Tuesday, July 08, 2014

फोटोंच्या आठवणी... (1)

ही लव्हेंडर रंगाची फुले आहेत ती एका रेस्ट एरिया मधली आहेत. फुलांचे बरेच फोटोज मी रेस्ट एरियाच्या अवती भोवती लावलेल्या फुलझाडांपैकी घेतलेले आहेत. हा रेस्ट एरिया मला नेमका कुठला ते आठवत नाहीये पण तो होता एका डोंगराळ भागात. नेहमीच्या इंटरस्टेट हायवे वर नव्हता त्यामुळे मूद्दाम अशी शोभेची झाडे आजुबाजूल नव्हती. सगळीकडे गवत पसरले होते आणि त्यात ही तीन फुले मला दिसली आणि खूप आनंद देवून गेली. एक तर लव्हेंडर रंग मला खूपच आवडतो आणि ही फुले तर अति नाजूक अशी होती त्यामुळे ही कायमची आठवणीत भरून राहिली आहेत.




हा फोटो आहे किल डेव्हिल हिल्स वरच्या समुद्रकिनाऱ्याचा जिथे राईट  बंधूंनी पहिले विमान उडवले. इथे आम्ही डिसेंबर महिन्यात गेलो होतो. समुद्रकिनाऱ्यावरच होटेल बुक केले होते. मला आनंद याचा होता की समुद्रकिनाऱ्यातून वर येताना सुर्योदय बघता येईल आणि शिवाय त्याचा फोटोही काढता येईल याचा, पण माझा हिरमोड झाला. नेमके सकाळी ढ्ग भरून आले होते. तरी पण इथली एक आठवण म्हणून हा फोटो घेतला पण तो कायम लक्षात राहिला आहे. त्यावेळेला हलके थंडगार वारे वाहत होते. ज्यावर्षी गेलो होतो तेव्हा ऐन डिसेंबरातही अजिबात थंडी नव्हती. या फोटोकडे बघितले तर जमीन, पाणी आणि आकाश असे एकत्र आले आहे त्यामुळे मला तरी हा फोटो मनाला जास्त भावला. 
हा फोटो आहे तो एका खडकाच्या बाजूला असलेल्या एका वेगळ्याच रोपट्याचा. असेच काहीतर वेगळे छानसे उगवले होते. मी रोज चालायला जाते ती एका ओबडधोबड खडकावर थोडी बसते. त्या दिवशी या खडकावर बसले होते आणि आजुबाजूला पाहिले तर एक छान काहीतरी उगवलेले दिसले. पण मला त्याचा नीट फोटो काढता येत नव्हता. मग मी ते जे काही उगवले होते ते तोडले आणि त्या ओबडधोबड खडकावर ठेवले तर छान दिसले आणि त्या खडकाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो छान आला. वेगळाच दिसतो त्यामुळे मनात भरला आणि कायमचा आठवणीत राहिला.

क्रमशः ...


No comments: