कंप्युटर प्रोग्रामिंगचा कोर्सही असाच मजेशीर. सीडॅकचा तर्फे या कोर्सची
शाखा डोंबिवली मध्ये मोठ्या बॅनर मध्ये लावली होती. मी आणि अर्चना मिळून या
क्लासला जायचो. १५,००० रूपये फी होती .१९९८ साली हा कोर्स केला. थोडे आठवत
आहे. फॉक्सप्रो मध्ये आम्ही ४ जणींनी मिळून एक प्रोजेक्ट केला होता.
दीपाली नावाची एक मुलगी आम्हाला "सी" नावाची मशीन भाषा शिकवायची आणि तिने
आमच्याकडून ती चांगलीच घोटून घेतली होती. मला खूप उत्साह आला होता
शिकण्याचा तेव्हा. डेव्हलपर २००० शिकवायला शिक्षक मिळत नव्हता. एक पोरगेला
मुलगा आला शिकवायला आम्हाला. आम्ही म्हणले पण हा शिकवणार आम्हाला ! हा कोर्स संथ गतीने चालला होता. एक तर आम्ही क्लासला गेल्यावर बरेच वेळा लाईटी जायच्या आणि मग आम्ही परत घरी यायचो. दुपारचा १२ ते १ क्लास होता. उन्हात मी छत्री घेऊन जायचे. क्लास होत आला आणि आम्ही अंधेरीस राहायला आलो.
नंतरचा बराचसा उरलेला कोर्स मी अंधेरी -डोंबिवली- अंधेरी असा येऊन जाऊन केला. अजून एक प्रोजेक्ट बाकी होता. परीक्षेचे सेंटर दादरला होते. प्रोजेक्ट, अभ्यास आम्ही तिघींनी मिळून केला. आणि नंतर दादरला आम्ही तिघी मिळून परीक्षेसाठी गेलो होतो. मी ४ दिवस नेर्लेकर यांच्या घरी जाऊन राहिले होते. दादरला परीक्षेसाठी गेलो ती होती एका शाळेत. अजिबात चांगली व्यवस्था नव्हती. परीक्षा देऊन घरी आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मि घरी अंधेरीला गेले. हुश्य ! झाला एकदाचा कोर्स ! असे मनाशी म्हणाले. नंतर प्रमाणपत्र मिळाले आणि ठरवले होते की एक पीसी घेऊन जे शिकलो त्याचा सराव करू. सराव केल्यावर प्रोग्रॅमिंग जमतय का बघू. दीपाली मला म्हणाली होती की तुम्ही काही पुस्तके विकत घ्या आणि सुरवात करा. पण तसे काहीच झाले नाही. आपण ठरवतो एक आणि होते भलतेच ! Rohini Gore

No comments:
Post a Comment