भेटूया भेटूया असे घोकत घोकत शेवटी आज तो योग जुळून आला ! आम्ही तिघी मनोगती म्हणजे वर्षा, मी आणि अंजली अंजलीच्या घरी जमलो. तिच्या घरालागतच्या अंगणात खुर्च्या टाकून बसलो. आज ढगाळ हवा होती. अंजलीने दडपलेले पोहे केले होते. त्यात सांडगी मिरची चुरडून घातल्याने चविष्ट पोहे खायला मजा आली. एकीकडे गप्पा टप्पा चालूच होत्या. मनोगत, मायबोली, ऐसी अक्षरे, मिसळ पाव, उपक्रम या सर्व संकेत स्थळाच्या आठवणी निघाल्या. त्यात कोण कोण सक्रिय आहे, कुणाकुणाच्या प्रत्यक्षात भेटी झाल्यात याची चर्चा झाली. गप्पांच्या ओघात ऑर्कुट, फेसबुक, इंस्टा आलेच! नाटक, सिनेमे, आरोग्य, भारतातले हवा-पाणी, आम्ही तिघी सध्या काय करतो वगेरे सर्व विषय बोलण्यात आले आणि आवरते घेतले कारण की वर्षाला ट्रेन पकडून दूरवर जायचे होते. अवघ्या 2 तासातली ही गाठभेट अविस्मरणीय झाली ! आजचा ऑगस्ट चा पहिला दिवस छान गेला.
1 August 2026
No comments:
Post a Comment