Thursday, November 19, 2020

२०२० डायरी फोटो (3)

 




कोरोनामुळे फिरणे झाले नाही त्यामुळे यावर्षीचे वसंत रूतमधले आणि फॉल मधले जास्त फोटोज घेता आले नाहीत. फक्त मी जेव्हा बाहेर अपार्टमेंटच्या आवारात फिरायला जायचे त्यावेळी घेतलेले हे काही फोटोज इथे अपलोड करत आहे.

 

Specialization of Spanish Vocabulary (5 courses) beginners level  at coursera dot org  पूर्ण केले त्याची प्रमाणपत्रे








स्वरदाकडून केलेली ऑनलाईन खरेदी


 







 







थँक्स गीव्हींग मोठ्या सुट्टीत कुठेही जाता आले नाही. त्यामुळे कंटाळा जाण्याकरता थोडेफार नेहमीचेच पदार्थ केले त्याचे फोटोज.

 

 

Wednesday, November 18, 2020

२०२० डायरी फोटो (2)

 लीप वर्ष २९ फेब्रुवारी


 नव वर्षारंभ गोडाचा शिरा

 


आमच्या लग्नाचा वाढदिवस २६ फेब्रुवारी २०२० संत्र आणि केळी घालून केलेला गोडाचा शिरा


 सुहास दादाने पाठवलेले कृष्ण धवल फोटोज आणि मी इंडिया वरून आणलेले काही फोटोज स्कॅन केले.










यावर्षी गणपती आणि दुसऱ्या दिवशी विनायकचा वाढदिवस आला म्हणून मोदक आणि वडा सांबार केले.


 

 एके दिवशी खूप झणझणीत मुगाच्या डाळीची खिचडी केली, सोबत घरी बनवलेले लिंबाचे गोड लोणचे घेतले आणि थंडगार रेडीमेड ताक होते.
उत्साह आला.  


 अजुनही फोटोज आहेत. क्रमशः ....

२०२० डायरी फोटो (1)

 




 
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि नवरात्रीचे नऊ रंग, हे सर्व फोटोज मी काढलेले आहेत आणि माझ्या फोटो अल्बम मधून घेतलेले आहेत.










आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र २०२०



 

                    दिवाळी २०२०





 साडी चॅलेंज २०२०


 

गुढीपाडवा २०२०

होळीपौर्णिमा २०२०


 

आईचा वाढदिवस ८५ वर्षात पदार्पण - १५ जुलै २०२० आई आणि रंजना

क्रमश : ---- अजून फोटोज आहेत, दुसऱ्या पोस्ट मध्ये टाकेन. शिवाय २०२० डायरी पण लिहिणार आहे. मी काय काय केले ते सर्व.
डिसेंबर महिना अजूनही बाकी आहे तेव्हा काही घडामोडी घडतील त्याही लिहीन आणि फोटोही टाकेन. डिसेंबर शेवटी किंवा जानेवारीच्या
पहिल्या दोन दिवसात डायरी २०२० हा लेख लिहिणार आहे. त्या आधी सर्व फोटोज टाकीन. धन्यवाद.  


 

संभ्रम

 

मालू सकाळी उठून पटपट आवरत होती. आज तिला बरीच कामे होती. एक तर ७.१२ ची फास्ट लोकल पकडून ऑफीस मध्ये वेळेवर हजर व्हायचे होते. आणि दुसरे म्हणजे सासूबाईंसाठी औषधे आणायची. होती. येताना भाजी कोणती आणायची या विचारात ती होती. कूकरची शिट्टी झाली आणि तिच्या विचाराची साखळी तुटली. सर्वांचे डबे तिने भरले. पर्समध्ये सर्व काही आहे ना ते एकदा बघितले. साडी सावरून तिने आरश्यात पाहिले. निघते हं सासूबाई असे म्हणून ती घराबाहेर पडली देखील. आज एक महत्त्वाचे काम तिला करायचे होते. नंणदेसाठी एक स्थळ आले होते त्याची चौकशी करायची होती. मैत्रीणीसोबत गप्पा मारता मारता तिच्या मैत्रिणीने तिला या स्थळाबद्दल तिची एक बहिण तिला माहिती अधिक सांगणार होती.

तिचा फोन नंबरही तिने घेऊन ठेवला होता. ऑफीसमध्ये गेल्यावर कामे सुरू झाली. फायली मध्ये काही पत्रे लावताना परत तिचे विचार तिच्या नणंदेच्या स्थळाबद्दल चालू झाले. तिच्या मैत्रिणीला फोन करून स्थळाची माहिती सांगणारी तिची  बहिण ठरलेल्या जागी येणार ना याची खात्री करून घेतली. साहेबांना सांगितले की सगळी कामे झाली आहेत. मला आज तासभर लवकर निघायचे आहे तर ठरल्याप्रमाणे जाऊ ना? साहेबांनी ओके म्हणले आणि लगेचच ती निघाली.
 
 
आधी त्या  मैत्रिणीच्या बहिणीला भेटायचे आणि नंतर घरी जाताना भाजी आणि औषधेही घेऊन जायची असे तिने ठरवले होते. ठरल्या वेळेवर ती पोहोचली होती पण मैत्रिणीच्या बहिणीचा पत्ता नव्हता. वाट बघता बघता अर्था तास गेला आणि तिने फोन केला. फोन रेंजमध्ये नाही असे उत्तर येत होते. आता काय करावे? घरी गेले तर हे म्हणतील कुठे भटकत होतीस. माझ्याशिवाय तर घरचे पान हालत नाही. नणंदनेचा अभ्यास , कॉलेज करून ती दमते. वाट पाहून कंटाळून शेवटी ती सर्व कामे करून घरी आली. नंणदेने कूकर लावून ठेवला होता. कणीक भिजवून ठेवली होती. 
 
 
रात्रीची जेवणे आटोपून ती झोपणार तेवढ्यात तिच्या मैत्रिणीच्या बहिणीचा फोन आला. सांगत होती की सॉरी मला एक महत्त्वाचे काम आले म्हणून मी येऊ नाही शकले. मुलाची माहिती मी तुम्हाला उद्या नक्की सांगते. मालू म्हणाली आता सांगितलीत तरी चालेल की फोनवर. तर म्हणाली फोनवर सविस्तर बोलता येणार नाही म्हणून प्रत्यक्षात भेटल्यावरच सांगेन. असे म्हणून तिने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर मात्र मालूची झोप उडाली. रात्रभर विचार करत बसली. या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिली. ही नक्की कोणती माहिती सांगणार आहे आपल्याला आणि फोनवर का सांगत नाहीये. एकीकडे मनाची समजूतही काढत होती की अशी माहिती फोनवर कोण सांगणार? रात्रभर तिचा डोळा लागला नाही. संभ्रमात असतानाच सकाळी उठली. नणंद म्हणाली वहिनी मला तूला काहीतरी सांगायचे आहे? आजच्या दिवस तू रजा टाकशील? काहीतरी कारण सांग ना ऑफीस मध्ये. वहिनीने बरे वाटत नाही असे फोन करून कळवले. आणि काय आश्चर्य नंणदेने तिच्या हातात मुलाचा फोटो ठेवला होता. वहिनी मी तुला सांगणारच होते. हा मुलगा मला खूप आवडला आहे. माझ्या मैत्रिणीचा लांबचा भाऊ आहे. या मुलाची चौकशी करशील? का कोणजाणे पण मला हा पाहताक्षणीच आवडला. मालू ज्या मुलाची चोकशी करणार होती तो हाच तर मुलगा होता. 
 
 
मैत्रिणीच्या ओळखीतूनच या मुलाचे स्थळ सुचवले गेले होते. वहिनीच्या संभ्रमात अजूनच भर पडली होती.

प्रारब्ध

 कटू पण सत्य आहे

देवाच्या मनात काय आहे?

ते कळले नाहीच कुणाला
म्हणूनच मन दोलायमान आहे

घालमेल ती असंख्य झाली वेदनांची
ती एक जगराहटी आहे

ना कळले नाही कधी कुणाला
हा जीव शापित आहे

मी एकटा आहे तरीही
सावरणारा तोच श्रीहरी आहे

ही मला सुचलेली कविता रोहिणी गोरे

माझे बाबा

 बाबा अमुचे मायेचे मणी

हळूवार गोष्टी सांगती // १//

चित्रांमध्ये रंग भरती
निसर्गछटांच्या पानोपानी //२//

हस्ताक्षर असे बाबांच्या अमुचे
जशा चांदण्या नीलनभी //३//

कौतुक त्यांना आम्हां कन्यकांचे
देती आशीर्वाद भरभरूनी //३//

गतजन्मीचे नशीब उजळून आले या जन्मी
म्हणूनच निर्मला लाभली सहचारिणी//४//

नातीचे कौतुक आहे त्यांना पदोपदी
सयो सयो म्हणूउन हाका मारिती गालात हसूनी //५//

रंजना, निर्मला , सई, सुरेश
काळजी घेती क्षणोक्षणी //६//

रोहिणी विनायक दुरूनच म्हणती 
ठीकठाक आहात ना तुम्ही? //७//

नव्वदीचा वाढदिवसाचा क्षण आला भाग्याचा
आप्त आम्ही सारे तुमचे वर्षाव करतो शुभेच्छांचा //८//

रोहिणी गोरे,, ही मला सुचलेली बाबांच्या वाढदिवसावर केलेली कविता.