Sunday, August 23, 2015
CFCC - North Campus - Wilmington - NC (1)
Hendersonville , एक छोटे टुमदार शहर, आजूबाजूला हिरवेगार डोंगर, डोंगरावरची झाडी आभाळाला टेकलेली, त्यामुळे तयार झालेली निसर्गाची रंगसंगती अप्रतीम! पण तरीही .... Wilmington शहरातले मी बरेच काही मिस करत आहे. सी. एफ . सीसी, नॉर्थ कॅप्सस, प्रो.Hugh currin , Susan Clarke , friends Jennifer, Katrina, Erin ली रिंगरला पण मी खूपच मिस करत आहे. वेदर संदर्भात मी ली रिंगर्ला फोटो पाठवायचे व लगेचच तो वेदर न्युज चॅनलला " वेदर शॉट ऑफ द डे" मध्ये दाखवायचा. साधारण मार्च २०१३ ते जून २०१५ पर्यंत त्याने मी पाठवलेले तीस फोटो दाखवले. आता नवीन शहरी केबल नेटवर्क बदलले आहे त्यामुळे फोटो पाठवणे नाही की ते वेदरशॉट मध्ये येणे नाही.
Wilmingtonn मधले कॉलेज लाईफ मी कधी मिस करेन असे तर कधीही वाटले नव्हते !! २०१४ मार्चच्या सुमारास गुगल शोध घेतला, तो अश्यासाठी की काहीतरी ऑनलाईन शिकता येईल का? कॅंपुटर कोर्सेस करता येतील का हे शोधत होते. मी पुर्वी म्हणजे १९९९ साली ADCP CDAC चा कोर्स केला आहे त्यामुळे एकदम काहीतरी नवीन शिकायचे असे नव्हते. गुगल शोधामुळे मला बरेच काही ऑन्लाईन कोर्सेस सापडले पण त्याच्या फिया प्रत्येकी ७५ ते ८० डॉलर्स होत्या.
तितक्यातच वेदर न्युज चॅनलला हेच कोर्सेस ग्रंथालयाचे सदस्य असल्यास फूकट होते. मला खूपच आनंद झाला! ग्रंथालयाचे सदस्य कार्ड वापरून ऑनलाईन कोर्स जॉईन केला. त्यात एक कोर्स Explore career as a paralegal असा होता. सुरवातीला एक सोपा कोर्स घेतला. इंग्रजी ग्रामर की जे आपण सर्व शाळा कॉलेजातून शिकलो आहोत. दुसरा कोर्स ऑनलाईन पुस्तके बनवण्याचा होता पण तो मी अर्धवट सोडून दिला. सुरवातीला मी जाम उत्साही होते. पण नंतर विचार केला की ब्लॉगवर लिहिले आहे त्याचे परत पुस्तक बनवण्यात काही अर्थ नाही. Explore career as a paralegal हा कोर्स मला खूपच आवडून गेला. आणि त्यातून परत एकदा मी गुगल शोध घेतला की हाच कोर्स कॉलेज मधून करता येईल का? कशी गंमत आहे बघा, वेदर चॅनल वर परत आमच्या शहरामधल्या कम्युनिटी कॉलेजची जाहिरात दाखवली. फॉल सेमेस्टर ला रजिस्टर करा ! Wilmington मधल्या कम्युनिटी कॉलेजचे मुख्य कँपस आहे डाऊन टाऊनला आणि मला येण्याजाण्यासाठी बसही होती. अगदी कॉलेजच्या समोर बस स्टॉप होता आणि घराच्या अगदी जवळ बस स्टॉप नसला तरी खूप लांबही नव्हता.
शिकण्याच्या बाबतीत माझे नशीब खूप जोरदार होते. पॅरालीगलचा हा कोर्स नॉर्थ कँंपसला शिकवत होते आणि हे ते आमच्या घराच्या ५ मिनिटांच्या कार ड्राईव्ह वर होते! मागच्या वर्षीच्या फॉल सेमेस्टरला मि कॉलेजला जायला सुरवात केली. फॉल व स्प्रिंग सेमेस्टर खूपच छान गेल्या. समर सेमेस्टरला डिप्लोमाचे कोर्सेस नव्हते. काही होते ते ऑनलाईन होते पण मला ऑनलाईन म्हणजे परत घरातूनच बसून करा, कॉलेज निमित्ताने बाहेर जाणे येणे होणार नाही म्हणून घेतले नाहीत. प्रत्यक्षात कॉलेज ला जाऊन लेक्चरला बसण्यात जी मजा आहे ती ऑनलाईन नाही. जून जुलै कडे आमच्या नशिबाची चक्रे जोराने फिरली आणि विनायकच्या नोकरीबदलामुळे आम्ही वेस्टर्न नॉर्थ कॅरोलायना मध्ये आलो.
गेल्या आठवड्यापासून माझी परत फॉल सेमेस्टर सुरू झाली पण, कॉलेजमध्ये न जाता ऑनलाईन ! नवीन शहर हे नॉर्थ कॅरोलायना राज्यामध्येच असल्याने मला उरलेला डिप्लोमा ऑनलाईन करता येईल. पण तरीही कॉलेजमधली मजा काही वेगळीच आहे. आणि तीच मी खूप मिस करत आहे. आज या सर्व गोष्टींची प्रखरतेने आठवण झाली आणि सर्व काही कागदावर आणि नंतर ब्लॉगवर उतरवल्याशिवाय काही खरे नाही म्हणून भराभर उतरवले.
क्रमश .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment