Thursday, May 28, 2015
अटलांटा
अटलांटा म्हणले की आम्हाला धडकीच भरते. पहिल्यांदा खूप लांबच्या प्रवासाला निघालो तेव्हा अटलांटा ओलांडून जायचे होते. अटलांटा आले मात्र ! मोकळ्या आकाशात ढग जमा झाले आणि रपारप पावसाला सुरवात झाली. नुसता पाऊस नाही, तर त्यात भर म्हणजे गारा पडायला सुरवात झाली. कारच्या काचेवर टणाटण गारा पडत होत्या. काच फुटणार तर नाही ना ! अशी भीतीही वाटत होती. पुढचा रस्ता नीट दिसत नव्हता. ५ ते ६ लेन सूरू झाल्या होत्या. पेट्रोल संपायला आले होते. ते भरण्याकरता उजवीकडची एक्झीट घ्यावी तर सर्व लेन वाहतूक मुरंब्याने भरल्या होत्या. काही वेळाने हळुहळू करत गॅस एक्झीट घेतली आणि हायसे वाटले.
साधारण वर्षापूर्वी अटलांटाला गेलो. अटलांटामधली ५ आकर्षणे बघण्याकरता ऑनलाईन पास घेतले आणि सर्व तयारीनिशी निघालो. हवामानाचा अंदाज घेतला होता. ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊसाची शक्यता १००% वर्तविणारे हवामान बघूनच निघालो होतो. पाऊस होता पण वादळ नव्हते. पावसाची शक्यता दुसऱ्या दिवशी अटलांटा मध्ये होती. निघण्याचा वाटेत पाऊस लागणार नाहीच हे माहीती होते आणि अटलांटा मध्ये पाऊस असला तरी तो सुद्धा अगदी दिवसभर पडतोच असे तर नाही होत ना ! आमच्या बाबतीत मात्र "पावसाने आम्हाला गाठले होते" असे म्हणता येईल.
कधी नव्हे ते वि ने निघताना मला आठवण करून दिली. छत्री घेतली आहेस ना? मी म्हणाले "तू आणि चक्क छत्रिची आठवण करून देतो आहेस? " वि म्हणाला हो ना ! तुझ्या जय्यत तयारीत सर्व काही बसते ना ! पाऊस आला तर छत्री, उन पडले तर टोपी, थंडी पडली तर कोट आणि मफलर ! हाहाहा , मी जोराने हसले आणि म्हणाले , उपयोग होता ना पण या जय्यत तयारीचा, कधी कुठे काही अडत नाही ! अटलांटापर्त्यंतचा प्रवास छान झाला. अधुनमधून थोडे ढगाळी वातावरण होते इतकेच ! हॉटेलवर सुखरूप पोहोचलो. पिझ्झा खायला बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि हॉटेल रूमच्या खिडकीचा पडदा बाजूला केला मात्र ! बाहेर रपारप पाऊस पडत होता. सीएनएन, कोकाकोला शोरूम, मत्सालय पाहण्याकरता साधारण अर्धा ते एक तासाचा ड्राईव्ह असेल. कारमध्ये बसलो. अर्थातच जीपीएस सुरू केले पण तिथे काहीच दाखवत नव्हते. मार्ग दाखवण्यात अडथळे निर्माण झाले होते. आमच्याकडे गुगल मॅप होताच त्यामुळे तिथे जाण्याकरता कोणती एक्झीट घ्यायची ते माहीत होते. पाऊस इतका काही प्रचंड होता की काचेवरचे वायपर अति जलद गतीने सुरू करूनही काही नीट दिसत नव्हते. सर्व वाहने हळूहळू जात होती. जिपीएस काम करत नाहीये, पुढचे नीट काही दिसत नाहीये अश्या अवस्थेत कार हळूहळू पुढे जात होती. काही वेळाने जिपीएसने मार्ग दाखवायला सुरवात केली आणि व्यवस्थित एक्झीट घेऊन आम्ही सीएन एअ सेंटर्ला पोहोचलो.
पाऊस थांबला होता. सीएनएन सेंटरच्या इथे विशेष गर्दी नव्हती. डाऊन टाऊन होते आणि रस्ते सर्व वनवे होते. तिथले कार पार्किंग नक्की कुठे आहे ते कळत नव्हते. शेवटी एकदाचे सापडले. कार पार्क करून बाहेर पडलो तो परत पाऊस सुरू झाला. छत्री होती ती मी डोक्यावर घेतली. वि ने साधे कॉटनचे जाकीट घातले होते व त्याला लागूनच टोपी असल्याने डोके भिजत नव्हते. चालत चालत सीएनएनला पोहोचलो. छानच होते हे सेंटर. माहीती ही छान सांगत होते. नंतर त्याच आवारात आम्हाला चांगले जेवण मिळाले. "ये मुँ और मसूर की डाल" छानच मिळून गेली. तिथून बाहेर पडल्यावर बाहेरच्या सीएन एन पाटीचा फोटो घेतला. बाहेर पडलो तर पाऊस थोडा थांबला होता. कारमध्ये बसून बाहेर रस्त्याला लागलो तर परत धो धो पाऊस सुरू झाला. कोकाकोलाची शोरूम आणि मत्सालय पाहण्याकरता निघालो होतो. वनवे रस्ते भिरभिर करत पार पडले आणि पार्किंगसाठी जागा शोधू लागलो तर एक ठिकाणी ते मिळाले. पण तिथला मीटर बिघडला होता. डेबिट कार्ड काम करत नव्हते आणि बरोबर सुटे पैसेच टाका असे तिथे लिहिले होते. ५ डॉलर्स सुटे नव्हते. पर्समध्ये शोधून शोधून कसेबसे निघाले पण फक्त ३ डॉलर्स ! पाऊस होताच. छत्रीचा काहीही उपयोग होत नव्हता. वारा असल्याने छत्री अनेकदा उलटी होत होती आणि डोके भिजत होते.
विनुचा धीर सुटत चालला आणि चिडचिड वाढली. पार्किंगसाठी सुटे पैसे नाही का घ्यायचे? हीच का तुझी जय्यत तयारी. मी ५० च्या दोन नोटा घेतल्या होत्या. पार्किंगसाठी सुटे पैसे लागतील हे माझ्या डोक्यातच आले नव्हते ! वि म्हणाला चल आपण परत हॉटेल मध्ये जाऊ. मी म्हणाले, थांब ना, इतके आलो तर अजून दुसरे पार्कींग बघू. दुसरे पार्किंग मिळाले पण तिथेही बोंबाबोंबच होती. डेबित कार्ड चालत नव्हते. मी म्हणाले आता शेवटचा ट्राय करू. लांबवर एक पेट्रोल पंप आहे तिथे जाऊन बघू सुटे पैसे मिळतात का ते, नाहीतर मग जाऊ परत हॉटेलमध्ये. तिथे गेलो तर तिथले सर्व सुटे पैसे संपलेले. बरेच जण तिथे सुटे पैसे घेऊन बाहेर पडताना दिसत होते. म्हणजे फक्त आपलीच नाही तर सर्वांचीच पंचाईत झाली होती तर ! पेट्रोल पंपावरून बाहेर पडल्यावर अचानक आम्हाला मस्तालयाच्या पाट्य दिसल्या आणि तिथल्या पार्किंगमध्ये घुसलो. हे पार्किंगही आम्हाला अगदी शेवटच्या मजल्यावरचे मिळाले. तिथे एकच जागा शिल्लक होती. ती जणू काही आमच्या कारसाठी रिजर्व करून ठेवली होती असेच आम्हाला वाटून गेले. आणि लगेचच तिथे कार पार्क केली. चला. निदान कमीत कमी मत्सालय तरी पाहून होईल असा आम्हाला दोघांनाही धीर आला. मत्सालय पाहिले आणि चक्क त्याच आवारातच पलीकडे कोकची शोरून दिसली. इतके काही हायसे वाटले !
आवारात शिरताच क्षणी परत जोरदार पावसाला सुरवात झाली आणि आम्ही चिंब भिजून गेलो. छत्री कारमध्येच विसरून आलो होतो ! पावसाने साठलेल्या पाण्यात फदक फदक पाय मारत निघालो आणि उरले सुरले पायही पूर्णपणे भीजून गेले. गारठायला झाले. कोकची शोरूम आवडून गेली. तिथे सर्व देशातले कोकचे रंगीबेरंगी नमुन्यांच्या टाक्या भरलेल्या होत्या. बाजूला छोटे प्लॅस्टिकचे ग्लास होते. ते घेऊन मनसोक्त कोक प्यायलो. कितीही प्या असे म्हणल्यावर काय विचारता ! तिथे बरीच गर्दी जमा झाली होती आणि सर्वजण कोकचा मनमुराद आनंद लूटत होते. आम्हाला दोघांनाही पेप्सीपेक्षा कोक खूपच आवडतो. कोक पिऊन पिऊन पोट टम्म फुगले होते ! तिथून निघताना डॉलफिनचा शो पाहिला. खूपच सुंदर शो होता ! तिथून बाहेर पडलो तर जवळजवळ अंधार पडतच आला होता. आणि एकापाठोपाठ एक कार जात होत्या. रस्त्याला लागतो न लागतोच परत धो धो पावसाला सुरवात ! असे काय चाललय काय? कहर केलाय या पावसाने. संपूर्ण दिवस पाऊसच पाऊस ! म्हणून म्हणले ना की पावसाने चक्क्क आम्हाला गाठले होते ! दिवसभर पावसात ओलेचिंब भिजून अंगावरच कपडे वाळायला सुरवात झाली होती तर परत पाऊस. अर्थात आता आम्ही कारमध्ये बसलो होतो !
बाहेर हायवे वर ही तोबा गर्दी. हायवे वर मर्ज व्हायला आणि रपारप पावसाची परत एकदा सुरवात. मर्ज झालो आणि परत आमची एक्झीट आली असे वाटले, पण ती आमची नव्हती. जिपीएस परत चालेनासे झाले. जी एक्झीट दिसली ती दुसऱ्याच कोणत्यातरी हायवेला जाणार होती आणि आम्हाला एक्झीट ओन्ली लेन सोडून दुसऱ्या हायवे ला लागायचे होते. पण तिथे जाताच येईना. अतिजलत वायपर असूनही नीट पुढचा आणि मागचा रस्ता दिसेना. डोळे फाडून रस्ता पाहावा तर येणारी वाहने भराभर पुढे निघून जात होती. वाहने वेगात होती. मी वि ला म्हणले की तू कारचा वेग अतिमंद कर आणि सिग्नल दे. मी तुला मागे वळून पाहून सांगते कधी घुसायचे ते. पटकन कसेबसे घुसलो आणि एक दीर्घ निः श्वास टाकला. माझा तर घसाच कोरडा पडला होता. एरवी ही एक्झीट चुकली असती तर काही बिघडले नसते. परत लांब लांब जाऊन येता आले असते. पण गर्दीच इतकी काही होती की चुकीच्या एक्झीटा जाऊन परवडण्यासारखे नव्हते. जोराचा पाऊस, अंधार पडलेला आणि हायवे वर गर्दी असे चित्र आम्ही यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. शेवटी एकदाचे हॉटेलवर येऊन पडलो. कारमधून बाहेर पडताना सुद्धा छत्री लागत होती इतका पाऊस होता.
हॉटेल रूमवर येऊन पडलो. पाय आणि डोके प्रचंड दुखत होते. दिवसभर भिजलेले कपडे बदलले. मी तर गरम पाण्यात पाय सोडून थोडावेळ बसले होते. कपडे बदलल्यावर जरा बरे वाटले. जेवणासाठी बाहेर पडायच खूप कंटाळा आला होता पण जावे तर लागणारच होते. प्रचंड भूक लागली होती. नशिबाने पाऊस बराच कमी झाला होता. झिमझिमत होता. आदल्यादिवशी आलो तेव्हा रात्री पिझ्झा खाल्ल्ला होता म्हणून मेक्सिकन उपहारगृहात गेलो तर ते फास्टफूड असल्याने व्हेज काही मिळाले नाही. तिथून बाहेर पडलो तर दूरवर एक टाको बेल ची पाटी दिसली. नशीब कि त्याच रस्त्यावर लेन न बदलता होती आणि तिथे एकूणच रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. टाको बेल मध्ये निवांतपणे बसून जेवण केले. सेव्हन लेअर बरिटोला छान चव लागत होती. निदान या दिवशीची सांगता तरी चांगली झाली होती. शिवाय दुपारची मसूराची डाळ आणि सँडविच पण चांगले होते. हॉटेल मध्ये परतल्यावर छान झोप लागली.
दुसऱ्या दिवशी चेक आऊत केले व फर्नबँक म्युझिअम आणि प्राणी संग्रहालय बघायला गेलो. दुसऱ्या दिवशी हवा ढगाळ होती पण पाऊस अजिबात नव्हता. त्यामुळे खूप बरे वाटत होते. जिपीएसने पण चांगली साथ दिली. तिथे दुपारच्या जेवणाला व्हेज पिझ्झाही छान मिळून गेला.
अटलांटामधली ५ आकर्षणे बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. लांब पल्ल्याचा प्रवास आणि निघायलाही ३ वाजले होते त्यामुळे घरी परतायला चांगलाच उशीर झाला होता. एक वेगळाच अनुभव गाठीशी जमा झाला होता !!!
Tuesday, May 26, 2015
चिमनी रॉक
हवा
स्वच्छ आणि सुंदर होती. शिवाय हवेत अजिबातच आर्द्रता नव्हती आणि
म्हणूनच लाँग विकेंडचा प्लॅन बनवला. खरे तर आम्ही हँगिग रॉकला जाणार होतो.
तिथे २ वेळा जाऊन आलो होतो पण आम्हाला हा रॉक इतका काही आवडला आहे की
मेमोरिअल डेला वर्षातून एकदा हॅगिंग रॉकला जायचेच असे आम्ही ठरवून टाकले
होते. मीच म्हणाले तिथे जायला नको म्हणजे मला पण तो रॉक आवडतोच पण तिथले
सर्व फोटो घेऊन झाले आहेत. आणि ट्रीप ला जायचे आणि फोटो काढायचे नाहीत!
चिमनी रॉकला जायचे ठरवत होतो. अजून दुसरी ठिकाणेही बघत होतो. तसे तर नॉर्थ
कॅरोलायना सर्व पालथा घातला आहे. अजून एक दोन ठिकाणे राहिली आहेत पण ती २
तासाच्या अंतरात आहेत , ती नंतरही करता येतील म्हणून चिमनी रॉक ठरवला. तर
सर्व हॉटेल्स पटापट बुक होत होती. शेवटी एक हॉटेल मिळाले आणि मी तयारीला
लागले. नेहमीप्रमाणेच एक वेळचे जेवण आम्ही बरोबर घेतोच. कोणत्या रस्त्याने
जायचे हेही ठरवत होतो. ७४, ४० की ७४ वरून पुढे २० आणि २६
रस्त्याचा फाटा घ्यायचा? शेवटी २०-२६ च्या फाट्यावरून जायचे ठरले. इथे
विश्रांती थांबे आहेत आणि रस्ते सरळ सरळ आहेत. हल्ली जिपीएस बरोबर घेतोच
कारण की हायवे सोडला की रस्त्यांची नावे पटकन दिसत नाही आणि चुकायला होतेच
आणि मग भिरभिर फिरत राहून शोधणे मला अजिबात पसंत नाही. शिवाय मला जिपीएस
अजून एका कारणासाठीही आवडते. त्यातली बाई ओरडून तुम्हाला रस्ता सांगत असते
आणि तो दिसतही असतो. कुणीतरी आपल्याबरोबर आहे असे वाटते.
चिमनी रॉकच्या इथे येऊन थडकलो. तिकिटे घेतली आणि वळणावळणाच्या रस्त्याने थेट चिमनी रॉकच्या पायथ्याशी आलो. आता समोरच रॉक दिसतोय म्हणल्यावर चला इथेच आधी जाऊ, बाकीचे नंतर पाहू असे ठरवले. शनिवारी सकाळी ९ वाजता निघालो ते चिमनी रॉक गाठायला आम्हाला ४ वाजले. आधी गुगलींग करून माहीती वाचली होती. ५०० पायऱ्या चढायच्या आहेत याचीही मनाची तयारी केली होती. चिमनी रॉकवर जाण्यासाठी लाकडी जिने बांधले आहेत. चढायला सुरवात केली आणि धापा टाकत टाकत वर वर जात होतो. तिथे चढत असलेल्या सर्वांनाच खूप धापा लागत होत्या. दम खायला मध्ये सगळेच जण थांबत होते. कधी येणार ? असे म्हणून वर पाहिले तर आता अगदी थोडेच आहे. तो काय दिसतोय की वर ! अमेरिकेचा झेंडाही फडफडतोय. आता अगदी नकोसे होऊन गेले होते. पाठ पाय आणि कंबर दुखायला लागली होती. मध्ये मध्ये थांबून कोक ढोसत होतो. आता फक्त एकच जिना बाकी होता. तिथे एक उपहारगृह दिसले. तिथे सगळी मंडळी आईस्क्रीम खाण्यात दंग होती. आम्ही पण आईस्क्रीम खाल्ले . ते खाल्यावर अगदी जीव आल्यासारखे वाटले ! वर जाऊन तिथल्या खडकांवर बसलो. फोटोसेशन झाले. वि म्हणला की अजून एक वर पॉईंट राहिला आहे तो करून जाऊ. मी म्हणाले नको आता. बास झाले. वर बघितले तर तो खूपच वर वाटत होता. पण इतके आल्यावर थोडक्याकरता तिथे जायचे नाही हे पण पटत नव्हते.
आईस्क्रीम खाल्ल्याने ताजेतवाने वाटत होते. आणि आम्ही अजून वर चढायला
सुरवात केली. हा चढ खूप कठीण होता. उंच उंच जात होता. अर्थात चढताना
कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. मी वि ला म्हणाले आपण उगीचच इथे आलो,
वर कुणीच दिसत नाहीये. आपण जाऊ परत , पण तितक्यात वरून काही लोकांचे
बोलण्याचे आवाज ऐकू आले आणि मला बरे वाटले. नंतर अजून एक फॅमिली
येताना दिसली. वरून एक जोडपे खाली उतरत होते, त्यांनी आम्हाला सांगितले आता
अगदी थोडे राहिले आहे. वर जा. तिथून खूप छान नजारा दिसतो. आम्हाला
दोघांनाही वर चढून चढून खूपच दमायला झाले होते. माझी तर खूपच चिडचिड होत
होती. शेवटी एकदाचे पोहोचलो. इथून खोलवर पसरलेली दरी आणि त्यामध्ये उगवलेली
हिरवी झाडी पाहून सुखावलो. चढताना अजिबात उन लागले नाही. वर गेल्यावर मात्र
खुप उन होते. स्पष्ट सावल्या पडत होत्या. तिथल्या गाईडने आम्हाला सांगितले
की मी ५ मिनिटांत पार्क बंद करतोय. फोटो काढायचे तर काढून घ्या. नंतर तोच
आम्हाला म्हणाला की मी एक तुमच्या दोघांचा फोटो काढतो. या पॉईंटला खूपच कमी
माणसे येत होती. बरिच माणसे चिमनी रॉकच्या खडकावर हवा खात बसली होती. इथून
बराच खाली रॉक आणि त्या खालची हिरवीगार झाडे दिसत होती. शिवाय लेक ल्युअर पण दसत होता.
थोड्याच वेळात आम्ही खाली उतरायला सुरवात केली. उतरताना मात्र क्वचित एक दोन वेळाच दम खायला थांबलो. खाली उतरलो. कारमध्ये बसलो आणि थेट हॉटेल गाठले. प्रचंद भूक लागली होती. त्यात भर म्हणजे खूपच दमायला झाले होते. आधीचा ६ तासांचा प्रवास आणि नंतरचे ३ तास चढून आणि उतरून खूपच दमछाक झाली होती. हॉटेल वर बॅगा टाकल्या. तिथली कॉफी प्यायली आणि मेक्सिकन उपहारगृहाचा पत्त्ता जीपिएस वर टाकला. पण रस्ता बंद असल्याने तिथे जाता आले नाही म्हणूउन पीझ्झा खायला गेलो. परत हॉटेल वर आल्यावर मी म्हणाले की उद्या सकाळी घरी परतू. विनू पण म्हणाला तेच करू. मलाही खूप दमायला झाले आहे.
आम्ही साधारण ५०० ते ६०० फूट वर चढून गेलो होतो आणि जिन्याचा हिशेब केला तर अंदाजाने ५० मजले वर चढून गेलो होतो. पायात प्रचंड गोळे आले होते. पाठ आणि मानही खूप दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तिथला एक प्रसिद्ध धबधबा पाहावा का असा विचार केला पण तिथे जाण्यासाठी मन आणि शरीर तयार होईना ! हा धबधबा पूर्व किनापट्टीवरचा सर्वात उंचावरचा आहे. तिथे एक दोन फिल्मचे शूटींगही झाले आहे. युट्युबवर पाहिले होते. मोह तर होत होता आणि इतके केले त्यात हेही करूच असे मनही सांगत होते पण शेवटी निर्णय परत घरी जाण्याचाच घेतला आणि तेच योग्य होते. या ट्रीपमध्ये चढण्याची आणि कारने प्रवास म्हणजे येऊन जाऊन १२ तास बसण्याची क्रिया झाली होती. चालणे अजिबात झाले नव्हते म्ह्णून मेमोरिअल डे, सुट्टीच्या दिवशी नदीवर चालायला गेलो तेव्हा कुठे थोडे पाय मोकळे होत आहेत.
चिमनी रॉकवरून आल्यापासून मनामध्ये हॅगिंग रॉकची व चिमनी रॉक यांची सारखी तुलना आम्ही करतोय आणि सतत हेच म्हणतोय की हॅगिॅग रॉक चिमनी रॉकपेक्षा कितीतरी पटीने छान आहे !! अगदी खरे आहे हे ! तिथेही खोलवर जाणारे धबधबे आहेत आणि हॅगिॅग रॉकही बराच उंचावर आहे. पण इथे पायऱ्य नाहीत. तीक्ष्ण चढ आणि आणि उतार आहेत पण इथे चालण्याची क्रिया होते त्यामुळे इतके दमायला होत नाही आणि दमलो तरी भरपूर उत्साह घेऊनच येतो ! अर्थात प्रत्येकाचे सौंदर्य आणि त्रास निरनिराळा असतोच.
चिमनी रॉकच्या इथे येऊन थडकलो. तिकिटे घेतली आणि वळणावळणाच्या रस्त्याने थेट चिमनी रॉकच्या पायथ्याशी आलो. आता समोरच रॉक दिसतोय म्हणल्यावर चला इथेच आधी जाऊ, बाकीचे नंतर पाहू असे ठरवले. शनिवारी सकाळी ९ वाजता निघालो ते चिमनी रॉक गाठायला आम्हाला ४ वाजले. आधी गुगलींग करून माहीती वाचली होती. ५०० पायऱ्या चढायच्या आहेत याचीही मनाची तयारी केली होती. चिमनी रॉकवर जाण्यासाठी लाकडी जिने बांधले आहेत. चढायला सुरवात केली आणि धापा टाकत टाकत वर वर जात होतो. तिथे चढत असलेल्या सर्वांनाच खूप धापा लागत होत्या. दम खायला मध्ये सगळेच जण थांबत होते. कधी येणार ? असे म्हणून वर पाहिले तर आता अगदी थोडेच आहे. तो काय दिसतोय की वर ! अमेरिकेचा झेंडाही फडफडतोय. आता अगदी नकोसे होऊन गेले होते. पाठ पाय आणि कंबर दुखायला लागली होती. मध्ये मध्ये थांबून कोक ढोसत होतो. आता फक्त एकच जिना बाकी होता. तिथे एक उपहारगृह दिसले. तिथे सगळी मंडळी आईस्क्रीम खाण्यात दंग होती. आम्ही पण आईस्क्रीम खाल्ले . ते खाल्यावर अगदी जीव आल्यासारखे वाटले ! वर जाऊन तिथल्या खडकांवर बसलो. फोटोसेशन झाले. वि म्हणला की अजून एक वर पॉईंट राहिला आहे तो करून जाऊ. मी म्हणाले नको आता. बास झाले. वर बघितले तर तो खूपच वर वाटत होता. पण इतके आल्यावर थोडक्याकरता तिथे जायचे नाही हे पण पटत नव्हते.
आईस्क्रीम खाल्ल्याने ताजेतवाने
थोड्याच वेळात आम्ही खाली उतरायला सुरवात केली. उतरताना मात्र क्वचित एक दोन वेळाच दम खायला थांबलो. खाली उतरलो. कारमध्ये बसलो आणि थेट हॉटेल गाठले. प्रचंद भूक लागली होती. त्यात भर म्हणजे खूपच दमायला झाले होते. आधीचा ६ तासांचा प्रवास आणि नंतरचे ३ तास चढून आणि उतरून खूपच दमछाक झाली होती. हॉटेल वर बॅगा टाकल्या. तिथली कॉफी प्यायली आणि मेक्सिकन उपहारगृहाचा पत्त्ता जीपिएस वर टाकला. पण रस्ता बंद असल्याने तिथे जाता आले नाही म्हणूउन पीझ्झा खायला गेलो. परत हॉटेल वर आल्यावर मी म्हणाले की उद्या सकाळी घरी परतू. विनू पण म्हणाला तेच करू. मलाही खूप दमायला झाले आहे.
आम्ही साधारण ५०० ते ६०० फूट वर चढून गेलो होतो आणि जिन्याचा हिशेब केला तर अंदाजाने ५० मजले वर चढून गेलो होतो. पायात प्रचंड गोळे आले होते. पाठ आणि मानही खूप दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तिथला एक प्रसिद्ध धबधबा पाहावा का असा विचार केला पण तिथे जाण्यासाठी मन आणि शरीर तयार होईना ! हा धबधबा पूर्व किनापट्टीवरचा सर्वात उंचावरचा आहे. तिथे एक दोन फिल्मचे शूटींगही झाले आहे. युट्युबवर पाहिले होते. मोह तर होत होता आणि इतके केले त्यात हेही करूच असे मनही सांगत होते पण शेवटी निर्णय परत घरी जाण्याचाच घेतला आणि तेच योग्य होते. या ट्रीपमध्ये चढण्याची आणि कारने प्रवास म्हणजे येऊन जाऊन १२ तास बसण्याची क्रिया झाली होती. चालणे अजिबात झाले नव्हते म्ह्णून मेमोरिअल डे, सुट्टीच्या दिवशी नदीवर चालायला गेलो तेव्हा कुठे थोडे पाय मोकळे होत आहेत.
चिमनी रॉकवरून आल्यापासून मनामध्ये हॅगिंग रॉकची व चिमनी रॉक यांची सारखी तुलना आम्ही करतोय आणि सतत हेच म्हणतोय की हॅगिॅग रॉक चिमनी रॉकपेक्षा कितीतरी पटीने छान आहे !! अगदी खरे आहे हे ! तिथेही खोलवर जाणारे धबधबे आहेत आणि हॅगिॅग रॉकही बराच उंचावर आहे. पण इथे पायऱ्य नाहीत. तीक्ष्ण चढ आणि आणि उतार आहेत पण इथे चालण्याची क्रिया होते त्यामुळे इतके दमायला होत नाही आणि दमलो तरी भरपूर उत्साह घेऊनच येतो ! अर्थात प्रत्येकाचे सौंदर्य आणि त्रास निरनिराळा असतोच.
एक वेगळा अनुभव म्हणून चिमनी रॉक आम्हाला
दोघांनाही आवडलाच यात वाद नाही, पण झुकते माप हँगिग रॉकलाच !!!
Wednesday, May 20, 2015
पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(4)
सकाळी उठलो, पटापट आवरले आणि हॉटेलच्या लॉबीमध्ये आलो. आज सॅन फ्रॅन्सिस्को शहर दाखवणार होते. त्यामुळे आज तसा निवांतपणा होता. २५ डिसेंबरची सुट्टी होती. बरोबर थोडेफार तोंडात टाकायला खायला घेतले होते म्हणजे २/४ बेसन लाडू, कचोरी व केक पण तरीही केळी आणली असती तर फार बरे झाले असते, निदान पोट तरी भरले असते असे वाटून गेले. आजचा दिवस उपासाचा होता हे आम्हाला कुठे माहीत होते? सबंध दिवस भूकेने व्याकुळ झालो होतो. सकाळी सकाळी उठल्या उठल्या पर्वतीसारखा चढ चढला. थंडी होती पण तरीही मी पंजाबी सूट घातला होता. पर्वतीसारख्या चढावर नाही म्हणायला मद्रासी रंगाची बोगनवेल दिसली म्हणून बरे वाटत होते. चढ आणि उतरताना उतारच उतार त्यामुळे पाऊलांना ब्रेक लावायला लागत होते. लोंबार्ड स्ट्रीट हा असाच उंचावर चालत जाण्यासारखा आहे. तिथे कोणी कोणी स्किलफुल ड्राईव्ह पण करताना दिसत होते. नंतर तिथून फाईन आर्ट पाहिले व अजून एक दोन ठिकाणे पाहून गोल्डन ब्रीजला आलो. फोटोतच हा ब्रीज जास्त छान दिसतो. त्यावर चालून आलो. पण इतकी मजा आली नाही. एक तर वेळही कमी होता आणि काही काही गोष्टी प्रत्यक्षात जास्त चांगल्या नसतात तर काही गोष्टी प्रत्यक्षात चांगल्या नसूनही फोटोत छान येतात. ब्रीजचे फोटो काढले. वारे आणि थंडी होती त्यामुळे डोके दुखायला लागले आणि त्यात भर म्हणजे उपासाची !
एके ठिकाणी बोट राईड होती. तिथे खूप गर्दी होती. ही बोट राईड समुद्रातून होती. या राईडमधून परत येताना गोल्डन गेटच्या खालून जातो. एक तर थंडी, त्यात उन पडले होते. ते तीव्र तीव्र वाटत होते. एके ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सोडले आणि जेवण झाल्यावर साधारण दोन तासाने बोट राईड करता अमूक ठिकाणी येऊन थांबा असे सांगितले. त्या गाईडने सांगितले की होटेल आहे तिथे नूडल्स चांगले मिळतात. आम्ही शाकाहारी त्यामुळे आम्ही तेच खाणार होतो पण ते होटेल नेमके बंद होते. मग जॅक्स फास्ट फूड मध्ये काही मिळते का ते बघत होतो. भूक जोरदार लागली होती. अजून हॉटेलची शोधाशोध करत फिरणात बळ नव्हते. तिथे असलेली गर्दी , तीव्र उन आणि लागलेली भूक यामुळे अंगात त्राण नसल्यासारखेच वाटते होते. तिथे फ्रेंच फ्राईस, बर्गर पण एक विनंती करून मिळाला. म्हणजे व्हेज बर्गर. ती द्यायला तयारच न्हवती पण दिला. आणि बनाना आणि स्ट्रॉबेरी स्मुदी घेतली. तात्पुरते का होईना पोट भरले. बोट राईड छान होती. त्या राईडमध्ये कोक घेतला. हे होईपर्यंत ५ वाजले. मग परत काही ठिकाणी फिरलो. एक चर्च बघितले. सिटी हॉल बघितला, पब्लिक लायब्ररी बघितली. आणि चायना टाऊन मध्ये आलो. एकूणच इथले सर्व रस्ते उंचसखल होते. बसमधून समोरचा खाली उतारासारखा रस्ता चांगला दिसत होता. भूक लागली पण इथे या चायना टाऊन मध्ये काही नीट मिळेल असे वाटत नव्हते. शेवटी एका हॉटेल्मध्ये आलो तिथे आम्हाला गाईइने सांगितले की तुम्हाला इथे व्हेज फ्राईड राईस नक्की मिळेल. त्यामुळे तो राईस आणि एक कुठली तरी मिक्स भाजी घेतली. ते हॉटेल इतके चांगले नव्हते. पण काहीका होईना थोडे तरी पोट भरायला शाकाहारी अन्न मिळाले हे ही नसे थोडके. भात भाजी खाल्यावर पोट भरले. रात्री हॉटेल मध्ये आल्यावर निवांत पडायचे असे काही नव्हते.
एकूणच या शहराचे दर्शन छान झाले. बाहेर पडले म्हणजे थोडाफार त्रास सहन करावा लागतोच हे तर गृहीतच असते. आतापर्यंत आमची ट्रीप खरच खूप छान झाली. उद्या आमच्या ट्रीपचा शेवटचा भाग होता. उद्या योसेमिटीत जाऊन मग येतानाचा आम्हाला लॉस अँजलिस विमानतळावर सोडणार होते जिथून आमची ट्रीप सुरू झाली होती.
मी बॅगा भरायला सुरवात केली. म्हणजे वापरलेले कपडे एका बॅगेत, नको असलेल्या गोष्टी एका बॅगेत, तर काही गोष्टी प्रवासात लागणाऱ्या एका बॅगेत ठेवत होते. सगळी जय्यत तयारी करून ठेवली म्हणजे उठल्यावर आवरले की बाहेर पडायचे आणि आता आम्ही योसेमिटीचे दर्शन झाल्या झाल्या थेट विमानात बसणार होतो घरी येण्यासाठी. लवकर निघायचे होते त्यामुळे झोप नाहीच पण निदान पाठीला आराम मिळावा म्हणून पाठ टेकली. सकाळी उठून नेहमीप्रमाणेच आवरले आणि होटेलच्या लॉबीत येऊन थांबलो. आम्ही दोघेही योसेमिटी बघण्याकरता खूपच उत्सुक होतो! आम्हाला योसेमिटी खूपच आवडून गेला पण यावेळी फक्त दर्शनच घेतले. पण पुढच्या ट्रीप मध्ये योसेमिटी २ दिवसाची ट्रीप नक्कीच करणार इतका आम्हाला आवडला. उंच उंच झाडे, धबधबा, सर्व काही छान आणि निसर्गरम्य ! पुढील आणि या सहलीचा अखेरचा भाग घेऊन लवकरच येईन.
Sunday, May 17, 2015
Saturday, May 16, 2015
Subscribe to:
Posts (Atom)