आमच्या अपार्टमेंटला मुख्य दरवाजाला कुलूप असते त्यामुळे लक्षात ठेवून किल्ली घेऊन जावे लागते. विनायकने कामावर जाण्यासाठी निघाला. थंडीमध्ये रोजच्या रोज कार गरम करावी लागते त्यामुळे तो खाली गेला. पण वर येताना त्याच्या लक्षात आले की मुख्य दरवाज्याची चावी घेतली नाहीये. आणि फोन पण नेला नव्हता त्यामुळे मला फोन करून आतून दार उघड असे सांगता पण येईना. नशिबाने एकजण विनायक सारखाच खाली आला होता कार गरम करण्यासाठी आणि अर्थात विनायकने आणि त्यानेही कारवरचा बर्फही साफ केला होता.
त्याच्यामुळे त्याला मुख्य दरवाजातून वर अपार्टमेंट मध्ये येता आले.
आज मी ग्रंथालयात जायचे ठरवले होते. पडलेला बर्फ लवकर वितळणार हे माहीती होते. म्हणून मी ग्रंथालयात जाऊन आले. सर्व तयारीनिशी गेले होते. थंडी होतीच पण झेपण्याइतपत होती. जाताना रात्रीच्या पोळ्याही करून ठेवल्या होत्या. जाऊन येऊन तासभर लागला. मला वाटले होते तितके दूर नाहीये ग्रंथालय.
एक वाजेपर्यंत घरी आले आणि जेवले. दमल्यामुळे थोडी विश्रांती घेतली. दुपारी चहा घेऊन संध्याकाळचे खायला पण केले. आज धुणे धुवायचे होते म्हणून अंधार पडायच्या आत ते धूउन येवू असा विचार केला आणि गेले. आमच्या अपार्टमेंट मध्ये वॉशर आणि ड्रायर नाहीयेत. अपार्टमेंटच्या बाहेरच्या बाजूला थोडे चालत गेल्यावर तळघरात ते आहेत. तिथे गेले तर सर्व मशिन्स बंद होती. तिथे एक बाई होती. ती म्हणाली फक्त एकच मशीन चालू आहे त्यात मी माझे धुणे लावले आहे. तिला तर खूप वैताग आला होता. तिचे धुणे एका मशीन मध्ये
अडकले होते. त्यात पाणीही होते.
तिने त्या मशीनचा प्लग काढला आणि मशीन मध्ये असलेले सर्व कपडे पिळून दुसऱ्या मशीन मध्ये टाकले. मी तिला म्हणाले मी माझी धुण्याची पिशवी इथेच ठेवते.
तुझे कपडे धूवून झाले की मग मी येते. कारण की एकच मशीन चालू होते आणि तिचे कपडे त्यामध्ये
धुतल्यानंतर मग ती तिचे कपडे काढून ड्रायरमध्ये टाकणार त्यामध्ये वेळ जाईल म्हणून मी परत घरी आले. विनायक घरी येऊन चहा पीत होता. तो म्हणाला की तो त्याचा फोन कामावरच्या जागेवरच विसरून आलाय. मग थोड्यावेळाने मी लाँड्री मध्ये गेले आणि त्या एकाच चालू असलेल्य मशीनमध्ये टाकले.
या लाँड्रीरूम मध्ये बसायला खुर्च्या नाहीत. थंडी असल्याने बाहेर पण जाता येत नाही त्यामुळे परत जिना चढून घरात यावे लागते. आणि आठवणीने मुख्य दाराची किल्ली आणि फोनही घेऊन जावा लागतो.
मशीन मध्ये कपडे टाकून मी मैत्रिणीला फोन लावला. थोडावेळ थंडी असली तरी बाहेर थांबले. घरी परत गेले नाही कारण की आधीच मी सकाळी तासभर म्हणजे दोन मैल चालून आले होते. कोणतेही मशीन चालू नाही आणि फक्त एकच मशीन चालू होते म्हणून माझी एक खेप जिना चढण्या उतरण्याची झाली होती. म्हणून मी विचार केला की अर्धा तास खालीच थांबून धुतलेले कपडे ड्रायर मध्ये टाकून मग जिना चढून घरी जावे. भाजी चिरलेली होतीच. ड्रायरमध्ये कपडे वाळायला ४५ मिनिटे लागतात. त्यावेळात भाजी करावी असा विचार केला होता.
बाहेर थंडी होती म्हणून लाँड्रीरूम मध्ये येऊन मैत्रिणीला फोन लावला तितक्यात मला कसला तरी आवाज आला. बघते तर मी कपडे लावलेले मशीन आऊट ऑफ ऑर्डर झालेले. अरे देवा ! तिथे असलेल्या फोन नंबर वर फोन केला तर तिथे नेहमीचेच ऑप्शन्स अमूक करता १ दाबा याव आणि टँव . तिथे मेसज दिला आणि परत वैतागून वर आले. विनायक ला म्हणाले की तुझ्या फोनवरून फोन लाव परत. फोन लावला कोणीही बोलायला आले नाही. आता अर्धवट (खरे तर नीट धुतले न गेलेले कपडे) लाँड्र्रिच्या पिशवीत टाकले आम्ही दोघांनी मिळून.
नशीब मशीनचे झाकण उघडता
आले. ओले कपडे पिशवीत घालून खालच्या खाली आम्ही कारमध्ये बसून कॉईन लाँड्रीमध्ये गेलो. तिने तासभर बसून चालणार नव्हते. तिथे एका मशिनमध्ये कपडे धुवायला टाकले आणि घरी आलो. डोके भणभणायला तर लागलेच होते. शिवाय पाय खूप दुखत होते. चहा घेतला आणि परत जाऊन कपडे ड्रायर मध्ये टाकून आलो. घरी आल्यावर पोळी भाजी केली. आणि परत वाळलेले कपडे घेऊन घरी आलो आणि जेवलो.
आज मी ७ ते ८ वेळा जिन्याची चढ उतार केली. त्यामुळे प्रचंड पाय दुखत आहेत. कपडे धूवून आल्यानंतर
लाँड्रीच्या कस्टमर सर्व्हीसचा फोन आला. त्यांना सांगितले की आमचे कपडे आम्ही दुसरीकडून धुवून आणले. आजपासून कानाला खडा. अपार्टमेंटच्या लाँड्रीमध्ये कधीच कपडे धुवायचे नाहीत. सरळ कॉईन लाँड्रीमध्ये जायचे. अपार्टमेंटच्या लाँड्रीकरता जे पैसे भरून आणले होते ते बरेचसे संपले होते म्हणून ठीक.
लाँड्रीच्या कस्टमर सर्व्हीसचा फोन आला. त्यांना सांगितले की आमचे कपडे आम्ही दुसरीकडून धुवून आणले. आजपासून कानाला खडा. अपार्टमेंटच्या लाँड्रीमध्ये कधीच कपडे धुवायचे नाहीत. सरळ कॉईन लाँड्रीमध्ये जायचे. अपार्टमेंटच्या लाँड्रीकरता जे पैसे भरून आणले होते ते बरेचसे संपले होते म्हणून ठीक.
2 comments:
baap re! kiti katatop aahe kapde dhune mhanaje!
saral hatane nahi ka dhuta yet?
Tub madhe?
chhe ga ajibaatach nahi,, tub chhota asto,, mi agadi survatila ameriket aale aani 2-4 kapde dhutle tar majhe kambarde paar modun gele,, aamhi aadhi rahat hoto tithe aamche swatahache washer dryer hote,, pan ithlya apartment la inside apartment washer dryer nahiyet, mhanun ha khatatop,, pan aat aamhi coin laundry madhunach kapde dhuvun aanto, te aamchya 2 minitachya car drive var aahe, vinayak mala sodto aani mag tasane aanayla yeto, kapde dhuvun jhale ki mag mi tyala phone karte.
Post a Comment