विल्मिंग्टन पासून ऍशविल पर्यंत आम्ही ज्या रस्त्याने आलो अगदी त्याच
रस्त्याने हे वादळ येत आहे. विल्मिंग्टन शहरातून बाहेर पडण्यासाठी आधी
७४/७६ रस्ता नंतर महामार्ग ९५ नंतर २० कोलंबिया - साऊथ कॅरोलायना, नंतर ते
२६ स्पार्टनबर्ग महामार्गाने ऍशविलला म्हणजे उद्या येईल. पण हे वादळ इथे
येईपर्यंत पार मरतुकडे होऊन गेलेले असेल. वादळ जरी साऊथ कॅरोलायना कडे
सरकले असले तरीही अजून विल्मिंग्टन, रॅले मध्ये पाऊस पडत आहे.मनात विचार चालू आहेत की आपण आत्ता तिथे राहत असतो तर काय करावे लागले असते? पहिले म्हणजे शहर सोडायलाच लागले असते आणि ते सुद्धा वेळेवर. नंतर विचार करून जाऊ कि नको असे करत बसलो तर अजूनच बरेच
अडथळे निर्माण झाले असते. घर सोडून जाताना एक आठवडा पुरेल असे सर्व काही
घ्यायला लागले असते. कपडे, औषधे, थोडे अन्न आणि पाणी. शिवाय होॅटेल बुक
करून जास्तीत जास्त उंचावर म्हणजे आम्ही आता जिथे राहत आहोत तिथे आलो असतो.
डेबिट क्रेडीट कार्डे, फोन, लॅपटॉप, कॅश, असे सर्व काही बरोबर घेऊन जे जे
काही सुचेल तेही बरोबर घेऊन जरी निघालो असतो तरी वाहतुक मुरंबा लागला
असता.
आणि वादळ शमून गेल्यावरही परत आपल्या शहरात गेल्यावर म्हणजे तसे पटकन जाताही आले नसते. कारण रस्त्यावरून जाता आले नसते. शिवाय तिथे गेल्यावर घरातल्या वस्तुंची काय हानी झाली असेल? याचे विचार मंथन, शिवाय पॉवर नाही. त्यामुळे इंटरनेट नाही. फोन नाही. असे एकेक करून बरेच विचार मनात येत आहेत. विल्मिंग्टन शहरातले दिवस आठवत आहेत. या शहराची प्रलयासारखी झालेली अवस्था न्युज मध्ये पाहून खूप वाईट वाटत आहे. :( Rohini Gore

No comments:
Post a Comment