Wednesday, July 15, 2020

बर्थ डे गर्ल - आई

आज बर्थ डे गर्ल आई होती. १५ जुलै आईचा वाढदिवस. आजचा दिवस स्मरणात राहील असा गेला. आईचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा झाला. आईची सर्व भाचवंडे आईवर खूप प्रेम करतात. आईलाही तिची भाचवंड खूप प्यारी आहेत. तर असा हा वाढदिवस झूमवर साजरा झाला. सर्व भाचवंडे, लेकी, सुना, जावई, नातवंडे पतवंडे हजर होती. त्यानिमित्ताने आम्ही भावंड पण एकत्र आलो आणि  प्रत्यक्षात भेटल्याचे समाधान झाले. किती छान छान शुभेच्छा होत्या सर्वांच्या ! वा ! केक, फुगे पण होते. आणि शब्द शुभेच्छाही
मस्तच होत्या.

झूमवर भेटलोच पण आई बाबा कोरोनामुळे रंजनाकडे रहायला गेले आहेत. तिथे त्या दोघांची ती खूप छान काळजी घेते. आणि आज तर आई खूप खुष आहे. सांगत होती रंजनाने काय काय केले ते ! ऐकून खूपच छान वाटले. 
विडिओ कॉलवर आईचा आनंदी चेहरा बघून खूप समाधान वाटत होते. रंजना, सुरेश व सईने आईला १४ तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच १५ तारीख सुरू होण्याच्या सुमाराला सरप्राईज दिले. आईबाबांच्या खोलीत गेले. दिवा लावला आणि टाळ्या वाजवून आईला भरभरून  शुभेच्छा दिल्या. आज रंजनाने आईला ओवाळले. तिला गरम गरम आयते खाऊ घातले. तिच्या आवडीच्या डाळिंब्या केल्या होत्या आज  रंजनाने जेवणात ! गरम गरम टम्म पुऱ्या वाढल्या. वेगळी म्हणून रव्याची खीर केली. दिवस भर आईला तिच्या भाचवंडांचे फोन येत होते. मला विडिओ कॉल वर हे सर्व तिने मला सांगितले. आईला विरंगुळा म्हणून रंजनाने तिला ट्रांझीस्टर गिफ्ट केला. नंतर आलो सगळे झूमवर. तिथेही गप्पा टप्पा झाल्या. 
आईने आज ८५ वर्षात पदार्पण केले आहे. आणि बाबांचा वाढदिवस मे महिन्यातला. त्यांनि ९० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्याने सुखकारक ठरो ही देवाजवळ प्रार्थना. सर्वांना धन्यवाद. हासऱ्या, आंनंदी आणि चिरतरूण असलेल्या माझ्या आईला परत एकदा वाढदिवसाच्या  आभाळभर हार्दिक शुभेच्छा ! आणि नमस्कार ! Love you Aai <3 :="" always="" as="" id="goog_1613518867" span="">


2 comments:

श्रिया (मोनिका रेगे) said...

खूप सुंदर लिहिलंस ताई. ह्या करोनामुळे प्रत्यक्षात जरी भेट होत नसेल तरी तुम्हा सर्वांनी उत्साहात काकूंचा वाढदिवस साजरा केलात हे वाचून खूप आनंद वाटला. आम्हा तिघांकडून काकूंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !��

rohinivinayak said...

Hi Monica,,, Anek Dhanyawaad !, tujha reply vachun khup chhan vatle ga! mi sangitlya tuzya shubhechchaa aaila :) :)