Wednesday, April 18, 2012

अनामिका ... (८)




अमित संजली बीचवर येतात. दुपारची वेळ असल्याने बीचवर अजिबातच गर्दी नसते. शिवाय शनिवार रविवापैकी पण वार नसतो. गप्पा मारत मारत समुद्राच्या जवळच्या वाळूत दोघे फिरतात. थोड्यावेळाने वाळूतच एके ठिकाणी येऊन बसतात. अमित म्हणतो 'मला तर अजूनही खरे वाटत नाही की तू मला भेटलीस' ....मला पण! संजली म्हणते. वाळूवर बसून संजली इकडे तिकडे बघत असते. आजुबाजूला पडलेले शिंपले वेचते. अमित त्याच्या डाव्या तळहाताकडे बघत असतो. मधूनच उजव्या हातावरही बघतो. तेव्हढ्यात संजलीचे लक्ष त्याच्याकडे जाते. काय बघतोस? भविष्य? तुला कळते का हातावरून भविष्य? हो. थोडेफार कळते. पूर्वी काही पुस्तके आणून वाचली होती. असे म्हणल्यावर संजली उत्साहात तिचा डावा हात पुढे करते आणि म्हणते 'ए बघ ना माझे भविष्य? काय लिहिले आहे? " अमित तिचा डाव हात हातात घेतो आणि डाव्या तळहातावरच्या रेषेंवरून नजर टाकतो मग परत स्वतःच्या तळहातावर बघतो आणि हासतो. तुझा दुसरा हात बघू. संजली दुसरा तळहात पुढे करते. अमित तिचे दोन्ही तळहात जवळजवळ घेतो आणि काही रेषा दाखवतो आणि गालातल्या गालात हासतो. काय झाले? संजली विचारते. तुझ्या नशिबात प्रेमविवाहाचा योग नाहीये. कारण की ही रेषा मध्येच तुटली आहे. "हो! कोणती रेषा? " "ही बघ ही रेषा. ही जर तुटली नसती तर हा योग होता. " ए ए तुझा हात बघू ना! तुझा आहे का हा योग? असे म्हणून अमितचे दोन्ही तळहात जवळ घेऊन रेषा बघते आणि म्हणते रेषा दिसत आहेत पण खूप पुसट आहेत असे म्हणून अमितकडे बघते तर अमित तिच्याकडेच बघत असतो. काही क्षणांसाठी दोघांची नजरानजर होते आणि त्याचवेळेला संजलीच्या असे लक्षात येते की हातावरच्या रेषा बघण्यासाठी आपण अमितच्या खूप जवळ येऊन बसलो आहोत. ती पटकन बाजूला सरकते आणि आजुबाजूला पाहते. आजूबाजुला कोणीही नसते. ती पटकन उठून उभी राहते आणि म्हणते "चल चल जाऊ या आपण" अमित म्हणतो "जाऊ या, फक्त ५ मिनिटे बस. मग निघूच" परत संजली त्याच्याजवळ बसते. काही वेळ कोणीच काही बोलत नाही. संजली वाळूतच रेघोट्या मारत बसते. अमित तिच्याकडे बघून म्हणतो संजली या हिरव्या साडीत तू खूप सुंदर दिसत आहेस. संजली त्याच्याकडे बघून हासते आणि त्याला धन्यवाद देते.












थोड्यावेळाने दोघे निघतात व अमित विचारतो चल आपण जेवू या. कुठे जेवायचे? संजली म्हणते नको. मला भूक नाहीये. उशीर झाला आहे. लग्नघरी माझी खूप वाट बघत असतील. अमितही म्हणतो चालेल. मलाही विशेष भूक नाहीये. टॅक्सी करून अमित संजलीला तिच्या लग्नघरी नेऊन सोडतो. टॅक्सीतून उतरताना संजली अमितला म्हणते की मी तुला एक मिस कॉल देईन. वेळ असेल तर तू मला फोन कर. चल बाय. मजा आली खूप. मी खूप आनंदात आहे. मी पण! अमित म्हणतो. संजली म्हणते मी पुण्याला गेल्या गेल्या अनिलला तू भेटल्याची बातमी देणार आहे. अमित म्हणतो नको. आता काहीच बोलू नकोस. पुढच्या वर्षी मी भारतात येईन तेव्हा तुझ्या घरी नकी येईन सर्वांना भेटायला. बरं मला एक सांग मी तुला फोन केला तर चालेल ना? संजली म्हणते हो हो चालेल. फोन सतत माझ्याकडेच असतो. माझ्या मैत्रिणींशी बोलायला मला सतत फोन लागतोच. शिवाय अनिलही फिरतीवर असतो. त्यामुळे आणि आत्याबाईंना काही बरे नाहीसे झाले की डॉक्टरांना फोन करण्यासाठी मला फोन सतत माझ्याकडेच ठेवायला लागतो. अमित म्हणतो चल तर मग बाय! मलाही खूप आनंद झाला आहे. मी पण निघण्याच्या तयारीला लागतो घरी पोहोचलो की. टॅक्सी यु टर्न घेते आणि अमितच्या घरच्या मार्गावर जाण्याकरता निघते.









अमित मनातल्या मनात खूपच सुखावलेला असतो. त्याच्या मनावरचे ओझे हलके झालेले असते आणि तिकडे संजली पण एका वेगळ्याच उत्साहात लग्नघरात प्रवेश करते. सर्वजणी म्हणतात अगं संजली कुठे होतीस इतका वेळ. चल लगेच जेवायला. आम्ही सगळ्या जणी थांबलो आहोत तुझ्यासाठी. ही आपली जेवायची शेवटची पंगत आहे. आणि काय गं इतकी आनंदात का आहेस? काय झाले? संजली म्हणते छे गं , कुठे काय? काही नाही. चला गं मी जरा फ्रेश होऊन येते असे म्हणून संजली साडी बदलायला आत जाते व थोड्याच वेळात फ्रेश होऊन सलवार कुडता घालून बाहेर येते.





क्रमशः या पुढील कथा लिहायला वेळ लागेल कारण की कथा पुढे कशी न्यायची याचा मला थोडा विचार करावा लागेल.

2 comments:

Anonymous said...

पुढील भाग लवकर post करा plz......

rohinivinayak said...

ho ho,, lavakarch taken,, he varsha sampat aale aahe,, tyamule January madhe mi nakki post karen next part,,tumhala hi katha aavdaleli disat aahe he vachun khupach chhan vatat aahe mala,, pudhil bhagavar vichar karayla survat karte aani lihun takte lavkarach :)