आजचा दिवस खूप खास होता. स्नो डे/वर्क डे (विनुचा)/साडी डे. साडी मला खूपच आवडते नेसायला पण आजपर्यंतच्या आयुष्यात मी खूपच कमी वेळा साडी नेसली आहे. लग्ना नंतर नोकरी केली तेव्हा मी कामावर जाताना पंजाबी ड्रेस घालत असे आणि अधुन मधून साडी. साड्यांच्या आठवणी तर खूपच आहेत. ओन्ली विमल गुलाबी रंगाची आईची साडी मी विनुबरोबरच्या कांदेपोहे कार्यक्रमाला नेसले होते. गुलाबी कानातले आणि गळ्यातले. साखरपुड्यानंतर मी व विनु फिरायला जायचो तेव्हा माझ्या वाढदिवसाला त्याने एक साडी आणली होती. रंग होता आंबा कलर आणि त्याला मरून रंगाचे काठ. ही साडी मी वाढदिवसाला नेसले. लग्नानंतर विनुच्या मित्राच्या लग्नात नेसले. आईची एक साडी बांधणी लाल रंग आणि त्याला हिरव्या रंगाचे काठ होते. आईची अजून एक साडी सॅटीन पट्टा. या साडीत ७ रंग होते. आईने आम्हा दोघींना कॉलेजला गेल्यावर साड्या घेतल्या होत्या. माझी लाल रंगाची जरीवर्क केलेली साडी आणि रंजनाला आंबा कलरची आणि काठ होते मरून रंगाचे. माझ्या सासुबाईंनी मला मंगळागौरीला घेतलेली पांढऱ्या रंगाची साडी खूप आवडली होती. त्यावर वेगवेगळ्या रंगाचे गोळे होते. अशा काही साड्या मनात भरलेल्या आणि आठवणीतल्या आहेत. काही साड्या नेसलेले फोटो आहेत पण ते जुने आहेत. लग्नात आईने व सासुबाईंनी घेतलेल्या साड्याच फक्त मला होत्या. मी दुकानातून खरेदी केलेल्या साड्या ४ ते ५ असतील. मी जरी पंजाबी ड्रेस घालत असले तरी सुद्धा ते कमीच होते. ढीगाने कधीच साड्या/ड्रेस नव्हते माझ्याकडे. आता पुढील आयुष्यात ही कसर भरून काढणार आहे. आज विनुला कामावर जायचे होते. खूप नाही तरी स्नो बऱ्यापैकी पडलेला होता. जेवणाच्या वेळी विनु घरी परतला आणि आम्ही दोघे साऊथ इंडियन थाळी (दोघात एक) खायला बाहेर पडलो. नंतर विनुने मला कोह्ल्स मध्ये सोडले व परत कामावर गेला. ३ तास मी दुकानात हे बघ ते बघ करत होते. पाय खूप दुखायला लागले म्हणून दुकानात बाहेरच्या बाजूला असलेल्या बाकावर बसले पण बाकडे थंडीने अतीशय गार झाले होते. लोक दुकानात येत-जात होती त्यामुळे दार उघडे होत होते आणि थंडी वाजत होती. मधेच मी विला पिझ्झा मध्ये गेले आणि फक्त डाएट कोक घेतला. इथे फक्त मी बसण्यासाठी गेले होते. तिथल्या माणसाने विचारले आज पिझ्झा नाही का? सगळे लपेटून घेतले होते तरीही दुकानात खूप थंडी वाजत होती. शून्य अंश डिग्री
सेल्सिअसच्या आसपास तापमान होते आज. उद्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे
चुपचाप घरीच बसायचे आहे. आज स्नोचे फोटो घेतलेच नेहमीप्रमाणे आणि कुडकुडत
का होईना आजचा दिवस छानच गेला. घरी आल्यावर आलं घालून चहा व गरम गरम पोहे
केले.
Sunday, December 22, 2024
२१ डिसेंबर २०२४
आईने
आम्हा दोघी बहिणींना घेतलेल्या कल्पना साड्याही आठवल्या आणि एकंदरीतच
आईच्या, बहिणीच्या, सासुबाईंच्या साड्या, रंजनाच्या व माझ्या लग्नातल्या
साड्याही आठवल्या. पूर्वीच्या आठवलेल्या साड्यांचे रंग आणि रंगसंगती
असलेल्या साड्या घ्यायच्या आणि नेसायच्याही असे ठरवले आहे.
rohinigore
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment