हवा
स्वच्छ आणि सुंदर होती. शिवाय हवेत अजिबातच आर्द्रता नव्हती आणि
म्हणूनच लाँग विकेंडचा प्लॅन बनवला. खरे तर आम्ही हँगिग रॉकला जाणार होतो.
तिथे २ वेळा जाऊन आलो होतो पण आम्हाला हा रॉक इतका काही आवडला आहे की
मेमोरिअल डेला वर्षातून एकदा हॅगिंग रॉकला जायचेच असे आम्ही ठरवून टाकले
होते. मीच म्हणाले तिथे जायला नको म्हणजे मला पण तो रॉक आवडतोच पण तिथले
सर्व फोटो घेऊन झाले आहेत. आणि ट्रीप ला जायचे आणि फोटो काढायचे नाहीत!
चिमनी रॉकला जायचे ठरवत होतो. अजून दुसरी ठिकाणेही बघत होतो. तसे तर नॉर्थ
कॅरोलायना सर्व पालथा घातला आहे. अजून एक दोन ठिकाणे राहिली आहेत पण ती २
तासाच्या अंतरात आहेत , ती नंतरही करता येतील म्हणून चिमनी रॉक ठरवला. तर
सर्व हॉटेल्स पटापट बुक होत होती. शेवटी एक हॉटेल मिळाले आणि मी तयारीला
लागले. नेहमीप्रमाणेच एक वेळचे जेवण आम्ही बरोबर घेतोच. कोणत्या रस्त्याने
जायचे हेही ठरवत होतो. ७४, ४० की ७४ वरून पुढे २० आणि २६
रस्त्याचा फाटा घ्यायचा? शेवटी २०-२६ च्या फाट्यावरून जायचे ठरले. इथे
विश्रांती थांबे आहेत आणि रस्ते सरळ सरळ आहेत. हल्ली जिपीएस बरोबर घेतोच
कारण की हायवे सोडला की रस्त्यांची नावे पटकन दिसत नाही आणि चुकायला होतेच
आणि मग भिरभिर फिरत राहून शोधणे मला अजिबात पसंत नाही. शिवाय मला जिपीएस
अजून एका कारणासाठीही आवडते. त्यातली बाई ओरडून तुम्हाला रस्ता सांगत असते
आणि तो दिसतही असतो. कुणीतरी आपल्याबरोबर आहे असे वाटते.
चिमनी रॉकच्या इथे येऊन थडकलो. तिकिटे घेतली आणि वळणावळणाच्या रस्त्याने थेट चिमनी रॉकच्या पायथ्याशी आलो. आता समोरच रॉक दिसतोय म्हणल्यावर चला इथेच आधी जाऊ, बाकीचे नंतर पाहू असे ठरवले. शनिवारी सकाळी ९ वाजता निघालो ते चिमनी रॉक गाठायला आम्हाला ४ वाजले. आधी गुगलींग करून माहीती वाचली होती. ५०० पायऱ्या चढायच्या आहेत याचीही मनाची तयारी केली होती. चिमनी रॉकवर जाण्यासाठी लाकडी जिने बांधले आहेत. चढायला सुरवात केली आणि धापा टाकत टाकत वर वर जात होतो. तिथे चढत असलेल्या सर्वांनाच खूप धापा लागत होत्या. दम खायला मध्ये सगळेच जण थांबत होते. कधी येणार ? असे म्हणून वर पाहिले तर आता अगदी थोडेच आहे. तो काय दिसतोय की वर ! अमेरिकेचा झेंडाही फडफडतोय. आता अगदी नकोसे होऊन गेले होते. पाठ पाय आणि कंबर दुखायला लागली होती. मध्ये मध्ये थांबून कोक ढोसत होतो. आता फक्त एकच जिना बाकी होता. तिथे एक उपहारगृह दिसले. तिथे सगळी मंडळी आईस्क्रीम खाण्यात दंग होती. आम्ही पण आईस्क्रीम खाल्ले . ते खाल्यावर अगदी जीव आल्यासारखे वाटले ! वर जाऊन तिथल्या खडकांवर बसलो. फोटोसेशन झाले. वि म्हणला की अजून एक वर पॉईंट राहिला आहे तो करून जाऊ. मी म्हणाले नको आता. बास झाले. वर बघितले तर तो खूपच वर वाटत होता. पण इतके आल्यावर थोडक्याकरता तिथे जायचे नाही हे पण पटत नव्हते.
आईस्क्रीम खाल्ल्याने ताजेतवाने वाटत होते. आणि आम्ही अजून वर चढायला
सुरवात केली. हा चढ खूप कठीण होता. उंच उंच जात होता. अर्थात चढताना
कोणत्याही प्रकारची भीती वाटत नव्हती. मी वि ला म्हणाले आपण उगीचच इथे आलो,
वर कुणीच दिसत नाहीये. आपण जाऊ परत , पण तितक्यात वरून काही लोकांचे
बोलण्याचे आवाज ऐकू आले आणि मला बरे वाटले. नंतर अजून एक फॅमिली
येताना दिसली. वरून एक जोडपे खाली उतरत होते, त्यांनी आम्हाला सांगितले आता
अगदी थोडे राहिले आहे. वर जा. तिथून खूप छान नजारा दिसतो. आम्हाला
दोघांनाही वर चढून चढून खूपच दमायला झाले होते. माझी तर खूपच चिडचिड होत
होती. शेवटी एकदाचे पोहोचलो. इथून खोलवर पसरलेली दरी आणि त्यामध्ये उगवलेली
हिरवी झाडी पाहून सुखावलो. चढताना अजिबात उन लागले नाही. वर गेल्यावर मात्र
खुप उन होते. स्पष्ट सावल्या पडत होत्या. तिथल्या गाईडने आम्हाला सांगितले
की मी ५ मिनिटांत पार्क बंद करतोय. फोटो काढायचे तर काढून घ्या. नंतर तोच
आम्हाला म्हणाला की मी एक तुमच्या दोघांचा फोटो काढतो. या पॉईंटला खूपच कमी
माणसे येत होती. बरिच माणसे चिमनी रॉकच्या खडकावर हवा खात बसली होती. इथून
बराच खाली रॉक आणि त्या खालची हिरवीगार झाडे दिसत होती. शिवाय लेक ल्युअर पण दसत होता.
थोड्याच वेळात आम्ही खाली उतरायला सुरवात केली. उतरताना मात्र क्वचित एक दोन वेळाच दम खायला थांबलो. खाली उतरलो. कारमध्ये बसलो आणि थेट हॉटेल गाठले. प्रचंद भूक लागली होती. त्यात भर म्हणजे खूपच दमायला झाले होते. आधीचा ६ तासांचा प्रवास आणि नंतरचे ३ तास चढून आणि उतरून खूपच दमछाक झाली होती. हॉटेल वर बॅगा टाकल्या. तिथली कॉफी प्यायली आणि मेक्सिकन उपहारगृहाचा पत्त्ता जीपिएस वर टाकला. पण रस्ता बंद असल्याने तिथे जाता आले नाही म्हणूउन पीझ्झा खायला गेलो. परत हॉटेल वर आल्यावर मी म्हणाले की उद्या सकाळी घरी परतू. विनू पण म्हणाला तेच करू. मलाही खूप दमायला झाले आहे.
आम्ही साधारण ५०० ते ६०० फूट वर चढून गेलो होतो आणि जिन्याचा हिशेब केला तर अंदाजाने ५० मजले वर चढून गेलो होतो. पायात प्रचंड गोळे आले होते. पाठ आणि मानही खूप दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तिथला एक प्रसिद्ध धबधबा पाहावा का असा विचार केला पण तिथे जाण्यासाठी मन आणि शरीर तयार होईना ! हा धबधबा पूर्व किनापट्टीवरचा सर्वात उंचावरचा आहे. तिथे एक दोन फिल्मचे शूटींगही झाले आहे. युट्युबवर पाहिले होते. मोह तर होत होता आणि इतके केले त्यात हेही करूच असे मनही सांगत होते पण शेवटी निर्णय परत घरी जाण्याचाच घेतला आणि तेच योग्य होते. या ट्रीपमध्ये चढण्याची आणि कारने प्रवास म्हणजे येऊन जाऊन १२ तास बसण्याची क्रिया झाली होती. चालणे अजिबात झाले नव्हते म्ह्णून मेमोरिअल डे, सुट्टीच्या दिवशी नदीवर चालायला गेलो तेव्हा कुठे थोडे पाय मोकळे होत आहेत.
चिमनी रॉकवरून आल्यापासून मनामध्ये हॅगिंग रॉकची व चिमनी रॉक यांची सारखी तुलना आम्ही करतोय आणि सतत हेच म्हणतोय की हॅगिॅग रॉक चिमनी रॉकपेक्षा कितीतरी पटीने छान आहे !! अगदी खरे आहे हे ! तिथेही खोलवर जाणारे धबधबे आहेत आणि हॅगिॅग रॉकही बराच उंचावर आहे. पण इथे पायऱ्य नाहीत. तीक्ष्ण चढ आणि आणि उतार आहेत पण इथे चालण्याची क्रिया होते त्यामुळे इतके दमायला होत नाही आणि दमलो तरी भरपूर उत्साह घेऊनच येतो ! अर्थात प्रत्येकाचे सौंदर्य आणि त्रास निरनिराळा असतोच.
चिमनी रॉकच्या इथे येऊन थडकलो. तिकिटे घेतली आणि वळणावळणाच्या रस्त्याने थेट चिमनी रॉकच्या पायथ्याशी आलो. आता समोरच रॉक दिसतोय म्हणल्यावर चला इथेच आधी जाऊ, बाकीचे नंतर पाहू असे ठरवले. शनिवारी सकाळी ९ वाजता निघालो ते चिमनी रॉक गाठायला आम्हाला ४ वाजले. आधी गुगलींग करून माहीती वाचली होती. ५०० पायऱ्या चढायच्या आहेत याचीही मनाची तयारी केली होती. चिमनी रॉकवर जाण्यासाठी लाकडी जिने बांधले आहेत. चढायला सुरवात केली आणि धापा टाकत टाकत वर वर जात होतो. तिथे चढत असलेल्या सर्वांनाच खूप धापा लागत होत्या. दम खायला मध्ये सगळेच जण थांबत होते. कधी येणार ? असे म्हणून वर पाहिले तर आता अगदी थोडेच आहे. तो काय दिसतोय की वर ! अमेरिकेचा झेंडाही फडफडतोय. आता अगदी नकोसे होऊन गेले होते. पाठ पाय आणि कंबर दुखायला लागली होती. मध्ये मध्ये थांबून कोक ढोसत होतो. आता फक्त एकच जिना बाकी होता. तिथे एक उपहारगृह दिसले. तिथे सगळी मंडळी आईस्क्रीम खाण्यात दंग होती. आम्ही पण आईस्क्रीम खाल्ले . ते खाल्यावर अगदी जीव आल्यासारखे वाटले ! वर जाऊन तिथल्या खडकांवर बसलो. फोटोसेशन झाले. वि म्हणला की अजून एक वर पॉईंट राहिला आहे तो करून जाऊ. मी म्हणाले नको आता. बास झाले. वर बघितले तर तो खूपच वर वाटत होता. पण इतके आल्यावर थोडक्याकरता तिथे जायचे नाही हे पण पटत नव्हते.
आईस्क्रीम खाल्ल्याने ताजेतवाने
थोड्याच वेळात आम्ही खाली उतरायला सुरवात केली. उतरताना मात्र क्वचित एक दोन वेळाच दम खायला थांबलो. खाली उतरलो. कारमध्ये बसलो आणि थेट हॉटेल गाठले. प्रचंद भूक लागली होती. त्यात भर म्हणजे खूपच दमायला झाले होते. आधीचा ६ तासांचा प्रवास आणि नंतरचे ३ तास चढून आणि उतरून खूपच दमछाक झाली होती. हॉटेल वर बॅगा टाकल्या. तिथली कॉफी प्यायली आणि मेक्सिकन उपहारगृहाचा पत्त्ता जीपिएस वर टाकला. पण रस्ता बंद असल्याने तिथे जाता आले नाही म्हणूउन पीझ्झा खायला गेलो. परत हॉटेल वर आल्यावर मी म्हणाले की उद्या सकाळी घरी परतू. विनू पण म्हणाला तेच करू. मलाही खूप दमायला झाले आहे.
आम्ही साधारण ५०० ते ६०० फूट वर चढून गेलो होतो आणि जिन्याचा हिशेब केला तर अंदाजाने ५० मजले वर चढून गेलो होतो. पायात प्रचंड गोळे आले होते. पाठ आणि मानही खूप दुखत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा तिथला एक प्रसिद्ध धबधबा पाहावा का असा विचार केला पण तिथे जाण्यासाठी मन आणि शरीर तयार होईना ! हा धबधबा पूर्व किनापट्टीवरचा सर्वात उंचावरचा आहे. तिथे एक दोन फिल्मचे शूटींगही झाले आहे. युट्युबवर पाहिले होते. मोह तर होत होता आणि इतके केले त्यात हेही करूच असे मनही सांगत होते पण शेवटी निर्णय परत घरी जाण्याचाच घेतला आणि तेच योग्य होते. या ट्रीपमध्ये चढण्याची आणि कारने प्रवास म्हणजे येऊन जाऊन १२ तास बसण्याची क्रिया झाली होती. चालणे अजिबात झाले नव्हते म्ह्णून मेमोरिअल डे, सुट्टीच्या दिवशी नदीवर चालायला गेलो तेव्हा कुठे थोडे पाय मोकळे होत आहेत.
चिमनी रॉकवरून आल्यापासून मनामध्ये हॅगिंग रॉकची व चिमनी रॉक यांची सारखी तुलना आम्ही करतोय आणि सतत हेच म्हणतोय की हॅगिॅग रॉक चिमनी रॉकपेक्षा कितीतरी पटीने छान आहे !! अगदी खरे आहे हे ! तिथेही खोलवर जाणारे धबधबे आहेत आणि हॅगिॅग रॉकही बराच उंचावर आहे. पण इथे पायऱ्य नाहीत. तीक्ष्ण चढ आणि आणि उतार आहेत पण इथे चालण्याची क्रिया होते त्यामुळे इतके दमायला होत नाही आणि दमलो तरी भरपूर उत्साह घेऊनच येतो ! अर्थात प्रत्येकाचे सौंदर्य आणि त्रास निरनिराळा असतोच.
एक वेगळा अनुभव म्हणून चिमनी रॉक आम्हाला
दोघांनाही आवडलाच यात वाद नाही, पण झुकते माप हँगिग रॉकलाच !!!
No comments:
Post a Comment