मला काहीच करायचं नाहीये
नुसतं कट्ट्यावर बसून राहायचयं
शांतपणे नि स्तब्ध
आठवणींच्या जंजाळात अडकायचं नाही मला
उदासवाणे निः शब्द
माणसांमध्ये असूनही जगणे काय ते !
मरगळलेले
नाशिवंत
आता तुझ्यात साठवून घे रे मला निसर्गा
उत्स्फूर्त नि शोभिवंत
कारण
कायमस्वरूपी टिकणारं ते एक सत्य !
आज मला अचानक काही ओळी उस्त्फूर्तपणे सुचल्या,, त्या लिहिल्या.
10-13-2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
hmmm..antim satya tech ahe.. afat nisargat arthatach paramatmyat vilinata.. masta spurale ahe..baryach divasani blog var chakkar takatey aaj..
- Pallavi
Thanks Pallavi !
Post a Comment