लग्नानंतरचे पाच सहा महिने पटकन निघून जातात. मानसीचा संपूर्ण वेळ घराची
साफसफाई, नवेनवे पदार्थ करण्यात जातो. शिवाय ती कार घेऊन शॉपिंगसाठी आणि
जीममध्ये पण व्यायामाकरता जात असते. बरेच वेळा एकटी असताना ती तिच्या मनात
समुद्रावर जाण्याचे बेत आखत असते. केव्हा मिळणार मला समुद्र पहायला? सहा
महिने होत आले, अजून अमितला वेळ होत नाही ? त्याचा तिला रागच येतो.
अधुनमधून अमितजवळ लाडीगोडी लावून ती विषय काढायची, तेव्हा अमित तिला
म्हणायचा "मी सांगितले ना, तुला नक्की नेईन म्हणून ! मी प्रॉमिस कधीच विसरत नाही.
आणि
एक दिवस अचानक समुद्रावर जाण्याचा योग जुळून येतो. जुळून येतो म्हणजेच
कामानिमित्तानेच ! तिकडे एके ठिकाणी एका प्रोजेक्टवर त्याला काम येते आणि
लगेचच तो त्या कामाला होकार कळवतो. विचार करतो एकीकडे काम आणि एकीकडे
समुद्रावरची सफर असे दोन्ही होऊन जाईल. एक दिवशी तो ऑफीसमधून घरी येतो आणि
मानसीला सांगतो की आपण येत्या शनिवारी समुद्रावर जात आहोत. मी हॉटेल पण बुक
केलेले आहे. आणि ते सुद्धा समुद्रकिनारीच ! हे ऐकल्यावर मानसीला खूप आनंद
होतो आणि त्या आनंदात ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते तुला माहीत आहे
मला किती आनंद झाला आहे ते ! अमित म्हण्तो "हो ते तुझ्या कृतीवरून दिसते
आहे ! मानसी म्हणते "इस खुशी के मौके पर कुछ हो जाए? चल ना, आपण डिनरला
बाहेरच जाऊ आज. आईने कुरियने मला काही नवीन फॅशनचे पंजाबी सूट पाठवले
आहेत, त्यानिमित्ताने मला त्यातला एक घालायला मिळेल. असे म्हणून ती पटकन
स्वयंपाक घरात अमितसाठी आलं घालून चहा करायला जाते. तिच्या आल्याच्या
चहाची सवय अमितला इतकी लागते की तो आपण कॉफी पीत होतो हे तो संपूर्णपणे विसरून जातो.
शनिवारी सकाळी लवकर उठून ते दोघे तयार होतात.
कारमध्ये बसताना बाकीच्या इतरतयारीबरोबर ते दोघे आपापल्या आवडीच्या सीडीज
घेतात. हॉटेलवर कार पार्क करेपर्यंतही मानसीला धीर नसतो. खाली उतरल्यावर
रूममध्ये जाण्या आधीच मानसी समुद्रावर धावते. अथांग पसरलेला समुद्र डोळे
भरभरून पाहते. कितीतरी शंख शिपले ती वेड्यासारखे गोळा करते. तोपर्यंत अमित
रूमचा ताबा घेतो आणि खाली येतो तेव्हा मानसी लॉबीमध्ये बसलेली त्याला
दिसते. तिला म्हणतो "चल जरा वर जाऊन विश्रांती घेऊ. नंतर जेवायला बाहेर
पडू. वर रूममध्ये जाऊन ते दोघे थोडी विश्रांती घेतात. मानसीला थोडी डुलकी
लागते. अमित थोडावेळ आडवा होतो आणि उठतो आणि लॅपटॉप घेऊन ऑफीसचे काम करतो.
मानसी उठून पाहते तर अमित कामाला लागलेला. हे काय? इथेही कामच? पण तीही
समजून घेते. कामानिमीत्ताने का होईना आज आपण समुद्रावर आहोत. त्याचे काम
संपल्यावर ती दोघे बाहेर जेवून येतात. रूममध्ये आल्यावर मानसी म्हणते. तु
दमला असशील तर तू आराम कर. मी जरा समुद्रावर जाऊन येते. रात्रीचा समुद्र
कसा दिसतो ते बघते. अमित म्ह्णतो " तू म्हणजे ना, कठीण आहेस. रात्रीला काय
बघायचे समुद्राला? किनाऱ्यावर कोणीही नसेल आता. पण मानसी कुठली ऐकायला. "चल
मी जाऊन येते जरा किनारी. येतेच लगेच. पण उशीर झाला तर काळजी नको करूस.
मानसी
किनाऱ्यावर येते. थंडीचे दिवस सरत आलेले असतात आणि त्यामुळेच समुद्रकिनारी
खूप तुरळक माणसे असतात. समुद्राच्या काठावर मानसी उभी राहते आणि समोरच्या
समुद्राला बघते. चांदण्यात समुद्राचे रूप थोडे वेगळे दिसते. लाटा काळसर
दिसतात. चंद्राचा प्रकाश असला तरीही तो इतका नस्तो याचे कारण आकाश ढगाळलेले
असते. लांबवर एखाद दुसरी बाई किंवा एखाद दुसरा माणूस तिला चालताना दिसतो.
किनारी उभे राहून ती इकडे तिकडे बघत असते. सुखद गार वारा
असतो. वाराही
थोडासा भुरळ पाडणारा, सुखावणारा. त्यादिवशीचे तापमानही थोडे गरमच असते
त्यामुळे मानसीला तिथे उभे रहायला छान वाटते. काय करावे? चालावे का थोडे ?
असे म्हणून ती चालायला लागते. डावीकडे असलेल्या लाटा बघत बघत ती चालत असते
आणि एके ठिकाणी येऊन थांबते. सहज मागे वळून बघते. अरे आपण किती दूरवर चालत
आलो आहोत? मागे बघितल्यावर पूर्णपणे काळोख पण तरीही अगदी थोडे मिणमिणते
दिवे असतात. काही ठिकाणी हॉटेलचे बाहेरच्या आवारातले मिणमिणते दिवे चालू
असतात. मानसी भरभर चालायला लागते. अरेच्या आपले हॉटेल कुठे गेले. सगळीकडे
तिला एकसारखेच दिसायला लागते. आता मात्र मानसी थोडी घाबरते. ती थोडी मागे
चालत जाते तर थोडी परत पुढे चालते. आपले हॉटेल नक्की कुठे आहे? आपण फोन पण
घेतला नाही बरोबर ! अजून खूप मागे चालायचे की अजून बरेच पुढे आहे?
भांबावलेल्या अवस्थेत तिला काहीही सूचत नाही. मग एके ठिकाणी येऊन बहुतेक इथूनच आपण बाहेर पडलो , आत जाऊन बघू. तर ते हॉटेलच असते जिथे त्यांची रूम बुक केलेली असते. तिच्या हातापायातली ताकद पार निघून जाते.
भरभर
चालून दम लागतो म्हणून हॉटेलच्या बाहेरच्या आवारात थोडी
बाकडी ठेवलेली असतात तिथे ती बसते. हॉटेलच्या मागच्या बाजून समुद्राचे
प्रवेशाचे दार असते. हळूहळू करत ती जिना चढते आणि रूम मध्ये येते. अमित
म्हणतो काय गं झाला का समुद्र बघून. एक ५ मिनिटामध्ये माझे काम संपेल. मग
आपण एक मस्त मुव्ही बघूया. हो चालेल. मानसी पण त्याच्याकडे बघून उत्तर
देते. थोड्यावेळाने एक इंग्लिश मुव्ही बघायला लागतात दोघेजण, पण मानसीचे
त्याकडे लक्ष नसते हे अमितच्या लक्षात येते. मूव्ही पाहिल्यावर दोघेजण झोपतात. मध्यरात्र संपत आल्यावर मानसी खूप घाबरून अमितला मिठी मारते. अमित म्हणतो काय गं झाले? अशी घाबरलेली का आहेस? काही होत आहे का तूला? मानसी नकाराची मान हलवते. अमित म्हणतो काल खूप दगदग झाली तुझी. मी आहे तुझ्याबरोबर, घाबरू नकोस. उद्या आपण इथे एक चांगली बाग आहे तिथे जाऊ. तिथे गेल्यावर तुला बरे वाटेल. तिथून पुढे अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत, ती बघू आणि उशीरानेच जेवून हॉटेल ला परतू? ठीक आहे? अमितने दुसऱ्या दिवशीचा प्लॅन सांगितल्यावरतिला जरा हुशारी येते.
ती झोपण्याचा प्रयत्न तर करते पण बराच वेळ तिला झोप लागत नाही. तिचे
विचारचक्र चालू राहते. आपल्याला समुद्रावर फिरायला गेलो तर इतके छान का वाटत होते? सुखद वारा आणि तोही भूल पाडणारा का होता? कुणीतरी बोलावल्यासारखे आपण इतका वेळ समुद्रावर
भारावून गेल्याप्रमाणे
का चालत होतो? उद्या तर अमितने पूर्णवेळ बाहेर जायचा प्लॅन बनवलाय आणि
परवा तर आपण निघणार ! मग समुद्राला अजूनही खूप डोळे भरून कधी पाहणार आपण?
अमितला समुद्र आवडत नाही का? की फक्त तो माझ्याचसाठी इथे आला आहे? मला
अजूनही काही दिवस इथेच राहावे असे का वाटत
हे? मला समुद्राची सर्व रूपे पाहायची आहेत. काल रात्री पण समुद्र किती शांत होता. लाटा कशा हळूहळू पडत होत्या.
एक ना अनेक प्रश्न. विचार करता करता तिला झोप लागते. थोडी उशीरानेच तिला
जाग येते.
क्रमशः .....
Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
छान वाटतेय कथा. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक आहे… :)
Thank you Dhanu !! next part madhe mi kathecha end karin bahutek :)katha lihinyacha dusra prayatna aahe ha,, sampurNa kalpanik aahe, ajun ek katha ardhavat lihili ahe ti pan purNa kalpanik aahe,, thanks a lot !
Mast.. :)
Thank you !
hi savita,,, ek don photo ghetlet te takte,, waterfall chi ek video clip ghetli aahe,, ti youtube var aahe,, thanks everyone !
जरा प्लीज लवकरात लवकर पुढचा भाग वाचायला उत्सुकता लागली आहे
Thanks so much Shyam Thorat,, tumhala utsukata lagli aahe pudhe kaay hote yachi, he vachun khupach chhan vatle ! lavkarat lavkar lihinyacha prayatna karin,, thanks all !
आगे बढो रोहिणी !
Thank you,,, bhag 3 lihila aahe !! kalach, thanks for your comment
Post a Comment