Thursday, July 18, 2019

सूर्यास्त १७ जुलै २०१९











आजचा सूर्यास्त म्हणजे निळेशार आकाश, त्यात वेगवेगळ्या आकाराचे ढ्ग आणि नंतर त्या ढगांमध्ये निर्माण झालेले विविध रंग म्हणजे निव्वळ सूख ! सोनेरी, आकाशी, पांढरा, पिवळा, तांबूस, करडा अशा रंगांची आकाशातली उधळण पाहून मन प्रसन्न होते नेहमीच. Sunset 17th July 2019 - Hendersonville NC

सूर्यास्त १८जुलै २०१९









आज सूर्यास्ताच्या वेळी रंगांचे फरांटे होते. जसजशी संध्याकाळ दाट होत गेली तसतसे रंगही गडद होत गेले. क्षितीज्यावरचे गडद रंग फिकट होत गेले आणि रात्र अवतरली. Sunset -18th July 2019 - Hendersonville NC

Monday, July 01, 2019

बिग बॉस मराठी सीझन नं २

बिग बॉस मराठी सीझन नं २- टाळ्यांचा कडकडाट करावा अशा अफलातून कलाकारांचा शो. वावा किती छान शिविगाळ, आरडाओरडा. आणि मारामारी. पहिल्याप्रथम शिवानीचे कौतुक करू. काहीही कारण नसताना आग पाखड. नेहाही तसलीच. तिचा किरकिरा आवाज. वैशाली तर खेळायला आली नसून फक्त झोपा काढायला आल्यासारखी वाटते. सुरेखा तर एकेठिकाणी बसायचा कंटाळा आला की दुसरीकडे जाऊन बसते. रूपालीचा स्वर जास्त वेळा लागत नाही पण एकदा लागला की सारेगपम च्याही वरचा स्वर लागतो तिचा. अर्थात बिचुकल्याला याच स्वरांनीच तर त्याला जागचे हालवले. ततपप झाली त्याची. रूपाली चांगली वाटली मला. वीणाही आधी चांगली वाटली पण प्राध्यापक मांजरेकरांनी तिच्या डोक्यात इतकी हवा भरली की तिला वाटले पराग कोण? कुठला? शिव बद्दल आकर्षण पण मी नाही बाई त्यातली असा फुकटचा आव आणणारी.
केळकर महाराज दुसऱ्याची मदत घेऊन खेळणारा. हिम्मत असेल तर डोक लावून खेळ. बाप्पा म्हणजे कुणीतरी फुकटचा आग्रह केला म्हणून आला. दिगंबर आधी नीट खेळत नव्हता पण वर्गशिक्षक म्हणून त्याने लोकनाट्याबद्दल चांगले शिकवले. ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला बिगबॉसने घरात येण्याची परवानगी कशी काय दिली बुवा? ज्याने आईबहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या, इतक्या की त्या म्युट कराव्या लागल्या आणि त्याबद्दल प्राध्यापक मांजरेकर काहीच बोलले नाहीत? तर इज्जत का फालुदा झाल्याने घरातल्या पुरूषांवर आरडाओरड केली. की तुम्ही बिचुकल्यावर का नाही रागावलात? का नाही त्याच्या मुस्कटात लगावून दिलीत. भिचुकल्याला भितात का ते?



किशोरी बऱ्यापैकी खेळत होती. सगळ्यांना सांभाळून घेत होती. बिगबॉस मधले टास्क ज्याला कळले आहेत असा एकमेव माणूस म्हणजे पराग. आणि मुख्य म्हणजे त्याला माणसे ओळखता येतात. तो शेफ आहे. त्याला टक्कल आहे. त्यावरून पहिल्यापासूनच घरातल्या सर्वांचा त्याच्यावर इतका राग का? त्यावरून त्याची किती टिंगल उडवत होते? परागचे फक्त एक खटकले की त्याने ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुप मध्ये जायला नको होते. केळकर महाराजांनी शिवचे कान भरले आणि त्यानुसार तो वागला आणि त्यात नेहा पडली. तिचे ढोपरे फुटले. तरी तिला पुढे सारून तो कंफेशन रूम मध्ये गेला. तसाच तो टास्क होता. शिव बलाढ्य आहे त्यामुळे त्याने जोर लावला. त्या ढकलाढकलीत नेहा पडली. माधव तर नेहमी सगळ्यांबरोबरच असतो. म्हणजे काय चालू आहे, कोण काय बोलतयं हे पाहण्याकरता. तिथे ते दोघे काय करत होते? नेहा पडल्यावर केळकर महाराजांनी तिची माफी लगेच मागितली नाहीच. शनिवारच्या शाळेमध्ये माफी मागितली. हीना फक्त सगळ्यांना तिचा नाच दाखवायला आली आहे. बरं जेव्हा नेहा पडली तेव्हा लगेचच परागने तिची बाजू समजून घेतली. ते सर्व विसरून नेहाने शिवला
आणि केळकर महाराजांना स्वर्गात टाकले आणि परागला नरकात. स्वर्ग नरक या टास्क मध्ये.



घरातले इतर सर्व सदस्य परागला पाण्यात पाहतात. आणि जाणून बुजून एका टास्कमध्ये परागला इतका त्रास दिला नेहाने आणि वैशालीने आणि इतर सर्वांनी मिळून त्याला शेवटी खाली पाडले. खरे तर खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्क मध्ये तो सर्व त्रास सहन करून अगदी जिंकायलाच आला होता पण शेवटी त्याला ढकलून देवून खाली पाडले. एकावर एक झालेली टिंगल टवाळकी आणि टास्क मध्ये झालेला सर्व त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि त्याने नेहाच्या थोबाडीत मारली आणि त्याला बिग बॉसने घरातून त्या क्षणी घालवून दिले. त्याची चूक आहे मान्य पण त्याला दिलेला त्रास प्रेक्षकांनी पाहिला आहे. तो त्रास पाहून कोणीही हेच म्हणेल आणि सर्व सोशल मिडियावर हेच म्हणले आहे की परागच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यातून त्याची चूक घडली. खुर्चीवरून उठून जाण्याच्या टास्कमध्ये किशोरीला खूप त्रास दिला नाही. शिवलाही नाही. शिवच्या मांडीवर तर हीना जाऊन बसली. तो कशाला उठेल?



घरातून गेल्यावर फक्त परागचा अपमान करण्यासाठीच त्याला घरात आणले होते. आणि त्याचा प्राध्यापक मांजरेकर आणि घरातल्या सर्व सदस्यांनी (त्याच्याबरोबर असणाऱ्या वीणा, किशोरी आणि रूपालीनेही) फक्त आणि फक्त त्याचा अपमानच केला. परागने किडनी डोनेट केली आहे. खुर्चीवर उठून जाण्याच्या टास्कमध्ये त्याला वैशालीने नखे टोचली. तिथे वजने ठेवली होती त्यामुळे वजनावर बसणे शक्य नव्हते. त्यामुळे तो तिरका बसला होता. नेहा तर परागला राग येईल असेच वाट्टील ते बोलत होती. या सर्वाचा त्याला खूप त्रास झाला आणि त्याने सांगितले की त्याच्या पोटात अजूनही दुखत आहे. त्याला झालेल्या त्रासाबद्दल एकानेही एक चकार शब्दही काढला नाही. त्रास देणाऱ्या सदस्यांचे तर प्राध्यापकांनी कौतुक केले.



परागला नक्कीच या सगळ्याचा त्रास झाला असेल. पण त्याला घरात राहू दिले नाही हे एका अर्थी बरेच झाले. सुटला बिचारा सगळ्यांच्या तावडीतून ! बिग बॉस, प्राध्यापक मांजरेकर आणि इतर सदस्य यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. असो. या आधीचे बिग बॉस बघितले होते ते चांगले वाटले म्हणून सीझन नं २ बघायला गेलो तर निराशा झाली असे म्हणण्यापेक्षा लोकांचे खरे रंग कळाले.

पहिल्यादिवसापासून शिव्या आणि भांडणेच बघितली. वाटले होते पराग, किशोरी, वीणा आणि रूपाली यांचा चांगला ग्रुप झालाय. काहीतरी चांगले बघायला मिळेल. आता बिग बॉस वर कायमची काट.....Rohini Gore

Friday, May 31, 2019

मी आणि माधवी

मोठ्या पडद्यावर सिनेमा पहायला मला खूप आवडते. मलाही ! माधवी म्हणाली. जायेंगे क्या? हाहा क्युँ नही !! मी म्हणाले. २००१ साल. माझी आणि माधवीची मैत्री झालेली. बरेच काही काही केले आम्ही दोघींनी मिळून. इंडियन असोसिएशनतर्फे विद्यापीठाच्या एका हॉल मध्ये सिनेमे दाखवले गेले नाताळच्या सुट्टीत. टेक्साज राज्यातील डेंटन या छोट्या शहरात आमची पोस्डॉक कम्युनिटीही अगदी छोटी. बोचऱ्या थंडीत आणि स्नो पडत असतानाही आम्ही दोघी आमच्या घरातून चालत चालत हॉलवर पोहोचत होतो शिणुमा पहायला. रात्रीचा शो असल्याने जेवून निघायचो. चार सिनेमे पाहिले. त्यात दोघींचे एकेक आवडते पिक्चर्स. डीडीएलजे, माधवीचा आवडता तर चुपके चुपके माझा आवडता.शाहरूख माधवीचा आवडता नट. डीडीएलजे पाहताना अगदी एक टक डोळे लावून बघत होती. ( मी मनातल्या मनात "त्या माकडतोंड्याला इतके काय निरखून पहायचे पसंद अपनी अपनी) मी मात्र अधून मधून डुलकी घेत होते. चुपके चुपके साठी माझे कान टवकारलेले. एकही डायलॉग मिस होता कामा नये, नाहीतर सिनेमा पाहण्यात अर्थ नाही. या सिनेमाला मात्र माधवी जांभया देत होती. त्यावेळी स्मार्ट फोन काय तर साधे मोबाईल पण नव्हते. त्यामुळे फोनचा व्यत्यय नाही. हॉल मध्ये जास्तीचे सिनेमाप्रेमी नाहीत. लगान ला मात्र बरीच टाळकी जमा झालेली. हा सिनेमा पाहताना आम्ही ३ ते ४ वेळेला उठलो , चला संपला एकदाचा म्हणेपर्यंत परत बसलो. अजून किती वेळ? असे आमच्या दोघींचे उद्गार.



ये दोनो भी आमीरसे क्युँ प्यार करते है रे ! ये सब दिखाने की क्या जरूरत है! और गाने भी इतने लंबे लंबे क्युँ? आमच्या दोघींची अशी ही शेरेबाजी ! एका गाण्यात आमीरबरोबर दोघी प्रेमात पडलेल्या आणि आपल्याच धुंदीत दाखवलेल्या. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून स्माईली देत होतो. सरतेशेवटी कंटाळून आम्ही दोघीही उठलो अभी कुछ भी होने दो यार. ये मुव्ही तो रात भर भी चलेगा! त्या दिवशी माधवी मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मला हैद्राबादी बिर्याणी खाऊ घातली. रंगीला मात्र आम्ही दोघींनीही एंजोय केला. त्यादिवशी सिनेमा संपल्यावर परत येताना स्नो फॉल सुरू झाला होता. माझे घर थोडे लांब होते. कडाक्याची थंडी तर होतीच. पण चालत येताना चिटपाखरूही नव्हते. काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. रात्रीचे १२ वाजले होते. मनातून जाम टरकले होते. रामनामाचा जप सुरू केला. खूप भराभर चालूनही रस्ता संपता संपत नव्हता. नजरेच्या टप्यात घर आले. रस्ता क्रॉस केला. आणि अक्षरशः पळत पळत येऊनच घरात शिरले.
माधवीला फोन केला " मी पोहोचले गं घरी ".......रोहिणी गोरे

Wednesday, May 22, 2019

नाशिकची आठवण

आम्ही दोघी बहिणी, आमच्या दोन मावस-आत्येबहिणी आणि एक छोटी आत्या असे सर्व मिळून आम्ही नाशिकच्या मावस आत्याकडे राहायला गेलो होतो मे महिन्याच्या सुट्टीत ! आम्हां दोघी बहिणींना आईबाबांना सोडून नातेवाईकांकडे रहायची सवय नव्हती. मी त्यावेळेला ९ वी मध्ये होते आणि माझी बहिण ७ वीत होती. शाळेत असताना आम्ही दोघी बहिणी पुण्यामध्ये म्हणजेच गावात राहणाऱ्या २ मामांकडे एक दोन वेळेलाच रहायला गेलो होतो. पण पुणे सोडून दुसऱ्या गावाला रहायला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. खरे तर आम्ही नको नको म्हणत होतो. पण छोटी आत्या म्हणाली चला की !



आमची एक दुसरी मावस-आत्येबहिण ती पण तिच्या मावशीकडे पहिल्यांदाच रहायला जात होती. तिचे नाव राणी. राणी आणि आम्ही दोघी म्हणजे मी आणि रंजना, आमच्या तिघींच्या चेहऱ्यावर टेंशन होते. नाशीकच्या आत्याकडे गेलो पण तिथे पटकन रुळलो नाही. आम्ही तिघी बाथरूम मध्ये जायचो आणि खूप रडायचो. आम्ही बाहेर आलो की सगळे विचारायचे "काय गं काय झाले? डोळे एवढे लाल का दिसत आहेत? " आम्ही म्हणायचो काही नाही. मग आमच्या दोघींच्या (म्हणजे मी आणि माझी बहीण रंजना ) लक्षात आले की राणी पण बाथरूम मध्ये जाउन रडते. आम्ही तिला विचारले तू का रडतेस? तर म्हणाली मला आईची आठवण येते.आम्ही दोघी पण आईबाबांची आठवण येऊन रडायचो. मग एके दिवशी उजू आत्या (छोटी आत्या) तिने विचारले काय गं, इतके डोळे लाल का तुमचे? एवढे काय झाले रडायला, आईबाबांची आठवण येते का? आम्ही तीला तसे सांगितले. मग एकूण सगळ्यांच्याच लक्षात आले आणि आत्या, तिचे यजमान आणि बाकी दोघी बहीणी आणि छोटी आत्या यांनी आम्हा तिघींना सामावून घेतले. मग आम्ही पण गप्पा गोष्टीत रमू लागलो. त्या घरी काकांची एक छोटी लायब्ररी
होती. एका भिंतीमध्ये कोनाडे करून पुस्तके लावून ठेवली होती. ते बघून मला आणि रंजनाला खूप आनंद झाला. मग रोज एकेक करत आम्ही दोघी पुस्तके वाचायला लागलो. छोटी आत्या म्हणायची काय गं तुम्ही दोघी सारख्या वाचत असता? डोळे नाही का दुखत तुमचे? चला बाहेर या अंगणात. आत्याचा मोठा बंगला होता. आजुबाजूला आवार आणि मोठे अंगण. तिथे काका सकाळच्या अंघोळीचे पाणी तापवायचे.



८ दिवस राहिलो आम्ही. मजा येत होती. एके दिवशी आत्याने सगळ्यांसाठी उत्तपे बनवले. एके दिवशी नाशिक दर्शनाला जायचे होते पण मला खूप ताप आला होता. म्हणून घरी कोणीतरी थांबले होते माझ्या सोबतीला. पण मी दिवसभर झोपून होते. एके दिवशी रात्री जेवणे झाल्यावर आमची एक मावस-आत्यबहीण म्हणाली की चला आपण भेंड्या खेळू या. अंगणात भेंड्यांची मैफील खूपच रंगली. रात्री ९ वाजता भेंड्या सुरू झाल्या त्या पहाटे ४ वाजेपर्यंत. कुणावरही एकही भेंडी चढली नाही. म्हणजे भेंडी जरी चढली तरी ती लगेच उतरवली जायची. या भेंड्यांच्या कार्यक्रमात आमची एक मावस-आत्येबहीण म्हणाली की मी एकटी विरूद्ध तुम्ही सर्व जण. ती आमच्या सर्वांच्यात मोठी होती. ती गायची, त्यामुळे तिला गाणी पण बरीच माहीती होती. ती म्हणाली एक अट आहे गाणी सगळी मराठी पाहिजेत. हिंदी अजिबात नकोत. आणि मला आणि रंजनाला तर हिंदी गाणी जास्त माहीती होती. मग आम्ही म्हणालो ठीक आहे. मराठी गाण्यांची अट मान्य ! मग आमचा सामना अगदी अटीतटीचा झाला. आम्ही मराठी मध्ये लावण्याही म्हणल्या आणि आरत्याही !



आम्ही जरी रुळले होतो तरी पण आता उद्या आपण आपल्या घरी जाणार याचा आनंदही होत होता. ८ दिवस खरच खूप मजेत गेले. निघण्या आधी अगोदरच्या रात्री आम्ही काही बहिणी बाहेर फिरायला गेलो. त्यात थोडे गॉसिपही झाले. काय ते आठवत नाही आता. घरी आल्यावर आम्ही दोघी खूप उत्साहात होतो. आणि आमच्या स्वयंपाकघरात एक पाहुणा आला होता. तो पाहुणा म्हणजे हिंडालियमचा ओटा आणि त्याला जोडून ताटाळे आणि कपबशाळे. आम्ही दोघींनी त्याचे खूपच कौतुक केले. आई म्हणाली काय करू खायला? तर मी म्हणाले तिखटामिठाचा शिरा कर. मग आईने त्या ओट्यावरच तो केला. मी त्या ओट्याच्या शेजारीच स्टुलावर बसले होते.
...........रोहिणी गोरे


का कोणजाणे पण ही आठवण इतक्या वर्षांनी गेले ४ दिवस माझ्या मनात घोळतेय. आज लिहून काढावेच म्हणले !

Thursday, February 21, 2019

ट्रींग ट्रींग .... ( भाग २)

लँडलाईनचा जमाना गेला आणि मोबाईलचा जमाना आला. मोबाईलच्या जमान्यात आम्ही कधीच नव्हतो. २००१ साली आम्ही जेव्हा अमेरिकेत आलो तेव्हा विद्यापीठाच्या लायब्ररीतून "आम्ही सुखरूप पोहोचलो" अशी एक मेल पाठवली होती. अपार्टमेंट मध्ये राहाणाऱ्या शेजारील एका भारतीय कुटुंबाने आम्हाला फोन कार्ड बद्दल सांगितले होते. ९९ सेंटस या नुकत्याच सुरू झालेल्या बांगलादेशी दुकानातून एक कार्ड विकत घेतले होते. हे कार्ड डेबिट/क्रेडिट कार्डासारखे दिसायला होते. त्यावरचा नंबर दिसण्यासाठी तो आधी खोडावा लागायचा. मग ऍक्सेस नंबर दिसायचा आणि मग तो फिरवून अजून काही डिजिटचा नंबर फिरवला की कॉल लागायचा. पण ही कार्डे अजिबात टिकली नाहीत. आम्ही पोहोचलो हे सांगण्याकरता हे कार्ड घेतले होते. त्यावर आवाज तर नीट ऐकू येत नव्हताच. पण मिनिटेही मोजकीच होती.



भारतात फोन करण्यासाठी आम्हाला आधी अमेरिकेतला लँडलाईन फोन घ्यावा लागला. व्हराईजन या टेलीफोन कंपनीत आम्ही आमचे नाव नोंदवले व फोन सुरू झाला. त्या फोनवरून इथे अमेरिकेत आल्या आल्या २ ते ४ दिवसांनी मी रंजनाला कॉल केला होता.मी अगदीच मोजकी २-ते ३ वाक्ये बोलली असेन. म्हणजे 1 की २ मिनिटेच. पटकन फोन खाली ठेवला, बील येण्याच्या भीतीने. बील आले १० डॉलर्स !



नंतर आमच्या मित्रपरिवारातून आम्हाला काही साईटी कळाल्या. त्यावरून आम्ही दर महिन्याला ४० डॉलर्सची ऑनलाईन कार्डे विकत घ्यायचो. एक सासरी एक माहेरी एक बहिणीकरता. १० डॉलर्स मध्ये २० मिनिटे मिळायची.. या २० मिनिटात बोलणे जास्त व्हायचेच नाही. एका आठवड्याला एक 10 डॉलरचे कार्ड वापरायचो.
फोन लावण्यासाठी आधी १० आकडी ऍक्सेस नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १० आकडी पीन नंबर फिरवायला लागायचा. मग नंतर १५ आकडी ( इंटरनॅशनल कोड, भारताचा कोड, शहराचा कोड, आणि मुख्य टेलीफोन ८ आकडी लँडलाईन फोन ) नंबर फिरवायला लागायचे. हे सर्व मिळून ३५ डिजिटचे फोन नंबर फिरवल्यानंतर फोन लागायचा. त्यात ऐकू यायचे. पण कधी कधी फोन मध्येच तुटायचा. मग परत सर्व डिजिटचे नंबर फिरवण्यासाठी फोन वरची मग बटने दाबायला लागायची. त्यात मग तुमची काही मिनिटे बोललेली/वापरलेली कट करून उरलेली मिनिटे शिल्लक रहायची. बोलणे जास्तीचे व्हायचेच नाही. तब्येतीची चोकशीच जास्त केली जायची. आणि बोलताना आईला/रंजनाला/सासूबाईंना सांगायला लागायचे की आता मिनिटे संपत आली आहेत. फोन आपोआप कट होईल. यामध्ये नंतर ही ऑन लाईन विकत घेतलेली कार्डे थोडी स्वस्त झाली.





यात रिलायन्सची कार्डे जास्त चांगली होती. नंतर नंतर ५ डॉलर्सला ३० मिनिटे, आणि नंतर ६० मिनिटे दिली जायची. या फोनकार्डाबरोबर आम्हाला कस्टमर सर्विसचा नंबरही दिला जायचा. आम्ही मोबाईल फोन कधीच घेतला नाही. का ते पुढील लेखात...नंतर मोबाईल घेतला त्याचे नाव ट्रॅक फोन. अगदी छोटुसा फोन होता हा.. मी जेव्हा पब्लिक लायब्ररीत Voluntary work करायला जायला लागले तेव्हा हा मोबाईल घेतला. आणि त्याचा वापर अगदी जरूरीपुरताच.


क्रमश : ....

Wednesday, February 20, 2019

ट्रींग ट्रींग.....(1)

आमच्या वेळी म्हणजे शाळा कॉलेजात असताना फोनपर्व नव्हते. अगदी मोजूनच काहीजणांकडे फोन होते. ज्यांच्याकडे फोन असायचा त्यांचा टेलिफोन नंबर त्यांना विनंती करून घ्यायला लागायचा आणि अगदी महत्वाचा निरोप असेत तरच तुमच्याकडे आमच्याकरता फोन येईल हे सांगावे लागायचे आणि तेही आनंदाने द्यायचे. काही जण फोन करण्यासाठी किंवा निरोप देण्ञासाठी पैसे घेत असत. १ रूपया किंवा 50 पैसे असत. आम्हां दोघी बहिणींच्या लग्नानंतर आमच्या घरी फोन आला. मी डोंबिवलीवरून पुण्याला आईकडे जायचे तेव्हा गेल्या गेल्या रंजनाला तिच्या ऑफीसमध्ये तिला फोन करायचे. डोंबिवलीच्या आमच्या घरी आम्ही फोन घेतलाच नव्हता. तिथेही आमच्या सोसायटीत वर मामी राहतात त्यांच्याकडे काही निरोप असल्यास फोन येत असे.
लग्नानंतर आयायटीत वसतिगृहात राहायचो तेव्हा पण वसतिगृहाच्या खाली एक सार्वजनिक फोन होता. तिथे मला आईबाबांचा फोन यायचा. खुशाल आहात ना? असे फोनवरून ऐकल्यावर खूपच छान वाटायचे.
वसतिगृहाच्या खाली बसलेला वॉचमन फोन आला की आमच्या खोल्यांचे नंबर पुकारायचा. आणि मग मी तिसऱ्या मजल्यावरून खाली जिन्याने भराभर उतरून यायचे. पूर्वी सर्वजण आपापली खुशाली पत्राद्वारे कळवत असत. फोन फक्त गरजेपुरताच होता.




जेव्हा टेलिफोन बूथ निघाले तेव्हा मग जरा काही जास्तीचे बोलायचे असेल तर फोन करत असे. डोंबिवलीत राहत असताना आमच्या सोसाटीच्या इमारतीच्या समोरच्या इमारतीत एक बूथ झाला होता. तिथे जाऊन मी आईला आणि रंजनालाही फोन करत असे. आम्ही जेव्हा अंधेरीत कंपनीच्या जागेत रहायला गेलो तेव्हा आमच्याकडे फोन आला. तोपर्यंत आम्ही फोन घेतला नव्हता. एक तर मी दर २ ते ३ महिन्यांनी पुण्याला सासरीमाहेरी जायचे. त्यामुळे नुसती खुशालीच नाही तर भरपूर गप्पाही व्हायच्या आणि प्रत्यक्ष भेटल्याचा आनंदही व्हायचा. अंधेरीच्या जागेत रहायला गेल्यावर आमच्याकडे फोन आला. आणि मग आम्ही फोन करायचो पण खूप नाहीच. आईचा फोन यायचा, फक्त ती कुठे बाहेरगावी जाणार असेल तर तसे सांगायला मला फोन करायची.



नंतर घरोघरी फोन झाले. आणि अमाप गप्पाही सुरू झाल्या. एवढेच नाही तर फोनवर रेसिप्याही सांगितल्या जायच्या. फोनची बिले जेव्हा अवाच्या सवा यायची तेव्हा घराघरात ओरडे खायला लागायचे. नंतर फोनही स्वस्त झाले. ऑफिसमध्ये जेव्हा कामाला होतो तेव्हा मला आठवतय ऑफीसमध्ये वेगळी टेलिफोन ऑपरेटरची पोस्ट असायची. ती बसायची त्यापुढे एक भले मोठे कपाटासारखे काहीतरी असायचे आणि त्यात अनेक वायरी असायच्या. टेलिफोन आला की ज्या कुणाला फोन आला असेल त्याच्याशी वायरी जोडून तो फोन त्या व्यक्तिसाठी उपलध करून द्यायची. पहिली नोकरी सोडून जेव्हा दुसरी नोकरी सुरू झाली तिथे पण एक टेलिफोन ऑपरेटर होती. पण ऑफीस छोटे असल्याने ती व्यक्ती फोनपाशी येऊन बोलतअसे. नंतर त्या ऑफीसमध्ये इंटरकॉम सिस्टीम आली.


महाराष्ट्राच्याबाहेर जर फोन लावायचा असेल तर ऑपरेटर कॉल बुक करायची. आमच्या ऑफीसमधली टेलीफोन ऑपरेटर टेलीफोन खात्यातील टेलीफोन ऑपरेटरला फोन करायची. मग तिथली ऑपरेटर ज्या माणसाला फोन लावायचा आहे त्याचा नंबर घ्यायची. आमच्या कंपनीचा फोन नंबर घ्यायची आणि वेळ सांगायची. सांगितलेल्या वेळेला कॉल यायचा आणि म्हणायची की पार्टीशी बोला. एकदा सिंगापूरला कॉल बुक केला होता आणि तोही १० मिनिटांकरिता.

क्रमश : ....

Thursday, February 14, 2019

Happy Valentine's day

मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है
तू ही नजरोमें जान-ए-तमन्ना तू ही नजारोमें


तू ही तो मेरा नीलगगन है, प्यार से रोशन आँख उठाए
और घटाके रूपमें तू है, काँधेपे मेरे सर को झुकाए
मुझ पे लटे बिखराए



मंझिल मेरे दिल की वही है, साया जहाँ दिलदार है तेरा
परबत परबत तेरी बाहे, गुलशन गुलशन प्यार है तेरा
महके है आँचल मेरा

जागी नजर ख्वाब है जैसे, देख मिलन का दिन ये सुहाना
आँख तो तेरे जलवोमें गुम है, देखुँ तुझे या देखुँ जमाना
बेखुद है जमाना

Lyricist - Majrooh Sultanpuri

Wish you all happy valentine's day ! <3 br="">