आजचा रविवारचा कार्यक्रम ठरवला होता तो म्हणजे ऍशविल मध्ये असलेल्या भारतीय उपहारगृहात जेवायचे आणि संध्याकाळी आमच्या शहरातल्या ऍपल फेस्टीवला जायचे. आज हवा छानच होती. भारतीय जेवणही छान होते. ऍपल फेस्टीवलला मजा आली. तिथे मी २ कानातले घेतले. मला खूपच आवडून गेले. तिथले म्युझिक, निरनिराळे लावलेले स्टॉल बघताना खूप मजा वाटत होती. तिथेच माउंटन फेस्टीवलचाही स्टॉल होता तिथे तिकिटे घेतली. पुढच्या १५ दिवसात हा फेस्टीवल आहे. मागच्या वर्षीही आम्ही ऍपल फेस्टीवलला गेलो होतो. इथे आज एक वेगळाच स्टॉल बघायला मिळाला तो म्हणजे काचेचे निरनिराळे काहीतरी बनवून टेबलावर मांडून ठेवले होते. त्यात एक बदक तर खूपच सुंदर होते. काही फोटोज घेतले.
उद्या कामाला जाउच नये असे वाटत आहे पण जायला तर हवेच.
एकूण काल रात्रीपासून जो रिलॅक्स मूड होता तो संपला आता. विनायक मात्र अजुनही रिलॅक्स मूड मध्ये आहे. लेबर डे विकेंडची त्याला सुट्टी आहे ना !
कालपासून सुरू झालेला ऍपल फेस्टीवल उद्या संपेल पण गेल्या आठवड्यात आमच्या कडे सुरू झालेला मटकी
फेस्टीवल मात्र पुढच्या आठवड्यात संपेल. मागच्या आठवड्यात आम्हाला गेल्या १५ वर्षात मटकी खायला मिळालेली नव्हती, ती आम्हाला इंडियन स्टोअरमध्ये मिळाली आणि ती सुद्धा मोड आलेली. मग मोह आवरेना. खूप घेतली. म्हणून आम्ही "मटकी फेस्टीवल" असे नाव दिले आहे.
2 comments:
सुंदर लिहिलं आहेस रोहिणीताई. खूप आवडलं
Hey Savita,, thanks a lot ! tula lihilele aavadale he vachun khup aanand jhala :)
Post a Comment