क्लेम्सनमधून बाहेर पडल्यावर काही वेळाने ८५ महामार्गावर जाण्यासाठी
ग्रीनवीलची एक मोठीच्या मोठी वेटोळी एक्झीट घ्यावी लागते. ही एक्झीट लक्षात
राहिली याचे कारण इथे अमेरिकेत आल्यावर पहिलावहिला लांब पल्य्यचा प्रवास
जेव्हा केला होता तेव्हा या भल्यामोठ्या वेटोळ्या एक्झीटवरून जाताना मी तर चक्क श्वास रोखून धरला होता !
त्या
आधीचा एक रस्ता होता त्याचा उजव्या बाजुने एक वळण घेतले तेव्हा मी
मागे वळून पाहिले आणि मनात म्हणाले "आता इथे परते येणे नाही" एक्झीट घेताना
सुद्धा जाणवत होते की एक्झीट घेतोय ती आता शेवटची ! मन खूप भरून आले होते.
कारमध्ये आम्ही दोघे पुढच्या सीटवर होतो. माझ्या पायाशी काही सामान होते.
तर मागच्या सीटवर डेस्कटॉप आणि छोटा टीव्ही होता. त्याला आधार देण्यासाठी
उश्या लावल्या होत्या.
हे सर्व सामान लावायला आम्हाला
पूर्णिमाने मदत केली. कारमध्ये सामान व्यवस्थित ठेवल्यावर आम्ही परत घरात
आलो. रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. पूर्णिमेला आम्ही आमच्या फ्रीजमधले दूध व
ज्युस दिले. ती म्हणाली, मी तुमच्याकरता कॉफी बनवते. रिकाम्या खोलीत आम्ही
मांडी घालून बसलो. पूर्णिमाने आमच्या तिघांकरता कॉफी बनवली. ती प्यायली
आणि मी कप विसळायला उठले तर मला एकदम हुंदकाच फूटला. पूर्णिमेलाही रडू
फुटले. आम्ही दोघीही रडलो. पूर्णिमा म्हणाली "बहूतही
अच्छे दिन थे ना इधरके ! हम वो कभी नही भूलेंगे ! पूर्णिमा व अभिरामी या
दोन्ही विद्यार्थिनी आमच्या घराच्या वरच्या मजल्यावार रहायच्या. मी त्यांना
बरेच वेळा बटाटेवडे, समोसे, साबुदाणा खिचडी द्यायचे. त्याही मला त्यांचे
रसम आणि सांबार द्यायच्या. तिथे राहत असताना आम्ही आमच्या कारमधून त्या
दोघींना ग्रोसरीकरता न्यायचो. शुक्रवार ठरलेला. रात्रीची जेवणे करून
ग्रोसरीला निघायचो.
आमचे विल्मिंग्टनला जायचे निश्चित झाल्यावर मी सामानाची बांधाबांध करायला
सुरवात केली. मूव्हींगचा आधीचा अनुभव कामी आला ! एकेक करत १० ते १२ खोकी
तयार झाली. त्या सर्व खोक्यांना चिकटपट्या चिकटवून त्यावर नवीन
अपार्टमेंटचा पत्ता व फोन नं लिहिला. अपार्टमेंट बुक करतानाच तिथल्या
ऑफीसमध्ये विचारून ठेवले होते. अमुक एका दिवशी आमचे सामान येईल ते तुमच्या ऑफीसमध्ये ठेवले तर चालेल का? त्यांनी लगेचच होकार दिला. इंडियातून आणलेल्या भल्या मोठ्या ४ बगा, त्यात
सामान कडेकोट भरलेले ! शिवाय १० ते १२ खोकी एकेक करत ४ ते ५ चकरा कारने
झाल्या. जड खोकी विनायकने उचलून कारमध्ये घालायची व ती युएस पीएस मध्ये
नेऊन द्यायची. असा काही वेळ आमचा कार्यक्रम पार पडला. निरानिपटीने घर आवरले होते. प्रत्येक खोक्यामध्ये एकाच प्रकारचे सामान ठेवले होते.
म्हणजे एका खोक्यात स्वयंपाकाची भांडी, तर एका खोक्यात पुस्तके, तर एका खोक्यात सटरफटर सामान. जरूरीपुरते सामान मात्र आधीच वेगळे करून त्याची एक बॅग आम्ही आमच्या बरोबर घेणार होतो. टुथपेस्ट, ब्रश, कंगवे, घरात घालायचे व बाहेर घालायचे २ ४ कपडे, पेपर टॉवेल, टिशू पेपर, साखर, चहा, २ -४ चहा प्यायचे कप, पाणी पिण्याची भांडी, थोडी कणीक, तांदुळ, मिसळणाचा डबा, इ. इ. म्हणजे काही कारणाने आमच्या सामान आमच्या आधी पोहोचले नाही तर पंचाइत व्हायला नको ! निघायच्या आधीच घर रिकामे झाले होते. जरुरीपुरते सामान, डेस्क टॉप, लॅडलाईन फोन, टिल्लू टीव्ही इतकेच सामान खोलीत उरले होते. त्यादिवशी रात्री आम्ही पूर्णिमा अभिरामीकडे
जेवलो. फ्रीजमधल्या उरलेल्या काही भाज्या त्यांना दिल्या. त्यांच्याकडे
जेवून घरी आल्यावर झोपलो. झोप नीट लागली नाही कारण सामानाची बांधाबांध करून
आणि अपार्टमेंटची स्वच्छता करून खूपच दमायला झाले होते.
क्लेम्सन मधले घर जरी लहान असले म्हणजे एकच खोली (स्टुडिओ अपार्टमेंट) तरी बाकीच्या दृष्टीने क्लेम्सनचे दिवस खूपच छान गेले होते. मी ३ ते ४ नोकऱ्या केल्या, मित्रमंडळ जमा झाले
होते. एकत्र जेवणे होत होती. त्यामुळे हे सर्व सोडून दुसऱ्या ठिकाणी जायला
मन तयार नव्हते. अर्थात पोस्ट डॉक पर्व संपणार होते ते एका अर्थाने चांगलेच
होते. एच १ च्या कॅप मध्ये वेळीसच गेलो होतो. माझा मात्र एच ४ व्हिसा झाल्याने मला नोकरी करता येणार नव्हती. आधीच्या विसावर वर्क परमिट काढल्याने मला नोकरी करता आली. वेगळा अनुभव मिळाला होता. नवीन शहरात मिळालेले अपार्टमेंट छानच होते. २ बेडरून अपार्टमेंट, भरपूर सूर्यप्रकाश, समोरासमोर दारे, सिलींग फॅन होते. त्यामुळे नव्या जागेत जागेत जायला आम्ही दोघेही उत्सुक होतोच. शिवाय नोकरी
निमित्ताने जाणार होतो आणि नवीन घरात नवीन फर्निचरही घेणार होतो.
आत्तापर्यंतच्या साडे तीन वर्षात आम्ही आमचे असे फर्निचर घेतले नव्हते.
आधीच्या मूव्हींग मध्ये विमाना प्रवास होता तर या मूव्हींगमध्ये आम्ही
आमच्या कारने जाणार होतो ! प्रत्येक मूव्हींग वेगळ्या प्रकारचे असते, नाही का?
दमणूक आणि मनातले विचार याने झोप काही लागत नव्हती. शेवटी बऱ्याच वेळाने लागली. सकाळी उठवत नव्हते पण उठायला तर हवेच ना ! उठून अंघोळी पांघोळी उरकल्या. वास्तूला नमस्कार केला आणि मनात म्हणाले "खूप छान गेले इथले दिवस" राजेश प्राचीने आम्हाला सकाळच्या न्याहरीला बोलावले होते. प्राचीने गरम गरम सँडविचेस बनवली होती. ती खाल्ली आणि त्यावर आलं घातलेला चहाही प्यायलो. त्यांचा निरोप घेतला व परत घरी आलो. कारमध्ये सामान ठेवलेले होतेच. पूर्णिमेचा निरोप घेतला आणि तिला आमच्या अपार्टमेंटची चावी दिली आणि ती ऑफीसमध्ये नेऊन दे असेही सांगितले. विनायकने कार सुरू केली आणि तिला टाटा बाय बाय करत हळूहळू कार रस्त्याला लागलीही! कारमध्ये बसण्या आधी परत एकदा खिडकीतून घराला बघून घेतले. हे घर कायमचे सोडून जात आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली.
त्या दिवशी निघताना भरपूर थंडी होती ! प्रवासात मधल्या वाटेत विश्रांती
थांबा होता. तिथे थांबलो. प्रचंड थंडीमुळे बाहेर बाकावर बसून जेवता आले
नाही. त्यामुळे कारमध्ये बसूनच पोळी भाजी खाल्ली. पाण्याची बाटली होतीच
त्यामुळे बरे झाले ! साधारण संध्याकाळच्या सुमारास विल्मिंग्टनला येऊन
पोहोचलो. एका मित्राच्या घरी आलो आणि तिथूनच सकाळी उठून आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये आलो. अपार्टमेंट वरच्या मजल्यावर होते. आमचे सामान आदल्या दिवशी येऊन पोहोचले होते ! सर्व खोकी, बॅगा, डेस्क टॉप, टिव्ही, एकेक करत आमच्या अपार्टमेंटमध्ये विनायकने व त्याच्या मित्राने वाहून आणले. मी बाकीच्या छोट्या बॅगा आणल्या. सकाळी सकाळीच जिना चढण्या उतरण्याचा भरपूर व्यायाम झाला. सामान उचलून उचलून अंगदुखीमध्ये आणखी भर पडली. नंतर विनायकने दूध आणले.
चहा प्यायल्यावर जरा थोडे बरे वाटले. हॉलमध्ये सर्व सामान होते. थोडावेळ जरा आडवे झालो आणि मग नंतर जवळच असलेल्या पिझ्झा हटमध्ये जेवण करून आलो. एकेक करून परत खोक्यांवर चिकटवलेल्या चिकटपट्या काढल्या आणि सामान काढले. स्वयंपाक घरातले सामान पटापट लावून घेतले. रिकाम्या जागेत परत एकदा नव्याने संसार मांडायला सुरवात झाली !!
क्रमश : .....
Tuesday, December 29, 2015
Friday, December 25, 2015
२५ डिसेंबर २०१५
आजचा दिवस नाताळचा, सुट्टीचा. आम्हाला दोघांनाही सुट्टी होती त्यामुळे ग्रीनवीलला जायचे ठरवले. मुख्य म्हणजे काल मला कामावर अर्धा दिवसच जायचे होते त्यामुळे दीड दिवसाची सुट्टी मस्तच गेली. काल विला सुट्टी होती त्यामुळे तो मला आणायला आणि न्यायलाही आला होता.
काल कामावरच्या काही बायका नटून थटून आल्या होत्या. कामाचा कोणाचाही मूड नव्हता तरी काम हे करावेच लागते. विकीने मला एक छान गिफ्ट दिली. गिफ्टमधले दिलेले कानातले घालून आज ग्रीनविलला गेलो. तिथे थाळी घेतली. काल आणि आज दिवसभर खूपच ढ्गाळ हवा आणि अधुनमधून थोडा थोडा पाऊस पडत होता. कालच्या अर्ध्या दिवसाच्या कामानंतरही थेट मेक्सिकन उपहारगृहात जेवण केले आणि आल्यावर आराम केला. आराम केल्यामुळेच कालचा आजचा दिवस जास्त छान गेला असे वाटते.
दीड दिवसाच्या सुट्टीत बाहेरच जेवण, इंडियन भाज्या घेणे झाले आणि हवाही खूप स्वच्छ आणि सुंदर नसली तरी छान वाटत होते. थंडीचे मात्र नाव नाहीये. खूप गरम होत आहे. उद्या कामावर जायचा खूप कंटाळा आला आहे. मागच्या वर्षीचा २५ डिसेंबरला आम्ही सॅन फ्रॅन्सिस्कोला होतो त्याची आठवण झाली. विकीने दिलेले कानातले मात्र मला खूपच आवडून गेले आहेत !
भारतीय उपहारगृह चालू असल्यानेच वेगळेपणा आला नाहीतर २५ डिसेंबरला सर्व काही बंद असते. मग घरातच करावे लागते.

Thursday, December 03, 2015
३ डिसेंबर २०१५
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला हवी. आज स्वच्छ
सूर्यप्रकाश तर काल पाऊस आणि ढगाळ हवा. काल जेव्हा सकाळी कामाकरता दोघेही
बाहेर पडलो तर आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस पडून गेला आहे ते चांगलेच
जाणवत होते ! सर्वत्र खूपच ओल दिसत होती तर रस्त्यावर काही ठिकाणी पाणी
साचले होते. असे वाटत होते झोपून राहावे कामावर जाऊच नये.!
कालचा दिवस खूप छान होता तर आज कामावर जायचे नसूनही झोपेत आणि आळसात दिवस गेला. आज हेअर कलर केला. काल रात्रीला केलेली भरल्या वांग्याची भाजी होती म्हणून आज मी वरण भाताचा कूकर लावला. आणि गरम भात त्यावर तूप व सोबत भरली वांगी. भात खाल्याने आणि डोक्यावरून अंघोळ केल्यानेच बहुतेक आज खूप झोप लागली होती. काल तसे काम बरेच कमी होते. चालताना हवेत सुखद गारवा होता. आल्यावरही थोडावेळ पडून कामे उत्साहाने केली.
कामावरची विकी आज माझ्या खूप प्रेमात पडली होती. तिथे मला क्लब संडविच कसा बनवायचा ते दाखवले. ती काल लवकर निघणार होती. तिचे कोलोस्ट्रोल खूप वाढल्याने तिच्या डॉक्टरांनी तिला वेज डाएट करा असे सांगितले आहे. आणि म्हणून ती स्टोअर्स मधले व्हेज बर्गर घेण्याकरता गेली आणि मला पण बरोबर नेले. स्टोअरस मध्ये आता सर्वांना माहीत झाले आहे की मी पक्की शाकाहारी आहे ते ! विकीने निघताना मला हग केले. कार्मेन काल नव्हती आणि लुलू पण दुसऱ्या कामात बिझी होती.
रविवारी खूप काम होते इतके की सोमवार मंगळवार सुट्टी होती आणि आरामही बऱ्यापैकी झाला होता तरी पाय खूप दुखत होते. पण कालचा दिवस मात्र छान च ! कमी कामाचा. बाहेर पावसाळी हवा. कामावरून निघताना बाहेर पडले आणि चालत आले तरी त्रास झाला नाही. उलट छान वाटत होते. पावसाने रस्त्याच्या कडेला ओहळ निर्माण झाले होते. थोडे थांबून त्या वाहत्या पाण्याकडे पाहत मनात विचार आले की आयुष्य हे ओहळासारखेच सतत वाहणारे हवे. थांबले तर आयुष्य ठप्प होऊन जाईल आणि मजाच निघून जाईल.

काल आल्यावर मी गवार निवडली. गवार निवडताना
मी तल्लीन होऊन जाते इतकी मला ती निवडायला आवडते. आज
कार्ल्याची परतून भाजी आणि मुळ्याची कोशिंबीर आहे. आज सुट्टी असल्याने
संध्याकाळी कोरडी भेळ करून खाल्ली. चुरमुरे, फरसाण, बारीक चिरलेला कांदा
आणि कोथिंबीर आणि इंडियन स्टोअर्स मधून आणलेली तिखट मिरची चुरडून लावली.
अशी भेळ आम्हाला दोघांनाही खूपच आवडते. त्यात भाजके दाणे हवेच.
चला आता लागोपाट ३ दिवस कामाला जायचे आहे ! उद्या कामावार जा यचे नाही याची मजा
आदल्या दिवशीच !
चला आता लागोपाट ३ दिवस कामाला
आदल्या दिवशीच !
Subscribe to:
Posts (Atom)