Monday, March 10, 2014
Sunday, March 09, 2014
९ मार्च २०१४
आजचा दिवस भरपूर कामाचा आणि तितकाच खूप आनंद देणारा होता. शनिवार रविवार नेहमीच कामात जातो पण आज स्वयंपाकघर पूर्णपणे आवरायचे ठरवले म्हणजे ओट्यावरची आणि खालची कपाटे आवरण्यात ४ ते ५ तास लागतात. झाडून पुसून सर्वच त्यात बरण्या पण आल्या स्वच्छता आणि भारतीय ग्रोसरी पैकी काय संपले आहे न काय नाही इत्यादी. तसेच कालच ठरवले होते की आजचा सूर्योदय बीचवर जाऊन पहायचा, कारण की हवा स्वच्छ व सुंदर होती.
कालचा दिवस पण असेच काही ना खरेदी करण्यात व ग्रोसरी पण केल्याने झोपायला उशीर झाला होता म्हणून ठरवले होते की अट्टाहास करून लवकर उठून जायचेच असे नाही. सहज जाग आली तर जायचे. इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर आपोआप जाग येते याचे प्रत्यंतर आज आले. मला व विनायकला आपोआप जाग आली आणि सूर्योदयाच्या सुमारास आम्ही बीचवर जाऊन पोहोचलो. तशी थोडी घाईच झाली. उठलो, ब्रश केला, चहा घेतला आणि लगेच तातडीने निघालो. झुंजुमुंजू झाले होते. मी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचताच क्षणी लहान मुलासारखी धावत सुटले. कारण की मला सूर्योदयापूर्वीचे क्षण अजिबात वाया घालवायचे नव्हते. आज बऱ्यापैकी गरम होते. मागच्या वेळेस चांगलीच थंडी होती. आज आकाश निरभ्र होते. समुद्राच्या मागील आकाश हळूहळू लालसर शेंदरी होत होते. काही क्षणातच लाल चुटूक सूर्य डोकावला. जसे काही म्हणाला "मी आलो" किती सुंदर दिसत होता. हळूहळू करत सूर्याचा लाल गोळा समुद्राच्या वर येत होता. आज मनासारखा लालबुंद सूर्य पहायला मिळाला. समुद्रातून वर येताना इतका काही सुंदर दिसत होता. काही क्षणच हे लालपण टिकले. नंतर पिवळसर शेंदरी आणि नंतर पांढरा गोळा झाला. त्याला हात जोडून नमस्कार केला. समुद्रकिनारी चालण्याचा मूड होता पण नाही चाललो. कारण की जितके चालत पुढे जाता तितके मागे यायला खूप कंटाळा येतो आणि घरी जाऊन आजची ठरवलेली कामे करायची होती.
घरी आल्यावर २ तास साफसफाई केली. अंगोळपांघोळ करून पिझ्झा खायला बाहेर गेलो. नंतर अशीच काही ना काही कामे करून घरी परतलो. थोडावेळ आडवे पडल्यावर जरा बरे वाटले. उठून परत चहा घेतला. आणि परत कामाला सुरवात. खरे तर काम करण्याचा खूपच कंटाळा आला होता आणि दमायलाही झाले होते. असे वाटले की छान हवा आहे तर बाहेर नदीवर फिरायला जाऊन आजचा सूर्यास्ताचाही फोटो घेऊ, पण गेलो नाही. आज रात्री गरमगरम साबुदाणा खिचडी खाल्ली त्यामुळे खूप छान वाटत आहे. खूप काम झाले की असे काहीतरी आवडीचे चमचमीत खायला आम्हाला दोघानांही खूप आवडते. जेवायलाही पोटभरीची होते. नाहीतरी नेहमीचे असतेच , आज जरा वेगळे म्हणून केली होती.
आज मात्र उठायच्या आधी मला एक खूप विचित्र स्वप्न पडले. स्वप्न चांगलेच होते पण त्याचा क्रम विचित्र होता. एका इमारतीच्या बाल्कनीत आम्ही दोघे उभे आहोत आणि एकदम हिरवा प्रकाश पडलेला आहे. मी म्हणले चल लवकर सूर्योदय बुडेल नाहीतर. मग मी व विनायक आमच्या कारमध्ये बसून निघालो. रस्ता नेहमीचा नव्हता. मोठा ब्रीज कधीच लागत नाही. तो स्वप्नात दिसला आणि समुद्रावर उतरताना रिक्षात बसलेलो होतो. आणि समुद्रावर भरती होती. ती भरती इतकी होती की रिक्षातून खाली उतरताना पाय ठेवला तर तो समुद्रातच. मी म्हणाले अरे आपण इथे कुठे आलो ? हा तर मुंबईचा समुद्र आहे. सगळीकडे गजबजाट होता. मासे विक्री चालू होती. आणि समुद्राच्या आजुबाजूला लालसर छटा पसरली होती. थोड्यावेळाने एकदम सूर्यच वर आला. निराशा झाली. एकदम पांढरा सूर्य कसा काय? मग आम्ही दोघांनी विचार केला की आलोच आहोत तर सकाळचा समुद्र तरी बघू. परत सगळीकडे शांतता. नंतर काहीवेळाने एकदम अंधार. नंतर कळाले की ही तर ढगांची किमया आहे आणि स्वप्न पूर्ण होताच मला जाग आली आपोआपच आणि खिडकीतून बाहेर बघितले तर अंधार होता. घड्याळात पाहिले तर पावणेसात झाले होते आणि सूर्योदय होता साडेसातला. मी उठले आणि विनायकला म्हणाले चल. तर तोही जागाच होता. पटापट आवरून निघालो आणि समुद्रावर पोहोचलो तर ५ मिनिटात सूर्योदय झाला. पण काही म्हणा पहिल्या सूर्यास्ताची मजा काही वेगळीच होती. म्हणतात ना पहिला कोणताही अनुभव चांगला आणि कायम लक्षात राहणारा असतो. आज लालबुंद सूर्य पाहण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली. पण आज एक कळाले की हा लाल रंग सूर्य वर आला की काही सेकंदच टिकतो. हळूहळू लगेच तो शेंदरी व्हायला लागतो. आजचा सूर्य तर क्षितीजाची रेषा छेदून वर आला होता. आणि जेव्हा जेव्हा अगदी थोडा सूर्य की जो लाल होता तो सुरवातीला जेव्हा त्याची एंट्री झाली ना आहाहा काय दिसत होता. सुंदर. अजूनही तो लालचुटूक सूर्य डोळ्यासमोरून हालत नाहीये.
Wednesday, March 05, 2014
५ मार्च २०१४
आजचा दिवस थोडासा त्रासदायक पण तरीही आनंदाचा होता. विनायकबरोबर आज मी इथल्या विद्यापीठात गेले. तिथे त्याचे काही काम असते तेव्हा तो मला नेहमी म्हणतो चल माझ्याबरोबर कारण की विद्यापीठात मला नेहमी काहीतरी वेगळे मिळून जाते आणि लगेच मला "क्लिक" करायला संधी मिळते. स्प्रिंग सुरू झाला आहे त्यामुळे त्याची पालवी फुटून वेगवेगळी फुले पण दिसतात. काही वेळा जाते आणि काही वेळा म्हणते नको, मला आता फोटोग्राफीचा कंटाळा आला आहे. आज बरेच म्हणजे बरेच महिन्यांनी विद्यापीठात गेले. नेहमीप्रमाणे मला आजही फुले दिसली. खरे तर ही फुले मी यापूर्वीही घेतलेली आहेत पण आज पावसात भिजलेली व झाडाखाली सडा पडलेली दिसली. त्यामुळे खटाखट त्याचे फोटोज घेतले. घरी आले आणि संगीतके सितारे या ग्रुपमध्ये कोणती थीम आली आहे ते बघितले. शब्द होता अंगडाई ...
या अंगडाई शब्दाने माझी पूर्ण दुपार डोके खाजवण्यात गेली. ली प्यारने अंगडाई दिवाना हुवा बादल हे गाणे आधीच कोणीतरी टाकले होते त्यामुळे ते गाणे गेले मला हे गाणे खूप म्हणजे खूप आवडते. असे आवडते गाणे टाकायला मिळाले नाही तर चुटपुट लागून राहते. गुगलींग केले. त्यात "कजरा रे कजरा रे" गाणे सापडले. तेही कोणीतरी टाकले होते. पूर्वी मी गाणे पाहिले होते पण आज पाहिले आणि इतके काही आवडून गेले की परत परत पाहिले. एक तर आवडता अमिताभ होता आणि ठेकाही मस्त जमून गेला होता. गुलजार यांचे शब्द तर काय त्या त्या गाण्याच्या संदर्भात फिट्ट असतात. मला गुलजारची गाणी आवडतात. एकूणच या गाण्याचे सर्व छान जमले आहे. काही काही गाणी अशी असतात की सगळे छान जमून जाते. शेवटी एक गाणे मिळाले ते टाकले, का करू सजनी आए ना बालम, यात अंगडाई शब्द आहे. अंतऱ्यामध्ये "भोर भई और सांज ढली रे, समयने ली अंगडाई" खरे तर गाणे मला खूप काही आवडत नाही. पण थीम मध्ये बसले म्हणून टाकले. हे सर्व करता करता ५ वाजायला आले आणि जाम भूक लागली. गरमागरम पोहे खायला केले. आणि नंतर आज घेतलेली फुले अपलोड केली. फुले नहेमीच खूप आनंद देवून जातात. प्रत्येकाची फुलण्याची तऱ्हा काही वेगळीच असते. आज पाऊस असल्याने त्यावर पावसाचे थेंब पडले होते त्यामुळेही ही फुले जास्त सुंदर दिसत होती. बऱ्याच फुलांचा झाडाखाली सडा पडला होता. काही झाडावरच कोमेजून गेली होती तर काही खाली पडलेली कोमेजली होती. ही अशी सुकलेली फुले पण किती छान दिसतात. त्यांचे सौंदर्य तर वेगळेच असते.
आज दिवसभर पाउस पडत आहे. उद्या आणि परवा तर जास्तच आहे. आज खरे तर मी दही बटाटा पुरी करणार होते, पण ती उद्या करीन. त्यात तयारीमध्ये खूप वेळ जातो.
Sunday, February 23, 2014
२३ फेब्रुवारी २०१४
आजचा दिवस कायम लक्षात राहील असा होता. थोडा गडबडीचा, तर थोडा दमणूकीचा तर आनंद देणारा अधिक असा होता. आज पहिल्याप्रथमच समुद्रातून सूर्य वर येताना पाहिले. सूर्यदर्शन खूपच छान झाले. आज मुख्य म्हणजे हवा चांगली होती. ढग नव्हते, वारा नव्हता, पाऊसही नव्हता. आज काहीही झाले तरी जायचेच असे ठरवले होते.
आमच्या घरापासून समुद्रकिनारा १५ मिनिटांच्या कार ड्राईव्ह वर आहे त्यामुळेच हे जमले. खूप दिवसापासून इच्छा होती ती पूर्ण झाली आणि हा सूर्योदय बघण्याचा अनुभव तर खूपच छान होता. नेहमीप्रमाणेच फोटोसेशन झाले पण तरीही प्रत्यक्ष सूर्याला वर येताना बघण्याचा आनंद काही औरच होता. दुसऱ्यादिवशी लवकर उठून कुठे जायचे असेल तर मला अजिबात झोप येत नाही तरी थोडी लागली. ३ वाजता जाग आली. घड्याळात बघितले तर अजून ३ तासांचा अवधी होता. आजचा सूर्योदय अजिबात हुकवायचा नव्हता. त्यामुळे जागीच राहिले. नाहीतर काहीवेळा पहाटे पहाटेच डोळा लागतो आणि एकदम उन्हे वर येतात. निघालो तर उजाडायला सुरवात झाली होती. तिथे पोहोचलो तर समुद्राच्या आजुबाजुला वर आकाशात गुलाबी रंग विखुरलेला दिसत होता. लालबुंद सूर्य अगदी थोडा दिसत होता. आज काय झाले होते की लालबुंद सूर्याच्या अगदी बरोबर पुढे ढगांचा एक मोठा पट्टा आला होता. आणि त्यामुळे तो त्यातून वर येईपर्यंत पिवळा कम शेंदरी रंगाचा झाला होता. पहाटे पहाटे फटफटले असे जे म्हणतात ना ते मस्त दिसत होते. ढगाच्या वर सूर्य हळुहळू वर सरकत होता.
आज आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले आणि जर पाऊस पडला असेल तर आकाशात निरनिराळे रंग जमा होतात असा अनुभव आहे. आज तसे नव्हते पण तरीही हळूहळू सूर्य वर येतोय आणि ढगामागूनही तो जेव्हा वर आला तेव्हा अगदी खास आपण त्याच्या दर्शनासाठी आलोय आणि त्याने दर्शन दिले आहे असे वाटत होते. अगदी काही सेकंदाने सूर्य एकदम पांढरा शुभ्र आणि तेजस्वी दिसला. त्या आधी सूर्यप्रकाशाची पिवळी किरणे पूर्ण समुद्रावर पसरलेली होती. एकूणच सर्व काही छान दिसत होते. साधारण तासभर आम्ही दोघे समुद्रकिनारी होतो. थंडी होतीच. फोटो काढताना हात पार गारठून गेले होते. पटापट येऊन कारमध्ये बसलो आणि हीटर चालू केला तेव्हा बरे वाटले. आल्यावर परत एकदा चहा घेतला.
आल्यानंतर डोसे करायचे होते जेवणासाठी. ते ठरवले नव्हते पण झाले. काल दुपारी विनायक ऑफीसला गेला आणि त्याला यायला थोडा उशीर झाला असे वाटले म्हणून मी भाताचा कूकर लावणार होते. कणिक फ्रीजमधून बाहेर काढली आणि स्वयंपाकाला सुरवात करणार होते तितक्यातच वि आला आणि मग दर शनिवारी आम्ही बाहेर जेवायला जातो त्याप्रमाणे गेलो. कूकरमधले तांदूळ पाण्यात बराच वेळ राहिल्याने मग त्यातच थोडे तांदुळ घालून उडीद डाळही भिजवली आणि आज मसाला डोश्याचा बेत झाला. बासमती तांदुळाचा डोसाही छान लागतो ते कळाले. आजचा मसाला डोसाही चविला छान झाला होता. उकडून बटाट्याची भाजी, नारळाची चटणी, सांबार आणि मोठमोठाले डोसे खायला खूप मजा आली. कालच्या जागरणामुळे दुपारी थोडे झोपणे झाले. काल सर्व ग्रोसरी आणि साफसफाई झाल्याने आज आता संध्याकाळी कुठेही बाहेर पडलो नाही.
आज संपूर्ण दिवस डोळ्यासमोर सारखा आजचा सूर्योदय येत आहे. आता यापुढे हवामान चांगले असेल तर जास्तीत जास्त सूर्योदय बघणार आहोत. आज एक जाणवले की मी सूर्यास्ताचे बरेच फोटो घेतले आहेत आणि त्याचा आनंदही खूप मिळाला आहे. पण आज मात्र उलटे झाले आहे. फोटोपेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रत्यक्ष सूर्योदय बघण्याचा आनंद मिळाला. सूर्यास्त बरेच जमवलेत. आता सूर्योदय बरेच जमवायचे आहेत.
आज जर सूर्याच्या समोर जर ढगांचा पट्टा नसता तर लालबुंद सूर्य बघायला मिळाला असता. वर लालबुंद सूर्य आणि त्याच्या तळाशी निळेशार पाणी , किती छान ना !
Wednesday, February 12, 2014
१२ फेब्रुवारी २०१४
आजचा दिवस घडामोडींचा होता. हिवाळ्यातली हिमवृष्टी आणि वादळे इथे अमेरिकेत होतच असतात. आमचे गाव या वादळाच्या पट्ट्यात कधीच येत नाही हे एका अर्थाने खरच खूप चांगले आहे. वादळाचा थोडाफार प्रभाव आमच्या शहरावर पडतो इतकेच. तसे तर आमच्या गावात हिमवृष्टी कधीच होत नाही. ९ वर्षात ४ वेळाच झाली आहे आणि ती सुद्धा महाभयंकर नाहीच. अगदी पहिला स्नो तर काय पडला पडला म्हणेपर्यंत गेला पण. नाही म्हणायला दुसरा स्नोफॉल म्हणजे २०११ मधला चांगला होता. तो एकच दिवस होता. १० दिवसापूर्वी पडला तोही जरा वेगळाच आणि आजचा तर खूपच वेगळा. या चार स्नो फॉलमध्ये बर्फाची वेगवेगळी रूपे पहायला मिळाली.
२०११ चा स्नोफॉल मात्र छान अनुभवायला मिळाला. त्यात मी स्नो डॉल, स्नो गर्ल आणि स्नो मॅन बनवले होते. भुसभुशीत बर्फ पडला तर चांगले वाटते. पण जरा का तसा न पडता आईस रूपासारखा पडला तर कटकट होऊन बसते. आईस म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये जसा असतो तसा बर्फ पडतो. हवेतून कापसासारखा हलका पांढराशुभ्र पडला तर त्याची मजा असते. आमच्या राज्यात बाकीच्या शहरात दणाणून हिमवृष्टी झाली आहे. हवामान चॅनल वर वीज जाईल असा संदेश देत होते. पण तरीही आपल्या शहरात जाणे शक्यच नाही म्हणून मी तशी निर्धास्त होते. सकाळी उठल्यावर विनायक ऑफीसमध्ये चालतच गेला. जवळच ऑफीस असल्याने ते शक्य होते. गाडीवर बर्फ जमा म्हणजे चिकटून बसला होता. तो खरवडायलाच लागणार होता. आमच्याकडे खरवडण्यासाठीचे हत्यार नव्हते. तसे ते मुद्दामहून घेणे कधीच झाले नाही कारण की तशी वेळच येत नाही . त्यामुळे तो चालत गेला. चालण्यासारखी परिस्थिती होती कारण की जमिनीवर बर्फ साठलेला नव्हता. यावेळी तो फक्त झाडांवरच लपटलेला दिसत होता. फेसबुकावर येरझाऱ्या आणि बाकीची भाजी आणि नेहमीची फोनाफोनी करून झाली. भाजी झाली आणि आज कणिक भिजवायची होती इतक्यात आपण डोळे कसे मिचकावतो तसे लाईटनेही २ ते ३ वेळा मिचकवले. लाईट जाणार की काय? थोडी शंका आली. लगेचच भराभर पाऊले उचलली. म्हणजे पटकन कणिक भिजवून अगदी मोजून ५ मिनिटे कणिक मुरल्यावर लगेच पोळ्या करून घेतल्या. थोड्या रात्रीसाठी पण लाटून ठेवल्या. गरम पाणी आहे तोवर लगेचच घाई घाईने अंघोळ उरकली.
अंघोळ उरकल्यावर वरण भाताचाही कूकर लावणार होते पण तितक्यात लाईट गेले. दुपारची जेवणे झाली. विनायक ऑफीसला चालत गेला आणि आता काय करावे बरे या विचारात मी थोडी आडवी झाले. लाईट काय दोन चार तासात येतीलच पण नाही आले तर आणि उद्याही आले नाहीतर? त्यापेक्षा उजेड आहे (तसा खूप उजेड नव्हता) तोवर काही ना काही दुकानातून घेऊन येऊ. खाली उतरणार आहोतच तर कचराही टाकू म्हणून जय्यत तयारीनिशी म्हणजे सर्व अंगाला सर्व बाजूने लपेटून घेतले. आणि जिन्याला धरून सावकाशीने खाली उतरले. कचरा टाकला आणि छत्री उघडून चालू लागले. पुढच्या चौकातच दुकान आहे. जास्त लांब नाही पण तरीही बोचरे वारे असल्याने शॉर्ट कटने गेले. वारे इतके होते की मी छत्री डोळ्यासमोर धरली होती. या शॉर्ट कट रस्त्याचे मी आज मनापासून आभार मानले. तसे तर हा रस्ता बनवला नाही. आमच्या अपार्टमेंटच्या समोर गॅस स्टेशन आहे आणि आमच्या दोघांमध्ये तारेचे कुंपण आहे. पण हे कुंपण लोक नेहमीच तोडून टाकतात त्यामुळे हा रस्ता तयार झाला आहे. चालत दुकानात गेले तर आत लाईट नव्हते. पॉवर नसली तरी जनरेटर असतो. पण या दुकानात का नव्हता कोण जाणे. दुकानातल्या मॅनेजरने दार उघडले आणि सांगितले की पॉवर नाहीये. सॉरी. मी म्हणाले की मी इमर्जन्सी साठी काही वस्तू घेण्याकरता आली आहे. तरी तो सॉरीच म्हणाला. मग मी बाहेरच्या बाकड्यावर थोडी दम खायला बसले . तितक्यात एक बाई बाहेर आली आणि मला सांगितले की तुला मॅनेजर बोलावत आहे. मी आत गेले आणि माझ्याबरोबर कॅशिअरही चालत चालत दुकानभर काही गोष्टींसाठी फिरला. दुकानात अगदी तुरळक मंद लाईट होते. तो मॅनेजर म्हणाला की नंतर येऊन पैसे द्या तर मी म्हणाले नको माझ्याकडे कॅश आहे. तेव्हा मग पैसे दिले आणि परत शॉर्टकटने घरी परतले. येताना झाडांकडे बघत होते. सर्व झाडे बर्फाने वेढलेली होती. एका हातात सामानाच्या कॅरी बॅगा होत्या. छत्री मानेने सावरली व एका हाताने फोटो घेतले. काय जरूर आहे का एवढे क्ररायची. पण हे क्षण गेले की गेले परत थोडीच येणार आहेत?
थंडीने जाम गारठले होते. आल्यावर चहा प्यावासा वाटत होता पण पॉवर नसल्याने कुठला आलाय चहा. सर्व कसे अगदी ठप्प होऊन जाते. मायकोवेव्ह नाही. इलेक्ट्रिक शेगड्या चालत नाही की गरम पाणी नाही. तसे गरम पाणी थोडावेळ टिकते. सामानात बटाटा वेफर्स, बिस्किटे आणि ब्रेड आणला होता. फळे होतीच , पिण्याचे पाणी होतेच त्यामुळे तितकी चिंता नव्हती. लाईट उद्याला आले नाहीत तर ब्रेड सँडविच खायचे असे ठरवले. टोमॅटो, काकडी, कांदा यांचे काप, थोडे लोणचे लावायचे ब्रेडला आणि साजूक तूप लावायचे. टोमॅटो केचप बरोबर असे हे जेवण आम्ही उद्या करणार होतो.
हिटर नसल्याने जाम थंडी वाजायला लागली. एरवी हिटर चालू असला की साधा स्वेटर ही घालायला लागत नाही पण आज बाहेर जाताना जसे लपेटून जातो तसेच लपेटून शिवाय मफलर गुंडाळून , दुलई घेऊन आडवी झाले. डोळे मिटून आडवे पडण्याशिवाय काहीच करता येत नाही लाईट गेले की. थंडी वाजून ताप भरतो की काय असे वाटू लागले. परत उठले. गरम पाणी आहे तोवर दुपारची साठलेली भांडी घासून टाकूया म्हणून घासली आणि तितक्यात लाईट आले. पण आले म्हणता म्हणता गेलेही. नंतर परत थोड्यावेळाने असेच झाले. लाईट आले म्हणून पटकन मायक्रोवेव्हचे घड्याळ सेट करून चहा ठेवायला गेले तर परत लाईट गेले. नंतर परत बराच वेळ लाईट नाहीत. असे वाटले की बहुधा आता ते येत नाहीत. आजची रात्र थंडीत कुडकुडत आणि ठार अंधारात काढावी लागणार बहुतेक असे वाटून गेले. अंधारून येत होते आणि तितक्यातच दिवेलागणीच्या सुमारास दिवे लागले. विनायक पण घरी आला. लाईट आल्यावर इतके काही हायसे वाटले. हिटरने संपूर्ण घर गरम झाले आणि आम्हीही गरमागरम चहा घेतला. आता काही लाईट जाणार नाहीत हे माहीती असून सुद्धा मी लगेच वरण भाताचा कूकर लावून घेतला. जेवताना आम्ही बोलत होतो की हेच जर लाईट आले नसते तर मेणबत्तीच्या प्रकाशात झोपून राहण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता ना ! थंडी असल्याने रात्रभर चांगलीच हुडहुडी भरली असती. कोणत्याची गोष्टींची कमतरता असली कीच त्या त्या गोष्टींची किंमत कळते ना ! आज रोजनिशी लिहायला मजा येत आहे.
Sunday, February 09, 2014
वेदर फोटो
१४ न्यूज कॅरोलायनावर अजून ३ फोटो दाखवले. हे फोटो मी केप फिअर नदी आणि
फोर्ट बीचवर काढलेले आहेत. डिसेंबर महिन्यात एका संध्याकाळी नदीवर आकाशात
खूप छान रंग जमा झाले होते आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते.
बीचवरचा फोटोही त्या दिवशी असाच छान मिळून गेला. ओहोटी असल्याने समुद्रात
असलेले काढ खडक व शेवाळे पहायला मिळाले. त्यामुळे हा फोटोही दाखवला. १४ न्यूज चॅनलचे नाव आता टाईम वार्नर केबल असे झाले आहे.
Thanks to Lee Ringer, Meteorologist, 14 News Carolina !
Friday, February 07, 2014
७ फेब्रुवारी २०१४
प्रत्येक दिवस खरच खूप वेगळा असतो , नाही का? तुम्ही म्हणाल त्यात काय,
नेहमीचेच रूटीन असते की, वेगळा कसा? तर तसे नाहीये. छोटी गोष्ट का
असेना पण ती वेगळी घडते. काही वेळा छोटीशीच गोष्ट खूप तापदायक ठरते तर काही
वेळा खूप उत्साह वाढवणारी असते. तसे तर गेले दोन दिवस असेच काही ना काही
वेगळे घडतच आहे. रविवारी समुद्रकिनाऱ्यावर गेलो तोही दिवस असाच काहीतरी खास
होता. म्हणजे ओहोटी अनुभवायला मिळाली आणि त्यातून नवीनच काहीतरी गवसले. त्याचा फोटो काढला. हा
फोटो माझ्या मनात घर करून राहिला आहे. तो फोटो मी वेदर चॅनलला पाठवला आणि
तो त्यांनी दाखवला. शिवाय वेबसाईटवरच्या फोटो गॅलरीतही लावला आहे. तसाच आजचा दिवस वेगळा आहे.
फेसबुकावरच्या दोन म्युझिक ग्रुपात आम्ही दोघेही आहोत, तिथे रोज काही ना काही थीमा सुरू असतात. त्याप्रमाणे गाणी टाकायची असतात. म्हणजे युट्युब वरच्या गाण्याच्या लिंका द्यायच्या असतात. आज एका ग्रुपमध्ये एक थीम अशी होती की सिनेमाचे नाव गाण्याच्या मुखड्यात न येता ते अंतऱ्यात यायला हवे. थीम आली आणि माझ्या मनात एकच गाणे आले ते म्हणजे तेरे मेरे सपने मधले ए मैने कसम ली. या गाण्यात तिसऱ्या कडव्यात या सिनेमाचे नाव आले आहे. तो अंतरा म्हणजे एक तन है , एक मन है , एक प्राण अपने, एक रंग एक रूप तेरे मेरे सपने. लगच्या लगेच हे गाणे टाकले. त्यामुळे मी आज खूप उत्साहात आहे. मला अभिमान आणि तेरे मेरे सपने मधली गाणी खूपच आवडतात. प्रत्येक वेळी ऐकताना आनंद देतात. गाताही येतात.
गेले दोन दिवस माझ्या मनात आई पूर्वी करायची ती वड्या घोळत होत्या. आल्याच्या वड्या करायच्या म्हणून रिकोटा चीझ आणलेच होते म्हणून त्या वड्याही केल्या गेल्या. आल्याच्या वड्या झाल्या, नंतर तीळाच्या वड्या झाल्या आणि आज टोमॅटोच्या वड्या झाल्या. पहिल्यांदाच केल्या. आधी थोड्या बिघडल्या. मग दुरूस्तही केल्या. रंग सुंदर आला आहे. या वड्यामध्ये बटाटा आणि थोडा नारळाचा खवही घालतात. आज दोन बटाटे जास्त उकडले होते बटाट्याचे डांगर करायला. संध्याकाळी खायला म्हणून केले होते. तितकी मजा आली नाही. बटाट्याचे डांगर खाताना खास मूड यायला लागतो. म्हणजे असे की बटाट्याचे पापड लाटताना अधून मधून डांगर खायला जास्त मजा येते. आज वांगे कांदे आणि टोमॅटो याचा रस्सा बिघडला. गांग्याच्या रस्सा भाजीत तेल कमी पडले की भाजी पांचट होते. शेवटी रात्रीच्या जेवणामध्ये या भाजीला वरून थोडी फोडणी करून घातली आणि फोडणीमध्ये थोडे लाल तिखट घातले आणि मग भाजीला खूप छान चव आली. जेवणे झाली. भांडी घासली. आणि रोजनिशी लिहायला बसले. आता झोपते. पण आजचा दिवस ए मैने कसम ली या गाण्याने खूपच आनंदात गेला.

Sunday, February 02, 2014
२ फेब्रुवारी २०१४
आजचा दिवस चांगला, स्वच्छ हवेचा होता. सकाळी उठल्यावर चहापाणी झाले आणि गॅलरीत उभी राहिले तर आहाहा, खूप छान हवा होती. असे वाटत होते की विंटर जाऊन स्प्रिंग सुरू झाला की काय? आणि मनात एकच विचार आला की बीचला फिरायला जावे. थोड्यावेळाने आज स्वयंपाक काय करायचा, की करूच नये , बाहेरच जावे, असा विचार करता करता भेंडीची भाजी आणि पोळी केली. विनायकच्या मनातही आज बीचवर जावे असे होते. हवा चांगली आहे ना? मग बाहेर पडा आणि दिवस सत्कारणी लावा. उगाच संगणकाच्या समोर बसून टिचक्या मारत बसू नका. असे संभाषण आमच्या दोघांच्यात हवा चांगली असेल की होतेच होते.
जेवण करून लगेचच समुद्रकिनारी जायला निघालो. आमच्या शहरापासून फोर्ट फिशर बीच साधारण १ तासाच्या कार ड्राईव्ह वर आहे̮. जेवण करून आडवे पडले की दिवस संपला. मग कसला आलाय समुद्रकिनारा ! उन्हाळ्यात ठीक आहे. दिवस संपता संपत नाही इतका लांबलचक असतो. मग या दिवसात जेवण करून, नंतर थोडी डुलकी काढून दुपारचा चहा घेऊन निघाले तरी चालते. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा रणरणते उन नसेल तर आम्ही सर्व तयारीनिशी बाहेर जेवूनच थेट बीचवर जातो. सकाळी नित्यनियमाची घरेदारे आवरण्याची व साफसफाईची कामे करून बाहेर जेवायला पडायचे ते थेट संध्याकाळी घरी परतायचे. अर्थात वीकेंडलाच. नाहीतर आठवड्याचे रूटीने हे ठरलेलेच असते की ! तर आम्ही निघालो आमच्या लाडक्या समुद्रकिनाऱ्यावर. याला मी खडकवासला बीच असे नाव दिले आहे. हा समुद्रकिनारा मला मनापासून आवडतो.
आजचा समुद्ररकिनारा काही वेगळाच होता ! आमची नेहमीची फेरी असते ती म्हणजे या किनारी आधी उजव्या बाजूला चालत जायचे. मग थोडे वाळून बसून उठायचे आणि समुद्रकिनाऱ्याच्या दुसऱ्या म्हणजे डाव्या टोकापर्यंत चालत जायचे. पण हे चालणे किनाऱ्यालगत होत नाही म्हणजे तसे चालताच येत नाही. समुद्राला लागून जे मोठमोठाले अवाढव्य खडक आहेत त्याच्या बाजूने एक रस्ता आहे तिथून चालत दुसऱ्या टोकाला यायचे आणि मग परतायचे.
या रस्त्यावरून चालताना एकीकडे समुद्र दिसत असतो आणि खडकावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज येतो. आज आम्ही काय केले तर आधी डाव्या बाजूच्या टोकाला गेलो आणि कधी नव्हे ते समुद्राचे पाणी आम्हाला नेहमीपेक्षा कमी वाटले. म्हणजे ओहोटी सुरू होती. ओहोटी आम्ही कधी पाहिलेली नव्हती. ओहोटीमुळे काय झाले होते की समुद्रकिनाऱ्याचा एक वेगळाच नजारा आज पहायला मिळाला. समुद्रातले काळे खडक आणि त्यावर साठलेले हिरवे शेवाळे असे वेगळेच काही दिसले. नेहमी समुद्राच्या लाटा खडकावर आदळत असतात आणि त्याचा आवाजची येत असतो. आज तसे नव्हते. विनायक म्हणाला आता आपण उजव्या नेहमीच्या टोकाला असेच चालत जाऊ. वरून रस्त्यावरून जायला नको. आणि चक्क आम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरून उजव्या टोकाला चालत आलो. असे कधीच होत नाही. कारण की भरतीमुळे सदैव पाणी असते. समुद्रालगतच्या खडकामध्ये तर खूप छान छान मोठे शिंपले अडकले होते. मी हात घालून काढण्याचा प्रयत्न केला पण ते तिथून अजिबात हलत नव्हते इतके ते त्या खडकांमध्ये अडकले होते. सीगल्स तर नेहमी मजा मारत असतात समुद्रकिनारी !
आज हवा चांगली असली तरी किनाऱ्यावर बऱ्यापैकी गारठा आणि वारा होता. अर्थात तो सहन होत होता. काल केलेल्या आल्याच्या वड्या बरोबर नेल्या होत्या. त्या खाल्या आणि जरा बरे वाटले. घरी आलो आणि चहा प्यायला. अजून दोन कामे बाकी होती ती म्हणजे ग्रंथालयात पुस्तके परत करायची होती आणि केबल चॅनलवर काही चॅनल्स का दिसत नाहीत हे पण विचारायचे होते. १४ न्यूज वेदर चॅनलची तर आम्हाला खूपच सवय झाली आहे. ती दोन्ही कामे केली आणि विचार केला की ग्रंथालयात आलोच आहोत तर नदीवरचा सूर्यास्त पाहून जाऊ. सूर्यास्त चांगला होता पण तितका चांगला नाही. थोड्यावेळ बसलो आणि थंडी वाढायला लागली म्हणून लगेच घरी परतलो. आज जेवायला काय करावे? परत कंटाळाच आला होता. मग भाज्या घालून सांजा केला आणि भांडी घासून रोजनिशी लिहायला बसले आहे. आजचा दिवस समुद्रकिनाऱ्यावरच्या दिसलेल्या वेगळ्या नजाराने खूप वेगळा भासत आहे. अता चहा प्यायची तल्लफ आली आहे. तो पिऊन मग झोपणार.
Wednesday, January 29, 2014
२९ जानेवारी २०१४
आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा खरच खूप वेगळा होता. ठप्प करणारा, गोठवणारा,
हुडहुडी भरणारा. तशी तर थंडीच्या दिवसामध्ये हुडहुडी ही भरतेच पण त्यातून
स्नो फॉल असेल आणि सूर्यप्रकाश नसेल तर शरीराच्या बरोबरीने मन ही अगदी पार
थिजून जाते, गोठून जाते. डोके बधीर होते. अर्थात आमच्या शहरात असे गोठवणारे
दिवस अगदी मोजूनच येतात ते एका अर्थी चांगलेच आहे म्हणा, नाहीतर माझे काय झाले असते कोण जाणे !
वेदर चॅनलवर मंगळवार दुपारपासून ते बुधवार सकाळपर्यंत हळू हळू करत स्नो पडणार होता हे वर्तविले होते. त्यामुळे खिडकीबाहेर सारखी बघत होते. आम्ही ज्या शहरात राहतो तिथे आम्हाला ९ वर्षे पूर्ण झाली. त्यामध्ये मोजून तीनदा बर्फ वृष्टी झाली आहे. २००९, २०११ आणि आता हा आजचा २०१४ चा स्नो फॉल. यामध्ये यावर्षीचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे हवेतून कापसासारखा स्नो पडणार नव्हता. आईस पडत होता. म्हणजे रिमझिम पाऊस कसा पडतो तसा पाऊस पडून तो खाली जमिनीवर पडला की त्याचे बर्फात रूपांतर होत होते. आज बुधवारी सकाळी प्युअर स्नो पडणार होता. तापमान मायनस १० दिवसभर. हिटर लावून सुद्धा भागत नव्हते. काल रात्रीपासूनच दरवाजा उघडून आणि खिडकीतून डोकावत होते. खाली पडणारा बर्फ साखरे सारखा दिसत होता. ग्रॅन्य्लेटेड शुगर सारखा.
हातात गोळा केला तेव्हा आणि वाटीत भरला असता तर कोणालाही वाटले असते साखर ठेवली आहे कि काय? रात्रभर अगदी थोडा थोडा पडत होता. मनात म्हणत होते एकदा दणादणा पडू दे ना, हा काय अगदी स्लो लोकलसारखा डकाव डकाव करत पडत आहे. अधूनमधून रात्रीही खिडकीतून बघत होते. नंतर थोड्यावेळाने झोप लागली आणि सकाळी उठून पाहते तर सगळीकडे पांढरे शुभ्र झाले होते. ज्या शहरांमध्ये सहसा कधी स्नो फॉल होत नाही त्या शहरात कधी नव्हे बर्फ पडला तर भंबेरी उडून जाते. रस्ता साफ करणारी यंत्रणा नसते त्यामुळे सर्व काही बंद असते. आणि त्यातून आजचा बर्फ तर घसरडा होता त्यामुळे कोणी बाहेर पडू नका. वरच्या मजल्यावर राहत असाल तर जिन्याच्या कठड्याला धरून सावकाश उतरा असे सांगत होते. मी बाहेर जायचा प्रयत्न केला पण भयानक थंडी होती. तरीही पोळी भाजी करून मफलर जाकिट, जीन्स घालून कॅमेरा घेऊन खाली अगदी सावकाश उतरले. तळ्यावर गेले. काही फोटो काढले. सारे काही ठप्प होते. एखादा चुकार माणूस रस्त्यावरून जात होता. बदकेही बर्फाच्छादित जमिनीवर बसून डुलक्या घेत होती. चिटपाखरू नव्हते. एखाद दुसऱ्या माझ्यासारख्या उस्ताहित बायका सर्व अंगभर लपेटून बाहेर पडल्या होत्या.
खरे तर मला स्नोचे काही ना काही बनवायचे होते पण स्नो नेहमीसारखा भुसभुशीत नसल्याने बनवणे राहून गेले. चालताना जाणवत होते. जमिनीवरचा स्नो खूप कडक होऊन बसला होता. आणि त्यामुळेच घसरण्याची शक्यता जास्त होती. आज दिवसभर तसे कंटाळ्यासारखे झाले होते. कंटाळा घालवण्यासाठी काहीतरी चमचमीत खायला करू असा विचार केला पण काय करायचे? पोटॅटो फ्राईड, बटाटा कीस की कांदा भजी. शेवटी पोटॅटो फ्राईड केले. हल्ली मी तेलकट करणे बंद केले आहे. एक दोन बटाट्याचे पोटॅटो फ्राईड केले पण ते चांगले झाले नाहीत. म्हणून लगेच आवरते घेतले. नंतर त्याच तेलात नाचणीचे व ज्वारीचे पापड तळले. आणि तेलकट खाऊन डोके दुखायला लागले. नंतर चहा केला आणि तो सुद्धा नेहमीसारखा मायक्रोवेव्ह मध्ये केला नाही. पारंपारिक पद्धतीने चहा पावडर घालून, आले किसून , दूध घालून चांगला उकळून केला. चहा मात्र छान झाला होता. आज दिवसभर बाहेर पांढरे पांढरे पाहून डोके बधिर होऊन गेले आहे. उद्याही मायनस तापमानच आहे. पण संध्याकाळ पर्यंत सर्व काही सुधारेल आणि मग परत थंडीच्या दिवसातही पुढच्या आठवड्यात थोडे हवामान गरम राहील.
हा असा स्नो फॉल एक दोन दिवसच ठीक. मला तर त्या एक दोन दिवसातच नकोसे होऊन जाते. बंद पेटीत राहून पेटी उघडून बाहेर काय चालू आहे ते बघायलाच फक्त पेटीचे दार उघडे करायचे . अगदी तसेच वाटते मला या दोन दिवसात. बंद पेटीत, कडेकोट बंदोबस्तात राहिल्यासारखे. मला थंडीतले मायनस तापमान आवडते अर्थात ते सुद्धा सेल्सिअस मध्ये पण स्नो! नको रे बाबा ! मायनस तापमान मी क्लेम्सनमध्ये असताना एंजॉय केले आहे. त्यावेळेला मला पहिली नोकरी एका चर्चमध्ये लागली होती. सुरवातीला कार नव्हती. त्यामुळे मी सकाळी ७ ला चालत चालत चर्चमध्ये जायचे. २० मिनिटे लागायची पोहोचायला. सर्व जामानिमा करून चालत सुटायचे. खूपच मजा यायची. चालताना तोंडातून वाफा यायच्या. आणि मायनस तापमानात कोवळी सूर्यप्रकाशाची किरणे आणि स्वच्छ सुंदर हवा खूप सुखावून जायची.

Sunday, January 19, 2014
१९ जानेवारी २०१४
आज बरेच बरेच दिवसांनी रोजनिशी लिहित आहे. आज लिहाविशी वाटली याचे कारण
आजची संध्याकाळ खूप सुंदर गेली. थंडीचे दिवस असल्याने तसे बाहेर फिरणे
किंवा चालणे कमीच झाले आहे. पण जरा कुठे थोडी थंडी कमी वाटली रे वाटली की
लगेच आम्ही चालायला बाहेर पडतो. शनिवार रविवार पैकी एक दिवस आमचा चालण्याचा
असतो. चालण्याची ठिकाणे दोनच ती म्हणजे नदी आणि तळे. या दोन्हीकडे आधी
कारनेच जायला लागते. मग कार पार्क करून चालायला सुरवात करायची. उन्हाळ्याचे
रोजचे चालणे म्हणजे राहत्या घरापासून बाजूचा असलेला रस्ता. अर्थात
त्यावरून जास्त मजा येत नाही पण रोजच्या रोज चालायचेच असे ठरवले तर चांगला
आहे. तसे तर पूर्वीसारखे भरपूर चालणे कमीच झाले आहे.
हल्ली मी रविवारी सकाळी संपूर्ण दिवसाचा पोळी भाजी , भात आमटी असाच स्वयंपाक करून ठेवते. काल खूपच थंडी असल्याने बाहेर पडलो नाही. त्यामुळे ग्रोसरी करायची पण राहून गेली होती. आज दुपारी चहा घेऊन कुठे जायचे हे ठरवत होतो. संध्याकाळ लवकर होत असल्याने तळ्याकाठी जायला तसे थोडे नको वाटते. तिथे खरे तर चालायला छान आहे पण शुकशुकाट असतो. तसा उन्हाळ्यात पण तिथे जास्त कोणी जात नाही. उन्हाळ्यात तर नदीवर खूप गर्दी असते. लहान मुलांना घेऊन नदीवरच्या पूलावरून सर्वजण चालत असतात. आज थोडे लवकर निघू म्हणजे सूर्यास्त पहिल्यापासून बघायला मिळेल आणि ग्रोसरी घेऊन घरी यायला पण जास्त रात्र होणार नाही असे मी विनायकला म्हणाले. आम्ही दोघे चहा पिऊन लगेचच निघालो. खूप लवकर जातोय का आपण? असे मी म्हणाले, पण जाऊदे, आता निघालोय ना.! नदीजवळच ग्रंथालय आहे तिथे पुस्तके परत केली आणि नदीवरून चालायला सुरवात केली. आकाश निरभ्र होते. आकाशात ढग असले की निरनिराळे रंग आकाशात तयार होतात. आज तसे काहीच झाले नाही. सूर्यास्ताला पण वेळ होता. चालण्याची फेरी पूर्ण केली आणि आईस्क्रीम खाल्ले. सूर्य हळूहळू खाली सरकत होता. अर्थातच सूर्यास्ताचे फोटो काढले. निळे आकाश त्याचे पाण्यावरचे निळे प्रतिबिंब आणि सूर्य अस्ताच जात आहे. अस्तास जात असताना त्याचे पाण्यातले प्रतिबिंब, त्याची सूर्यकिरणे असा एकूणच सूर्यास्ताचा फोटो खूप छान आला त्यामुळे आनंद झाला. ग्रोसरी केली. आणि आमच्या गावात असलेल्या एका दुकानात जिथे थोडे भारतीय किराणाही ठेवलेला असतो तिथे गेलो तर चक्क मला पाणी पुरीचे एक पाकिट दिसले. ९ वर्षात पहिल्याप्रथमच ! त्या पाकीटामध्ये ३० पुऱ्या आहेत त्यामुळे एकदा दही बटाटा पुरी करणार आहे.
आज त्या दुकानात जाऊन गुळाच्या छोट्या ढेपाही घ्यायच्या ठरवल्या होत्या. कारण की फेसबुकावर मी एक छान गुळाच्या पोळीचा फोटो पाहिला आणि मला आता जाम इच्छा झाली आहे गुळाच्या पोळ्या करून खाण्याची. बोअर काम आहे पण बघू कधी होतायत ते. काही वेळेला संध्याकाळ नाहीतर काही वेळेला पूर्णच्या पूर्ण दिवस इतका काही छान जातो की अगदी कायम लक्षात राहतो. तशीच आजची एक संध्याकाळ होती. आणि त्यामुळे आजच मला रोजनिशीची आठवण होऊन लगेच रोजनिशी लिहिली गेली.

Tuesday, January 14, 2014
भारतभेट २०१३ फोटो
भारतभेटीत जी मजा केली त्याचे फोटो इथे देत आहे. आईबाबांकडील बाग आहे
त्यातली गुलाबाची आणि शेवंतीची फुले. आकाशकंदील, रांगोळ्या व इतर असे अनेक
फोटो भारतभेटीमध्ये काढले. रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांच्या रांगोळ्या व त्यात
रंग भरणे व काही दारापुढे नक्षी काढली. वेलबुट्टी काढली. दिवाळीची खूप हौस
करून घेतली.
Wednesday, January 08, 2014
अनामिका ... (९)
मैत्रिणीच्या मावसबहिणीचे लग्न थाटामाटात पार पडते. संध्याकाळच्या रिसेप्शन पार्टीला सगळेजण तयार होतात. संजली पण एक छान साडी नेसून तयार होते. तिच्या हातात मोबाईल असतोच. अमितचा फोन येणार असतो. उशीराने विमानाचे उड्डाण असल्याने विमानतळावर गेल्यावर तो संजलीला फोन करणार अस्तो. अमितचा फोन कधी येईल या विचारात ती असते. तितक्यात फोन वाजतो. लगबगीने संजली नवऱ्या मुलीच्या खोलीत शिरते. "बोल अमित" अमित तिला सांगतो मी आता विमानतळावर जायला निघतोय तिथे पोहोचलो की साधारण तासा दोन तासाने तुला फोन करीन म्हणजे ११ वाजता. तू झोपणार नाहीस ना ! संजली म्हणते नाहीरे , मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आम्हाला सुद्धा घरी पोहोचतेपर्यंत उशीर होईलच. पण आता तुला नाही का बोलता येणार? कारण की आता इथे माझ्या आजुबाजूला कोणीच नाहीये. नंतर घरी गेल्यावर मात्र माझ्या मैत्रिणी असतील. पण तरी बघते मी कसे काय मॅनेज करता येईल ते !
रात्री उशीरापर्यंत मंडळी घरी परततात. सर्वजण खूप दमलेले असतात. घरात पसारा असतो. संजली व तिच्या मैत्रिणी खोलीत येतात कुणालाही बोलायची ताकद नसते. उद्या सकाळी पुण्याला परत जायला लवकर निघायचे असते. संजलीला झोप येत असूनही तिला जागेच रहायचे असते कारण की अमितचा फोन येणार असतो. संजली मात्र या सगळ्या गर्दीत मला अमितशी कसे काय बोलता येणार आहे कोण जाणे, अशा विचारात असते. कार्यालयात अमितचा फोन आला तेव्हाच का नाही बोलला आपल्याशी? काय करावे आता? अशा विचारातच ती आडवी होते. हातात मोबाईल असतोच. दारावरची बेल वाजते. कोणीतरी निरोप घेऊन आलेले असते की वरच्या मजल्यावरच्या पाहुण्यांमध्ये एका आजींना त्यांच्यासोबत झोपायची गरज आहे. त्यांना जरा बरे वाटत नाही तर कुणी तयार आहे का? संजली लगेचच होकार देते. दुसऱ्या मजल्यावर त्या आजीबाई एकट्याच एका रूममध्ये झोपलेल्या असतात. त्या म्हणतात माझा सून एका नातेवाईकांकडे गेली आहे ती उद्या येईल. आणि मला थोडे बरे वाटत नाही म्हणून तुम्हाला बोलावले. संजली त्या आजींना सांगते काही काळजी करू नका. मी आज तुमच्या सोबतीला आहे. काही लागले तर सांगा. फक्त मला एक फोन येणार आहे तर चालेल ना? आजी म्हणतात अगं हो, न चालायला काय झाले? मी तर आता औषध घेऊन लगेच झोपेन. कदाचित मला झोप लागेल. आज सबंध दिवस लग्नात दगदग झाली इतकेच. त्यामुळे थोडे ताप आल्यासारखे वाटत आहे.
त्यांच्या समोर असलेल्या कॉटवर संजली आडवी होते. रिंगटोन खूप कमी करते. संजलीला काही केल्या झोप येत नसते. केव्हा करणार हा फोन? असे म्हणत पाणी प्यायला उठते आणि आजींना झोप लागली आहे का नाही ते बघते. तर त्या शांत झोपलेल्या असतात. परत येऊन कॉटवर पडते. तिला खरे तर खूप झोप येत असते पण झोपता तर येत नसते अशी अगदी वाईट अवस्था होऊन जाते. अमितच्या फोनची वाट बघून बघून तिला कंटाळा येतो तेवढ्यात फोन वाजतो. तो अनिलचा असतो. तो विचारतो काय गं उद्या निघताय तुम्ही सर्व? मला उद्या एक महत्त्वाची मिटिंग आहे त्यामुळे मी दिवसभर नाहीये आणि आईला पण जरा बरे वाटत नाही. तर लवकर निघून या. म्हणजे तुला पण घरी आल्यावर जरा विश्रांती मिळेल. संजली जांभया देत देत अनिलला उत्तरे देत असते. आणि म्हणते चल बाय. मी झोपते आता. उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून फोन बंद करते. आणि लगेचच अमितचा फोन येतो. अमितचा फोन आल्यावर मात्र तिची झोप उडते आणि उत्साहात बोलायला लागते. त्याला ऐकू जाईल अशा आवाजात पण थोडे हळू बोलत राहते. त्याचे बोलणे थांबूच नये असे तिला वाटत असते. मागच्या काही आठवणी निघतात. अमित तिच्या आईवडिलांची पण चौकशी करतो. बऱ्याच वेळ गप्पा मारल्यावर अमित म्हणतो चल आता मी फोन ठेवतो. विमानात बसायला सुरवात झाली आहे. मी तुला पोहोचल्यावर फोन करेन पण वाट पाहू नकोस. नंतर कधीतरी वेळ मिळेल तसा तुला फोन करीन आणि हो पुढच्या वर्षी आल्यावर अनिलला नक्की भेटेन मी. अगं तो माझा चांगला मित्र आहे पण पूर्वी काही घटना घडल्या आणि मी त्या घरात येईनासा झालो, ते का हे मी तुला सांगितलेच आहे, त्यामुळे त्याचे माझ्याशी बोलणे झालेच नाही.
परत एकदा आजींकडे बघते तर त्या शांत झोपलेल्या असतात. मनात म्हणते बरे झाले त्या झोपल्यात त्यामुळे मला अमितशी छान बोलता आले. तिला बराच वेळ झोप येत नाही. पहाटे पहाटे तिला थोडी झोप लागते. सकाळी तिच्या मैत्रिणी तयार होऊन तिच्या खोलीची बेल वाजवतात तेव्हा संजली दचकून जागी होते. दार उघडताच ' अगं संजली तुला किती फोन केले. तु तुझा फोन बंद करून का ठेवलास? चल आवर लवकर तुझे. आपल्याला निघायचे आहे. संजली भराभर आवरून तयार होते. लग्नघरी सर्वांचा निरोप घेऊन संजली व तिच्या मैत्रिणी पुण्याला जायला निघतात. वाटेत संजली थोडी थोडी डुलकी घेत असते. तिला खूप दमल्यासारखे झालेले असते. ती तिच्या घरी येते तेव्हा आत्याबाई घरात असतात. अनिल मिटिंगला आणि मुलगा शाळेत गेलेला असतो. आत्याबाई विचारतात कसे झाले लग्न? खूप मजा केलीत का तुम्ही मैत्रिणींनी? स्वयंपाक तयार आहे. आपण दोघी जेवू. "हो आत्याबाई. खूप मजा आली लग्न छानच झाले. प्लिज आत्याबाई. तुम्ही बसा जेवायला. मी वाढते तुमहला. मला अजिबात भूक नाहीये. मध्ये वाटेत खाणे झाले आहे. मी वर जाते. आत्याबाईना जेवायला वाढून संजली वरच्य मजल्यावरच्या तिच्या खोलीत निघून जाते.
प्रवासाचा शीण जाण्याकरता ती डोक्यावरून अंघोळ करते. ओले केस टॉवेलमध्ये गुंडाळते व त्याचा अंबाडा घालते. एक कॉटनची हलकी साडी नेसून झोपते. झोपताना ती आठवणीने दार लावते. तिला आता कोणीही तिच्या खोलीत यायला नको असते. रात्रभर झालेले जागरण व दगदग यामुळे तिला गाढ झोप लागते. झोपेतून उठते तर अनिल आलेला असतो. तिल म्हणतो अगं किती गाढ झोपली होतीस. खूप दगदग झाली का?
नाहीरे, खूप मजा आली. थोडी कालच्या जागरणाने आणि लवकर उठून लगेचच प्रवासाला निघाल्याने थोडे दमायला झाले आहे इतकेच. ती खाली जाते आणि स्वयंपाकाचे बघते. थोड्यावेळाने सर्वजण जेवायला बसतात. जेवताना तिने व तिच्या मैत्रिणींनी कसे शॉपिंग केले, काय काय मजा केली, लग्न कसे थाटामाटात झाले. याचे सविस्तर वर्णन सांगते. अनिलला ते ऐकून बरे वाटते पण एकीकडे त्याच्या मनात प्रश्नचिन्हही उभे राहते की संजली यापूर्वी उत्साहात असायची पण
क्रमशः ...
Thursday, December 05, 2013
Thursday, November 28, 2013
भारतभेट २०१३
भली मोठी बॅग रिक्शातून खाली काढली. रिक्शावाल्याला पैसे दिले आणि वर पाहिले तर लाल चुटुक गुलाब वाऱ्यावर डोलत होता. एका कुंडीत भरगच्च शेवंतीही फुलली होती. लिफ्टने वर गेले आणि बेल वाजवली "टिंगटाँग" आईने दार उघडेच ठेवले होते. जाळीच्या दारातून आत पाहिले तर आई माझी आतुरतेने वाट पाहत कॉटवर बसलेली दिसली.
घरात शिरल्यावर बाबाही दिसले. बाबांनी विचारले "गुलाब पाहिलास का? " हो तर! गुलाबाने छानच स्वागत केले माझे! मी म्हणाले. बाल्कनीत गेले आणि एकेक फुलाकडे निरखून पाहिले. फुले खूपच गोड दिसत होती! बागेत नवीन पाहुणा आलेला दिसला आणि तो म्हणजे नारिंगी रंगाचा जास्वंद! इतका काही छान दिसत होता! आईने साबुदाणा भिजत घातला होता पण मी म्हणाले प्रवासात मी इडली चटणी खाल्ली आहे. संध्याकाळी करू खिचडी, आणि मी करते, माझ्या हातची खा!
श्री भिडे यांची १३ सीटरची गाडी पुणे डोंबिवली व डोंबिवली पुणे सकाळ संध्याकाळ धावते. त्यांच्यातर्फे मधल्या वाटेत खायला इडली चटणी असते. हलकीफुलकी इडली चटणी खाऊन पोट भरले होते! आदल्या दिवशी मुंबई विमानतळावरून डोंबिवलीस आलो तेव्हा सकाळी सुषमाने गरम गरम उपमा केला होता. प्रचंड भूक लागली होती त्यामुळे तो खाताना खूप बरे वाटत होते! काही वेळाने अर्चना आली व येताना गरम साबुदाणा खिचडी घेऊन आली. भारतात आल्या आल्याच खादाडीला सुरवात झाली होती. आईकडे जेवण झाल्यावर थोडी डुलकी घेतली. संध्याकाळी दूधवाला चिकाचे दूध घेऊन आला. बरेच वर्षांनी खरवस खाण्याचा योग आला होता.
आईकडे आल्यावर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. तब्बल १२ वर्षांनी भारतामधली दिवाळी अनुभवत होतो. खाऊवाले पाटणकर यांच्याकडून कडबोळी घेतली. मला आवडते म्हणून खारी आणि राजगिऱ्याच्या वड्याही घेतल्या. शिवाय दोन तीन प्रकारच्या गोळ्या व बिस्किटेही घेतली. ह्या दुकानासमोरच्या दुकानातून उटणे, वासाचे तेल, अत्तरे याचीही खरेदी झाली. ठिकठिकाणी आकाशकंदील विक्रीकरता झळकत होते. आकाशकंदील किती बघू नि किती नाही असे मला झाले होते. आकाशकंदिलाची खरेदी झाली. रांगोळी, रंग, घेतले. व माझ्याकरता आईने फुलबाज्याही घेतल्या! ड्रेसच्या कापडाची खरेदी झाली. काही ब्लाऊजपिसेस घेतले. लुंकडकडे ड्रेस मटेरियलच्या थप्याच्या थप्प्या विक्रीसाठी होत्या. ते बघण्यात खूप वेळ गेला. शेवटी २ ड्रेसची कापडे घेतली. एक पाडव्याच्या ओवाळणीसाठी व एक माझ्या भाचीच्या वाढदिवसानिमित्त देण्याकरता. खूप वेळ भटकून जोरदार भूक लागली. मग खादाडीही केली. मसाला डोसा व चहा अप्रतिम होता. बाजीराव रोडवरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूच्या बोळात एका गुजराथ्याचे दुकान आहे तिथे हा डोसा १७ रूपयात मिळतो. बऱ्याच वर्षानंतर भट्टीतले खारे दाणे खाल्ले. हे खारे दाणे घरी पण करता येतात त्यामुळे तेही केले.
दुसऱ्या दिवशी परत आमची खरेदीकरता बाहेर फेरी. मी, बाबा व आई तिघेही परत १० च्या सुमारास रिक्शात बसलो. ग्रीन बेकरीत बटाटावडा, इडली व समोसे खाल्ले. नंतर लगेच रसवंतिगृहामध्ये रस! हा रस मी कधीही चुकवत नाही. नंतर चितळे स्वीट मार्ट मधून लुटालूट! खास दिवाळीकरता बेसन, रवा व मोतीचूर लाडू व अनारसे ! शिवाय साटोऱ्या, आंबा बर्फी, काजुकतली, पेढे, सुतरफेणी, माहीम हलवा, बाकरवडी, शेव, फरसाण. यादी खूपच लांबलचक होती. ओल्या नारळाच्या करंज्या व चकल्यांची ऑर्डर आईने जवळच राहणाऱ्या एका ओळखीच्या बाईंकडे दिली होती. आईला आता होत नाही त्यामुळे गेले २ ते ३ वर्षे ती हे सर्व विकतच आणते. मलाही यंदाच्या भारतभेटीत हे सर्व आयते खायला मिळाले होते. अमेरिकेत दिवाळीत मी थोडे थोडे सर्व करते. त्याचीही मजा येतेच पण तरीही भारतातली मजा काही निराळीच! चिवडा मात्र मी घरी केला. आईला सांगितले तू मला सर्व सामान काढून दे आणि बाहेर बस. मी सर्व काही करते. अजिबात सूचना देऊ नकोस. बाकी कशात नाही तरी चिवडा करण्यामध्ये मी बऱ्यापैकी तरबेज झाली आहे. आईला चिवड्याची चव बघायला सांगितली आणि म्हणाले तुझ्या पसंतीस उतरला आहे का? तर म्हणाली, छानच झालाय! पण थोडी साखर हवी होती. पूर्वीच्या सर्वच कोब्रा बायका नारळ, दाण्याचे कूट आणि साखर यांचा स्वयंपाकात सढळ हाताने वापर करतात ना!
यावर्षीचा प्रत्येक दिवस इतका काही छान गेला की अगदी कायम लक्षात राहील. एके दिवशी पिठले भाकरी, तर एके दिवशी आंबोळी, तर एके दिवशी चकोल्या! मला भाकऱ्या थापायला खूपच आवडतात. एक दिवस रविवारी झी मालिकांमध्ये काम करणारे यांचा बक्षीस वाटप समारंभ होता. त्या दिवशी चकोल्या केल्या. दुपारी खास लोकाग्रहास्तव होणार सून मी या घरची यातला लग्न सोहळा होता व संध्याकाळी ४ तास झी मराठीचा समारंभ. सकाळी गरम चकोल्या व रात्रीही जेवायला त्याच होत्या. त्यामुळे स्वयंपाकात जास्त वेळ न घालवता मी व आईने मनसोक्त टीव्ही बघितला. एके दिवशी आईबाबांना लग्नाला जायचे होते. त्या दिवशी मी एकटीच घरी होते, अर्थात काही तासांपुरतीच. मग मी भाजणीचे थालीपीठ जेवायला केले. गरम गरम थालीपीठ खाताना एकीकडे विविध भारतीवरची हिंदी गाणी ऐकत होते. हा दिवसही वेगळाच गेला.
यावर्षी तुळशीबागेत खरेदीनिमित्त दोन चार वेळा चकरा झाल्या. बऱ्याच वर्षानंतर काचेच्या बांगड्या भरल्या. दिवाळीत रांगोळी काढायची हौस करून घेतली. ठिबक्यांच्या रांगोळ्या काढताना हात दुखत होते आणि बसून रांगोळीत रंग भरताना पाठही दुखत होती. वेलबुट्टी व नक्षीही काढली. बाबांनी नेहमीप्रमाणेच मोराची व हत्तीची रांगोळी काढली. आकाशकंदिलाकडे तर सारखे पाहत राहावेसे वाटत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर मी बाल्कनीतच काही तास उभी होते. भुईनळे, फुलबाज्या, फटाक्यांचे आवाज हे सर्व बघताना छान वाटत होते. मी लहान मुलाप्रमाणे फुलबाज्या उडवल्या. चारही दिवस पक्वान्नांचे जेवण जेवलो. विनायकचे काका, चुलत बहिणी, चुलत भाऊ, आई यांच्याकडे जेवणे व गप्पा ठोकणे हाच कार्यक्रम चार दिवस चालू होता. पक्वान्नामध्ये बासुंदी, गुलाबजाम, फ्रूटसॅलड, दुधी हलवा होते. दुधी हलवा पाडव्याच्या दिवशी आईकडे होता आणि त्याची फर्माइश मी आधीच फोनवरून बोलताना केली होती. सुहासदादाने आठवणीने येऊन मला भाऊबीज घातली. बऱ्याच वर्षानंतर भाऊबीजेचा आणि पाडव्याचा ओवाळण्याचा कार्यक्रम झाला.
आईकडे रोज सकाळ, दुपार, रात्र भरपूर विविध भारतीवर गाणी ऐकली. मला आवडणारी कामे केली. गॅसवर चहा, कपडे वाळत घालणे, केर काढणे, नारळ खरवडणे, भाकरी थापणे इत्यादी. दरवर्षी मी थालीपिठाची भाजणी नेते. ती जवळजवळ ६ किलो भाजली. आईने काही मायक्रोवेव्हवर भाजून दिले. आईचे पाय चेपले, एकदा मी आईला व एकदा आईने मला गरम गरम पोळ्या वाढल्या. आईच्या आवडीचे तिला गरम गरम खायला करून घातले. बटाट्याचा कीस, साबुदाणा खिचडी, साबुदाणे वडे हे आमच्या दोघींचे खूप आवडते पदार्थ आहेत. त्यामुळे आम्ही दोघींनी ते चवीचवीने खाल्ले. आईकडचे साजूक तूप, लोणीही खाल्ले. रोज सकाळी बाबांच्या हातचा चहा आणि आईच्या हातचा मऊभात असायचा.
एक दिवस अंजलीचा फोन आला व तिने मला विचारले आहे का तुला २/३ दिवसात वेळ? तसा तिलाही खूप वेळ नव्हता. ती पण तिच्या दिवाळसणा निमित्ताने खूप व्यग्र होती. योग होता म्हणून भेट झाली. त्या दिवशी आम्हाला दोघींनाही वेळ होता. मलाही कुठे जायचे नव्हते. मी व आई तिच्या घरी गेलो. तिचे नवीन घर मी प्रथमच पाहिले. तिच्याकडचा दिवस खूप छान गेला. सिमलामिरचीच्या भाजीचे कौतुक तिच्याकडून फोनवर ऐकले होते. भाजी खूपच सुंदर झाली होती. जेवणानंतर तिने तिच्या कामवालीच्या सुनेला बोलावले होते मला मेंदी काढण्याकरता. बऱ्याच वर्षानंतर माझ्या हातावर मेंदी रंगली. ही तिची भेट तर मला खूपच आवडून गेली. नंतर संध्याकाळी माझ्या आवडीची साबुदाणा खिचडी तिने केली. त्याची चव अजूनही माझ्या आठवणीत आहे. तिची नणंद शंकरपाळे व शेव करते. त्याची पाकिटे तिने आम्हाला दिली. चव अप्रतिम होती! शंकरपाळे व खारी मीच एकटीने चहाशी खाऊन संपवली. अंजलीकडून निघताना आईने तिला व तिच्या यजमानांना जेवायचे आमंत्रण दिले. त्या दिवशी तिच्या आवडीचे बटाटेवडे केले होते. डाळिंब्या, वरण भात, नारळाची चटणी,, बटाटेवडे व पाव असा बेत त्या दोघांना खूपच आवडून गेला.

३ वर्षांनी आम्ही मनोगती दादरला छायाताईंकडे भेटलो. दादर पुणे एशियाडने जाण्याचा अनुभव बऱ्याच वर्षांनी घेतला. छायाताईंकडे मला नेहमीच खूप आराम मिळतो. त्यांच्या घराच्या खिडकीतून समुद्राला पाहता येते. समुद्राचे गार वारे खायला मिळते. छायाताईंकडचा तो दिवस खूप सुंदर गेला. ओघवत्या गप्पांचा आनंद दिवसभर घेत होतो. मी, विनायक, सौ व श्री पटवर्धन, मिलिंद फणसे, राधिका जमलो होतो. बाहेर जेवणाचा कार्यक्रम पण सुंदर झाला. छायाताईंनी युरोप ट्रीप केली त्याचे फोटो बघितले. खूप सुंदर फोटो टीव्हीच्या पडद्यावर छानच दिसत होते. दरवेळच्या भारतभेटीत जसे जमेल तितक्या नातेवाईक व मित्रमंडळींना भेटते. सुहासदादाच्या कारमधून निगडीला अनिताच्या घरी जाऊन आलो. त्या दिवशी कारचा प्रवास छान वाटून गेला. प्रवासात पुण्याचे बदलते रूप पाहत होते व आठवणींना उजाळा मिळत होता. तशीच संध्याकडेही आईबाबांबरोबर जाऊन आले. तिथेही खूप आराम मिळाला. संध्याने मला ज्वारीचे व नाचणीचे पापड दिले. मीराताईंची भेट पुण्यामध्ये ठरवूनही झाली नाही याची रुखरुख मनाला लागून राहिली आहे. काही कामाकरता मला डोंबिवलीस ठरलेल्या वाराच्या आधीच जावे लागले आणि तसेच पुढे आम्ही दोघे मुंबई विमानतळावर अमेरिकेस रवाना होण्याकरता गेलो.
अमेरिकेत परतण्या आधी मोजून ३ दिवस डोंबिवलीस आले व काही रेंगाळलेली कामे उरकत होतो, तरीही ती पूर्ण झालीच नाहीत. काही झाली काही राहिली. कामे उरकण्याच्या निमित्ताने डोंबिवलीतच होतो त्यामुळे मी ऑर्कुटवर २००५ मध्ये झालेल्या २ मैत्रिणींना त्यांच्या डोंबिवलीच्या घरी भेटले. स्मिता चावरे व रमा काळे या दोघींनाही माझ्याइतकाच आनंद झाला होता. स्मिताकडे साजूक तुपातला बुंदीचा लाडू आणि रमा कडे माझे अत्यंत आवडते पोह्याचे डांगर खाल्ले. शिवाय तिने मला अनारसा पीठही दिले. तसेच अर्चनाकडेही गेलो, तिने पावभाजी व शेवयांची खीर केली होती. डोंबिवलीच्या मार्केटमधून काही कामानिमित्त बरीच फिरले. डोंबिवलीला एक फेरफटका झाला. फिरताना पूर्वीच्या आठवणी येत होत्या. यावर्षी आमचे सोसायटीतले मित्रवर्य यांच्या हातची साबुदाणा खिचडी खाल्ली. अत्यंत चविष्ट अशी ही खिचडी होती. या खिचडीची एक वेगळी पद्धत आहे. त्यानुसार एकदा करून पाहणार आहे. शिवाय इडली सांबार चटणी आणि शेगावची कचोरीही त्यांनी एकदा न्याहरीला आणली होती. शैलाताई दरवर्षी आम्हाला जेवायला बोलावतात. जेवणामध्ये दर वेळेस वेगळा आणि छान चविष्ट मेनू असतो. यावेळी बटाटा परोठे, टोमॅटो सूप आणि आइसक्रीम होते. नेर्लेकर व आमच्या घरी कामाला येणारी इंदुबाई हिच्या हातच्या तलम भाकरी खाण्याचा एक छान योग जुळून आला. इंदूबाईने धुणे भांड्यांची कामे सोडून स्वयंपाकाची कामे धरली आहेत. अतिशय कष्टाळू आहे. तिचे दैनंदिन रूटीन ऐकून मी थक्कच झाले. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत ही काम करत असते.
दरवर्षीच्या भेटीत काही ना काही उरतेच अर्थात ते पुढील भारतभेटीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी विनायक व त्यांच्या चुलतबहिंणींची भाऊबीज छान झाली. जयसिंगपुरच्या बहिणीने खूप फिरवले. गणपतीपुळे, नरसोबाची वाडी, सांगलीचा गणपती, कोल्हापूर अशी बरीच भटकंती झाली. पुण्यावरून डोंबिवलीला येताना सूर्यास्ताचा फोटो चालत्या गाडीतून काढला. खूप सुंदर दिसत होता. शिवाय परतीच्या प्रवासात अटलांटा विमानतळावर अजून एक सुंदर सूर्यास्त पाहायला मिळाला. त्याचाही फोटो घेतला.
२०१३ ची भारतभेट अतिशय सुंदर झाली. बरीच खादाडी, आवडती कामे आणि आराम असे सर्व काही झाले. काहींना भेटायचे राहून गेले ते पुढील भारतभेटीत जमवणार. मन प्रसन्न व ताजेतवाने झाले. काही वेळेला मात्र खूप बडबड करून आणि माणसांचे आवाज ऐकून डोके भणभणायला लागायचे. तर काही वेळेला रस्त्यातली गर्दी पाहून चिडचिड व्हायची. अमेरिकेतल्या घरी आल्यावर मात्र इथली भयाण शांतता खूप टोचायला लागली आहे. भारतातल्या आठवणीत रमावेसे वाटते पण कुठेतरी रूटीनला सुरवात केलीच पाहिजे म्हणून सर्व आठवणी जेव्हा कागदावर उतरवते तेव्हा जरा हलके झाल्यासारखे वाटते! आता पुढच्या भारतभेटीचा ऋतू कोणता बरे निवडावा याची विचारचक्रे तूर्तास तरी मंद गतीने सुरू झाली आहेत.

Wednesday, November 27, 2013
Subscribe to:
Posts (Atom)