Monday, July 24, 2023

२४ जुलै २०२३

 मधुराणी तुला सांगू का, तुला पाहून चाफा पडेल फिका हे गाणे बऱ्याच वर्षांनी ऐकले आणि ते मी मोहिनी अंताक्षरीवर पाठवले. मोहिनीला पण हे गाणे आवडले आणि ती म्हणाली की तिने पण खूप दिवसांनी ऐकले. तिने लगेच २४ जुलैची थीम जुनी मराठी गाणी असे घोषित केले आणि माझे मन भूतकाळात निघून गेले. रेडिओवर हे गाणे लागायचे. हे गाणे आता माझ्या मनात ठिय्या देवून बसणार हे नक्की ! सुधीर फडके आणि आशा भोसले यांची जवळपास सर्वच द्वंद्व गीते सुंदर आहेत. गुगलमध्ये हे गाणे शोधले, युट्युबवरही पाहिले. ग. दि. माडगूळकरांनी शब्दांची सुरेख गुंफण केली आहे. अजून एक गाणे आहे तेही पूर्वी ऐकले नव्हते. ते गाणे आहे पैठणी बिलगून म्हणते मला जानकी वनवास ग संपला. पी सावळाराम यांनी हे गाणे लिहिले आहे. तर आजच्या मोहिनी अंताक्षरी मध्ये सदस्यांनी अशी अनेक जुनी गाणी म्हणली आणि त्यामुळेच आजचा दिवस छान गेला. संगीत हे टॉनिक आहे आणि ते आम्हां सर्वांना मोहिनी अंताक्षरी या ग्रुपमध्ये मिळते. गाणी आठवतात, बोल गुगल शोधात मिळतात. मग आठवतात ते पूर्वीचे दिवस. रेडिओवर प्रसारित होणारी गाणी. आपण सगळेच या रेडिओवर लागणारी गाणी ऐकत मोठे झालो.

मला ही जुनी गाणी आवडतात.

१. मधुराणि तुला सांगू का तुला पाहून चाफा पडेल फिका
२. पैठणी बिलगुन म्हणते मला जानकी वनवास ग संपला
३. असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसून मरवा
४. माझ्या रे प्रिती फुला ठेऊ मी कोठे तुला
५. पाय नका वाजवू कुणीही पाय नका वाजवू
६. त्या तिथे पलीकडे तिकडे माझिया प्रियेचे झोपडे
७. कशी करू स्वागता एकांताचा आरंभ कैसा असते कशी सांगता
८. तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
९. रात्र काळी घागर काळी
१०. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची
११. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
१२. आज चांदणे उन्हात हासले तुझ्यामुळे
१३. खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
१४. तुझी प्रीत आज कशी स्मरू
१५. नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी
१६. झाला साखरपुडा ग बाई थाटाचा रुणुझुणु चुडा हाती गाईल ग
१७. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते
१८.  परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?
१९.  पुनवेचा चंद्रम आला घरी चांदाची किरण दर्यावरी
२०.  अंगणी गुलमोहर फुलला लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला
२१.  धुंद येथ मी स्वैर झोकितो मद्याचे प्याले

No comments: