सी सेव्हन अपार्टमेंटमध्ये मला बरेच काही सूचत गेले आणि ते मी करत गेले. जे काही केले ते कायम आठवणीत राहिले आणि जे आठवणीत राहिले ते ब्लॉगवर साठवत राहिले. रोजनिशी लिहिण्याची कल्पनाही अशीच सूचली. म्हणजे ज्या दिवशी काही वेगळे घडले तर दिनांक टाकून लिहायचे. एके दिवशी मी भारतावरून आणलेली डायरी चाळत होते. त्यामध्ये सुरवातीला मी दिनांक टाकून एक दोन वाक्ये लिहिली होती. त्यावरून मला रोजनिशीची कल्पना सूचली.
याच जागेत आमच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यादिवशी सकाळपासून झिमझिम
पाऊस पडत होता. सकाळी पाऊस पडायला सुरवात झाली ते अगदी रात्रीपर्यंत पडत
होता. त्या दिवशीच्या जेवणात मी आमच्या दोघांच्या आवडीचा बेत केला होता. शेवयाची खीर, पुरी, बटाट्याची भाजी आणि ओल्या नारळाची चटणी. दुपारच्या आणि रात्रीचे जेवण हेच होते. गरम गरम टम्म पुऱ्या विनायकला वाढल्या. आमच्या दोघांच्या ३ ते ४ फोटोंचे कोलाज केले आणि ते फेबुवर टाकले. स्टेटस मेसेज लिहिला की आजचा दिवस काय होता आणि कसा गेला. तिथे मला खूप शुभेच्छा आल्या. असा आमचा २५ सावा लग्नाचा वाढदिवस आगळावेगळा साजरा झाला आणि म्हणूनच तो जास्ती लक्षात राहिला आहे!
इथे फॉल सीझनमध्ये पानगळती होते. सर्वत्र रंगीबेरंगी पानांचा सडा पडलेला असतो. फॉल सीझनमधल्या एके दिवशी मी बाल्कनीत उभी होते तर खालच्या अंगणात बराच सडा पडला होता. लगेच खाली गेले, पाने गोळा केली आणि वर आले. ती पाने मी एका बशीत मांडली. नंतर त्याच पानांचे दसऱ्याला एक तोरण बनवले. सुई दोरा घरात होताच. सुईत दोरा ओवला आणि एकाड एक वेगवेगळ्या रंगाची पाने ओवली. तयार झालेले तोरण मी दारावर बांधले. त्या तोरणाकडे खूप कौतुकाने बघत होते मी !
जेव्हा मी ली रिंगरला वेदर शॉट साठी फोटो पाठवत असे, ते तो वेदर चॅनलला दाखवणार आहे का, यासाठी मी रोज उठल्यावर मेल चेक करायचे. पण काही वेळा उठायला उशीर झाला तर विनायक मला उठवायचा आणि सांगायचा "रोहिणी लवकर ऊठ, तु पाठवलेला फोटो दाखवत आहेत. असे म्हणल्यावर मी ताडकन उठायचे. आम्ही तिथून निघण्याच्या काही दिवस आधी फेबू स्टाईल फोटो दाखवत होते.
म्हणजे जेव्हा मी ली रिंगरच्या फेबू पेजवर तो फोटो पाठवला तर माझी फेबुची प्रोफाईल व नकाशा दाखवायचे की हा फोटो कुठे काढला आहे. नदीवरचा एक शेवटचा सूर्यास्ताचा फोटो पाठवला होता.
तो त्याने फेबू स्टाईल दाखवला. त्याने मला खूपच आनंद झाला होता.
तो त्याने फेबू स्टाईल दाखवला. त्याने मला खूपच आनंद झाला होता.
दर रविवारी नदीवर चालायला जाणे आणि सूर्यास्त बघणे आणि त्याचा फोटो काढून तो ली रिंगरला पाठवणे हा कार्यक्रमच ठरून गेला होता.
क्रमश : ....
2 comments:
खूप छान आठवणी आहेत. अजून ऐकायला आवडेल :)
Thanks Prachi !! ajun 2 te 3 bhag hotil,,
Post a Comment