आय आय टी , पवईला राहत असताना शिवणाचा क्लास लावला होता. हा क्लास मैलोंमैल
लांब होता. चालत जाऊन येऊन २ - 3 मैल. क्लासवरून आल्यावर भूक लागायची. दुपारी १ ला आमची जेवणे झाली की थोडावेळ विश्रांती घेऊन
मग मी व माझी मैत्रिण क्लासला जायला निघायचो. जाताना उत्साह असायचा पण
येताना खूप दमायला व्हायचे. मला खरे तर ब्लाऊज आणि पंजाबी ड्रेस शिवायला
शिकायचे होते. पण त्या क्लासच्या बाई म्हणाल्या की आधी सुरवातीला तुम्हाला
सराव होण्यासाठी बारीक बारीक कपडे शिवा मग मी तुम्हाला नक्की ब्लाउज व
पंजाबी ड्रेस शिकवेन.
सुरवातीला अनेक लहान बाळाचे लंगोट, झबली, टोपडी शिवली. ती माझ्या भाचीला मी बाळंतविड्यात दिली.
घाटकोपरला जाऊन छोटे छोटे फॉक घेतले. मला अजूनही त्याचे रंग आठवत आहे.
लाल, पिवळा, निळा, गुलाबी इ. माझा बाळंतविडा खूप छान झाला. शिवाय तिला
पायातल्या तोरड्या पण घेतल्या होत्या. जेव्हा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी
नवीन हॉस्टेल बांधले ते खूपच छान होते. तिथे माझ्या बहिणीचे म्हणजेच
रंजनाचे डोहाळेजेवण केले. भैरवीकडून अन्नपूर्णा पुस्तक आणले व त्यातून
रेसिपी शोधून स्वयंपाक केला होता. गाजर घालून भात केला. टोमॅटो सूप व
बटाट्याचे पराठे बनवले. कोबीची भजी केली व गोड म्हणून शेवयाची खीर बनवली.
नेमका गॅस संपल्याने सर्व स्वयंपाक स्टोव्ह वर करायला लागला. रंजना म्हणाली
की तू आधी सर्व स्वयंपाक उरकून घे. मग मी बसल्या बसल्या पराठे करते. तिचे
पराठे होईपर्यंत मी पानाची तयारी केली. रांगोळी काढून मग आम्ही चोघे
जेवायला बसलो. रंजनाला द्यायला म्हणून एक साडी आणली होती. ही साडी आम्ही
दोघांनी घाटकोपर मधल्या एका दुकानातून आधीच खरेदी करून ठेवली होती. तिचा
रंग निळा व थोडा मोरपंखी रंगाकडे झुकणारा होता. त्यावर मॅचिंग ब्लाऊज पीसही
आणले होते. रंजना व सुरेश काही कामानिमित्ताने मुंबईला आले होते म्हणून मला तिचे डोहाळेजेवण करता आले म्हणून मला खूप आनंद झाला होता. विनायकचे भाऊ व भावजय त्यांच्या लग्नानंतर आमच्या जुन्या
हॉस्टेल म्हणजेच एच ११ ला आली होती. वसुधाला मी साडी घेतली होती. त्याचा रंग लाल होता आणि दीराला शर्टपीस.
एच ११ ला आम्ही आमचे लग्न झाल्यावर लगेचच महिन्याने रहायला आलो होतो.
सगळीकडे हिरवेगार होते. पावसाळ्यात खूप अंधारून यायचे. सकाळी उठून अशा
अंधारलेल्या वातावरणात दिवा लावायला लागायचा. एकीकडे चहाचे आधण गॅसवर
ठेवायचे व खिडकीतून पावसाला बघत रहायचे. आले घालून केलेला चहा मग आम्ही
दोघे प्यायचो. रात्री झोपताना ट्रॉंझिस्टर वर छायागीत, बेलाके फूल ऐकूनच झोपायचो. त्यावेळेला घाटकोपरला जाऊन पाणी पुरी व भेळ पुरी खाणे होत असे. मेथीची भजी
करताना खूप आनंद व्हायचा. तुलसी ब्लॉक्स मध्ये एक मोठा बेड होता आणि टेबल
खुर्ची होती. या टेबल खूर्चीचा लिहिण्यासाठी व जेवताना त्याचा डायनिंग
टेबल म्हणून उपयोग व्हायचा. शिवाय मोठ्या बेड शेजारची जागा होती तिथे एक
गादी व त्यावर बेडशीट व मागे उशा अशा ठेवल्या होत्या भिंतीला टेकून. यावर
दुपारचे बसणे होत असे.
बऱ्याच आठवणी आहेत. जश्या आठवतील तश्या लिहीनच. तूर्तास इतकेच. आयायटी होस्टेल लाईफ वर जितके लिहीन तितके कमीच !
Saturday, February 21, 2015
Sunday, February 08, 2015
८ फेब्रुवारी २०१५
आजची रोजनिशी लिहायची म्हणजे मला आदल्या दिवशीची पण थोडी भर घालायला लागेल. नेहमीचे वीकेंडचे कार्यक्रम थोडे उलटे सुलटे झाले व त्यामुळे आजचा दिवस जरा वेगळा आणि चांगला गेला. आज सकाळी सूर्योदय पहायचा योग आला. सूर्योदय पाहणे म्हणजे देवळात जाऊन आल्यासारखेच वाटते. सूर्य आधी लाल, नंतर पिवळा व नंतर पांढरा होत जाताना छान तर वाटतेच, शिवाय त्याची किरणे जेव्हा आजुबाजूला फाकतात तीही अतीव छान दिसतात. मुख्य म्हणजे समुद्रावर जाऊन सूर्योदय बघण्याची मजा काही औरच असते. एक तर तिथे कोणताही अडथळा नसतो. अथांग समुद्रातून सूर्य जेव्हा वर येतो तेव्हा तो खास आपल्याला भेटण्यासाठीच आलेला आहे असेच वाटत रहाते.
शुक्रवारी रात्री मुडाखी , भाजी व कोशिंबीर खाल्ल्याने झोप लागली नाही. नेहमीचाच अनुभव आहे आमचा. आम्ही भात खाणे सोडले आहे. मला तर मुळातच भात तितकासा आवडत नाही. पोळी भाजी आम्हाला दोघांनाही प्रिय आहे. शुक्रवारी झोप नाही म्हणून शनिवार खूप कंटाळवाणा गेला. खरे तर आम्ही शनिवारी बाहेर जेवायला जातो. पण झोप नसल्याने अशक्तपणा आला आणि भूकही खूप लागली होती. मी घरीच करते काहीतरी पटकन म्हणून फ्रीज उघडला तर शुक्रवारची भाजी, कोशिंबीर होती. कणिक बाहेर काढली. आणि अगदी होॅटेलमध्ये कसे आर्डर केल्यानंतर १० मिनिटात खायला तुमच्या टेबलावर येते ना, अगदी तसेच झाले. कणिक खरे तर गार होती. पण ती पटकन ५ ते १० सेकंद मायक्रोवेव्हला ठेवली. भाजी गरम केली. पोळ्या लाटल्या आणि १० मिनिटांच्या आतच जेवायला बसलो. मग झोप लागली. उठल्यावर चहा घेतला आणि वि म्हणाला आज हवा चांगली आहे तर बाहेर फिरायला जाऊ. मला खरे तर जाववत नव्हते. पण फिरून आल्यावर जरा तरतरी आली.
शनिवारी रात्री सिमला मिरचीची भाजी केली. दुपारच्या पोळ्या होत्याच त्यामुळे बरे झाले. पण परत शनिवारी रात्री झोपेच खोबरे. झोपेचे खोबर होण्याचे कारण हवा. इथली हवा इतकी काही बदलते ना की रात्री प्रचंड थंडीने जर हीटर लावला तर सकाळी उठल्यावर बदाबदा पाऊस पडत असतो. तर संध्याकाळी हिवाळ्याच्या दिवसातही गरम हवेची लाट येते. झोपेच तितके खोबरे झाले नव्हते. झाले होते इतकेच की पहाटे ४ लाच जाग आली आणि मग झोप लागता लागेना. गरम हवा होती. सूर्योदय बघण्याचे आज ठरवले नव्हते. वि पण लवकर जागा झाला होता. दोघांनी समुद्रावर सूर्योदय बघायला जाण्याचे ठरवले. असा योग क्वचितच जुळून येतो. हिवाळ्यात सूर्योदय उशीराने होतो पण प्रचंड थंडी असल्याने बाहेर पडवत नाही. शिवाय ढग व पाऊस असला तरीही उपयोग नाही. आणि उन्हाळ्यात लवकर सूर्योदय होतो पण तेव्हा भल्या पहाटे उठून जायचाही कंटाळा येतो.
तर असा हा आमचा सूर्योदयाचा योग जुळून आला. चहा घेऊन निघालो. आज आकाश खूपच निरभ्र होते. एकही ढग नव्हता. समुद्रावर मोजकीच हौशी माणसे कॅमेरा हातात धरून सूर्याला कॅमेरात बंदिस्त करायला हजर होती. आज विशेष म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी आकाशात क्षितीजावर लालसर रंग उमटतो तो आज नव्हता. पिवळसर रंग होता. सूर्य सुद्धा आज लाल लाल गोळा होऊन बाहेर आला नाही. सुरवातीला होता थोडा लालसर पण लगेच तो पिवळा झाला. तरी सुद्धा सूर्योदय बघण्याचा आनंद नेहमीच छान असतो. समुद्राच्या खालून तो वर येताना अति क्लासिक दिसतो. नेहमीप्रमाणेच फोटो घेतले. आल्यावर तिखटामिठाचा शिरा खायला केला व नंतर चहा हवाच. नंतर दुपारी बाहेर जेवायला मेक्सिकन उपहारगृह. आज भाताचा वेगळा मेनू छानच होता. त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या सांगायच्या. भातामध्ये भाज्या व सॉस व चीझ घालून देतात. खूप आवडला मेनु. आत पुढच्या वेळी फोटो घेईन. नंतर घरी येऊन व्हक्युमिंग, ग्रोसरी इ. इ. कामे केली. पण आज सुद्धा थोडे डोळे तसे पेंगतच आहेत अजूनही. पण काहीही म्हणा, आजचा सूर्योदय मात्र खूप आनंद देवून गेला.
ली रिंगरला फोटोज पाठवले. बघू वेदर शॉटमध्ये वेदर चॅनलला मी पाठवलेला फोटो दाखवतात का ते. पण शक्यतोवर सूर्योदयाच्या फोटोला प्राधान्य देतात.
Saturday, February 07, 2015
Monday, February 02, 2015
एक होती "ऊ" तिला झाली " टू"
आई लहानपणी आम्हा दोघी बहिणींच्या उवा बघायची ना तेव्हा बरे वाटायचे. आईची
बोटे केसातून फिरायची आणि झोप आल्यासारखे वाटायचे. तिच्या उवा बघून झाल्या
तरीही आम्ही "आई, इथे बघं ग" असे म्हणायचो. केसामध्ये हुळहुळायचे आणि
वाटायचे केसात
मध्ये उ फिरते की काय. बरे, हाताने उवा लिखा मारून आईचे समाधान व्हायचे
नाही. मग आई आमच्या केसांमध्ये फणी फिरवायची या फणीचे कंगोरे इतके टोचायचे ना ! एक तर
आधी खूप लांबीचे केस. त्याची निगा
राखायची म्हणजे सोपे काम नाही. रोजच्या रोज तेल आणि कंगव्याने आणि फणीने
केस विंचरून झाले की केसांची पूर्ण झाडलोट झाल्यासारखी वाटायची. शिवाय
आठवड्यातून दोन वेळेला
डोक्यावरून अंघोळ असायची. ओले केस पंच्यामध्ये गुंडाळून ठेवायचे. काही तासा नंतर
पंचानेच ते खसाखसा चोळायचे. नंतर पूर्ण केस उलटे करून ते फटाफटा पंच्यानेच
आपटायचे. असे सर्व सोपस्कार करून झाले की मग थोड्यावेळाकरता केस मोकळे
सोडायचे. केस पूर्णपणे वाळले की मग आईच्या पुढयात बसायचे वेणी घालून
घेण्यासाठी.
वेण्या म्हणजे दोन वेण्या. त्याकरता आधी केसांमध्ये मधोमध भांग पाडून दोन भाग करून आधी केसात झालेल्या जटा काढायला लागत. मग आई विचारायची कुठे भांग पाडू? मध्ये की कडेला. मला डाव्या कडेला भांग पाडलेला आवडायचा. आणि माझ्या बहिणीला मधोमध भांग आवडत असे. तरीही शाळेत गेल्यावर मिसळीच्या उवा डोक्यात यायच्याच. उवांबरोबर लिखा आल्याच. या लिखा म्हणजे उवांची अंडी असत. याच लिखा मारल्या की मग उवाच येणार नाहीत म्हणून त्या शोधून शोधून मारायच्या. ऊ मारण्याची पण एक पद्धत आहे. केसामध्ये ऊ दिसली की ती आधी चिमटीत धरायची. नंतर तिला डाव्या अंगठ्याच्या नखावर ठेवायचे आणि उजव्या अंगठ्याच्या नखाने मारायचे. तश्याच लिखाही मारायच्या. ऊ मारली की 'टक' असा आवाज यायचा. लिखांच्या बाबतीतही असेच. पण काही वेळा लिखेमध्ये जीव नसायचा. लिखा या केसांमध्ये चिकटून असायच्या. फणीने सारले की मग त्यात एखादी तरी ऊ यायची. काही ऊवा खूप टेण्या असायच्या तर काही ऊवा तर खूप बारीक असायच्या. फणीचे कंगोरे असायचे त्यात लपून बसायच्या. मग त्या फणीचा कंगोरा बोटाने बाजूला करून छोटी ऊ चिमटीत पकडायची आणि फणीच्या सपाट भागावर ठेवून उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने तिला मारायचे. ही छोटी ऊ खूप चिवट असे. पणकन चिमटीत येत नसे. काही उवा तर इतक्या बारीक असायच्या जसे की अगदी छोटा कण.
डोक्यामध्ये उवा फिरताना हुळहुळायचे की मग लगेच केसामध्ये बोट फिरवले की ऊ हाताला लागायची. मग तशीच तिला चिमटीत पकडायची. काही वेळा चिमुट उघडून पाहावे तर ऊ च नसायची. आमच्याकडे पाहुण्यारावळ्या मुली आल्या की आम्ही पण आईप्रमाणेच त्यांची डोकी आमच्या पुढ्यात घेऊन बसायचो आणि उवा लिखा मारायचो. खूप गम्मत वाटायची आम्हाला. आणि उवा सापडल्या नाहीत तर नाराज व्हायचो. एकदा आमच्या शेजारी कुणीतरी नवीन रहायला आले आणि त्यांना ३ मुली होत्या. त्यांची ओळख पाळख झाल्यावर त्या आमच्या अंगणात खेळायला यायच्या. आम्ही दोघी बहिणी लगेच त्यांच्या डोक्यातल्या उवा काढण्यासाठी तयार असायचो. कारण की ऊवांना नखावर ठेवून नखाने मारायला मजा वाटायची. ऊ नखावर ठेवली की काही वेळा ती निसटून खाली पडायची. छोटी ऊ आणि ज्या लिखामध्ये जीव आहे त्यांना मारले की "टक" असा आवाज यायचा. की मग आम्हाला बरे वाटायचे.
वर्गात एका बाकावर दोघीजणी डोक्याला डोके लावून बसल्या की जायच्याच एकमेकींच्या डोक्यात मग या ऊवा ! वर्गात ज्या मुलीच्या डोक्यात खूप उवा झाल्या आहेत तिला मागच्या बाकावर एकटीलाच बसवायचे. या ऊवा आमच्या घरात थोड्या काळाकरताच आल्या होत्या. साधारण तो काळ ५ वी ते ७वी च्या दरम्यान असावा. असे हे "ऊ" प्रकरण आमच्या लहानपणी खूप फेमस होते. .फेसबुकावरच्या एका पोस्टवरून मन भूतकाळात शिरले आणि लेख लिहिला गेला.

Thursday, January 15, 2015
अघटित - भाग १
मानसीचे पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी ती बाळबोध वळणाची असते. तिचा भूताखेतांवर, भविष्यावर आणि अशा काही घटनांवर की ज्या घडलेल्या
आहेत, ज्यात विपरीत काहीतरी आहे, या सर्वांवर तिचा विश्वास असतो. मानसी मॉड
आहे. तिचा पेहराव म्हणजे स्कर्ट आणि टॉप. बॉयकट शिवाय तिला दुसरी कोणतीही केशभूषा पसंद नाही. दागदागिने, साड्या घालून मिरवावे असे तिला कधीच वाटत नाही.
एका जीममध्ये अमित व तिची ओळख होते. अमित काही महिन्यांच्या प्रोजेक्टकरता भारतात आलेला असतो. अमितलाही जीममधल्या वेगवेगळ्या मशीनवर जाऊन व्यायाम करण्याची आवड असते. एक मुलगी जीममध्ये येऊन व्यायाम करते आहे याचे त्याला खूप कौतुक वाटते आणि तो तिची ओळख काढतो. कुठे राहतेस, काय करतेस अशी विचारणा करतो. तिला ही तो आवडतो. मग त्यांच्या व्यायामाविषयी चर्चा सुरू होतात. त्या दोघांना गाण्याचीही आवड असते. त्याला मात्र वेस्टर्न म्युझिकच आवडत असते. तिची आवड मात्र मराठमोळी. इतकी मॉड असूनही हिला मराठी गाण्याची आवड कशी काय याचे त्याला आश्चर्यच वाटते. हळूहळू त्यांची मैत्री वाढते आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एके दिवशी तर अमित बाँबगोळाच टाकतो. त्याचे असे होते. काही कारणानिमित्ताने जीम बंद असते आणि ते दोघे आता काय करायचे अश्या विचारात असतात. तो म्हणतो चल आपण या उपहारगृहात कॉफी घेऊ. ती म्हणते कॉफी नको. मला चहाच आवडतो. तो म्हणतो बरे चहा तर चहा.
आणि चहा पितानाच तो तिला लग्नाची मागणी घालतो. लग्नाची मागणी घातल्यावर ती खूपच सुखावून जाते. खरे तर त्याला जीममध्ये बघताक्षणीच ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. दोघांच्या घरातून लग्नाला परवानगी मिळते आणि धुमधडाक्यात लग्न पार पडते. अमितची अमेरिकेत निघायची वेळ येते. मानसीलाही त्याच्याबरोबरच जायचे असते. पण त्याच्या आग्रहाखातर ती तिच्या आईवडिलांकडे राहते. एका महिन्यानंतर लगेचच ती अमेरिकेला जाण्याच्या तयारीला लागते. आईबाबा आणि सासूसासरे यांचा निरोप घेऊन ती मुंबईच्या विमानतळावर येते.
अमेरिकेतल्या एका मोठ्या विमानतळावर ती उतरते आणि तिची नजर अमितला शोधू लागते. अमित तिला लांबूनच हाय! असा हात करतो आणि ती अमितच्या कारमध्ये येऊन बसते. दोघेही घरी येतात. मोठ्या बंगल्यात अमितने तिच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली असते. बेडवरच्या चादरी स्वच्छ धुवून अंथरलेल्या असतात. डायनिंगवर गरम गरम अन्न तयार असते. अर्थातच ते एका हॉटेलमधून मागावलेले असते. मोठमोठ्या बॅगा घेऊन ते दोघे आत येतात. घरात शिरल्यावर मानसीला एकदम रडायलाच येते. अमित म्हणतो काय गं झालं? अगं तू तर माझ्याबरोबरच यायला उत्सुक होतीस ना? मग , आता काय झाले? "काही नाही रे. आईबाबांची आठवण आली मला. पण तू मला त्यांच्याकडे रहायला सांगितलेस ते किती बरोबर होते ते आता पटतयं मला. " अमित म्हणतो "हो ना? चल मग. पटापट आवरून जेवायला ये.
मानसी जागी होते तेव्हा सकाळ उलटून गेलेली असते. ती पटकन उठते. अरे बापरे! आपण किती वेळ झोपलो आहोत? असे म्हणून अमितला हाक मारते. खाली येऊन बघते तर खाली कुणीच नसते. अरेच्या अमित कुठे गेला? घड्याळात पाहते तर जवळजवळ ११ वाजत आलेले असतात. तेवढ्यात अमितचा फोन वाजतो. उठलीस का? " मानसी म्हणते " हो अरे, किती वेळ झाला मी झोपेतून जागे होण्यासाठी ! आणि तू कुठे आहेस? " अगं कुठे आहेस म्हणजे काय? ऑफिसमध्ये नाही का? चल, मी येतो संध्याकाळपर्यंत.
दिवसभर मानसी भारतातून आणलेल्या बॅगा खाली करते. खाण्याचे विविध प्रकार ती कोणत्या ना कोणत्या डब्यात भरून ठेवते. नंतर छानसा स्वयंपाकही करते. अमित घरी येतो आणि ते दोघे मिळून मस्त जेवण करतात. रात्री झोपताना अमित मानसी खूप विषयांवर बोलतात. लग्नानंतर पहिल्यांच असा निवांतपणा त्यांना मिळालेला असतो. विकेंडचे कार्यक्रम आखतात. कार्यक्रम आखताना मानसी अमितला म्हणते "आपण समुद्रावर कधी जायचे? अमित म्हणतो अगं इथून समुद्र तसा दूर आहे. चारपाच तास लागतात. आपण एखाद्या लॉंग विकेंडचा प्लॅन बनवून समुद्रावर जाऊ. मला माहीत आहे तुला समुद्र किती आवडतो ते. हो. रे मला खूप म्हणजे खूपच आवडतो समुद्र आणि आता तर अमेरिकेतला समुद्र पाहण्याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे मला ! ए. कधी जायचे सांग ना !
अगं हो हो. थोडा धीर धर. सध्या कामाचे वर्क लोड खूप आहे. पण मी तुला सांगतो, येत्या ६ महिन्याच्या आत आपण नक्किच जाऊ. काय! सहा महिने ! मानसी भुवया उंचावते. चला मॅडम, झोपा आता. किती वाजले पाहिलेत का? रात्रीचे ३ वाजत आले. तुझी झोप झाली आहे पण उद्या मला कामावर जायचे आहे. उद्यापरवा विकेंड आहे तेव्हा जवळच कुठेतरी फिरायला जाऊ. चल, गुडनाईट.
त्यादिवशी रात्रभर मानसी समुद्राचीच स्वप्ने पाहत असते. स्वप्नात तिला समुद्राच्या लाटा इकडून तिकडे धावताना दिसतात. खूप दूरदूरवर लाटांकडे बघताना काळोख होतो आणि ती घाबरून उठते. मानसीला जितका समुद्र आवडत असतो तितकीच त्याची भीतीही वाटते असते.
क्रमश : -----

Wednesday, January 07, 2015
पूर्वेपासून पश्चिमेकडे ...(3)
सकाळी
उठून पटापट आवरून व बॅगा घेऊन ८ च्या सुमारास हॉटेल लॉबीमध्ये आलो.
कॉफी व ब्रेड खाल्ला. नाही म्हणायला या हॉटेलमध्ये सकाळचा कॉफी ब्रेड तरी
छान होता. आता आमची उरलेली ट्रीप सुरू होणार होती. त्या आधी आम्हाला
सॅनफ्रॅन्सिसकोला जायचे होते. आजचा दिवस तसा आरामाचा होता. आजच्या प्रवासात
वळणावळणाचे घाट होते आणि आजुबाजूचे डोंगर खूपच सुंदर दिसत होते. डोंगरावर
पोपटी रंगाचे गवत होते. शिवाय हिरव्या रंगाच्या विविध छटाही दिसत होत्या.
डोंगराचे आकारही वेगवेगळे दिसत होते. डोंगरावरच निळे निळे आकाश
डोंगरावरच्या पोपटी रंगाच्या गवतावर खुलून दिसत होते. चालत्या बसमधून निसर्गाचे सुंदर रूप कॅमेरात साठवत होते. कितीतरी फोटोज
मिळाले. रस्त्यावरच्या आजुबाजूला बरीच शेते होती. बदामाची व सफरचंदाची
झाडेही दिसत होती. आज प्रवासात क्वचित थोडा पाऊस पडत होता.
मधल्या वाटेत २ ते ३ वेळा बस थांबली. चहापाण्याकरता व पोटपूजेसाठीही ! टाको बेलमध्ये एक बरीटो व कोक घेतला. संध्याकाळच्या सुमारास मोंटेरी बेवर जाणार असे गाईडने आम्हाला सांगितले. या प्रवासात आमच्या बसमधला ड्राइव्हर व गाईड दोघेही नवीन होते. आधीच्या प्रवासात मार्टी नावाचा गाईड होता तर या प्रवासात मिंग नावाचा ! मिंग खूपच साधा होता. प्रवासामध्ये इतर आजुबाजूची माहिती सांगायचा, कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत याची डिटेलवार माहिती सांगत होता. माँटेरी बे पहायला खाली उतरलो. तिथे एका कॅफेत गेलो. तिथूनच समुद्र दिसत होता. झिमझिम पाऊस पडत होता व गार वारेही सुटले होते. तिथल्या फूटपाथवर थोडे चालून घेतले. पावसात भिजायला झाले पण खूप अगदी ओलेचिंब नाही. काही चिनी लोकांनी प्रवासात बरोबर छत्रीही आणली होती. पाऊस पडला तर? त्यामुळे लगेच पावसात त्यांनी आणलेली छत्री उपयोगी पडली. समुद्राचे फोटो घेतले. फूटपाथवरील फुलांचेही फोटो घेतले व परत बसमध्ये येऊन बसलो. कॅफेमध्ये हॉट चाकलेट प्यायल्याने थोडी तरतरी आली. थोड्यावेळाने अंधार पडायला सुरवात झाली व सॅनफ्रॅन्सिसको बे पुलावरून जात होतो. आजुबाजूला दिसणाऱ्या शहरातले मिणमिणते पिवळे दिवे झगमग करू लागले. ६ वाजताच जेवण घ्यायला गाईडने एके ठिकाणी बस उभी केली. २४ तारखेला संध्याकाळी कुठेच काही बंद नव्हते. बरीच उपहारगृहे चालू होती. तिथे जेवायलाच हवे होते. खरे तर इतकी भूक नव्हती. दुपारच्या बरिटोने पोट जड झाले होते. पण काहीतरी पोटात टाकलेले बरे ! म्हणजे आधीचा अनुभव होताच गाठीशी. सबवे मध्ये सँड्विच घेतले. दोघांनी मिळून एक खाल्ले व एक बांधून घेतले. न जाणो रात्री भूक लागली तर? असलेले बरे. आता आमची बस सिलिकॉन व्हलीतून जायला लागली. मायक्रोसॉफ्ट व गुगलचे ऑफीस बघितले. बसमधून लांबूनच ऑफीसच्या पाट्या दिसत होत्या. गुगलची पाटी बघून खूप छान वाटले. शेराटॉन हॉटेलमध्ये आमच्या सगळ्यांची वरात येऊन पोहोचली. थंडी वाढली होती. सकाळी ७ वाजता सर्वांनी तयार राहा असे मिंगने आम्हाला सांगितले. वर हॉटेलच्या रूमवर गेलो मात्र ! आहाहा ! खूपच छान हॉटेल होते. आमच्या हॉटेलच्या खिडकीतून हायवे वरची गर्दी दिसत होती व हायवेला लागूनच रेल्वे लाईन दिसत होती. त्यामुळे कार व त्याच्या बाजूला आगगाडी जाताना खूपच छान दिसत होते. हायवे वर कार चालवताना कारचा वेग किती असतो हे चांगलेच जाणवले. आपणही कारमधून प्रवास करताना इतक्याच भरभक्कम वेगाने जात असओ हे पाहून मस्त वाटले. इथे हायवेवर हाय स्पीड ठेवायलाच लागतो. तसा ठेवला नाही तर अपघात होऊ शकतो. हॉटेल इतके चकाचक होते की असे वाटले इथेच उद्या संपूर्ण दिवस झोपून काढावा. इथे खरी विश्रांती मिळेल. उद्याचे जरूरीपुरते कपडे काढून ठेवले आणि चक्क खाली चक्कर मारायला उतरलो. हे हॉटेल एका शॉपिंग मॉलच्या आवारात होते. रात्र असल्याने शॉपिंगच्या आवारात शुकशुकाट होता. खूप मोठ्या आवारामध्ये चांगल्या ५ ते ६ फेऱ्या मारल्या. रोजच्या रोज बसप्रवासामध्ये बसून बसून चांगलेच वैतागायला झाले होते. चालणे कमी आणि बसणे जास्त हे तर आयोग्याला अजिबातच चांगले नाही की वो ! चालत असतानाच ५ लोकांची चिनी फॅमिली दिसली. हीच फॅमिली आमच्याबरोबर साऊथ रिमच्या बसमध्ये होती. साऊथ रिमला नाही म्हणता म्हणता बरीच लोकं आली होती. ही फॅमिली दिसल्यावर मी विनुला म्हणालेच की ही नक्कीच शॉपिंगसाठी बाहेर आली आहेत. आम्हाला पाहून त्यांनी विचारले कि मॉल चालू आहे का? आम्ही सांगितले की तुम्ही जाऊन पाहा आतमध्ये. आम्हाला तरी वाटतयं की आता बंद झाले असतील. कारण की आजची २४ ची रात्र आणि उद्या २५ म्हणजे सर्वांनाच सुट्टी असते त्यामुळे कोणी नसेल कदाचित. ही ५ जणांची फॅमिली कोणतेही दुकान उघडे दिसले रे दिसले की लगेच शॉपिंग्साठी घुसायची. त्यांना किती घेऊ न किती नाही असे झाले असावे बहुतेक. ही फॅमिली सिंगापूरची होती. आणि बिझिनेझमन होते त्यामुळे खरेदी ला काय तोटा? चालून परत हॉटेलवर आलो आणि आडवे झालो. प्रवासामध्ये हॉटलमध्ये उतरणे म्हणजे फक्त पाठ गादीला टेकणे इतकेच असते. झोप येत नाहीच कारण की उद्यासाठी लवकर उठून तयार व्हायचे असते. प्रत्येक हॉटेलवर वेक अप कॉल होते पण आमची झोप काही इतकी हुकमी नाही बाबा ! मला तर उद्या लवकर उठून कुठे जायचे असेल तर घरीपण अजिबात झोप लागत नाही. मग इथे कुठली लागायला? सततचा धसका ! जाग येईल ना! क्रमशः ---- |
Tuesday, January 06, 2015
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)