ती अजूनही करत आहोत.
इथे साऊथ इंडियन उपहारगृहे खूप आहेत आणि आम्हाला हे जेवण खूप आवडते त्यामुळे आज बाहेर गेलो होतो जेवायला आणि चक्क तिथे आम्हाला अप्पम खायला मिळाले. उपहारगृह उघडण्या आधीच बरीच गर्दी जमा झालेली दिसत होती. न्युजर्सीतल्या सर्व शहरांमध्ये इतकी काही लोकसंख्या आहे की ग्रोसरी स्टोअर्स मधले पाणी अथवा दूध आणायचे झाल्यास अगदी सकाळी सकाळी गेले तरच ते मिळते असे अनुभावयला मिळाले. त्यामुळे सकाळी उठून आवरून वालमार्ट मध्ये गेलो. मूव्हींग मध्ये सामान बांधून आणलेली खोकी फेकली.
अजूनही बरीच फेकायची बाकी आहेत. असे वाटते सेटल झालो पण तरिही दुसऱ्या शहरी गेल्यावर सर्व सुरळीत व्हायला वेळ हा लागतोच.
सार्वजनिक ग्रंथालयाचे सदस्यत्व घेतले. तिथे मला काही हिंदी पुस्तके दिसली. त्यातले एक हिंदी पुस्तक घेतले.छोट्या छोट्या कथा आहेत.
पहली कथा तर छानच आहे. लग्न झालेली मुलगी माहेरी आलेली आहे आणि तिला घरामधला बदल झालेला
कळतो आहे. तिच्या जुन्या
आठवणी तिला आठवत आहे. तिची आई खूप थकलेली आहे. तिच्या आईला मुलीबद्दल
काळजी वाटते. तिचा भाऊ आणि वहिनी त्यांच्या संसारात दंग आहेत.
तिला कुठेतरी असे वाटत आहे की घरामध्ये आता आपल्या आईचे म्हणणे चालत नाही. २ दिवस राहून ती निघते. तिला निघताना आई, वहिनी काही ना काही देतात. निघायच्या वाटेवर तिची एक जुनी स्मृती जागी होते. असे काहीसे या कथेत आहे. मला
मराठी बरोबर हिंदी वाचायलाही आवडते. संध्याकाळी दडपे पोहे खायला केले.
आणि अर्थातच जेवायच्या आधी हे रोजनिशीचे पान लिहीत आहे. आजचा दिवस वेगळाच
गेला. मुख्य म्हणजे थंडी अजिबात नव्हती त्यामुळे बाहेर फिरायला मस्त वाटत होते.
No comments:
Post a Comment