खरेच असे काहीतरी वेगळे केले की जामच उत्साह येतो. मिनरल्स संग्रहालयात एक
बाई कानातले बनवत होती. मला लगेचच कानातले खरेदी करण्याचा मोह झाला.
तिने काही कानातले बनवलेही होते.ती म्हणाली की तुला पाहिजे ते रंग तू निवड
मी तुला तुझ्यासमोर तुझ्यासाठी कानातले बनवून देते. मी माझा आवडता जांभळा
आणि केशरी रंग निवडला. खूप वेगळ्या आकाराचे कानातले बनवून घेतले. मला तर
खूपच आवडून गेले आहेत. डाऊनटाऊनला फूटपाथवरून फिरताना खूप छान वाटते.
जेव्हा आम्ही हँडरसन मध्ये नव्याने रहायला आलो तेव्हा सुरवातीला इथल्या
फूटपाथवर चालायचो. आज जवळजवळ अडीच वर्षानंतर डाऊनटाउनला फिरायला गेलो. मला
नोकरी लागल्यापासून शनिवार रविवार मी कामावर आणि विनायक घरी असेच चित्र
असते. सध्या मला शनिवार ऑफ मिळायला लागला आहे. तसे काही वेळेला पूर्वी पण
मिळाला आहे पण आता ठरवले आहे की शनिवार ऑफ मिळाला की काहीतरी वेगळे करायचे
म्हणजे उत्साह येतो. आत्ता रात्री उसळ केली आणि डबा भरला. उद्या कामावर
जाण्यासाठी उत्साह आलेला आहे. आणि नवीन कानातले पण घालून जाणार आहे. फोटो
इथे अपलोड करत आहे. :) Rohini Gore
Saturday, August 18, 2018
१८ ऑगस्ट २०१८
काल आणि आज सुट्टी असल्याने घरातली कामे झाली आणि आरामही झाला. आज सकाळी उठले तेव्हा हवा खूप छान होती. फॉल सीझन सुरू झाल्यासारखेच वाटत होते. गरम नाही. आर्द्रता नाही आणि पाऊसही नाही. साफसफाईची आणि इतर काही कामे उरकली आणि आज दोघांनाही कामावर जायचे नसल्याने काहीतरी वेगळे करायचे असे ठरवले. मागच्या शनिवार
सारखा काहीतरी वेगळा असा स्वयंपाक आज करायचा नाही तर बाहेरच जेवायला जायचे
असे ठरवून बाहेर पडलो. कितीतरी महिन्यांनी बाहेर जेवायला गेलो. त्यानंतर
डाऊनटाऊनला फिरलो. झाडांवरची पाने थोडा
थोडा रंग बदलायला लागलेली दिसली त्यामुळे प्रसन्न वाटले आणि डाऊनटाऊनला
असलेले मिनरल्सचे संग्रहालय पाहिले. तिथे किती फोटो घेऊन न किती नाही असे
झाले मला. खूपच सुंदर संग्रहालय आहे. आज कानातले आणि गळ्यातले सोन्याचे
घातले. मागील भारतभेटीमध्ये नेकलेस आणि कानातले असा सेट खरेदी केला होता.
इथे कोणतेही सणसमारंभ होत नाहीत त्यामुळे सोन्याचे दागिने घालायची वेळच
येत नाही. नुसते पडून राहण्यापेक्षा आज घालावे असा विचार आला आणि
विल्मिंग्टनला घेतलेला उडत्या बाह्यांचा पिवळा टॉपही घातला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
वाऊ! उसळ... मटकीची असेल, आणि थोडं फरसाण मिळालं तर मिसळही होईल!! उद्या मज्या आहे... सहकाऱ्यांनाही खिलवा. नक्की आवडेल. असेच लिहित्या राहा... धन्यवाद. -मिलींद
ha ha ! hirvya mugachi usal hoti,, pratisadabaddal anek dhanyawaad !!
Post a Comment