Thursday, February 16, 2012
वास्तू (२)
माझ्या आठवणीतला पहिला पलंग तीन रुंद जाड फळ्यांचा होता. काही अंतरावर दोन बाजूंना लोखंडी दोन स्टँड होते त्यावर या तीन मोठ्या रंद आणि जड फळकुट्या टाकायच्या की झाला पलंग! त्यावर तीन गाद्या. या पलंगावर आजोबा झोपत असत. आमच्या ४ गाद्या फरशीवरच एकावर एक गुंडाळून ठेवल्या जात व त्यावर बेडशीटा पांघरल्या जात. हे सर्व भिंतीच्या एका कडेला लावत असू. त्याच्या बाजूला एक सतरंजीवर एकावर एक उशा ठेवून त्यावर पण एक बेडशीट घालत असू. बेडशीत पूर्वी पलंगपोस असेही एक नाव होते. त्यानंतर आमच्या घरी दोन सनमायका लावलेले दिवाण आले. हे दिवाणही दुकानात जाऊन विकत घेतले नव्हते. आईबाबा दोघेही शिकवण्या घेत असत. त्यातल्या काही शिकवण्या घरी जाऊन शिकवत. त्यात एक बाई होत्या त्यांच्या दोन मुलांना बाबा घरी जाऊन शिकवायचे. त्यांच्याकडे एक ६ फूट मोठा दिवाण होता व एक सिटी होती. तीही अशी सनमाईका लावलेली छान होती. त्यांच्या नातू ६ फुटापेक्षाही उंच होता त्यामुळे तो दिवाण त्यांना विकायचा होता. ती सिटी पण त्यांना काढून तिथे सोफा आणायचा होता. तर बाबांना त्यांनी विचारले तुम्ही विकत घ्याल का? मग बाबांनी विचार करून त्यांना सांगितले की आम्ही घेऊ, पैसे किती द्यायचे. तर म्हणाल्या तुम्ही द्याल ते. ५०० रुपयामध्ये हे दोन्ही दिवाण आमच्या घरी आले तेव्हा आम्हाला काय आनंद झाला होता. हे दिवाण अजूनही आमच्याकडे आहेत. खूप सोयीचे असे हे दिवाण होते. त्यांना आतून ठेवण्याकरता जागाही होती. मग मोठा दिवाण आजोबांसाठी आणि छोटी सिटी म्हणजेच दिवाणच तो! तो आईकरता दुपारी तिला थोड्यावेळासाठी पडायला. या दिवाणावर आम्ही काही वेळा दुपारी तिघी मिळून झोपायचो. अर्थात तेव्हा तो आम्हाला तिघींनाही पुरत होता.
दोन दिवाण आले तरीही आम्ही चौघे खालीच गाद्या घालून झोपायचो. आम्ही जशा मोठ्या झालो, शाळेत जायला लागलो, तशी आईने आम्हाला कामे वाटून दिली होती. एकीने गाद्या घालायच्या तर एकीने त्या सकाळी आवरून ठेवायच्या. एकीने चहा करायचा तर दुसरीने चहा झाल्यावर कपबशा विसळायच्या. एकीने जेवणाची पाने घ्यायची तर दुसरीने उष्टी खरकटी काढायची. यात आमच्या दोघींच्यात चुरस चालायची ती म्हणजे कंटाळवाणे काम दुसरीवर कसे ढकलता येईल बरे! यात काही वेळेला सकाळी उठल्यावर जर माझी बहीण आधी उठलेली असेल आणि दात घासत असेल तर मी हळूच गुपचूप सर्व पांघरूणाच्या घड्या घालून गाद्या लावून मोकळी झालेली असायचे. आईला वाटायचे ही अजून झोपलीच आहे. माझी बहीण दात घासून व चहा पिऊन बाहेर येत्ये तर गाद्या काढलेल्या तिला दिसायच्या. मग रात्री गाद्या घालण्याचे कंटाळवाणे काम तिच्यावर येऊन पडायचे. मग तीही सुट्टीच्या दिवशी दुपारचा चहा असाच गुपचूप येऊन करायची. भांड्यांचा आवाज न करता चहाचे आधण ठेवायची. एकीकडे दूध तापत ठेवायची. मी स्वयंपाकघरात गेले की ती चहा कपबशी मध्ये गाळताना दिसायची म्हणजे कपबशा विसळण्याचे कंटाळवाणे काम माझ्यावर येऊन पडायचे. यात मग आमच्या दोघींमध्ये भांडणे व्हायची. नंतर आईने कामाचा नियम बदलला. जे काम घ्याल ते पूर्ण करायचे. मग हा नियम जरा कठीण जायला लागला. आईला नियम बदलायला लावला आणि मग आमच्यात भांडणे न होता समजुतदापणाने कामाची वाटणी होऊ लागली.
एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सर्व आत्येमामे भावंड एकत्र असायचो. आमच्या घरी सर्वांचाच अड्डा असायचा. कोणी कॅरम खेळतयं तर कुणी बुद्धीबळ तर कोणी पत्ते. यात एक वेगळा खेळ खेळायचो तो म्हणजे जगप्रवास. हा जगप्रवास आम्ही पुढच्या खोलीला ज्या पायऱ्या होत्या त्यावर बसून खेळायचो. त्या तीन पायऱ्या म्हणजे आमची जीप. सगळ्यात खालची पायरी म्हणजे पहिली सीट व त्यावरच्या दोन पायऱ्या म्हणजे मागच्या दोन सीटा! त्यात एक मामेभाऊ जीप चालवायची ऍक्शन करायचा. वळण आले की ओरडायचा वळण आले बरं का! मग आम्ही सर्व वळण आले की कसे एका बाजूला कलले जातो त्याप्रमाणे ऍक्शन करायचो. वळण संपले की परत पहिल्या स्थितीमध्ये बसायचो. प्रवास करता करता रात्र झाली की भाऊ म्हणायचा तुम्ही सर्वांनी झोपा आता. मी एकटा जीप चालवतो. या प्रवासामध्ये आम्ही मध्ये खाण्याकरता कोको व बोर्नव्हीटा आईच्या नकळत घ्यायचो. आईला कळायचे नाही बोर्नव्हीटा आणि कोको इतका लवकर का संपतो ते! बुद्धीबळामध्ये सुद्धा खेळताना आधीच ठरवायचो मारामारी की सिरियस खेळायचे ते! मारामारी असली डाव ५ मिनिटात संपायचा. एकाने एक प्यादे मारले की दुसऱ्याने लगेच उंट मारायचा. एकाने हत्ती मारला की एकाने घोडा उडवायचा. शेवटी फक्त राजा शिल्लक राहायचा. खटाखट मारामारी. खूप हासायचो. मागे शह असल्याशिवाय मारायचे नाही या नियमाने खेळलो सिरिअसली तरी धीर संपून शेवटी मारामारी ठरलेली! कॅरममध्ये सुद्धा धमाल यायची. यात बाकीच्या खेळापेक्षा गेम हा खेळ जास्त चालायचा. एक हारला की त्यावर लगेच दुसरा बसायचा. काहीवेळा तर अगदी १/१ या मार्कांप्रमाणे टफ गेम चालायची. नीट खेळता आले नाही तर म्हणायचो हात अजून तापला नाहीये. तो तापला की मग अगदी खूप अवघड सोंगटी पण कट मारून सहज छान जायची.
आई आमचे सर्व ड्रेस घरीच शिवायची. वेगवेगळ्या फॅशनचे फ्रॉक, स्कर्ट, शाळेचा गणवेश, पंजाबी सूट. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या शिवायची. फुग्याचा बाह्या, उडत्या बाह्या, मॅगी व स्लिवलेस आणि गळे पण गोल, चौकोनी, पंचकोनी, व्ही, बंद गळा असे बरेच प्रकार आईने छान छान शिवलेले आहेत. हे सर्व ड्रेस बेतून झाल्यावर जे कापड उरायचे ते सर्व आई गुंडाळ्या करून ठेवायची. त्याकरता एक मण्यांची बास्केट सारखी दिसणारी पर्स होती त्यात या सर्व गुंडाळ्या ठेवायची. त्यामुळे नातेवाईकात व मित्रपरिवारात कुणाकडे बारसे असेल तर आमच्याकडून घरी शिवलेला बाळंतविडा असायचा. आईने अनेक प्रकारचे छान छान बाळंतविडे शिवलेले आहेत. पूर्वी फोटोचे एवढे अप्रुप नव्हते नाहीतर कितीतरी फोटो झाले असते बाळंतविड्याचे. नंतर बघताना किती छान वाटले असते ना! बाळंतविड्याचा फोटो व त्याखाली बाळाचे नाव लिहिले असते, त्याची जन्मतारीख लिहिली असती व त्याचाही एक फोटो बाजुला लावला असता. हा एक छंद म्हणून किती छान झाला असता ना!
क्रमश:
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
Rohini Taai, aaj sakali sakali tumcha lekh vachun itka prasanna vattay ki kaay saangu! :)
Lahanpanchya athvani kitti goad astat...anhi purvichya kaali khare-kure khel (mhanjey tv-video games nastana) khelnyaat ji majja asaychi....tya athvaani aplyala janma bhar lakshaat rahatil.
Tumcha jeepcha khel vachun khup hasu ale :) :) valan ale ki sarva valaycha hey drushya tar agdi majhya dolya samor ale! Tumhi kharach khup sundar varnan karun saangta anhi vachnaryala agdi tya kaalat neta. Budhibalatli maramari vachun pan gammat vatli. :)
Amhi bhavanda suttyan madhye bhetlo ki carrom, patte, kho-kho, lapa-chupi, pakda pakdi, fugdi, bhatukli ase kahi na kahi divas bhar khelaycho...avismarniya divas hote te! :)
Gharatli kaama ek-mekamavar taknyacha prayatna karne hey agdi pratek ghaarat hot asel bhavandan madhye :) amcha ghari pan hot asat anhi ata athvun aplyach baalishpanavar hasu yeta.
Tehvha gharaat vastu kami asaychya mhanun tyanchi kimmat va kautuk khup vatayche. Malahi amchya ghari ghetlelya sarva vastunchya kevdhya athvani ahet! :)
Tumhaala khup khup maanapasun thanks...tumchya hya sarva anmol athvani share kelya baddhal.
- Priti
priti,, tula ya aathvanii aavadlya aani tuzyahi aathvani tula aathvalya he vachun khup chhan vatle ga!!! kharach na purvi kiti chhan hote na, agadi mojke hote mhanunach saglyachi kimmat hoti,, aata ti gammat ti maja rahili nahi yache karan aata manat yeil tase aapan kenvhahi kahi gheoo shakto tyamule tyatla aanand kami hote,,, kashache kahi aproop ase vatat nahi,, hach aanand aata aapan sagle harvun baslo aahot na? thanks a lottt priti!!
Khara ahe..Agdi majya maanatla bollat! :)
Anhi tumcha hey post vachun majhya maanat itkya athvaani jaagya jhaalya ahet ki aajcha divas tyancha madhye khup sunder jaiel.
Majhi aai pan majhya sathi gharich sundar frocks va skirts shivaychi :) punjabi dress var sundar embroidery karaychi...majhya ek odhanivar tiney itka najuk kaam kele hote ki jo baghel toh vicharaycha. Ekhadya frock kivva skirt sathi chaansa kapad anla ki kittek divas tyacha kade nusta baghun pan itka ananda vyaycha! Tumchya aai sarkhech majhi aai pan urleli kapda jama karun balantavide banvat asat...kharach photo kadhun thevayla have hote..khup chaan collection jhaala asta. Majhi aaji junya cottonchya sadyanchya godhadya karat asat, tya mau godhdyanchi uub maala ajun athavtye. :)
- Priti
रोहिणी ताई,तुमच्या बालपणीच्या जगात वास्तू १ आणि वास्तू २ मधून मस्त फेर फटका मारून आले.खूप छान वाटले हे लेख वाचून.'बालपणाचा काळ सुखाचा!!'हे अगदी खर आहे.तुमची लेखनशैली डोळ्यापुढे चित्र उभ करते.लहानपणाच्या आठवणीमध्ये काही काळ हा दिवसभराच्या धावपळीतून निवांतपणा देतो.....हे मौलाचे क्षण तुम्ही सुंदर शब्दात इकडे मांडलेत त्याबद्दल आभारी आहे.....मी पण थोड्या वेळासाठी लहान झालेले वाचताना...:)
are vaa tuzi aai pan shivan shivaychi he vachun chhan vatle! hoho godhdyanchi uub kaahi veglich hoti, mausar chhan vataychya panghartana,,
shreeya,, tuza abhipray vachun khup utsah aala ga mala!! tula sarv varnan aavadale he vachun mast vatle,, thanks a lottt,,, ajunahi pudhe vastu che varnan yenar aahe,
Post a Comment