Saturday, June 18, 2011

१८ जून २०११

उन्हाळा असल्याने लवकर जाग येते. सहाच्या सुमारास छान उजाडते. आमच्या बेडरूमच्या खिडकीबाहेरच एक झाड आहे तिथे पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. हे पक्षी काय काय गप्पा मारत असतात, एकमेकांना साद घालत असतात. मी त्यांच्या गप्पा टेप केलेल्या आहेत. हे पक्षी साधारण चार ते पाचच्या सुमारास जागे होतात आणि चिवचिवाट करतात.






आज जाग आली आणि खिडकीतून डोकावले तर फटफटले होते. उत्साह असला तर बाहेर जाते तळ्यावर आणि सूर्योदय पाहते. शिवाय बदकांना ब्रेडही घालते. आज बाहेर पडले तर थोडे आभाळ भरून आले होते, वाटले आज सूर्योदय पहायला मिळतोय की नाही कुणास ठाऊक. पण खूप छान सूर्योदय होता आज. आभाळामुळे आकाशात थोडे रंगही आले होते. सूर्योदयापूर्वीचा आकाशातील चंद्र पाहिला. बदकांना ब्रेड घातला. बदकीण आणि पिल्ले यांची दिवसभरात आमच्या अपार्टमेंटच्या समोरच्या हिरवळीवर बरेच वेळा चक्कर असते. फोटो घेतले.






आज पहिल्यांदा उपवासाचे सर्व पदार्थ बनवण्याचा मुहूर्त लागला. खरे तर अमेरिकेत राहिल्या आल्यापासून आमटी भगर, बटाट्याची भाजी वगैरे बनवण्याचा पहिल्यांदाच योग पहिल्यांदाच आला. तसे मी कालच ठरवले होते की आज उपवासाचा मेनू बनवायचाच. जसे की शनिवार रविवार बाहेर जेवणे नाहीतर इडली सांबार, डोसे असे काहीतरी वेगळे असतेच. पण आज उपवासाचा मेनू होता. आम्ही दोघे कोणतेही उपास करत नाही त्यामुळे केलेही जात नाही. उपवासाचे सर्व पदार्थ मात्र खूप आवडतात. भारतात असतानाही बाकीचे उपवास करायचो नाही कधी, फक्त आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र करायचो. उपवासाचे पदार्थही किती छान आहेत आपल्याकडे.






दुसरे म्हणजे आजकाल मी माझ्या आवडीची गाणी सीडी वर रेकॉर्ड करून डिव्हिडी प्लेअरवर ऐकते मनसोक्त. आज पदार्थ बनवताना एकीकडे गाणीही लावली होती. छान वाटले. जसे की मला स्वयंपाक करताना गाणी ऐकायला आवडतात तसेच सोफ्यावर किंवा पलंगावर पडून डोळे मिटून गाणी ऐकायलाही खूप आवडतात. आज मी एक छान पुस्तकही वाचायला घेतले आहे. बरेच वाचून झाले. मन खूप ताजेतवाने झाल्यासारखे वाटत आहे या पुस्तकामुळे. आज संध्याकाळ उलटल्यावर मी तळ्यावर परत एक चक्कर मारली. ही बदकीण व तिची पिल्ले कुठे झोपतात हे पाहिले. तळ्यावर चक्कर मारताना दिसली. एका खूप छोट्या झुडुपाखाली सगळी एकमेकांना चिकटून बसली होती. शांतपणे. ही बदकीण व तिची पिल्ले मला अजिबात घाबरत नाहीत. त्यांना माझी सवय झाली आहे.





आज रात्री स्वयंपाक नव्हताच. दुपारचे उरलेले गरम करून खाल्ले. जेवणानंतर ब्ल्युबेरी खाल्ली. आजचा दिवस खूपच वेगळा आणि छान गेला. खूप आनंद मिळाला आज मला.

5 comments:

Anonymous said...

Rohini Tai, chaan vatla tumcha divas kasa gela hey vachun. Kharach aplya jevnaat upasache padartha kitti chaan-chaan ahet pan farsey karna hot nahit. Me pan ekda tharvun upavasa bet banven, amha doghana khup avadto, kharach danyachi amti - bhagar khaun tar kittek varsha jhaali! Me aajach Swadcha sabudana anla tumchya sabudanya khichadichya comments madhye tumhi recommend kela hota, me kahi divasan purvicha vachla.

Aplya avdichi gaani aikli, kivva ek chaan pustak haati lagla ki kharach divas kitti chaan jaato. Ervi hya chotya-chotya goshti gup-chup maala khush karun jaatat pan tumhi ithe lihilya mulay maala tyacha mahatva jaanvayla lagla ahe.

Tumhi 'Taaryancha bait' pahila ka aplimarathi var? chaan ahe. amhi aajach pahila, fakta advertisement faar ahe madhye madhye, tyancha kantala yeto. Pan picture va tyachi story anhi sarva kalakaranchi acting pan chaan ahe.

rohinivinayak said...

Tumcha savisttar pratisad vachun khupch chhan vatle mala!! dhanyawaad. mi nahi ajun pahila to chitrapat pan aata pahin nakki.

संजीव कुलकर्णी said...

मज्जा आहे न काय! उपवासाचे काय काय खाल्ले ते सांगा की!

Dhanwanti said...

रोहिणीताई,
छान वाटले वाचून.. उपासाचा मेन्यू मी नेहमीच करते. म्हणजे भगर, शेंगदाणे घालून कोकमाची आमटी, आणि बटाट्याचे पापड असे. भगरीला दुसरा ऑप्शन म्हणजे साबुदाण्याची उसळ. एकदाच फक्त उपासाचे थालीपीठ केले होते. नीट जमले नाही. असो.
मलाही स्वयंपाक करता करता आवडती गाणी ऐकायला फार आवडते. पण बर्याचदा, मी पूजेचे श्लोक म्हणते रामरक्षा, अथर्वशिर्ष्य, शिवस्तुती वगैरे. पण आवडीची गाणी राहून जातात. एखाद संध्याकाळी.. झाडांना पाणी घटना मात्र जरूर एकतेच ऐकते. फार प्रसन्न वाटते.
तुझ्या अपार्टमेंटखाली बदकिण आणि तिची पिल्ले, तळे वगैरेच्या तुझ्या वर्णनाने मी मोहरून गेले मात्र. थोडी असूयाही स्पर्शून गेली मनाला. वाटले तिथे तुझ्याच शेजारी राहायला असते तर आपण दोघी मस्त तळ्यावर जाऊन फेरफटका मारून आलो असतो. सकाळी सकाळी मोर्निंग वॉकला तळ्यावर जाताना मला कोण मजा आली असती. असो. आज हे छान वाचून मनाला तीच प्रसन्नता आली आहे, असे वाटते आहे.
आणि हो, पुस्तक वाचनाच्या बाबतीतला वेडेपणा माझ्याकडे अतिभयानक आहे, असे म्हंटले तरी वावगे होणार नाही. आणि खरचच एखादे चांगले पुस्तक वाचतात, वाचल्यावर मनाला जो शांतवा मिळतो किंवा विचारांना एक प्रकारचा संथपणा येतो, हा अनुभव विलक्षण सुंदर आहे. आणि असे अनुभव रेअर असतात, ह्या मताची आहे मी. चला, तुझा दिवस मस्त गेला. मला वाचून सुद्धा खूप आनंद मिळाला आहे.
- सौ.अवनी

rohinivinayak said...

संजीव कुलकर्णी, मी उपवसाचे पदार्थ बनवले होते ते असे, भगर, दाण्याची आमटी, उकडून बटाट्याची भाजी, खमंग काकडी, नारळाची चटणी. अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

अवनी, खरच तू माझ्याजवळ रहायला असतीस तर खूपच मजा झाली असती. आपण दोघींनी मिळून खाण्यापिण्याचे पदार्थ बनवले असते. बदकांना ब्रेड घातला असता. इथे तर कुणीच नाही गं. तुझा प्रतिसाद वाचून खूपच छान वाटले. धन्यवाद!!