Monday, June 13, 2022

तोच चंद्रमा नभात....

 खिडकीत सहज डोकावले तर आज चंद्र खूप छान दिसत होता. त्याच्या बाजूने विखुरलेले ढग होते. चंद्राला पाहिले की ओठावर त्याचीच गाणी येतात. वो चांद खिला वो तारे हसे ये रात अजब मतवाली है, समझने वाले समझ गये है ना समझे वो अनाडी है, चंदा ओ चंदा किसने चुराई तेरी मेरी निंदिया, चाँदसा मुखडा क्यु शरमाया, चाँद को क्या मालूम चाहता है,.. किती तरी ! एकदा आमच्या मोहिनी अंताक्षरी मध्ये चंद्रावर गाणी गायची होती. खूप धमाल आली होती त्याची आठवण आली. पूर्वी एकदा रस्त्याने चालत येताना असाच भला मोठा चंद्र दिसला होता. त्यादिवशी होळी पौर्णिमा होती. एकदा नदीवर चालताना झाडाच्या मधोमध चंद्र चालत होता. त्याला कॅप्चर करून पाठवला होता हवामान तज्ञ ली रिंगरला आणी त्याने लगेचच दुसऱ्या दिवशी वेदर शॉट अऑफ द डे मधे दाखवला. एकदा असाच खिडकीतून घेतला होता. २०२० साली पण किती छान दिसला होता चंद्र. आजच्या चंद्राची खास आठवण म्हणजे आज मी माझ्याकडचे सर्व चंद्र एकत्र केले. चंद्राची अजून एक खास आठवण म्हणजे विल्मिंटनच्या बेडरूम मधून सहज दिसायचा ! Rohini gore




















 

2 comments:

Anonymous said...

Chandrache sarv ch photo.. ek se ek ahet.. khas karun khidkichya blindes chya fatitun ghetlela chandracha photo mhanje tujhya creativity la salam ahe!!!

chadra malahi far far awadato.. maze chandrashi nate janu far vegle ahe.. chandra nasla ki man udas hote..

sakalchya surya pahilela far smarat nahi.. pan mavalaticha surya ani tya nantar lagech yenara chandra mi roj ch pahate.. doghehi ek sandesh detat.. to aikaycha prayatna karte..
kadhi mala tyanni sangitlele samajate, kadhi nahi..

pan chandra maza jivlag ahe. evdhe khare.

- sau. avani

rohinivinayak said...

अवनी, चंद्र तुझा जीवलग आहे हे वाचून खूपच छान वाटले गं ! मला चंद्रापेक्षा सूर्य जास्त आवडतो. सूर्योदय बघायला तर जास्तच ! घेतलेत फोटो पण जास्त नाही. माझ्या आयुष्यात सूर्यास्ताचे फोटो घेण्याचा योग मात्र जबरदस्त आहे ! मला चंद्र आवडतो. चंद्राचे फोटो घेण्यात जास्त यश आले नाहीये. पण सहज समोर दिसला आणि गोल वाटोळा असेल तर अगदी त्याच्याकडे बघत बसावेसे वाटते हे मात्र खरे ! चंद्र तुझा खूप लाडका दिसतोय ! तू केलेल कौतुक मनापासून आणि त्यामुळेच मला खूपच उत्साह येतो ! आणि तुझे प्रतिसाद वाचनीय असतात ! अनेक धन्यवाद अवनी !