कोणी लहान मुले
आली की ती पहिली माळ्यावर जात. माळ्याच्या कठड्यावरून खाली बघत. त्यांना
खूप मजा वाटे. खाली उतरायलाच तयार नसायची. आम्हा दोघी बहिणींचाही हा माळा
अतिशय लाडका होता. स्वयंपाकघरातून या माळ्यावर जायला पायऱ्या होत्या. पूर्ण
लाकडाचा भक्कम माळा सर्वबाजूने खूप उपयुक्त होता. एक तर माळ्यावर बरेच
सामान राहिले होते. तिथे एक कॉट पण होती. स्वयंपाकघरात आजोबांनी केलेली
लाकडी मांडणी होती. ती खुप जुनी झाली होती आणि बाकीच्या सोयी करून
घेतल्याने जागा अपुरी पडत होती. मग त्या मांडणीचे दोन भाग केले आणि
माळ्यावर ठेवले. त्यावर मोठमोठाले डबे ज्यामध्ये आई व आम्ही मुलींनी मिळून
केलेली सर्व वाळवणे यात होती. आम्ही अभ्यासाला माळ्यावर बसायचो. जाताना
बरोबर भाजलेले पापड पापड्या व भाजलेले शेंगदाणे घेऊन जायचो. वाचनाचा किंवा
लेखनाचा अभ्यास करता करता अधून मधून खायचो. आमच्या घरी सतत शिकवण्या
असल्याने एक खोली नेहमीच भरलेली असायची आणि आम्ही दोघी बहिणी मोठ्या झालो,
अभ्यासही वाढले, त्यामुळे माळा करून घेतला होता. रात्रीच्या जेवणाकरता आई
हाक मारायची. पावसाळ्यात तर माळ्यावर बसायला खूप मजा यायची. अभ्यास करताना
पाऊस पडला की पावसाचे एक वेगळे म्युझिक सुरू व्हायचे आणि त्याच वेळेला आईने
गरम गरम पिठले भात केलेला असायचा. किती छान वाटायचे हे सर्व त्यावेळेला !
बऱ्याच वेळेला आम्हा दोघी बहिणींना बटाटेवडे करण्याची हुक्की यायची आणि आम्ही आईला सांगायचो की आम्ही सारण करून देतो , तू आम्हाला बटाटेवडे तळून वाढ. मग ते बटाटेवडे खाण्यासाठी माळ्यावर जाताना जो लाकडी जिना होता त्या पायऱ्यांवर बसायचे. पण ते असे बसायचे की आई वडे तळताना दिसली पाहिजे म्हणजे डावी मांडी जिन्याच्या पायऱ्याच्या मध्ये आणि उजवा पाय खायच्या पायरीवर सोडून बसायचा. एका पायरीवर स्टीलची ताटली जी ज्यामध्ये गरम वडा आहे. डायनिंगवर एक जण, त्यातून कोणी एक मैत्रिण किंवा बहीण रहायला आली असेल तर ती पण असायची. पायरीवर जो बसायचा त्याचे स्थान उंच. मग डायनिंगवरचे माना वर करून त्याच्याकडे पाहून बोलत. जसे बटाटेवडे पायरीवर बसून खायचो त्याचप्रमाणे अंबोळ्याही खायचो. माळ्याच्या जिन्यावरची जागा पटकन मिळवायला लागायची. मला तर ही जागा प्रचंड आवडायची. मामेबहिणी आल्या की आमच्या सर्व बहिणींची रवानगी माळ्यावर झोपण्यासाठी असायची. वर एक कॉट व गाद्याही होत्या. त्या घालायच्या, त्यावर पांघरुणे व गप्पा मारत मारत झोपायचो. त्यात खाली ज्या कोणी झोपल्या असतील. शिवय आईबाबा, अजोबा खाली झोपलेले असायचे. मग त्या सर्वांशी माळ्यावरून गप्पा व्हायच्या. काही वेळेला आम्ही माळ्यावर असलेल्या बहिणी हळू आवाजात बोलायचो की आई खालून ओरडायची काय गं पुटपुटताय. मग हशा पिकायचा. काही वेळेला आम्ही बहिणी सिनेमाच्या स्टोऱ्या सांगायचो. थंडीत आणि पावसाळ्यात माळ्यावर झोपायला जाम मजा यायची. खाली उजाडलेले कळायचे नाही.
क्रमश: ....

Wednesday, August 06, 2014
६ ऑगस्ट २०१४
आज बरेच दिवसांनी उघडीप पडली होती. सध्या ऋतू जरी उन्हाळा असला तरी पावसाळा
वाटावा इतका पाऊस पडत आहे. मागच्या आठवड्यात सूर्यदर्शन नव्हते. परवा तर
पावसाळी वातावरणात संध्याकाळच्या सुमारास इंद्रधनुष्य पाहिले. पाऊस, आणि ढग
असले की संध्याकाळी आकाशात वेगवेगळे रंग निर्माण होतात आणि ते
क्षणाक्षणाला बदलत राहतात. त्यात गुलाबी, आकाशी, निळा, भगवा, मातकट, फिकट
पिवळा असे निरनिराळे रंग आकाशात निर्माण झालेले मी कधीच पाहिले नव्हते ते
या आम्ही ज्या शहरात राहतो तिथे पहायला मिळाले.
आज नेहमीप्रमाणेच विविध भारतीवरची गाणी ऐकत होते आणि गाणी ऐकताना त्याचे अर्थ निराळेच लागत होते. गाणी तर नेहमीचीच होती पण मला ती आज मन लावून बसून ऐकाविशी वाटत होती. मन भूतकाळात गेले नव्हते. वर्तमानकाळातल्या काही गोष्टी गाणे ऐकता ऐकता आठवत होत्या आणि खूप छान वाटत होते. आज संबध दिवस मनाची स्थिती तशीच होती. मन कुठेतरी हरवले होते. आज संध्याकाळी एका रेसिपीला मुहूर्त लागला, तो सुद्धा ७ ते ८ वर्षानंतर लागला. संध्याकाळी नेहमीप्रमाणे तळ्यावर गेले तर पूर्वी जी बसकी बदके होती ती आज बऱ्याच संख्येनी हजर होती. ४० ते ५० बदके होती. एकदा चालत जायची कुठेतरी , तर एकदा एकामागोमाग एक करत तळ्यात उतरायची. मी आज तळ्याभोवती एक चक्कर मारली. नंतर तिथे असलेल्या एका बाकावर बसले आणि आकाशात बघितले तर परत बरेच ढग जमा झाले होते. वारेही सुटले होते. बराच वेळ बसले आणि घरी आले. आज मात्र आकाशात अजिबातच रंग नव्हते. आज जी रेसीपी केली ती होती तुरीच्या डाळीच्या वड्यांची. वेगळ्या चवीमुळे वडे बरेच खाल्ले गेले त्यामुळे दुपारच्या पोळीचा लाडू करून खाल्ले तेच आजचे जेवण. नाहीतरी सकाळची भाजी उरली नव्हती आणि परत नवीन भाजी करायचा कंटाळाही आला होता.

Sunday, July 27, 2014
२७ जुलै २०१४
आजच्या दिवशीची रोजनिशी म्हणजे कालची आणि आजची मिळून अशी आहे. गेला
आठवड्यात पाऊस, शनिवार रविवार आणि उद्याही गरम हवा, उद्या तर खूपच आहे. काल
आणि आज कामेच कामे झाली. आज स्वयंपाक खोली आवरली. वरची खालची कपाटे,
ड्रावर्स, ती पुसून घेणे आणि इंडियन मसाले आणि इतर इकडून तिकडे बरण्यातून
ठेवणे इत्यादी आवरा आवर केली आणि आज बाहेर जेवायला गेलो. मागच्या महिन्यातच
आमच्या शहरात एक नवीन भारतीय उपहारगृह सुरू झाले आहे. तशी इतकी खूप
नाहीतच. एखाद दोन आणि तीही अजिबातच चांगली नाहीत. पण हे सिया नावाचे
उपहारगृह मात्र खरच खूप छान आहे. मागे एकदा गेलो होतो तेव्हा मोठाच्या मोठा
मसाला डोसा आणि उत्तपा घेतला होता. यावेळेस पंजाबी डिश घेतली. खूप छान चव
होती. मलबार व्हेजीटेबल तर खूपच चवीला छान होती. या उपहारगृहातील जी मुलगी
होती तिने तर आज आम्हाला धक्काच दिला. ऑर्डर केलेली डिश घेऊन आली आणि नंतर
परत येऊन विचारले कशी वाटली डिश? तर मी म्हणाले गुड ! तर म्हणाली चांगली
आहे का? आम्हाला दोघांनाही आश्चर्याचा धक्का. मी तिला विचारले "चांगला" हा
शब्द तुला कसा माहीत? तर म्हणाली की माझ्या काही मराठी मैत्रीणी आहेत आणि
अजूनही त्यांच्याशी तिचे छान संबंध आहेत. मग तिला विचारले तू भारतात कुठे
होतीस ? तर म्हणाली मी मुंबईत कामाला होते आणि ती मुळची दार्जिलिंगची आणि
तिच्या नवरा उडिया आहे. म्हणाली की ती अलिबागला अनेक वेळा गेली आहे. तर मी
तिला विचारले की तुला मराठी पदार्थ माहीत आहेत का? तर म्हणाली हो !
बटाटेवडा खाल्लास का? तिला विचारले , तर म्हणाली हा हा वडापाव खाल्ला आहे.
पोहे खाल्ले आहेत. तिला पोहे खूप आवडले. खूप छान मुलगी आहे. हसतमुख आहे. ती
राहत होती शार्लोटला आणि आता ती व तिच्या फॅमिलीने हा नवीन भारतीय उपहारगृहाचा धंदा सुरू केला आहे. तिला म्हणाले की ये एकदा माझ्या घरी मी तुला पोहे करून खायला देते. मलाही पोहे खुप आवडतात. मी ठरवलेच आहे तिला पोहे आणि बटाटेवडे खायला करून द्यायचे.
कालचा दिवसही असाच छान गेला. अलीकडे आम्ही नेटफ्लिक्सवर इंग्रजी सिनेमे बघतो. त्यात एक बुक थिफ नावाचा सिनेमा पाहिला. अडीच तासाचा चित्रपट होता पण अजिबात कंटाळा आला नाही. त्यातली साधारण १२ ते १३ वर्षाची मुलगी खूपच गोड होती. तिने व इतरांनी पण छान कामे केली आहेत. आज संध्याकाळी नदीवर फिरायला गेलो पण नेहमीची फेरी मारली नाही. बोर्ड वॉकच्या उजव्या बाजूला चालत गेलो. हा नव्यानेच बांधलेला दिसत होता. तिथून परत नेहमीच्या ठिकाणी परत आलो आणि नेहमीची डाव्या बाजूने चालत जाणार होतो पण आज बरेच काम झाल्याने चालण्यासाठी शक्ती नव्हती. हवेत आर्द्रता होतीच पण थोडे वारे सुटल्याने बरे वाटत होते. हवा बरीचशी ढगाळ आणि आकाशात रंग अजिबातच नव्हते. सूर्यास्त दिसला नाही की रंग दिसले नाही. निराशा झाली. घरी आलो आणि युट्युबवर एकाने अप्रसिद्ध संगितकारांची गाणी रेकॉर्ड केली आहेत ती ऐकली. त्यामुळेही आज खूप छान वाटत आहे. आजची हवा बरी अशी उद्याची आहे. उद्याच्या हिट इंडेक्स १०६ आहे ! पण परत परवापासून नेहमीची हवा आहे त्यामुळे बरे आहे. आजचे दुपारचे जेवण इतके झाले आहे की रात्री फक्त केळे खाऊन झोपणार. त्या आधी ही रोजनिशी लिहित आहे.

Wednesday, July 23, 2014
Subscribe to:
Posts (Atom)