हरीश ऋजुता आणि त्यांचा मुलगा हर्षवर्धन यांना ऍशविलच्या विमानतळावर
सोडले. हा विमानतळ अगदी गावात येण्याजाण्याच्या रस्त्यावर आहे की जिथे फक्त
अमेरिकेतल्या अमेरिकेत जाणारी येणारी विमाने येतात. विनायकचा शाळेतला
मित्र अमेरिकेतील आमच्या घरी येईल असे कधी स्वप्नातही पाहिले नव्हते.
त्यांच्या मुलाकडे ते महिन्याभरासाठी आले आणि योगायोगाने ख्रिसमसची शनिवार
रविवार जोडून सुट्टी आल्याने आम्ही घरीच होतो आणि त्यामुळेच त्यांना
आमच्याकडे बोलावता आले. आम्ही सर्वांनी मिळून दिलखुलास गप्पा मारल्या. जवळ
असलेली ठिकाणे दाखवली. मी जिथे कामाला जाते ते वाण्याचे दुकान दाखवले. :D क्लेम्सन दाखवले. तिथे आम्ही ज्या घरात राहिलो ती घरे दाखवली. ४ दिवसात त्यांना चारही ऋतुंचे दर्शनही झाले. :)
घरी थोडी गाणी गायली. सकाळचा वेळ बाहेर फिरणे आणि इथल्या उपहारगृहात जेवण
असा कार्यक्रम आणि संध्याकाळ झाली की घरी बसून गप्पाटप्पा होत होत्या. एक
दिवस मध्ये गेला असेल की लगेचच मेघना आमच्या घरी आली. आल्यावर आपण कधी आणि
कश्या ऑर्कुटवर भेटलो असे आश्चर्यचकीत उद्गार निघाले. :)
इतके दिवस फक्त फोनवर बोलणाऱ्या आम्ही दोघी प्रत्यक्षात भेटलो. मेघना
आमच्या घरी दुपारी आली आणि आम्ही दोघींनी जेवून घेतले. पोळी भाजी आमटी भात
असा साधाच स्वयंपाक होता. रात्री मात्र साबुदाणाप्रेमींनी मनसोक्त साबुदाणे
वडे खाल्ले. :D
सोबत नारळाच्या चटणीने चवीमध्ये भर घातली. रात्रभर आम्ही दोघींनी गप्पा
मारल्या. दुसऱ्या दिवशी विनायक ऑफीसमध्ये गेला. मेघनाने आलं घालून गरम गरम
चहा आमच्या दोघींकरता बनवला. चहाची चव कायम लक्षात राहील माझ्या ! नंतर
तिने आणलेला फुलांचा गुच्छ फुलदाणी मध्ये लावला. "चाय पानी" हे ऍशविलमधले
एक भारतीय उपहारगृह आहे तिथे जायचे आदल्यादिवशीच ठरले होते. मला शोभनाने
सांगितले होते की तिथे पाणीपुरी छान मिळते. तेव्हापासून अमेरिकेतली
पाणीपुरी खायची इच्छा पूर्ण करायची असे ठरवले होते. तसे एकदा आम्ही दोघे
गेलोही होतो. पण तिथे पार्कींगला जागा न मिळाल्याने वैतागून परत घरी आलो
आणि खूप भूक लागलेली असताता घरीच पोळी भाजी बनवली होती. या अनुभवानंतर तिथे
अजिबात जायचे नाही असा निश्चय केला होता. पण आशा सुटेना देव भेटेना ! आणि
शेवटी देव भेटलाच नाही ! :D
पाणी पुरी एक नंबर आवडती की जी मी भारतात असताना मनसोक्त खाल्ली होती ती
इथे आल्यावर मात्र ती कुठेही अजिबात न मिळाल्याने त्याची चव पूर्णतः विसरले
होते. आणि आता आज योग आला आहे त्या आनंदात मी होते. मेघना या आधी तिथे
जाऊन आली होती आणि तिथे वडा पाव घेतला होता. ती म्हणाली वडापाव तसा बरा
होता पण भारतात मिळणाऱ्या वड्यासारखा नव्हता. आणि तिथे जेवायची थाळी मिळते
असेही ऐकले होते. तिथे जाऊन मग आम्ही एका फुलझाडांच्या दुकानात जाणार
होतो.
आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर हे चायपानी नावाचे
उपहारगृह होते. तिथे जायला आम्हाला जवळजवळ १ तास लागला. वेळ बघून ठेवली
होती. उपहारगृह ३ ला बंद होणार होते. १२ ला निघालो ते १ ला पोहोचलो.
पोहोचलो म्हणजे काय जिपिएसने आम्हाला भिरभिर फिरवले. गल्लीबोळातूनही
फिरवले. जिथे डेड एंड आहे तिथेही पोहोचवले. :D ऍशविल मधले क्रेझी ड्राइव्हरही पाहिले. :(
भारतासारखे थोड्याश्या जागेतून वाट काढणारे ड्राईव्हर पाहून ते आता आमच्या
कारला ठोकतात की काय असे वाटून गेले. ऍशविल डाऊनटाऊनला हे उपहारगृह आहे.
तिथले रस्ते अतिअरूंद असल्याने आणि पार्कींगचा भला मोठा प्रश्न असल्याने
आम्हाला इथे का आलो आहोत? असे होऊन गेले होते.
आमच्या नशिबाने
आम्हाला पब्लिक पार्किंमध्ये एक जागा कशीबशी मिळाली. तिथे घुसलो तेव्हा ३
जागा उपलब्ध असा डिजिटल पाटीवर लिहिले होते आणि आमच्या पुढे २ कार होत्या.
मिळाली बाई एकदाची जागा ! हुश्श केले आम्ही दोघींनी :D
आणि इतक्या त्रासानंतर जिथे उपहारगृह होते तिथे अगदी जवळच ही पार्कींगची
जागा होती. फूटपाथवरून चालायला लागलो तर ही मरणाची थंडी ! आणि चायपानी
उपहागृहात पोहोचलो तर तिथे ही रांग! अरे बापरे ! काय प्रकार काय आहे हा?
तिथे जागा बुक केली तर तासाभराने या सांगितले. म्हणजे आम्ही १ ला पोहोचलो
आणि २ ला तिथे बसलो. आणि ३ ला उपहारगृह बंद ! त्याच्या शेजारी असलेल्या एका
कॉफी हाऊस मध्ये शिरलो. आणि तिथे २ कॉफी आणि एक तिरामिसू घेतले.
बिल झाले १८ डॉलर्स. कॉफी एकदम थंडगार आणि आम्हाला जितकी छान मसालेदार असेल
अशी वाटली होती तितकी तर ती अजिबातच नव्हती ! तिरामिसू मात्र छानच होते.
मग काय वेळ घालवायला आमचे फोटोसेशन सुरू झाले. तिथले लोक्स बघायला लागले.
एकदा हाताची घडी घालून फोटो तर एकदा मि म्हणाले माझ्या कानातल्या बाटल्या येऊ देत गं फोटोमध्ये. :D
तर एकदा मेघना म्हणाली प्रकाश नीट येत नाही म्हणून दिव्याखाली फोटो !
त्रासातून अजून सुटका झाली नव्हती हं आमची ! खरा त्रास तर पुढेच आहे. :D
तर आम्हाला त्या उपहारगृहाचा फोन आला ही या लवकर. आम्ही गेलो तर आम्हाला
दारासमोर असलेली टेबल आणि खुर्ची होती. गर्दी असल्याने दार सारखे उघडले जात
होते आणि आमच्यावर अतिप्रचंड गार वाऱ्याचा लोट येत होता.
ऑर्डर
घ्यायला कुणीही फिरकत नव्हते. उपहारगृह तर मजेशीरच होते चिंचोळ्या आकाराचे !
आम्ही वेटर ला विचारून दुसरीकडे बसलो. पण तिथेही वाऱ्याचा लोट येतच होता.
वेटर काही यायला तयार नाही. शेवटी एका बयेला हात दाखवून बोलावले. थाळी
घेणार होतो पण सरसोंका साग ही भाजी होती. आम्हाला दोघींनाही ही भाजी आवडत
नाही :(
म्हणून या भाजीला पर्यायी भाजी मिळू शकेल का? असे विचारले असता तिने
थाळीमधला मेन्युच आम्हाला परत वाचून दाखवला ! पाणी पुरी नव्हतीच तिथे.
दहीबटाटाशेवपुरी होती ती ऑर्डर केली आणि एक वडा पाव आणायला सांगितले. इतका
वेळ लावला आणायला.:( :( आधी शेवबटाटापुरी आणली तर ती इतकी गारढोण होती की ती फ्रीजर मधून काढून दिली होती असे जाणवत होते. :D ७ डॉलर्चच्या शेवबटाटापुरी मध्ये फक्त ५ गारढोण पुऱ्या ! :D
वडापावचा तर पत्ताच नाही ! इतका गोंधळ ! त्यांचा गोंधळ पाहता उतप्पाची
ऑर्डर दिली. आणि लगेचच उतप्पा हजर ! कठिण आहे. ती उतप्प्याची ऑर्डर
दुसऱ्याचीच असणार. आम्ही त्या बयेला म्हणले पण की उत्तप्याची ऑर्डर आम्ही
आत्ताच दिली आहे! :(
बरं ठिक आहे म्हणून आम्ही तो उतप्पा तसाच ठेवू दिला. उतप्पा म्हणजे अरे
देवा ! गार ढोण, शिवाय कोथिंबीर म्हणजे त्या उत्त्प्यावर जणू काही
कोथिंबीरीचे शेत उगवले आहे असे वाटाते इतकी पसरली होती. :D :D उतप्पा कच्चा, चटणी आळणी, सांबार थोडेफार चव आहे असे म्हणायला हरकत नाही असे होते.
नंतर परत एक उत्तप्पा आणून दिला आणि बऱ्याच वेळानंतर वडा पाव ! बिनाचवीचे
खाऊन समाधान तर अजिबात झाले नव्हते. फक्त पोट भरले होते म्हणून वडा पाव घरी
आणून खाल्ला. घरी आल्यावर मात्र ढकलत ढकलत स्वयंपाक केला. झोप येत होती पण
झोपावेसे वाटत नव्हते. काही खावेसे वाटत नव्हते. मनः स्ताप झाला होता.
पण हा सगळा मूड झोपायच्या आधी बदलून गेला. आम्ही दोघींनीही गाणे रेकॉर्ड
करायचे ठरवले होते ते केले आणि मूड छान झाला. कजरा मुहोबतवाला हे गाणे ठरले
याचे कारण सूर नवा ध्यास नवा यात एकीने हे गाणे
दोघींच्या स्वरात
म्हणले होते आणि ते ऐकल्यावर हेच गाणे आम्ही दोघींनि म्हणायचे ठरवले.
गाण्याची रंगीत तालीम झाली आणि गाणे रेकॉर्ड करताना माझ्याकडून चूक झाली.
मोतीयन की माला हे नीट म्हणले गेले नाही. नंतर एकदा गायले तेव्हा मेघनाने
परत एकदा रंगीत तालीम केली त्यात झुमका ना हार माँगू च्या ऐवजी झुमका ना
प्यार माँगू असे म्हणले. मी ते लक्षात आणून दिल्याने आम्ही दोघी खूप हासलो.
नंतर रेकॉर्ड करतानाही परत मेघनाने हार च्या ऐवजी प्यार गायले तेव्हा ते
माझ्या लक्षात आले होते पण कसेबसे हासू आवरले. ते हासू कसे आवरले ते माझे
मलाच माहीत. :D नंतर रेकॉर्डींग करताना चूक लक्षात आल्यावर परत एकदा गायचे ठरले.
नंतर परत एकदा माझ्याकडून चाल म्हणण्यात चूक झाली. परत एकदा जोरजोरात हासल्लो. :D :D
मी म्हणाले जाउदे. हे झाले आहे ते चांगले आहे आणि मुख्य म्हणजे आपण दोघी
कुठे अडखलेलो नाही. हे सर्व रेकॉर्डिंग होईतोवर रात्रीचा १ वाजला. मी
म्हणाले चला झोपुया उद्या कामाला जायचे आहे. तरी झोप कुठली यायला. तु जो
मेरे सुरमें सुर मिलाले गायले. अजून एक दोन गाणी मेघनाने म्हणली. ती मलाही
आवडली. कारण मला जुनी गाणी आवडतात. नवीन गाणीही काही चांगली असतातच पण ऐकत
नसल्याने कळत नाही. शनिवारी सकाळी तिने मला इंगल्स ला सोडले आणि ती पुढे
शार्लटला तिच्या घरी गेली. काम करत असताना माझ्या मनात
कजरा
मुहोब्बतवाला सारखे घोळत होते. उपहारगृहामधला सावळा गोंधळ मात्र
पहिल्यांदाच अनुभवला. भारतीय उपहारगृहाचे मालक अमेरिकन होते. त्यांनी म्हणे
बंगलोर ला जाऊन काही भारतीय फास्ट फूड शिकले असे म्हणतात. Rohini Gore
Wishing you All A Very Happy and Prosperous New Year 2018 ! :D
Sunday, January 07, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment