मोठ्या पडद्यावर सिनेमा पहायला मला खूप आवडते. मलाही ! माधवी म्हणाली.
जायेंगे क्या? हाहा क्युँ नही !! मी म्हणाले. २००१ साल. माझी आणि माधवीची
मैत्री झालेली. बरेच काही काही केले आम्ही दोघींनी मिळून. इंडियन
असोसिएशनतर्फे विद्यापीठाच्या एका हॉल मध्ये सिनेमे दाखवले गेले नाताळच्या
सुट्टीत. टेक्साज राज्यातील डेंटन या छोट्या शहरात आमची पोस्डॉक
कम्युनिटीही अगदी छोटी. बोचऱ्या थंडीत आणि स्नो पडत असतानाही आम्ही दोघी
आमच्या घरातून चालत चालत हॉलवर पोहोचत होतो शिणुमा पहा
यला.
रात्रीचा शो असल्याने जेवून निघायचो. चार सिनेमे पाहिले. त्यात दोघींचे
एकेक आवडते पिक्चर्स. डीडीएलजे, माधवीचा आवडता तर चुपके चुपके माझा आवडता.शाहरूख माधवीचा आवडता नट. डीडीएलजे पाहताना अगदी एक टक डोळे लावून बघत
होती. ( मी मनातल्या मनात "त्या माकडतोंड्याला इतके काय निरखून पहायचे
:D
पसंद अपनी अपनी) मी मात्र अधून मधून डुलकी घेत होते. चुपके चुपके साठी
माझे कान टवकारलेले. एकही डायलॉग मिस होता कामा नये, नाहीतर सिनेमा
पाहण्यात अर्थ नाही. या सिनेमाला मात्र माधवी जांभया देत होती.
:D
त्यावेळी स्मार्ट फोन काय तर साधे मोबाईल पण नव्हते. त्यामुळे फोनचा
व्यत्यय नाही. हॉल मध्ये जास्तीचे सिनेमाप्रेमी नाहीत. लगान ला मात्र बरीच
टाळकी जमा झालेली. हा सिनेमा पाहताना आम्ही ३ ते ४ वेळेला उठलो , चला
संपला एकदाचा म्हणेपर्यंत परत बसलो. अजून किती वेळ? असे आमच्या दोघींचे
उद्गार.
ये दोनो भी आमीरसे क्युँ प्यार करते है रे ! ये सब दिखाने
की क्या जरूरत है! और गाने भी इतने लंबे लंबे क्युँ? आमच्या दोघींची अशी ही शेरेबाजी ! एका गाण्यात आमीरबरोबर दोघी प्रेमात पडलेल्या आणि आपल्याच
धुंदीत दाखवलेल्या. आम्ही दोघी एकमेकींकडे बघून स्माईली देत होतो.
:D सरतेशेवटी कंटाळून आम्ही दोघीही उठलो अभी कुछ भी होने दो यार. ये मुव्ही तो रात भर भी चलेगा! त्या दिवशी माधवी मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मला हैद्राबादी बिर्याणी खाऊ घातली. रंगीला मात्र आम्ही
दोघींनीही एंजोय केला. त्यादिवशी सिनेमा संपल्यावर परत येताना स्नो फॉल
सुरू झाला होता. माझे घर थोडे लांब होते. कडाक्याची थंडी तर होतीच. पण चालत
येताना चिटपाखरूही नव्हते. काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. रात्रीचे १२
वाजले होते. मनातून जाम टरकले होते. रामनामाचा जप सुरू केला. खूप भराभर चालूनही रस्ता संपता संपत नव्हता. नजरेच्या टप्यात घर आले. रस्ता क्रॉस केला. आणि अक्षरशः पळत पळत येऊनच घरात शिरले.
माधवीला फोन केला " मी पोहोचले गं घरी ".......रोहिणी गोरे
2 comments:
सुंदर आठवणी
Thank you very much Prachi !!
Post a Comment