आजचा दिवस वेगळा होता म्हणूनच रोजनिशीत लिहीत आहे. शुक्रवार-शनिवार-रविवार हे इतर कामाचे म्हणजेच साफसफाई, किराणा-भाजीपाला आणणे इत्यादी. २ दिवस थंडी २ दिवस उन्हाळा असे ऋतू आहेत सध्या. थंडी अजूनही स्थिरस्थावर झालेली नाहीये. शनि-रवि कडे एक दिवस बाहेर जेवायला जातो. केसर इंडियन थाळी या उपाहारगृहात गेलो की आम्ही तिथे पाणीपुरी घेतोच घेतो. ६ पुऱ्यांमध्ये मी ४ व विनु २ खातो. एक भाजी घेतो त्याबरोबर भात येतोच. मी एक चपाती घेते. तर आज आम्ही बासुंदी आणि कुल्फी पण घेतली. बासुंदी आता इतिहासजमा झाली आहे. खरे तर मला बासुंदी खूपच प्रिय आहे. आम्ही विल्मिंग्टन मध्ये रहात असताना अतिशय चवदार अशी बासुंदी केली होती ती शेवटची. माझ्या वाढदिवसाला केली होती. त्या बासुंदीची आज प्रखरतेने आठवण झाली. भारतात रहात असताना पाणीपुरी मी दर महिन्याला खायचे. आता एक पुरी तोंडात घातल्यावर अगदी हळूहळू खाते ठसका लागण्याच्या भितीने.
Saturday, November 09, 2024
९ नोव्हेंबर २०२४
Saturday, October 26, 2024
सणासुदीचे दिवस
Wednesday, October 23, 2024
22 ऑक्टोबर 2024
आज खूपच रणरणते ऊन होते,, पिझ्झा बरा होता, पानगळीचे रंग बरे होते, दुकानात खूप चालणे झाले, कानातले घेतले, त्यात चौकटचा एक्का खूपच आवडून गेला,, बऱ्याच महिन्यांनी हे बघ, ते बघ करत भटकंती केली, भटकंती करून घरी आल्यावर आलं घालून चहा प्यायला. नंतर तांदुळाच्या पिठाची उकड खायला केली. रात्री जेवायला मूग डाळ तांदुळ खिचडी व भेंडीची भाजी. खूप वेगळा छान आणि उत्साह देणारा दिवस होता.
Thursday, October 03, 2024
३ ऑक्टोबर २०२४
Sunday, August 11, 2024
११ ऑगस्ट २०२४
आजचा दिवस वेगळा आणि छान होता. विनायकच्या कंपनीमध्ये एक तेलुगु आहे. त्याची दुसरी मुलगी आज १ वर्षाची झाली म्हणून आम्हाला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. मागच्या आठवड्यात पण १ वर्षाच्या मुलाच्या पार्टीला गेलो होतो. इजा बिजा झाले आणि आता तिजाही होईल असे वाटते. पार्टीत बरेच जण होते. नवरा बायको आणि त्यांची मुले असे मिळून ३० तरी असतील. कंपनीतले अजून ४ जण होते. पार्टीत अजिबात औपचारिकता नव्हती ते मला जास्त आवडले. खूप झगमगाटही नव्हता. जिचा वाढदिवस होता ती, तिची मोठी बहिण आणि आई एकाच रंगाच्या ड्रेस मध्ये होत्या. तिचींचेही घोळदार झगे चमकत होते. राणी आणि नारिंगी रंग एकत्र होता. बाह्या उडत्या होत्या. त्यांच्या घराच्या बाहेरच्या बाजूला हिरवळीवर ही पार्टी होती. सगळे गप्पा टप्पा करत होते. लहान मुले हलकासा दंगा करत होती. मित्राची जी मोठी मुलगी आहे तिने माझी गिफ्ट डेकोरेशन केले होते तिथे नेऊन ठेवली. फोटोसेशन खूपच झाले. केक कापला आणि सर्वांनी आपापले जेवण कागदी डिश मध्ये घेऊन परत गप्पांमधे रंगून गेली.