झी मराठीवरची "पसंत आहे मुलगी" आम्ही दोघे सध्या पहात आहोत. पूर्वी पाहिली होती पण पूर्ण लक्षात नसल्याने परत पहात आहोत. खूपच सुंदर मालिका आहे. ही मालिका पहाताना घटना कुठेतरी खऱ्या खुऱ्या घडलेल्या आहेत असे वाटते इतके कथानक छान आहेत. संवादही अप्रतीम आहेत. ही मालिका बघताना लग्न या विषयावर लिहावेसे वाटते पण लिहिणार नाही. काही मुद्दे लिहिते. नंतर कधीतरी ते विस्तारीन. लग्न या विषयाची खोली खूप मोठी आहे. प्रत्येकाची "एका लग्नाची गोष्ट"असते.
* पत्रिका पहाणे
* कांदे पोहे कार्यक्रम - १० मिनिटात उरकणारा - मुलीकडचे मुलाकडच्या आईवडिलांना विचारतात मुलगी पसंत आहे का? मुलीला पण मुलगा पसंत हवा की नको? - मुलगा/मुलगी ३/४ वेळा भेटून मग निर्णय घेतात.
* मुलीच्या/मुलाच्या आईवडिलांनी सांगणे तुमचे तुम्ही लग्न जमवा.
* कांदे पोहे कार्यक्रम - १० मिनिटात उरकणारा - मुलीकडचे मुलाकडच्या आईवडिलांना विचारतात मुलगी पसंत आहे का? मुलीला पण मुलगा पसंत हवा की नको? - आताची पद्धत - मुलगा/मुलगी ३/४ वेळा भेटून मग निर्णय घेतात.
* मुलीचे वडील मुलगा पसंत पडेपर्यंत कांदे पोह्यांचा कार्यक्रम करत रहातात.
* मुलीच्या/मुलाच्या आईवडिलांनी सांगणे तुमचे तुम्ही लग्न जमवा.
* ३/४ बहिणी असतात तेव्हा मोठा मुलीवर दबाव आणला जा ऊ शकतो. उगीचच मुलात खोट काढत बसू नकोस.
* प्रेमविवाह
* बघताच क्षणी मुलगा/मुलगी एकमेकांना आवडतात व लग्न जमते.
* मुलीला मागणी घालतात आणि लग्न होते.
* आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलाशी/मुलीशी लग्न जुळवतात.
* मिळवत्या मुलीला प्रथम प्राधान्य दिले जाते.
* रंग/रूप पाहून मुलीला पसंत करतात. मुलगा कसाही असला तरी चालतो.
* एकत्र/विभक्त कुटुंब पद्धती
* काही घरात शिकलेली मुलगी नको असते (तिने डोक्यावर मिऱ्या वाटल्या तर?) अशिक्षित मुलगी पण तसे करू शकते.
लग्न तर झाले पण ते कोणत्या आधारावर टिकून रहाते याचे मुद्दे नंतर कधीतरी लिहीन. तूर्तास इतकेच.
copy right - rohini gore
See less
No comments:
Post a Comment