Wednesday, November 18, 2020

संभ्रम

 

मालू सकाळी उठून पटपट आवरत होती. आज तिला बरीच कामे होती. एक तर ७.१२ ची फास्ट लोकल पकडून ऑफीस मध्ये वेळेवर हजर व्हायचे होते. आणि दुसरे म्हणजे सासूबाईंसाठी औषधे आणायची. होती. येताना भाजी कोणती आणायची या विचारात ती होती. कूकरची शिट्टी झाली आणि तिच्या विचाराची साखळी तुटली. सर्वांचे डबे तिने भरले. पर्समध्ये सर्व काही आहे ना ते एकदा बघितले. साडी सावरून तिने आरश्यात पाहिले. निघते हं सासूबाई असे म्हणून ती घराबाहेर पडली देखील. आज एक महत्त्वाचे काम तिला करायचे होते. नंणदेसाठी एक स्थळ आले होते त्याची चौकशी करायची होती. मैत्रीणीसोबत गप्पा मारता मारता तिच्या मैत्रिणीने तिला या स्थळाबद्दल तिची एक बहिण तिला माहिती अधिक सांगणार होती.

तिचा फोन नंबरही तिने घेऊन ठेवला होता. ऑफीसमध्ये गेल्यावर कामे सुरू झाली. फायली मध्ये काही पत्रे लावताना परत तिचे विचार तिच्या नणंदेच्या स्थळाबद्दल चालू झाले. तिच्या मैत्रिणीला फोन करून स्थळाची माहिती सांगणारी तिची  बहिण ठरलेल्या जागी येणार ना याची खात्री करून घेतली. साहेबांना सांगितले की सगळी कामे झाली आहेत. मला आज तासभर लवकर निघायचे आहे तर ठरल्याप्रमाणे जाऊ ना? साहेबांनी ओके म्हणले आणि लगेचच ती निघाली.
 
 
आधी त्या  मैत्रिणीच्या बहिणीला भेटायचे आणि नंतर घरी जाताना भाजी आणि औषधेही घेऊन जायची असे तिने ठरवले होते. ठरल्या वेळेवर ती पोहोचली होती पण मैत्रिणीच्या बहिणीचा पत्ता नव्हता. वाट बघता बघता अर्था तास गेला आणि तिने फोन केला. फोन रेंजमध्ये नाही असे उत्तर येत होते. आता काय करावे? घरी गेले तर हे म्हणतील कुठे भटकत होतीस. माझ्याशिवाय तर घरचे पान हालत नाही. नणंदनेचा अभ्यास , कॉलेज करून ती दमते. वाट पाहून कंटाळून शेवटी ती सर्व कामे करून घरी आली. नंणदेने कूकर लावून ठेवला होता. कणीक भिजवून ठेवली होती. 
 
 
रात्रीची जेवणे आटोपून ती झोपणार तेवढ्यात तिच्या मैत्रिणीच्या बहिणीचा फोन आला. सांगत होती की सॉरी मला एक महत्त्वाचे काम आले म्हणून मी येऊ नाही शकले. मुलाची माहिती मी तुम्हाला उद्या नक्की सांगते. मालू म्हणाली आता सांगितलीत तरी चालेल की फोनवर. तर म्हणाली फोनवर सविस्तर बोलता येणार नाही म्हणून प्रत्यक्षात भेटल्यावरच सांगेन. असे म्हणून तिने फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर मात्र मालूची झोप उडाली. रात्रभर विचार करत बसली. या कुशीवरून त्या कुशीवर होत राहिली. ही नक्की कोणती माहिती सांगणार आहे आपल्याला आणि फोनवर का सांगत नाहीये. एकीकडे मनाची समजूतही काढत होती की अशी माहिती फोनवर कोण सांगणार? रात्रभर तिचा डोळा लागला नाही. संभ्रमात असतानाच सकाळी उठली. नणंद म्हणाली वहिनी मला तूला काहीतरी सांगायचे आहे? आजच्या दिवस तू रजा टाकशील? काहीतरी कारण सांग ना ऑफीस मध्ये. वहिनीने बरे वाटत नाही असे फोन करून कळवले. आणि काय आश्चर्य नंणदेने तिच्या हातात मुलाचा फोटो ठेवला होता. वहिनी मी तुला सांगणारच होते. हा मुलगा मला खूप आवडला आहे. माझ्या मैत्रिणीचा लांबचा भाऊ आहे. या मुलाची चौकशी करशील? का कोणजाणे पण मला हा पाहताक्षणीच आवडला. मालू ज्या मुलाची चोकशी करणार होती तो हाच तर मुलगा होता. 
 
 
मैत्रिणीच्या ओळखीतूनच या मुलाचे स्थळ सुचवले गेले होते. वहिनीच्या संभ्रमात अजूनच भर पडली होती.

No comments: