
अमेरिकेतील अनुभव, आठवणी, कलाकुसर, छंद, गप्पागोष्टी यांचा संगम म्हणजेच स्मृति.....
आज
पहिल्यांदाच ब्लॅक फ्रायडेची खरेदी केली. आज कामावर मजा आली. काम खूपच
होते. आज ८ तासाची ड्युटी होती. Kohl's मध्ये आज जत्रा होती.
Kohl's मध्ये आज सर्वांना ब्रेकफास्ट आणि जेवण होते. मी जेवण नाहि
घेतले. रांगाच रांगा होत्या. दुकानाबाहेर पोलीस सेक्युरिटी होती. सकाळी
वुमन्स डिपार्टमेंटला होते तर लंच नंतर men's बॅंक रजिस्टरला होते. मी
माझ्यासाठी आधीच खरेदी करण्यासाठी कपडे राखून ठेवले होते. काम झाल्यावर मी
कपडे ट्राय केले आणि भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले. एका top चा आवडीचा
रंग आणि टी शर्टवर काहीतरी कोरलेले घ्यायचे असे बरेच वर्ष मनात होते ते ही
खरेदी केले. shopping साठी सीझन सुरू झाल्याने माझे आठवड्याचे वेळापत्रक
खूप हेक्टिक आहे. रिटर्न्स तर इतके येत आहेत की रॅक भरून ते ओसंडून वाहत
आहे. कपडे खाली पडत आहे.
मि आज women's departmentला होते. माझ्याबरोबर कामाला होती ती म्हणाली मी
रिटर्न्स जागेवर ठेवते. यु जस्ट कीप फोल्डिंग. मी कपडे फोल्ड करत होते आणि
कस्टमर परत कपडे उचकटत होते.
Black Friday deal प्रत्येक गोष्टीवर आठवडाभर होते. मला एक मॅनेजर
म्हणाली की लंच नंतर मेन्स bank रजिस्टरला जा. मागच्या आठवड्यात तर सकाळी ९
ते १ bank register ला होते की मला एक कणही हालता आले नाही. भुकेने
व्याकुळ झाले होते. स्टोअर पिक अप and online order filling वेगळेच. वेळ
मिळाला की लिहीन एकेक करत सर्व. Wish you All Happy Holidays !
३ पॅक सॅंडविच म्हणजे कठिण आणि किचकट, उत्पादन विभागात आम्हां तिघींपैकी कुणालाच हे बनवणे आवडायचे नाही. दुपारी २ नंतर हे बनायचे. अगदीच पटापट विकले गेले तर मात्र सर्व काम सोडुन आधी हेच बनवायलाघ्यायचो. आणि बनवायचे असतिल तर फ्रिजर मधून ते सकाळिच आणायला लागायचे म्हणजे रुम टेंप्रेचरला यायला अवधी असायचा. जर का आणायचे राहिले तर मात्र अरेरे ! किती त्रास होतोय कापायला असे व्हायचे. मी हे बनवायचे पण अगदीच कुणी नाही बनवले तर बनवायचे. नाहीतर मी आणि कार्मेन मिळुन बनवायचो. लुलु तिचे सुशीचे काम झाले की आमच्या मदतीला यायची आणि ती हे सॅंडविच बनवायची. याकरता जे ग्रीन लीफ लेट्युस लागते ते आम्ही प्रोड्युस डिपार्टमेंट मधुन आणायचो. हे धुवुन घ्यायला लागायचे. नंतर ते चाळणीतनिथळत ठेवायचे. ३ पक संडविचला संपूर्ण टेबल रिकामे असले तर चांगले व्हायचे. १० सॅंडविच बनवायला टेबल भरुन जायचे.
हे गोल आकाराचे ब्रेड मधोमधकापुन त्याच्या वरचा भाग, (मी त्याला टोप्या म्हणायचे. :D ) ब्रेड कापला की एकावर एक टोप्या ठेवायला लागायच्या. खालचे डगले (कापलेल्या ब्रेडचा खालचा भाग )एका खाली एक असे पुर्ण टेबल भरुन जायचे. मग सर्वांवर आधी लेट्युसची पाने, नंतर ठरलेले २ औंस मांस ठेवायचे व नंतर चिझच्या चकत्या ठेवायच्या. प्रत्येक डगल्यावर वेगवेगळे मांस. हे सर्व झाले की प्रत्येक डगल्यावर ज्याच्या त्याच्या टोप्या ठेवायच्या. :D मग प्रत्येक सॅंडविच एका कागदामध्ये रॅप करायचा. रॅप करायचा कागद सुळसुळीत आणि कापायही कडक असायचा. रॅप करायचीपण एक पद्धत आहे. विकी आणि कार्मेनची पद्धत वेगवेगळी होती. मला कार्मेनच्या पद्धतीने रॅप करायचे.
काल स्वप्नात आला होता "तो"
नेत्रकटाक्ष झाले होते बरेचवेळा
हसलो होते दोघे एकमेकांकडे पाहून