मी काढलेल्या प्रत्येक फोटोमागे काही ना काही आठवणी दडलेल्या आहेत. आज काही
फोटोंची फेसबुकने आठवण करून दिली. त्यादिवशी समुद्रावर गेलो होतो.
समुद्रावर हवेत नेहमी आर्द्रता असते पण त्यादिवशी अजिबात नव्हती त्यामुळे
समुद्रावर चालणे झाले. चालणे झाले म्हणजे काय की चालतच बसावे, घरी जाऊच
नये असे वाटत होते. कितीतरी वेळ चालत होतो आम्ही दोघे समुद्रावर. चालता
चालता हळूवार पणे येणाऱ्या वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत होतो. आता बास !
मागे वळून पाहिले तर खूपच दूरवर आलो होतो. परतीच्या वाटेला लागलो.
त्यादिवशी आभाळात ढगांच्या समवेत गुलाबी रंग दिसला. आणि त्या गुलाबी रंगाचे
प्रतिबिंब पाण्यात पडले होते. गुलाबी रंगावरून आणि पाण्यात पडलेल्या
त्याच्या प्रतिबिंबावरून नजर हालत नव्हती.
Monday, July 16, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment