आजचा दिवस खूप वेगळा होता.प्रचंड थंडी आहे. लाँग विकेंडचा आजचा पहिला दिवस. नेहमीच मी काहीतरी वेगळे करते. आज मेथिची पीठ पेरून भाजी करायची मनात होती पण झाली नाही. उकडून बटाट्याची भाजीही करणार होते. तीही झाली नाही. भाजी झाली ती मेथी+ बटाटा. पण अजिबातच चांगली झाली नाही. उडदाची धिर्डी केली. आज संध्याकाळी कारने भटकण्यासाठी बाहेर पडलो. बंद दुकाने, रिकामे रस्ते व रिकामे पार्कींग लॉट पहाताना छान वाटले. ग्रोसरी न घेता ज्या ज्या दुकानात जातो तिथे फक्त फेरफटका मारला. एक वेगळाच नजारा पहायला मिळाला त्यामुळे उत्साह आला. आज नेट्फ्लिक्स वर एक इंग्रजी सिनेमा पाहिला. त्याचे नाव एव्ह्रीबडी इज फाईन. हलका फुलका सिनेमा पाहिल्यावर छान वाटले. होस्टेज ही मालिका नेटफ्लिक्स वर पाहत होतो. अजून एक भाग शिल्लक आहे तो उद्या. ही सिरिज पण मस्त आहे. बाकी आज काही विशेष घडले नाही. थॅन्क्स गिव्हिंग ची सुट्टी असल्यानेच वेगळेपणा आला आज.
Thursday, November 27, 2025
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment