ठेवली होती. मी काही गाणी म्हणली आणि झोपले. २८ ला दुपारी मी जी मुगाच्या डाळीची खिचडी केली होती
ती चविला खूपच छान झाली होती आणि काल मला का कोणजाणे पिठाची गिरणी आठवली त्यामुळे मी त्या आठवणीबद्दल लिहिले. आज २९ तारीख लीप वर्षाचा अमेरिकेतला दिवस म्हणून आज काहीतरी वेगळे करूया दुपारच्या जेवणात असे मनात आले आणि तसे केलेही.
मुगमटकीचण्याची उसळ, गाजर टोमॅटो कांदा अशी मिक्स कोशिंबीर आणि कढी केली. डाळीचे धिरडे केले. फोडी घेतल्या. सोबत घरी केलेले लिंबाचे गोड लोणचे होते. संत्र्याच्या फोडी होत्याच.
आज काहीतरी वेगळे केल्याने जेवणात मजा आली. तोंडाल चवही आली. आज थोडी रेंगाळलेली कामे करून आलो. आजचा लीप वर्षदिवस वेगळाच गेला आणि लक्षातही राहील. आज माझ्या एका मैत्रिणीने संत्र आणि केळे घालून गोडाचा शिरा माझ्या पद्धतीने केला त्यामुळेही छान वाटले.
Wish you All a very happy Leap Year 2020 !