आजचा दिवस छान गेला. आषाढी एकादशीचा मेनू ठरवला होता त्याप्रमाणे झाला. साबुदाण्याचे थालिपीठ, बटाट्याची भाजी, नारळाची चटणी. संत्र्याच्या फोडी , दाक्षे, खजूर, सुकामेवा व दाणे यांचा लाडू, आयते श्रीखंड. आज अंताअक्षरी मध्ये विठ्ठलाची गाणी म्हणायची होती ती म्हणली. मला आशा भोसले यांनी गायलेले धागा धागा अखंड विणूया हे गाणे खूप आवडते. हे गाणे तर ऐकलेच पण इतरही गाणी ऐकली, म्हणली. देवाची पूजा करताना नमस्कार करून म्हणाले कोरोनाचे संकट दूर होऊ देत. सर्वांच्या मनासारखे होऊ देत. माझ्या एका मैत्रिणीने पण छान मेनू केला होता. ती व मी आम्ही एकमेकींना फोटोज पाठवतो त्यामुळे जरा बळ मिळते. आज माझ्या मामे भाचीचा कथ्थक नाच पाहिला. तिने युट्युबवर आणि आमच्या भावंडांच्या ग्रूप मध्येही टाकला होता. अवघा रंग एक झाला या गाण्यावर तिने व तिच्या २ मैत्रिणींनी छान कथ्थक केले आहे. आज वेगळे पणा म्हणजे एफबी वर अवतार जागृत झाले होते. ते पाहताना पण मजा येत होती. आज आईबाबांना, माझ्या बहिणीला, व भाचीला विडिओ कॉलवर पाहिले.
Wednesday, July 01, 2020
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment