Saturday, March 14, 2015

१४ मार्च २०१५


आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला कालची थोडी भर घालायला हवी. काल सकाळी उठले तेव्हाच जरा डोके जड झाले होते. याचे कारण हवा. ढगाळी हवा, शिवाय अधून मधून उन्हे. स्प्रिंग सुरू झाला आहे याची चाहूल लागली होती. झाडांवर पांढरा शुभ्र बहर दिसत होता . काल वालमार्टला जायचे ठरवले. सकाळी स्वयंपाक असा काही नव्हताच. आदल्यादिवशीची भाजी उरली होती. दोनच पोळ्या होतील इतकी कणीक उरली होती म्हणून फक्त मुडाखी केली. जेवल्यानंतर वालमार्ट ला गेले. डोके दुखतच होते. पण मला हेअर कट करायलाच झाला होता. शिवाय विचार केला तिथेच जात आहोत तर ग्रोसरी पण करू. कट केला. आणि दुकानात इकडे तिकडे जरा फिरले. सपाता दिसल्या. वेगवेगळ्या रंगांच्या छान दिसत होत्या. शिवाय मला एक टॉप खूपच आवडून गेला. त्याचा रंग फिकट पिवळा आणि त्याला उडत्या बाह्या होत्या. सपाता आणि तो टॉप मनात भरून राहिले आहेत. घेतले नाहीत पण आता उद्या मुद्दामहून दुकानात जाऊन दोन्ही घेणार असे ठरवले आहे इतके मनात भरले आहेत. हेअर कट पण छान झाला. घरी आले आणि परत डोके खूप दुखायला लागले. हवा चांगली नव्हतीच. मग रात्री जेवायला बाहेर गेलो तेव्हा जरा परत मूड बदलला.





कालच ठरवल्याप्रमाणे आज वडा सांबार आणि गाजर हलवा केला. सकाळी उठल्या उठल्या सुरवात केली. सबंध दिवस आज तेच खाणे झाले. रात्री डिनरलाही तेच. असे मी पूर्वी दर पंधरा दिवसांनी करायचे. काहीतरी वेगळे. आजही ढगाळ हवा आणि बराच पाऊस. पण आज हवेत गारवा अजिबातच नाहीये. संध्याकाळी नेहमीच्या तळ्यावर चालायला गेलो आणि एकदम मूडच बदलून गेला. उत्साह आला. तळ्यावर फिरताना आज छान वाटत होते. तळ्यावर झाडी खूप आहेत. ढगाळ हवा होती आणि पाऊस पडून गेला होता. त्यामुळे सर्वत्र हिरवेगार झाले होते. चालायचा रस्ताही ओलाचिंब होता. वेलींवर पावसाचे थेंब अलगद बसले होते. या तळ्यावर अनेक प्रकारची झाडे व झुडुपे आहेत. शिवाय अनेक वेलीही आहेत. हिरव्या रंगाच्या कितीतरी छट इथे बघायला मिळतात. शिवय वाळलेली झाडे, वेली, गवताच्या वाळलेल्या काड्या वेगळ्या रंगाच्या, पिवळ्या, चाकलेटी झालेल्या असे बरेच काही वेगवेगळे सीझन प्रमाणे बघायला मिळते. तळ्याभोवती अशी एक गोल चक्कर, साधारण दीड मैलाची होते. थोडी उंच सखल चाल होते. त्यामुळे थोडा व्यायाम पण होतो. आजचे चालणे खूप सुख देऊन गेले. आज एक जमिनीवरच जे गवत उगवले होते त्याची पाने एखाद्या फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे उगवली होती. त्याचा फोटो घेतला आहे. निसर्ग किती सुंदर आहे ना ! तर एकूणच आजचा दिवस वेगळ्या पदार्थांमुळे व फिरण्यामुळे छान गेला. रंगीबेरंगी बघितलेल्या सपाता आणि लिंबू कलरचा उडत्या बाह्यांचा टॉप अजूनही डोळ्यांसमोरून हालत नाही . उद्या घेणारच !

8 comments:

मन कस्तुरी रे.. said...

Mast, Rohinitai. Please post the photo of that top! Seems very nice......

rohinivinayak said...

nakki takte photo !! thanks so much !!

rohinivinayak said...

आंबट गोड, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद ! टॉप आणि सपाता यांचाही फोटो टाकला आहे. या सपाता समुद्रकिनारी फिरण्यासाठी असतात. खूप छान रंग होते यामध्ये. त्यातले हे दोन घेतले. शिवाय शाई, लाल, पांढरा, काळा, पिस्ता असे अनेक रंग होते.



प्रिय वाचकहो, भयकथा पूर्ण करायची आहे, पण ती लिहिण्यासाठी मूड आणि वेळ मिळत नाहीये. १ वर्षापूर्वी ही कथा "अघटित" मी वहीत लिहायला सुरवात केली होती. त्याची आठवण मला मध्यंतरी झाली आणि म्हणून जितकी लिहिली आहे तितकी ब्लॉगवर लिहावी म्हणून लिहिली. पण या पुढचे वळण नक्की कसे घ्यायचे हे डोक्यात घोळत नसल्यामुळे कथा लिहिण्याचे लांबत आहे. पण ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करीन. अनेक धन्यवाद !

मन कस्तुरी रे.. said...

vaa! Mast Top. And, tumhi don chapalanche jod vikat ghetalet na? ki ek lal v ek pivali ghetali?
:-)

Anonymous said...

Waah! Rohini Taai, top khup sundar ahe! Maala pan khup avadla, ithlya Walmart madhye jaun baghte asach milto ka. :-)

- Priti

rohinivinayak said...

aambat goad,, hahaha, ek pivli n ek pink ghetli ;)

priti,, nakki bagh, asel, mala tar ha top khup aavadla :)

thanks for pratisad !

पंकज वळवी said...

mast!!

rohinivinayak said...

thank you!