Wednesday, November 14, 2018

पानगळीचे रंग






















Collage photos






फोटोचे एकत्रिकरण केले आहे ते सर्व फोटोज मी काढलेल्या फोटोंमधून घेतलेले आहेत. दिवाळी, होळी, निसर्ग आणि  ऋतू

पानगळीचे रंग











गेल्या १७ वर्षात पानगळीचे रंग इतके गडद पहिल्यांदाच दिसले. मी कामावरून येताना सगळीकडे ही रंगांची बहार
दिसत होती.
किती फोटो काढू नि किती नाही असे माझे झाले होते. सगळे फोटो इथे ब्लॉगवर अपलोड करत आहे.

Wednesday, October 17, 2018

दसरा शुभेच्छा


 सर्व वाचक, ब्लॉग लेखक यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ! फेबुवर मी नवरात्रीचे ठरवून दिलेले रंग निवडून एक थिम ठरवते. त्याप्रमाणे
फोटोज अपलोड करते. यावर्षी मी बांगड्या अपलोड केल्या होत्या. मागच्या वर्षी पेपर क्विलिंगचे कानातले आणि त्या आधी मी काढलेल्या
फोटोंपैकी फुले अपलोड केली होती. छान वाटते. एक कोलाज बनवून इथे टाकलेले आहे. आणि फॉल सीझनच्याही तुम्हां सर्वांना शुभेच्छा!



Monday, September 24, 2018

२४ सप्टेंबर २०१८

आज मला कामावर ऑफ होता त्यामुळे सकाळी सावकाशीने उठले. विनुलाही थोडे बरे वाटत नसल्याने तोही कामावर गेला नाही. बरे वाटत नव्हते म्हणजे काहीवेळेला हवा सतत बदलती असल्याने अंगदुखी आणि ताप आल्यासारखे वाटते तसे झाले होते. माझेही तसेच झाले होते थोडेफार. पण मग काहीतरी दिवसाचा वेगळेपणा होण्यासाठी मी आज वालमार्टला जायचे ठरवले. नेटही नव्हते. मग घरी बसून करायचे काय?   निघताना उसळ भात खाऊन निघाले. विनुने मला दुकानात सोडले आणि तो घरी आला. आज मी रिलॅक्स मूड मध्ये मला जे काही पाहिजे होते ते बघितले. तीन तास "हे बघ ते बघ" करण्यात गेले.


रविवारी ग्रोसरी केली नव्हती म्हणून बाकीचीही ग्रोसरी केली. त्यामध्ये आज हिरवी द्राक्षे बरीच आली  होती, ती घेतली. अनसॉल्टेड दाणे घेतले. कानातले तर मी नेहमीच बघते. त्यात मी आज कानातले भोपळे घेतले.
बाकी नेहमीचीच आठवड्याची  भाजी, दुध, दही, कांदे बटाटे वगैरे खरेदी केली.  विनू मला घरी आणण्यासाठी वालमार्ट मध्ये आला. आज दिवसभर आकाश ढगाळलेलेच होते. मला उद्या कामावर जायचे नसल्याने आज निवांतपणा आहे. उद्याची पोळी भाजी करून झोपायच्या आधी या वेगळ्या दिवसाची रोजनिशी टंकत आहे. कानातले भोपळे आता मी कामावर जाईन तेव्हा घालीन आणि आज मला दुकानात बॅकपॅकही छान मिळून गेली.


१० डॉलर्सची मुळ किंमत मला सेल मध्ये ३ डॉलर्स ला मिळाली. ती पण एखाद दिवशी कामावर घेऊन जाईन.



त्यात  जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याची बाटली, स्वेटर आणि टोपी  हे सर्व नीट  मावेल का ते आधी बघितले पाहिजे. मावल्यास तीच कामावर जाण्याची बॅग करीन. अर्थात त्याला पर्स सारखे आतले कप्पे नाहीयेत त्यामुळे बाकीचे सर्व कश्यात ठेवायचे? म्हणजे पैसे, क्रेडीट कार्ड, फोन,
फोनची डायरी, पेन. किंवा मग त्याकरता एक छोटी हातातली पर्स घ्यावी लागेल आणि मग ती त्यात घालून ही बॅकपॅक न्यायला सुरवात करायची काअसा विचार चालू आहे.