तो व ती एकाच कॉलेजमधे शिकत असतात. तो एक प्रतिभावंत कवी असतो. ती एक लाजाळू, अबोल, सरळ स्वभावाची, असते. तिला तो कवी असतो ते माहीत नसते. तिला कविताही करता येत नसते. तो सतत मैत्रिणींच्या घोळक्यात. ती पण त्याच मैत्रिणींच्या घोळक्यात असते. तिच्या मैत्रिणीला विनंती करून त्याच्या कविता तिला वाचायला मिळतात. ती कविता वाचून इतकी काही प्रभावित होते की त्याच्या प्रेमातच पडते. त्या सर्व मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये त्याला नावाजताना पाहून तिला खूप आनंद होतो. कॉलेजच्या होणाऱ्या कवीसंमेलनात, त्याला मिळालेल्या बक्षीस समारंभात किंवा मित्रमैत्रिणींचे होणारे संमेलन सर्व ठिकाणी ती हजर असते. पण तिला काही त्याला भेटून तिचे त्याच्यावर असलेले प्रेम त्याच्याकडे व्यक्त करता येत नाही. अगदी साधा त्याच्या कवितेबद्दलचा अभिप्राय पण तिला त्याच्यासमोर येऊन व्यक्त करता येत नाही. ती खूप अबोल, लाजरी व भिडस्त स्वभावाची असते. तिला वाटते की आपण जर आपले प्रेम व्यक्त केले तर त्याच्याकडून आपला अपमान तर नाही होणार? प्रेम झिडकारले तर नाही जाणार? काही वेळेला तर फक्त ते दोघेच असतात तरी सुद्धा त्याच्याशी बोलायचे तिचे धाडस होत नाही. मग खूप अस्वस्थता निर्माण होते. एकीकडे त्याचे काव्य तर खूप फुलत असते, बहरत असते. त्याच्या सर्व कविता तिला तोंडपाठ होतात. तिलाही कविता शिकण्याची इच्छा निर्माण होते.
मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये एकदा त्याचे लक्ष तिच्याकडे जाते जेव्हा ती तिच्या मैत्रिणींशी खळखळून हसत असते तेव्हा. त्यालाही ती खूप आवडते. पण तसे तो तिला कधीच दर्शवत नाही. पुढे त्यांची काही क्षणी नजरानजर होते. स्मितहास्य होते. पण पुढे काय? आता तर तिची अवस्था खूप कठीण होते. दिवसरात्र झोप नाही. सतत त्याचा विचार. आणि आपल्या मनातले त्याच्याबद्दलचे प्रेम कसे काय व्यक्त करायचे. आणि एक दिवशी ती ठरवते की आपल्याला असे बावळट राहून चालणार नाही. उद्या आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण होईल व हा पुढे एक मोठा कवी होईल. नंतर तर त्याची आपली भेट पण कधीही होणार नाही. आज आपण त्याला भेटायला जायचेच. असा विचार करून ती तयार होते. फ्रेश होते. तिच्या आवडीची जांभळ्या रंगाची साडी नेसते. खड्याचे कानातले गळ्यातले घालते.त्याच्याशी काय काय बोलायचे हे मनाशी ठरवते. आणि निघणार तोच दारावर टकटक. ...आणि तोच दारात समोर उभा तिला लग्नाची मागणी घालायला.
गुम है किसीके प्यारमें दिल सुबह श्याम
पर तुम्हें लिख नही पाऊँ मै उसका नाम हाय राम हाय राम....
सोचाहै एक दिन मै उससे मिलके
कह डालू अपने सब हाल दिलके
और कर दुँ जीवन उसके हवाले
फिर छोड दे चाहे अपना बनाले
मै तो उसका रे हुँवा दिवाना
अब तो जैसा भी मेरा हो अंजाम
चाहा है तुमने जिस बावरीको
वो भी सजनवा चाहे तुम्हीको
नैना उठाए तो प्यार समझो
पलके झुका दे तो इकरार समझो
रखती है कबसे छूपा छूपाके
अपने होठोमें पिया तेरा नाम
वरील गाणे महरूह सुलतानपुरी यांनी रचलेले व राहूलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले व रामपूरका लक्ष्मण या चित्रपटातील आहे. माझे अत्यंत आवडीचे आहे. मला जे काही "असेच सुचलेले...." आहे त्याच्याशी मिळते जुळते आहे ना?
Thursday, May 15, 2008
Subscribe to:
Posts (Atom)