Sunday, August 28, 2022
28 August FB Memory
Friday, July 08, 2022
८ जुलै २०२२
२०२२ रोजनिशीतले आजचे हे पहिले पान. मी २०११ सालापासून रोजनिशी लिहित आहे. रोजनिशी म्हणजे रोजच्या रोज नाही. असेच एखाद वेळेस काही वेगळे घडले. कोणत्या गोष्टीपासून काही आनंद झाला तर ती गोष्ट थोडक्यात लिहायची असे ठरवले आहे. मागच्या काही वर्षातली रोजनिशीतली पाने एखादवेळेस चाळली की अरे, या दिवशी आपण हे केले होते का? असे आठवून परत आपल्याला आनंद होतो. तर आजची ही रोजनिशी म्हणजे आज मी बाहेर गेले होते. एखाद्या दिवशी जाते बाहेर आणि काही दुकाने हिंडते. बघण्यात वेळ जातो आणि एखादे चांगले मिळून जाते. तर आज मी कानातले घेतले ते म्हणजे पेपरोनी पिझ्झाचे स्लाईस. टार्गेट मधे मी सहसा जात नाही. हेंडरसनविलला असताना तिथल्या मॉल मध्ये जायचे. इथे कोल्स आणि आता टार्गेट मध्ये जाते काही वेळेला.
आधी पिझ्झा खाते, कोक पिते आणि मग फिरते इकडे तिकडे. मला कानातले बघायला आणि खरेदी करायलाही खूप आवडते. आज मी केसाला लावायचा कंगोरा सारखा दिसणारा चाप पण घेतला, पहिल्यांदाच. घरी येवून लावून पाहिला तर चांगला वाटला. केस मोकळे सोडण्यापेक्षा काही वेळा आता मी चाप घेणार आहे. कानातली मस्तच होती. त्यात एक ट्र्क होता. शिवाय झाड ,काचेचा स्टाईलिस्ट ग्लास, आयस्क्रीम कोन होता. आणि दुसऱ्या एका दुकानात केकचा तुकडा पाहिला. गोगलगाय पाहिली. शिवाय घुबड होते. कुलुप, किल्ल्या, घड्याळ असेही कानातले होते. सेफ्टी पीना, कणीस, अननस, असे बरेच काही ! हे सर्व कानातले होते आणि असतात. वेगवेगळे प्रकार बघायलाही छान वाटतात. सेल असेल तर मी घेते. मला १३ डॉलर्सचे ७ मध्ये मिळाले म्हणून घेतले. मधे एकदा पक्षी आणि बगळाही घेतला होता.
माझ्या मैत्रिणीने मला मोर दिला ! खूपच छान आहे तो ! तर माझ्याकडे बरेच कानातले झाले आहेत. ते आहेत अनुक्रमे २ कासवे, २ हत्ती, रासबेरी, कॉफी मग, ३-४ प्रकारची फुले, मासे, २ फुलपाखरू, २ बदाम, भोपळा, निवडुंग, विंचू, बाटल्या, पक्षी, बगळा
Monday, July 04, 2022
शनि - रवि - सोम
Saturday, July 02, 2022
२ जुलै २०२२ FB memory
view from window before sunset - 27th June 2018 सूर्य जेव्हा म्हणतो चला आता मी भारतात जातो, उद्या भेटू परत , तेव्हा तो त्याचे रंग बदलायला लागतो. पांढरा शुभ्र दिसणारा सूर्य पिवळा होतो आणि नंतर तोच पिवळा रंग काही वेळ स्थिर होऊन तो लालसर रंगाकडे झुकायला लागतो. नंतर लाल चुटूक होतो आणि अंतर्धान पावतो. अंतर्धान पावताना त्याची किरणे आभाळात परावर्तीत होतात. जेव्हा आकाश निरभ्र असेल तेव्हा रंगांची उधळण होत नाही पण जेव्हा ढग असतील तेव्हा त्या ढगांमध्ये रंग घुसतात आणि क्षणाक्षणाला ते बदलत राहतात. काही वेळा हा रंग बदलण्याचा सोहळा खूप देखणा असतो. रंगांची नुसती उधळण असते. भगवा, गुलाबी, सोनेरी. आणि मग काही वेळाने होत्याचे नव्हते होते. रंगांच्या खुणा काळ्या निळ्या ढगांवर राहतात काही वेळ, आम्ही येऊन गेलो होतो असे सांगण्यासाठी.
Tuesday, June 21, 2022
२१ जून २०२२ (FB memory)
उन्हाळ्याच्या सुरवातीलाच गरम हवेचा दणका गेले १५ दिवस आहे. दुपारी चटका लागेल इतके उन असते आणि संध्याकाळी दणादण पाऊस पडतो. आज हवा त्यामानाने कमी गरम होती आणि आर्द्रता अजिबात नव्हती म्हणून समुद्रकिनारी फिरायला गेलो तर तिथे बरीच गर्दी होती. आज ठरवलेच होते की किनारी अनवाणी चालायचे. पाऊले भिजतील इतपत पाणी असेल त्या जागेवरूनच चालायचे. काही वेळेला पाणी नसते व ओली वाळू असते तिथेही छान वाटते. तासभर फिरलो. खूपच फ्रेश वाटले. खूप गार हवा नसली तरी वाऱ्याच्या थोड्या झुळका येत होत्या. चालत असताना मनात "जिंदगी कैसी है पहेली हाए, कभी तो हासाए, कभी ये रूलाए" समुद्राचे थंडगार पाणी पायांना छानच वाटत होते. शिवाय ओली वाळू व काही ठिकाणी ओबडधोबड वाळू होती की ज्यात शिंपले होते त्यावरून चालायलाही छान वाटत होते. काही ठिकाणी समुद्राचे पाणी साचले होते. तिथेही पाय बुडवत होते. एकूण काय चालताना आज खूपच मजा येत होती.
Monday, June 13, 2022
तोच चंद्रमा नभात....
खिडकीत सहज डोकावले तर आज चंद्र खूप छान दिसत होता. त्याच्या बाजूने विखुरलेले ढग होते. चंद्राला पाहिले की ओठावर त्याचीच गाणी येतात. वो चांद खिला वो तारे हसे ये रात अजब मतवाली है, समझने वाले समझ गये है ना समझे वो अनाडी है, चंदा ओ चंदा किसने चुराई तेरी मेरी निंदिया, चाँदसा मुखडा क्यु शरमाया, चाँद को क्या मालूम चाहता है,.. किती तरी ! एकदा आमच्या मोहिनी अंताक्षरी मध्ये चंद्रावर गाणी गायची होती. खूप धमाल आली होती त्याची आठवण आली. पूर्वी एकदा रस्त्याने चालत येताना असाच भला मोठा चंद्र दिसला होता. त्यादिवशी होळी पौर्णिमा होती. एकदा नदीवर चालताना झाडाच्या मधोमध चंद्र चालत होता. त्याला कॅप्चर करून पाठवला होता हवामान तज्ञ ली रिंगरला आणी त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी वेदर शॉट अऑफ द डे मधे दाखवला. एकदा असाच खिडकीतून घेतला होता. २०२० साली पण किती छान दिसला होता चंद्र. आजच्या चंद्राची खास आठवण म्हणजे आज मी माझ्याकडचे सर्व चंद्र एकत्र केले. चंद्राची अजून एक खास आठवण म्हणजे विल्मिंटनच्या बेडरूम मधून सहज दिसायचा ! Rohini gore
Friday, June 10, 2022
10 June 2019 (fb memory)
Monday, May 16, 2022
संगीत मैफील
Saturday, May 07, 2022
आठवण स्टीलच्या भांड्यांची
स्टीलचा उभा गंज ताक करायला, स्टीलची रवी पण होती. मोठाले थाळे, देव्हारा, निरंजन, उदबत्तीचे घर, रोजच्या वापरातले तेल ठेवण्यासाठी उभट आणि चोच असलेला कावळा, स्टीलचे कुंडे, शिवाय उभट कुंडे त्यावर झाकण, वाडगे, स्टीलचे चहाचे कप ठेवायचे ट्रे आम्हाला अहेरात आले होते. पूजेची थाळी दिली होती कुणीतरी होती. खूप छान होती. त्यावर नक्षीकाम होते. स्टीलचं पुरणयंत्र , संक्रांतीच्या हळदीकुंकू करता लुटण्यासाठी स्टीलचे असेच छोटे छोटे द्यायचे. मी म्हणायचे याचा काय उपयोग? तर झाकण ठेवण्यासाठी अश्या छोट्या ताटल्या उपयोगी पडायच्या. आईने अधिक मासामधे तीस-तीन सवाष्णी घातल्या होत्या तेव्हा सर्व बायकांना मोठाले स्टीलचे थाळे दिले होते. माझ्याकडे जेव्हा पूजा झाली तेव्हा मी झाकण असलेले गोलाकार आणि खालून निमुळते असे कुंडे दिले होते. मिसळणाच्या डब्यात पण हळद, तिखटासाठी वेगवेगळे छोटे स्टीलचे चमचे वापरत होते. मी ते आईकडून आणले आहेत. फक्त आठवणीत असण्यासाठी ठेवून दिलेत. वापरत नाही. लहान मुलांच्या ताटल्या होत्या. त्यात उथळ कप्पे होते, भाजी, कोशिंबिरीसाठी. ही ताटल्या मला प्रचंड आवडतात. पेढेघाटी स्टीलचा डबा पण खूप फेमस होता पूर्वी आणि स्टीलचे चहाचे कानवाले भांडे
Saturday, April 30, 2022
बाजारहाट ...(5)
समाप्त
Tuesday, March 29, 2022
मी आणि माझी नोकरी - Kohl's ... (5)
Monday, March 28, 2022
मी आणि माझी नोकरी - Kolhs ... (4)
नंतर त्या सेक्शनची मुख्य बाई आली. ती अमेरिकन होती. तिने पण हासून माझे स्वागत केले. ती म्हणाली की तू नवीन आहेस. मी कपडे लावते. तू फक्त सेक्शन मध्ये जाऊन जे कपडे विस्कटले असतील ते घडी करून ठेव. या घड्या पण विशिष्ट पद्धतीने घालायच्या असतात. काम करता करता ती परत आलेले कपडे लावत होती व मला सांगत होती, इथे जा , तिथे जा, कपडे विस्कटलेले आहेत. पूर्वी मी जेव्हा वाल मार्टला जायचे आणि तिथे पहायचे की काही बायका कपड्यांच्या घड्या करत असायच्या. तेव्हा मी मनात म्हणायचेे असे काम मिळाले पाहिजे, किती सोपे आहे ना ! नथिंग इस इझी हे मला प्रत्यक्ष काम करताना कळाले. पार्किंग मध्ये ज्या कार्ट असतात. त्या सर्व कार्ट्स वाहून आणतात ते काम पण सोपे नाहीये. स्नो पडत असताना, हाडे गोठवणारी थंडी असताना, पाऊस पडत असताना, थंडीमध्ये प्रचंड बोचरे वारे असताना,या कार्ट्स गोळा करून आणायच्या, हे कामही वाटते तितके सोपे नाही !
कॅशिअर मध्ये ट्रेनिंग जरी दिले ते सुद्धा १ दिवसच ! पण तरीही कितीतरी गोष्टी मला जेव्हा मी काम करायला लागले तेव्हाच कळाल्या किंवा सांगितल्या गेल्या. बऱ्याच गोष्टी कळल्या मला ! कपड्यांना सेक्युरिटि टॅग कसे लावायचे, टॅग कसे काढायचे, नोटा दिल्या की त्या खऱ्या आहेत की नाही ते कसे ओळखायचे? गिफ्ट रिसिट कश्या प्रिंट करायच्या. नुसते कार्ड पेमेंट असेल तर ते कसे करायचे? त्यातही काही लोक कॅश देतात तर काही चेक देतात. Transaction कॅन्सल कसे करायचे.कोल्स कार्ड हवे आहे का? आणि हवे असल्यास त्या करता काय करायचे? एकदा एका कस्टमरने मला विचारले की कार्ड काढायचे आहे. तेव्हा मला एका आफ्रिकन बाईने मदत केली. एकदा एकाने ४०० dollars ची खरेदी केली. आणि कॅश दिले. तेव्हा मागची कॅशियर आली आणि मला म्हणाली की कोल्स कार्ड असेल तर कॅश घ्यायची नाही. तू असे केलेस तर प्रोब्लेम मध्ये येशील. असे एक ना अनेक बरेच शिकायला मिळाले आणि कामही आवडले मला !
Thursday, March 24, 2022
कधीतरी केव्हातरी...
Friday, March 04, 2022
मी आणि माझी नोकरी - Kohl's .... (3)
मी जेव्हा माझी मी कामाला उभी राहिले तरी काही वेळा विचारावे लागते. इतके वर्षे काम करणारे त्यांनाही पहिल्याप्रथम शंका आल्याच असणार ना. काम जितके तुमच्या हाता खालून जाईल तितके तुम्ही तरबेज होता. मी कामाला उभी होते. कस्टमर लोकांची रांग लागलेलीच असते. ते येतातच की रांगेतून. तरी सुद्धा देशी बाई देखो कस्ट्मर है. मनात (माहीत आहे की) मला शंका आली की मी तिला विचारायचे. काही वेळा मॅनेजरलाच बोलवावे लागते. त्याप्रमाणे स्क्रीन वर तसे टॅब असतात ते प्रेस करायचे. मी एखाद वेळेस शंका विचारली की मी विचारायचे. मैने तुझको बताया था ना? अरे हो ना ! पण मी परत विचारू शकते ना एखादवेळेस. तर मला म्हणाली मॅनेजरला बोलाव.
Thursday, March 03, 2022
मी आणि माझी नोकरी - Kohl's .....next episode
Tuesday, February 08, 2022
माझी आवडती गाणी
Monday, January 24, 2022
हस्ताक्षर दिनानिमित्ताने






















