Wednesday, January 06, 2016

६ जानेवारी २०१६

आजचा दिवस उकडीचा होता ! जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा तो  पुढे कसा जाणार आहे ? वाईट की चांगला, की तापदा
यक? ते आपल्याला काहीच कळत नाही ना ! अर्थात कळत नाही तेच बरे आहे ना ! आजचा दिवस खरच खूप वेगळा होता. एक तर आज खूपच थंडी होती ! 

- १० तापमान होते. वि ने मला कामाच्या ठिकाणी सोडून तो पुढे त्याच्या ऑफीसला गेला. आज विकी २ तास आधी निघणार होती. तिची वेळ आहे सकाळी ६ ते २, तर ती आज १२ लाच निघणार होती. तिची आई दवाखान्यात आहे त्यामुळे ती अधून मधून लवकर घरी जाते.

आज जास्ती काम नव्हते. विकी सध्या शाकाहारी डाएट वर आहे त्यामुळे ती क्लब सँडविच बनवत होती तेव्हा तिला मी म्हणाले की मी पण क्लब सँडविच घरी बनवते पण तो शाकाहारी आहे. मी तिला रेसिपी प्रिंट करून देणार आहे असे मी तिला सांगितले. ती घरी गेली आणि मला पण नंतर विशेष काम नव्हते. १ ला संपले पण काम आणि मला इतरही काही कामे शिकायची असल्याने मी काउंटर वर मिल देण्यासाठी उभी राहिले. शेजारी ऍना उभी राहून गिऱ्हाईकांना ती सबवे टाईप सँडविच बनवून देत होती.  काही दिवसांपूर्वी माझे असेच काम लवकर संपल्याने मी सबवे टाईप सँडविच कसे बनवायचे हे थोडेफार शिकले. तसेच आज मिल देत होते. मी पुर्णपणे शाकाहारी असल्याने मिलमधले नॉनव्हेज आयटम मला अजूनही नीटसे कळाले नाहित. अर्थात सवयीने सगळे कळायला लागते.


 आमचा सेक्शनबरेच काही बनवतो  त्यामुळे आम्ही इतर कामात मदत करू शकत नाही.
अर्थात बाकीचेही आम्हाला मदत करू शकत नाही. काम लवकर संपले की दुसऱ्यांना मदत करायची असते त्यामुळे आमच्या सुपरवायझरने सगळे काम आले पाहिजे असे आम्हाला सांगितले आहे.


तर आज काम लवकर संपल्याने मी इतर कामे शिकत होते. लुलूचेही सुशी बारचे काम संपले होते. ती म्हणाली जेमीला विचार माझे काम संपले आहे तर मी आज लवकर घरी जाऊ का? पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि लगेचच विचारले. तशी जेमी पण लगेच जा असे म्हणाली.

लुलूचे काम एक तास आधी आणि माझे २ तास आधी संपले होते. आम्ही  पंचिंग केले आणि बाहेर पडलो. आज घरी आल्यावर खूप छान वाटत होते. ग्रोसरीचा खडखडाट झाल्याने आज आम्ही ग्रोसरी केली. कांदे बटाटेही घरात नसल्याने पटकन होणाऱ्या पोह्यांऐवजी आज बरेच महिन्यांनी गरम गरम उकड खायला केली त्यामुळे चव आली. आज अजून एक गंमत घडली. वि आज डबा न्यायचा विसरला त्यामुळे त्याने बाहेर सॅडविच घेतले. आता आज रात्री काल वाटून ठेवलेल्या डाळींची धिरडी आणि मु. डाळीची खिचडी असा बेत केला. उद्या सुट्टी असल्याने झोपताना खूप छान वाटत आहे !

4 comments:

Anonymous said...

khup diwasani blog la bhet dili. chan watle. tuze latest likhan pahun ase watle ki kuthun kuthe ali ahes.. kuthe ti puneri varanbhat tupachi satvikata ani kuthe he -10 madhle non veg sandwitches banavinyache parakya deshat parakya lokansobatche kam. pan changle ahe..anubhav wadhato ..

rohinivinayak said...

thanks for comment ! khare aahe,, anubhav khup gaThishi jama jhale aahet mazya, aani kuthe na kuthe tyacha upayog hotoch,, malahi chhan vatle comment vachun :)ha anubhav detail madhe lihinar aahe,, pan sadhya job mule jast pahilyasarkha vel nahi milat

manache sanwad said...

tumcha blog mee nehmich vachat aste .khup chan lihita .

rohinivinayak said...

Thank you so much !!! mala chhan vatle