काल रात्री वादळामुळे खूप गरम होत होते त्यामुळे झोपेचे खोबरे तर होणारच होते. ठरवले की आज ऑनलाईन एक मुव्ही पहायचा. कोणता पाहावा बरे? युट्यूबमध्ये शोधाशोध केली आणि मला सीता और गीता मिळाला. खूप पूर्वी पाहिला होता पण जास्त काही आठवत नव्हता. सिनेमा खूपच एंजॉय केला. हेमामालिनी खूपच गोड दिसते आणि जुळ्या बहिणींची ऍक्टिंग पण खूप छान केली आहे. झोपायला १ वाजला. अधुनमधून झोप येत होती तर काही वेळा खूप गरम होत असल्याने जागे व्हायला होत होते. कूलर चालू होता तरीही हवा चांगली नसल्याने झोपेचे तसे खोबरेच झाले होते. पहाटे अगदी थोडावेळ डोळा लागला. जाग आली आणि खिडकीतून बाहेर पाहिले तर उजाडायला सुरवात झाली होती. बाहेर जाऊन पाहिले तर आकाशात निळ्या व काळ्या रंगाचे फरांटे उठले होते. सूर्य यायला थोडा वेळ होता म्हणून परत जाऊन झोपले. परत उठले आणि बाहेर पाहिले तर संधिप्रकाशासारखा सूर्योदय पाहिला मिळाला. ढंगामधून थोडी पिवळे किरण बाहेर पडले होते. नंतर चहा केला व प्यायला आणि जी झोपले ती ११ वाजता उठले. १२ वाजता आम्ही दोघांनी न्याहरी केली. आज सुट्टी असली तरी विनुला कामावर जायचे होते. काल जास्तीचा स्वयंपाक केल्याने काही करायचे नव्हते. फक्त पोळ्या केल्या आणि आठवणीने सकाळीच साबुदाणा भिजत घातला.
जेवण झाल्यावर विनायक कामावर गेला आणि मी परत झोपले. उठून चहा घेतला आणि युट्युबवर थोडी गाणी पाहिली.
श्रेया
घोशालची गाणी पहिल्यांदाच ऐकली. संध्याकाळी गरमागरम साबुदाणे वडे
केले आणि नारळाची चटणी केली. आहाहा, खूपच चविष्ट झाले होते वडे आणि चटणी.
त्यामुळे खूपच खाल्ल्ले गेले. वडे आता सहसा खूपच कमी होतात त्यामुळे चव
आली. कालचा आणि आजचा दिवस खूपच कंटाळवाणा गेल्याने उशीराने कारने चक्कर
मारून आलो. आज नुसती चक्कर मारायला खूपच छान वाटत होते. नाहीतर इतर वेळी या
दुकानातून त्या दुकानात ग्रोसरी आणि इतर काही ना काही घ्यायचेच असते. आजचा
दिवस खूपच वेगळा गेला त्यामुळे छान वाटत होते. दुपारची पोळी उरली होती ती
नारळाच्या चटणीबरोबरच खाल्ल्ली. ही चटणी पोळी पण खूप छान लागली. भांडी
घासून रोजनिशी लिहायला बसले. आज स्वयंपाक असा झालाच नाही त्याचाही वेगळेपणा
जाणवत आहे. साबुदाणे वड्यानी मात्र आजचा दिवस जास्त छान गेला हे मात्र खरे
!
4 comments:
post wachun sabudana wade khawe watle.
:) thanks anagha ! tula pan aavadatat sa.vade? mastach,, karun khaa :)
aga rohini, mala hi watat hote 4th la sarv band. pan chakka costco, target anidesi groceries sarva kahi ughade hote so amhi groceries 4th la ch karun takli.
sabudana vada ikde hi pathava ;) -Plavi
bahutek aga sakali band astat, 6 nantar open hotat ase vatate,, karan ki aamhi sandhykali chakkar maryala gelo tar lowes food aani wal-mart open hote,
Post a Comment